goglobalwithtwitterbanner

Media Studio वापरण्याच्या पद्धती

Twitter वर आपला व्हिडिओ व्यवस्थापित करण्यासाठी, त्याचा कालावधी मोजण्यासाठी आणि मॉनिटाइझ करण्यासाठी वापरण्यास सुलभ प्लॅटफॉर्म.

Twitter वर आता जास्तीत जास्त 280 वर्णाक्षरे वापरता येतात. प्रतिमा, GIF आणि व्हिडिओवरून एखादी बातमी तयार करा. लाइव्हस्ट्रीम लाँच करा. आपल्याकडे एक खाते असो किंवा पन्नास, आपल्या संपूर्ण संस्थेचा Twitter वरील मजकूर व्यवस्थापित करण्यासाठी Media Studio वरून आपली माहिती आपल्या पद्धतीने सांगा. लायब्ररी, विश्लेषणे, मॉनिटायझेशन आणि निर्मात्याबरोबर Media Studio चा जास्तीत जास्त वापर कसा करायचा त्या विषयी जाणून घ्या.

आपल्या लायब्ररीमध्ये मीडिया अपलोड करण्याच्या पद्धती

 1. आपण studio.twitter.com वर लॉग इन करून पाहात असल्याची खात्री करा.
 2. पृष्‍ठाच्या सर्वात वरील उजवीकडचे अपलोड करा बटण दाबा.
 3. आपल्या कम्प्युटरवरील मीडिया निवडा.
  1. टीप: आपण अपलोड करू शकत असलेल्या विविध मीडिया प्रकारांबरोबर आपल्याला पाहिजे तितक्या फाईल्स आपण निवडू शकता.
 4. एकदा आपण आपला मीडिया निवडला की अपलोड स्वयंचलितपणे सुरू होईल.

मीडिया मेटाडेटा सुधारित करण्याच्या पद्धती

 1. आपल्या Media Studio लायब्ररीमध्ये आपल्याला सुधारित करायचा आहे असा मीडिया निवडा.
 2. सेटिंग्ज टॅब क्लिक करा.
 3. आपण खालील प्रकारचे मेटाडेटा (सर्व पर्यायी) अपडेट करू शकता:
  1. शीर्षक
  2. वर्णन
  3. कॉल-टू-अॅक्शन URL
  4. टीप: शीर्षक आणि वर्णनाचे रकाने केवळ आपला व्हिडिओ डेस्कटॉपवरून पाहणाऱ्या लोकांसाठी दिसतात; हे रकाने कोणत्याही मोबाइल प्लॅटफॉर्मवर दृश्यमान नाहीत.
 4. जर आपल्याला व्हिडिओवर भौगोलिक-प्रतिबंध लागू करणे आवश्यक असेल तर मजकूर प्रतिबंध उघडा:
  1. समाविष्ट करा
  2. अपवर्जित करा

 

आपल्या लायब्ररीमधून मीडिया ट्विट करण्याच्या पद्धती

 1. मीडिया लघुप्रतिमेच्या खालील ट्विट बटण  क्लिक करा.
 2. Tweet कंपोज विंडोमध्ये आपला ट्विट मजकूर (कमाल 280 वर्णाक्षरे) लिहा.
 3. आपले नवीन ट्विट त्वरित पोस्ट करण्यासाठी ट्विट बटण क्लिक करा.
  1. टीप: आपल्या टाइमलाइनवर न दिसणारे एखादे ट्विट आपणास तयार करायचे असल्यास 'केवळ-प्रमोट केले' चेकबॉक्स सक्षम करा. केवळ-प्रमोट केले अशा ट्विट्सविषयी अधिक माहिती मिळवा.

आपल्या लायब्ररीमधून ट्विट नियोजित करण्याच्या पद्धती

 1. मीडिया लघुप्रतिमेखालचे ट्विट बटण  क्लिक करा.
 2. Tweet कंपोज विंडोमध्ये आपला ट्विट मजकूर (कमाल 280 वर्णाक्षरे) लिहा.
 3. डायलॉग बॉक्सच्या सर्वात खालचे नियोजित करा बटण क्लिक करा.
 4. प्रदर्शित होणाऱ्या डेट पिकरमध्ये, तारीख आणि अचूक वेळ (आपल्या सध्याच्या टाइमझोनसह दर्शविलेले) दोन्ही निवडा.
 5. नियोजित ट्विट जतन करण्यासाठी ट्विट बटण (compose.svg) क्लिक करा.
 6. आपल्या निवडलेल्या तारीख आणि वेळेनुसार Media Studio वरून आपले ट्विट पोस्ट केले जाईल.

