Twitter for Android वापरण्याच्या पद्धती

नवीन खात्यासाठी साइन-अप करण्याच्या पद्धती

 1. अनुप्रयोग उघडा आणि साइन-अप टॅप करा.
 2. आपल्याला आमच्या साइन-अप अनुभवाबाबत मार्गदर्शन केले जाईल आणि आपले नाव आणि ई-मेल पत्ता यासारखी माहिती प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
 3. साइन-अप करताना आपण ई-मेल पत्ता दिल्यास, आम्ही त्वरित आपल्याला सूचनांचा ई-मेल पाठवू म्हणजे आम्हाला आपला ई-मेल पत्ता सत्यापित करता येईल.
 4. साइन-अप करताना आपण फोन क्रमांक दिल्यास, आम्ही आपल्याला त्वरित कोड असलेला मजकूर संदेश पाठवू म्हणजे आम्हाला आपला क्रमांक सत्यापित करता येईल. 
 5. आपल्या नवीन खात्यासाठी सेटिंग्ज सानुकूल करण्याच्या पद्धतींविषयी जाणून घ्या.
 6. आपल्या अनुप्रयोगावरून एकाधिक Twitter खाती व्यवस्थापित करण्याच्या पद्धतींविषयी जाणून घ्या.

 

Note: आता आम्ही 2.3 ते 4.1 Android संस्करणांना Google Play Store वर समर्थन देत नाही. आपण ही संस्करणे वापरत राहिल्यास, कृपया लक्षात घ्या की ती अपडेट होणार नाहीत. सर्वात अद्ययावत Twitter for Android चा अनुभव घेण्यासाठी, स्टोअरमधून नवीन संस्करण डाउनलोड करा किंवा आपल्या ब्राउझरमध्ये twitter.com वर भेट द्या.

आपले प्रोफाइल संपादित करणे

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. प्रोफाइल टॅप करा.
 3. प्रोफाइल संपादित करा टॅप करा.
 4. आपल्याला हवे असलेले बदल करा, नंतर जतन करा टॅप करा.
 5. आपल्या अनुप्रयोगावरून एकाधिक Twitter खाती व्यवस्थापित करण्याच्या पद्धतींविषयी जाणून घ्या.

 

आपल्या खाते सेटिंग्ज अपडेट करणे

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. मेनूमध्ये स्क्रोल करा आणि आपल्याला जी खाते सेटिंग पाहायची/संपादित करायची असेल ती निवडा.

 

आपला डेटा वापर कमी करण्याच्या पद्धती

डेटा-बचतकर्ता मोड सक्षम करून आपण Twitter कडून वापरल्या जाणाऱ्या डेटाचे प्रमाण कमी करू शकता. डेटा बचतीस मदत करण्यासाठी आपल्याला रिअल टाईममध्ये कोणता मीडिया डाउनलोड करायचा आहे ते नियंत्रित करा. 

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. सर्वसाधारण खालील, डेटा वापर टॅप करा.
 4. डेटा-बचतकर्ता चालू करण्यासाठी त्याच्या पुढील टॉगल टॅप करा.

या मोडमध्ये, प्रतिमा कमी गुणवत्तेवर लोड होतील आणि व्हिडिओ स्वयं-प्ले होणार नाहीत. डेटा-बचतकर्ता चालू असताना उच्च दर्जामध्ये प्रतिमा पाहण्यासाठी, अधिक प्रतीक टॅप करा आणि उच्च दर्जामध्ये लोड करा निवडा.

ट्विट पोस्ट करणे आणि हटविण्याच्या पद्धती

ट्विट पोस्ट करण्यासाठी:

 1. ट्विट प्रतीकावर {{htc-icon:compose_circle_fill }} टॅप करा
 2. आपला संदेश प्रविष्ट करून नंतर ट्विट टॅप करा.
 3. आपल्या उपकरणाच्या स्थितीदर्शक बारवर एक सूचनापत्र दिसेल आणि ट्विट यशस्वीपणे पाठवली गेल्यावर ते जाईल.

 

मसुदा म्हणून ट्विट जतन करणे:

 1. आपल्याला आपले ट्विट मसुदा म्हणून जतन करायचे असल्यास, ट्विट लिहा विंडोमध्ये X टॅप करा.
 2. आपल्याला मसुदा म्हणून जतन करण्यासाठीचा पर्याय दिसेल. जतन केलेल्या मसुद्याचा वापर करण्यासाठी आपल्या प्रोफाइलवर जा आणि ओव्हरफ्लो प्रतीक {{htc-icon:overflow_stroke }} टॅप करा नंतर मसुदे निवडा. 
 3. तसेच कॉम्पोझर बॉक्समध्ये टॅप करून, नंतर बॉक्समधील मसुदा प्रतीक {{ htc-icon:drafts }} टॅप करूनही आपण आपल्या मसुद्यांमध्ये प्रवेश करू शकता. आपल्याकडे मसुदे असतील तेव्हाच हे प्रतीक दिसेल.

