Twitter वरील इतर आपल्याशी कसे परस्पर-संपर्क साधत आहेत ते पाहण्यासाठी सूचनापत्रे टाइमलाइनच्या माध्यमातून एक सोपा मार्ग ऑफर केला जातो.
सूचनापत्रे टाइमलाइनवरून, आपल्या कोणत्या ट्विट्स पसंत केल्या, अलीकडील पुनर्ट्विट्स (आपल्या ट्विट्सपैकी), आपल्याकडे निर्देशित केलेल्या ट्विट्स (प्रत्युत्तरे आणि उल्लेख) आणि आपल्या नवीन फॉलोअर्सच यादी, तसेच आपले नवीन खाते फॉलोअर्स आपल्याला पाहता येईल.
आपण आपली सूचनापत्रे तीन प्रकारे पाहू शकता: सर्व यामध्ये आपल्याला खाते कृतीसाठी सूचनापत्रे दाखवितात, जसे की नवीन फॉलोअर्स, पुनर्ट्विट्स, उल्लेख आणि पसंती. उल्लेख यावरून आपणास केवळ आपल्या उपभोक्ता नावाचा उल्लेख करणाऱ्या या ट्विट्ससाठी आणि सत्यापितवरून केवळ सत्यापित निळा चेकमार्क असलेल्या खात्यांकडील ट्विट्सची सूचनापत्रे दाखविली जातात.
आपल्या सूचनापत्रांशिवाय, आपल्याला ज्या मजकुरामध्ये सर्वाधिक रस आहे आणि चर्चांमध्ये आपण अर्थपूर्ण मार्गाने योगदान देत आहात असे आम्हाला वाटते तो मजकूर आम्ही वर ठेवू, जसे की संबंधित, विश्वासार्ह आणि सुरक्षित मजकूर.
मला मिळणारी सूचनापत्रे मला फिल्टर करता येतात का?
होय. आपण Twitter वर काय पाहता आणि कोणाशी परस्पर-संपर्क साधता ते आपण नियंत्रित करू शकता. आपल्याला मिळणारी सूचनापत्रे फिल्टर करण्यासाठी आपल्या सूचनापत्रे सेटिंग्जमध्ये तीन पर्याय आहेत: गुणवत्ता फिल्टर, म्यूट केलेले शब्द, आणि प्रगत फिल्टर्स.
गुणवत्ता फिल्टर हा फिल्टर चालूवर सेट केल्यानंतर, आपल्या सूचनापत्रांमधील कमी गुणवत्तेचा मजकूर, उदाहरणार्थ, नकली ट्विट्स किंवा स्वयंचलित वाटणारा मजकूर फिल्टर केला जातो - आपण फॉलो करत असलेल्या लोकांची किंवा आपण अलीकडेच ज्या खात्यांशी संपर्क साधला त्यांची सूचनापत्रे फिल्टर केली जात नाहीत. आपल्या सूचनापत्रे सेटिंग्जमध्ये हे चालू किंवा बंद करण्याचा आपल्याकडे पर्याय आहे. (सूचना खाली सूचीबद्ध केल्या आहेत.)
आपल्या सूचनापत्रांमध्ये आपल्याला जे विशिष्ट शब्द किंवा वाक्प्रयोग पाहणे टाळायला आवडेल अशी म्यूट केलेले शब्द असलेलीसूचनापत्रे म्यूट करा. येथे अधिक जाणून घ्या.आपणास ज्या खात्यांकडील सूचनापत्रे पाहणे टाळायचे आहे त्या खात्यांची सूचनापत्रे म्यूट करा. यामध्ये आपण फॉलो करत असलेली किंवा नसलेली खाती म्यूट करण्याचा समावेश होतो. म्यूट केलेल्या खात्यांकडील आपण फॉलो करत असलेली खाती, प्रत्युत्तरे आणि उल्लेख अजूनही आपल्या सूचनापत्रे टॅबमध्ये दिसत राहतील. येथे अधिक जाणून घ्या.
प्रगत फिल्टर्समुळे आपल्याला जी ठराविक प्रकारची खाती टाळायची आहेत त्यांची सूचनापत्रे अक्षम करता येतात. याशिवाय, जर आपल्या खात्याकडे अचानक खूप जास्त लक्ष दिले गेले तर, आपण काय पाहता यावर आपल्याला जास्त नियंत्रण देण्यासाठी हे फिल्टर्स समायोजित करणारे सूचनापत्र आम्ही आपल्या सूचनापत्रांमध्ये समाविष्ट करू शकतो. (या सेटिंग्जविषयी खाली अधिक जाणून घ्या.)
नोट: आपल्यासाठी Twitter नवे असेल किंवा आपण आपला अनुप्रयोग पुनर्स्थापित केला असल्यास गुणवत्ता फिल्टर सेटिंग बाय-डिफॉल्टवर असेल. अक्षम आणि सक्षम करण्याविषयी सूचना खाली सूचीबद्ध केल्या आहेत.
IOS साठी:
1 पायरी
आपल्या सूचनापत्रेटाइमलाइन वर जा
2 पायरी
गिअर प्रतीक टॅप करा
3 पायरी
चालू किंवा बंद करण्यासाठी गुणवत्ता फिल्टर शेजारील स्लायडर खेचा.
नोट: आपण वरच्या मेनूमधून आपली सूचनापत्रे सेटिंग्ज अॅक्सेस करू शकता. आपल्या प्रोफाइल प्रतीकावर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
Android साठी:
1 पायरी
आपल्या सूचनापत्रेटाइमलाइन वर जा
2 पायरी
गिअर प्रतीक टॅप करा
3 पायरी
चालू किंवा बंद करण्यासाठी गुणवत्ता फिल्टर शेजारील चेकबॉक्स सक्षम करा.
Note: आपण आपली सूचनापत्रे सेटिंग्ज नॅव्हिगेशन मेनू प्रतीक किंवा आपल्या प्रोफाइल प्रतीकावरूनही अॅक्सेस करू शकता. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा..
डेस्कटॉपसाठी:
1 पायरी
आपल्या सूचनापत्रे टाइमलाइनवर जा.
2 पायरी
आपली सूचनापत्रे फिल्टर करण्यासाठी सेटिंग्जवर क्लिक करा.
3 पायरी
चालू किंवा बंद करण्यासाठी गुणवत्ता फिल्टर शेजारील बॉक्समध्ये क्लिक करा.
प्रगत फिल्टर सेटिंग्ज
आपल्याला ठराविक प्रकारची खाती टाळायची असतील त्यांची सूचनापत्रे आपल्याला कदाचित मिळू शकतात. गुणवत्ता फिल्टर सक्षम करण्याबरोबरच, आपण खालील प्रकारच्या खात्यांमधील सूचनापत्रे अक्षम करण्याची निवड करू शकता:
जी खाती नवीन आहेत (जी आपण फॉलो करत नाही).
जी खाती आपल्याला फॉलो करत नाहीत (जी आपण फॉलो करत नाही).
आपण फॉलो करत नसलेली खाती.
डिफॉल्ट प्रोफाइल छायाचित्र असलेली खाती (जी आपण फॉलो करत नाही).
पुष्टी केलेला ई-मेल पत्ता नसलेली खाती (जी आपण फॉलो करत नाही).
पुष्टी केलेला फोन क्रमांक नसलेली खाती (जी आपण फॉलो करत नाही).