अँड्रॉईडवर Twitter Lite कसे वापरावे

Twitter Lite अनुप्रयोग हा स्मार्टफोनवर Twitter वापरण्याचा डेटा व संग्रहण पूरक मार्ग आहे Twitter Lite अनुप्रयोगाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:

 • 2G आणि 3G नेटवर्कवर पटकन लोड होतो. 
 • डेटा वापर कमीत कमी ठेवतो - आपल्याला ज्या प्रतिमा किंवा व्हिडिओ पाहायचे आहेत तेवढेच डाउनलोड करण्यासाठी डेटा बचतकर्ता मोड चालू करा.
 • कमी जागा घेतो - 3MB हून कमी इनस्टॉल आकारमान असलेला, Twitter Lite आपल्या फोनवर फारशी जागा अडवत नाही.

Note: Twitter Lite खास करून Google Play Storeवर उपलब्ध आहे* आणि सध्या अँड्रॉईडच्या 5.0 आणि त्यावरील आवृत्त्यांचे समर्थन करत असलेल्या उपकरणांना अनुरूप आहे. आपल्याला जर Google Play Store मध्ये प्रवेश करता येत नसेल तर, आपण mobile.twitter.com वर Twitter ची मोबाईल वेब आवृत्ती वापरू शकता.

आपला डेटा वापर कसा कमी करावा

आपण Twitter वापरत असताना वापरल्या जाणाऱ्या डेटाचे प्रमाण कमीत कमी राखण्यासाठी Twitter Lite ची रचना केलेली आहे. डेटा बचतकर्ता मोड सक्षम करून आपण Twitter द्वारे वापरल्या जाणाऱ्या डेटाचे प्रमाण कमी करू शकता. डेटा बचतीस मदत करण्यासाठी आपल्याला वास्तविक वेळेत कोणता मीडिया डाउनलोड करायचा आहे ते नियंत्रित करा. 

 • डॅश मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी आपला प्रोफाइल फोटो टॅप करा.
 • डेटा बचतकर्ता चालू करण्यासाठी त्यासमोरील टॉगल टॅप करा.

या मोडमध्ये, प्रतिमा पूर्वावलोकन रूपात सादर केल्या जातील आणि आपण मोठ्या प्रतिमांची विनंती कराल तेव्हाच त्या लोड केल्या जातील. Twitter Lite मध्ये प्रतिमा लोड करा टॅप करून आपण प्रतिमा पाहू शकता.

 

लॉग इन किंवा साइन-अप करण्यासाठी

सुरुवात करण्यासाठी, Twitter Lite अनुप्रयोग डाउनलोड झाल्यावर तो उघडा.

लॉग इन करण्यासाठी:

 1. लॉग इन टॅप करा.
 2. आपले उपभोक्ता नाव, फोन क्रमांक किंवा ई-मेल पत्ता प्रविष्ट करा.
 3. आपला पासवर्ड प्रविष्ट करा.
 4. लॉग इन टॅप करा.

नवीन खात्यात साइन-अप करण्यासाठी:

 1. साइन-अप टॅप करा.
 2. आपले पूर्ण नाव आणि आपला फोन क्रमांक प्रविष्ट करा. आपण ईमेल पत्ता वापरण्यास प्राधान्य देत असाल तर, त्याऐवजी ईमेल वापरा टॅप करा. 
 3. साइन-अप टॅप करा. 
 4. पासवर्ड प्रविष्ट करा आणि पुढे टॅप करा.
 5. आपण ईमेल पत्ता देऊन साइन-अप करणे निवडल्यास, आम्ही कदाचित आपला फोन क्रमांक विचारू. आपण तो प्रविष्ट करू शकता किंवा आत्ता नाही टॅप करू शकता.
 6. एक उपभोक्ता नाव प्रविष्ट करा (आम्ही काही उपलब्ध पर्याय सुचवू), नंतर पुढे टॅप करा.
 7. स्वारस्य श्रेणी आणि त्या श्रेणींतील खाती सुचवून आम्ही आपल्याला सुरुवात करण्यास मदत करू.
 8. आपण अँड्रॉईड उपकरणावर असाल तर, आपल्याला पुश सूचनापत्रे मिळू शकतात. पुश सूचनापत्रे प्राप्त करण्यासाठी सूचनापत्रे चालू करा टॅप करा.
 9. आपल्या टाइमलाइनवर जाण्यासाठी आपण तयार असाल तेव्हा, झाले टॅप करा.