 

आपल्या ट्विटसोबत छायाचित्र किंवा GIF पोस्ट करणे:

 1. Twitter वर छायाचित्र किंवा GIF पोस्ट करणे याविषयी वाचा. 
 2. थेट संदेशांमध्ये छायाचित्र पाठविण्याच्या पद्धतींविषयी वाचा.

 

आपल्या ट्विटसोबत व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी:

 1. Twitter वर व्हिडिओ शेअर करणे आणि पाहणे याविषयी वाचा. (व्हिडिओ वैशिष्ट्य वापरण्यासाठी Android OS 4.1 आणि त्यावरचे संस्करण आवश्यक आहे.)

 

प्रत्युत्तर पोस्ट करण्याच्या पद्धती:

 1. आपल्याला ज्या ट्विटला प्रत्युत्तर द्यायचे आहे ते शोधा.
 2. प्रत्युत्तर प्रतीक {{htc-icon:reply_stroke }} क्लिक करा
 3. कॉम्पोझ बॉक्स समोर येईल, आपला संदेश टाईप करा आणि तो पोस्ट करण्यासाठी प्रत्युत्तर क्लिक किंवा टॅप करा.

 

उल्लेख पोस्ट करण्याच्या पद्धती:

 1. ट्विट बॉक्समध्ये आपला संदेश टाईप करा. 
 2. विशिष्ट खात्यास संबोधित करताना उपभोक्ता नावा(वां) पूर्वी @ चिन्ह टाईप करा. 
 3. पोस्ट करण्यासाठी ट्विट टॅप करा.
 4. प्रत्युत्तरे आणि उल्लेख याविषयी अधिक वाचा.

 

आपल्या स्थानावरून ट्विट करणे:

 1. आपले स्थान समाविष्ट करण्यासाठी स्थान प्रतीक {{htc-icon:location_stroke }} टॅप करून ते आपल्या ट्विटमध्ये ते समाविष्ट करा.
 2. आपल्या मोबाईल उपकरणावरील स्थान वैशिष्ट्य वापरण्याविषयी अधिक जाणून घ्या.

 

ट्विटमध्ये URL समाविष्ट करणे:

 1. Twitter ची स्वतःची t.co service वापरुन लिंक्स स्वयंचलितपणे लहान केल्या जातात.
 2. मूळ लिंक कितीही लांब असली तरी एखाद्या URL मध्ये टाईप किंवा पेस्ट केल्याने आपल्या वर्णाक्षर मर्यादेतून वर्णाक्षरे स्वयंचलितपणे कमी केली जातात.

 

ट्विट हटविणे:

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. मेनूमधून, प्रोफाइल टॅप करा.
 3. आपल्याला जे ट्विट हटवायचे आहे ते शोधा.
 4. ट्विटच्या सर्वात वरच्या बाजूला असलेल्या {{ htc-icon:chevron_down_nomargin }} प्रतीकावर टॅप करा.
 5. हटवा टॅप करा.
 6. खात्री करण्यासाठी होय टॅप करा.

गडद मोड कसा सक्षम करण्याच्या पद्धती

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. प्रदर्शन आणि ध्वनी टॅब टॅप करा.
 4. गडद मोड वैशिष्ट्य चालू करण्यासाठी त्याच्या स्लायडरवर टॅप करा.
 5. गडद मोड स्वरूपामधील आपले प्राधान्य टॅप करून गडद निळा किंवा काळा निवडा.

 6. वैशिष्ट्य बंद करण्यासाठी, गडद मोड पर्याय पुन्हा टॅप करा.

मेनूमधून गडद मोड सक्षम करण्याच्या पद्धती

 1. आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. गडद मोड चालू करण्यासाठी लाइट बल्ब प्रतीक टॅप करा.
 3. गडद किंवा काळा दरम्यान स्विच करण्यासाठी सेटिंग्जवर जा.

स्वयंचलित गडद मोड सक्षम करण्याच्या पद्धती

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. प्रदर्शन आणि ध्वनी टॅब टॅप करा.
 4. वैशिष्ट्य चालू करण्यासाठी स्वयंचलित गडद मोड स्लायडर टॅप करा.
 5. तो बंद करण्यासाठी, स्वयंचलित गडद मोड स्विच पुन्हा टॅप करा.

Bookmark or share this article