ट्विट पोस्ट करण्यासाठी

 1. आपल्या होम टाइमलाइन, शोध टॅब, सूचनापत्र टॅब किंवा प्रोफाइल्सवरून प्रवेशयोग्य असलेले नवीन ट्विट लिहा प्रतीक  टॅप करा.
 2. काय घडते आहे?  असे लिहीलेले असेल तिथे टायपिंग करायला सुरुवात करा
 3. आपल्याला एखादी प्रतिमा ट्विट करायची असल्यास, फोटो प्रतीक टॅप करा  आपण आपल्या ट्विटमध्ये सुमारे चार प्रतिमा जोडू शकता.
 4. पोस्ट करण्यासाठी ट्विट टॅप करा.

नोट: एकाधिक ट्विट्सचा समावेश असलेले थ्रेड कसे तयार करायचे ते जाणून घ्या.

खाती शोधणे आणि फॉलो करणे

खाते शोधण्यासाठी:

 1. शोध प्रतीक टॅप करा 
 2. आपण जे खाते शोधत आहात त्याचे नाव किंवा उपभोक्ता नाव टाईप करा. 
 3. आपण टाईप करायला सुरुवात केली की सुचवलेल्या खात्यांची आणि ट्रेंड्सची एक यादी दिसू लागेल.

खाते फॉलो करण्यासाठी:

 1. खात्याच्या प्रोफाइलमध्ये जा आणि फॉलो करा टॅप करा. 
 2. आपल्याला एखाद्या खात्यातील ट्विट दिसले आणि आपण ठरवले की आपण त्यांना फॉलो करायचे तर ते ट्विट विस्तारण्यासाठी त्यावर टॅप करा आणि नंतर फॉलो प्रतीक टॅप करा 

ट्विट्सना बुकमार्क कसे करावे 

ज्या ट्विट्सचा आपल्याला नंतर संदर्भ घ्यायला आवडेल त्यांना बुकमार्क करण्यासाठी बुकमार्क्स वैशिष्ट्य वापरा:

 1. शेअर प्रतीक टॅप करा.
 2. नंतर पाहण्यासाठी ट्विट जतन करण्याकरीता बुकमार्क्समध्ये जोडा निवडा.

आपल्या बुकमार्क्समध्ये प्रवेश करण्यासाठी:

 1. बुकमार्क्स मेनू पर्यायात प्रवेश करण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील आपला प्रोफाइल फोटो टॅप करा.

होम टाइमलाइन

 1. आपली होम टाइमलाइन मिळविण्यासाठी होम प्रतीक टॅप करा  .
 2. आपल्या होम टाइमलाइनमध्ये आपण फॉलो करत असलेल्या खात्यांतील नवीन ट्विट्स समाविष्ट असतात.
 3. जेव्हा होम टॅबच्या पुढे निळा ठिपका असतो तेव्हा, आपल्या टाइमलाइनवर येण्यासाठी नवीन ट्विट्स प्रतीक्षेत असतात. या नवीन ट्विट्स लोड करण्यासाठी आपली टाइमलाइन खाली खेचा.
 4. होम टाइमलाइनवरून, ट्विट तपशील पाहण्यासाठी आपण एक-एक करून ट्विटवर टॅप करू शकता. येथून आपण प्रत्युत्तर देऊ शकता, पुन्हा ट्विट करू शकता, ट्विट कोट करू शकता, किंवा ट्विट पसंत करू शकता.
 5. जेव्हा आपल्याला परत होम टाइमलाइनवर नॅव्हिगेट करायचे असेल तेव्हा, मागे प्रतीक टॅप करा 

सूचनापत्रे

Twitter वरील इतर आपल्याशी कसे संवाद साधत आहेत ते आपल्याला सूचनापत्रे टॅब द्वारे पाहता येते.

 1. आपल्या सूचनापत्र टाइमलाइनवर जाण्यासाठी सूचनापत्र प्रतीक टॅप करा  .
 2. आपली सूचनापत्रे टाइमलाइन आपल्या कोणत्या ट्विट्स पसंत केल्या गेल्या, शिवाय अलीकडील पुन्हा केलेल्या ट्विट्स (आपल्या ट्विट्सची), आपल्याकडे निर्देशित केलेल्या ट्विट्स (प्रत्युत्तरे आणि मेन्शन) आणि आपले नवीन फॉलोअर्स आपल्याला दाखवते.

प्रोफाइल आणि सेटिंग्ज

आपल्या प्रोफाइल आणि सेटिंग्जमध्ये प्रवेश करण्यासाठी, आपला प्रोफाइल फोटो टॅप करा. मेनूमध्ये, आपण:

 • आपल्या प्रोफाइलवर जाण्यासाठी प्रोफाइल टॅप करू शकता.
 • आपला प्रोफाइल संपादित करण्यासाठी, प्रोफाइल आणि नंतर प्रोफाइल संपादित करा टॅप करा. येथून आपण आपला प्रोफाइल फोटो, पूर्ण नाव, URL, स्थान आणि माझ्या बद्दल संपादित करू शकता.
 • आपले फॉलोइंग आणि फॉलोअर याद्या, तसेच आपण पोस्ट केलेला मीडिया आणि आपल्या पसंत्या पाहण्यासाठी प्रोफाइल टॅप करा.
 • आपल्या सेटिंग्ज संपादित करण्यासाठी, आपल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा, त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा. येथून आपल्याला खालील गोष्टी संपादित करता येतात:
 • खाते सेटिंग्ज, ज्यामध्ये समाविष्ट असते:
  • उपभोक्ता नाव
  • फोन
  • ई-मेल
  • पासवर्ड
  • सुरक्षा
  • डेटा आणि परवानगी, जिथे आपण आपला Twitter डेटा आणि संलग्न अनुप्रयोग यांचे पुनरावलोकन करू शकता
 • गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज
 • सूचनापत्रे सेटिंग्ज
 • सामग्री प्राधान्ये
 • सर्वसाधारण सेटिंग्ज, ज्यामध्ये डेटा वापर समाविष्ट असतो

गडद मोड कसा सक्षम करावा

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.

 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

 3. डिस्प्ले आणि ध्वनी टॅब टॅप करा.

 4. गडद मोड वैशिष्ट्य चालू करण्यासाठी त्याच्या स्लायडरवर टॅप करा.

 5. वैशिष्ट्य बंद करण्यासाठी, गडद मोड स्लायडरवर पुन्हा टॅप करा.


मेनूमधून गडद मोड कसा सक्षम करावा

 1. आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा. 

 2. गडद मोड चालू करण्यासाठी तळाशी डावीकडे असलेला गडद मोड स्लायडर टॅप करा.

थेट संदेश

अधिक माहितीसाठी थेट संदेश आणि आमच्या थेट संदेश नेहमी विचारले जाणारे प्रश्न याबद्दल वाचा. नोट: Twitter Lite थेट संदेशांमध्ये पूर्वनिर्धारित प्रतिसादांना समर्थन देत नाही (उदा. व्यवसाय प्रोफाइल्समधून). 

*Twitter Lite अनुप्रयोग खालील देशांत उपलब्ध आहे: अल्बानिया, अंगोला, अँटिग्वा आणि बार्बुडा, अर्मेनिया, अरुबा, ऑस्ट्रिया, अझरबैजान, बहामास, बहारीन, बेलीज, बेनिन, बोस्निया आणि हर्जेगोविना, बोत्सवाना, बल्गेरिया, बुर्किना फासो, कंबोडिया, कॅमरून, केप वर्दे, कोट डी'आयव्हर, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपब्लिक, फिजी, फिनलँड, गॅबॉन, जर्मनी, ग्रीस, गिनी-बिसाऊ, हैती, हंगेरी, आयर्लंड, इटली, जमैका, कुवैत, किरगिझस्तान, लाओस, लाटविया, लायचेस्टीन, लक्सेन्बर्ग, मॅसिडोनिया (FYROM), माली, माल्टा, मॉरीशस, मोल्दोव्हा, मोझांबिक, म्यानमार (बर्मा), नामीबिया, नायजर, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, पोलंड, कतार, रशिया, रवांडा, सौदी अरेबिया, सेनेगल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, श्रीलंका, स्वीडन, स्वित्झर्लंड, तजाकिस्तान, टोगो, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुर्कमेनिस्तान, संयुक्त अरब अमिरात, युनायटेड किंग्डम, उझबेकिस्तान, व्हिएतनाम आणि झांबिया.

 

Bookmark or share this article