आपल्या लायब्ररीमधून दुसऱ्या Twitter उपभोक्ता नावावर मीडिया शेअर करण्याच्या पद्धती

 1. आपल्या Media Studio लायब्ररीमधील मीडियावर क्लिक करा.
 2. शेअर करणे टॅब क्लिक करा.
 3. आपण ज्या व्यक्तीस मीडिया शेअर करायचे आहे त्या व्यक्तीचे उपभोक्ता नाव टाईप करायला सुरुवात करा.
 4. ड्रॉपडाउनमध्ये दिसत असलेले अचूक उपभोक्ता नावावर क्लिक करा.
 5. शेअर केलेला अॅक्सेस काढून टाकायचा असेल तर संबंधित उपभोक्ता नावाच्या पुढील हटवाप्रतिक  क्लिक करा.

Media Studio वरून शेअर केलेला मीडिया व्यवस्थापित करण्याच्या पद्धती

 1. नॅव्हिगेशन लायब्ररी हेडरच्या पुढील  ड्रॉपडाउन क्लिक करा.
 2. शेअर केलेला मीडिया क्लिक करा.
 3. या दृश्यामध्ये शेअर केलेल्या मीडियावरून ट्विट्स व्यवस्थापित आणि तयार करा.
  1. नोट: या पद्धतीवरून तयार केलेल्या सर्व ट्विट्समध्ये व्हिडिओच्या मूळ मालकासाठी (मूलभूतपणे व्हिडिओ शेअर केलेले उपभोक्ता नाव) बातमीचा मूळ स्त्रोत समाविष्ट केलेला असेल.

आपल्या मीडिया स्टुडियो खात्यामध्ये जास्तीचे लोक समाविष्ट करण्याच्या पद्धती

 1. सर्वात वरती-उजव्या कोपऱ्यामधील आपल्या नावाच्या पुढील ड्रॉपडाउनवर क्लिक करा.
 2. खात्यामधील प्रवेश संपादित करा क्लिक करा.
 3. प्रवेश समाविष्ट करा बटण क्लिक करा.
 4. प्रवेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे उपभोक्ता नाव टाइप करायला सुरुवात करा आणि ते प्रदर्शित होणाऱ्या सूचीमध्ये यादीमधून निवडा.
 5. यादीमधून परवानगीचा स्तर निवडा:
  1. स्टुडिओ खाते प्रशासक – उपभोक्त्यास खात्यामध्ये पूर्ण प्रवेश मंजूर केला जातो आणि खाते मालक जे काही हवे ते सर्व काही करू शकतात. दिलेल्या खात्यासाठी एकापेक्षा अधिक प्रशासक असू शकतात.
  2. स्टुडिओ काँट्रिब्युटर - खाते सेटिंग्ज बदलून किंवा अतिरिक्त उपभोक्त्यांना समाविष्ट करण्याखेरीज उपभोक्त्यास जवळजवळ पूर्ण प्रवेश मंजूर केला जातो.
  3. स्टुडिओ पब्लिशर - उपभोक्त्यास त्यांच्या वैयक्तिक खात्यासाठी लायब्ररीमधून मीडिया वापरण्यासाठी प्रवेश मंजूर केला जातो. तो मुख्य खाते उपभोक्त्याच्या वतीने कोणतेही कार्य करू शकत नाहीत.
  4. स्टुडिओ विश्लेषक – विश्लेषणामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्यासाठी उपभोक्त्यास लायब्ररीकरिता केवळ-दर्शनीय प्रवेश मंजूर केला जातो.
 6. बदल जतन करा क्लिक करा.

मीडिया स्टुडियोमध्ये SRT उपशीर्षकाची फाईल अपलोड करण्याच्या पद्धती

 1. आपला व्हिडिओ थेट Media Studio वर अपलोड करा.
 2. अपलोड पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओचा विस्तारित मेनू पाहण्यासाठी मीडिया तपशील टॅप करा.
 3. उपशीर्षके टॅब टॅप करा.
 4. Media Studio-समर्थित भाषांच्या सूचीमधून SRT फाइलची भाषा निवडा.
 5. अपलोड करणे टॅप करा.
 6. आपल्या उपकरणावरून SRT फाईल निवडा.

लायब्ररी अपलोड करण्याविषयीचे तपशील

या सूचना केवळ Media Studio साठी वैध आहेत आणि Twitter विकसक API, प्रो मीडिया API, डेस्कटॉप अपलोड किंवा मोबाइल अपलोडच्या वापरासाठी देखील त्यांचे अनुसरण केले जाऊ नये.

व्हिडिओ

फाईलचा आकार आणि प्रकार

फाईलचा कमाल आकार: 1 GB
प्रकार: .MP4, .MOV

वियोजन

शिफारसीकृत वियोजन (लँडस्केप): 1280x720
शिफारसीकृत वियोजन (चौकोनी): 720x720

एनकोडींग

व्हिडिओचा तपशील: AVC एनकोडींग (H264)
ऑडीओ तपशील: stereo/mono AAC (LC)
उपशीर्षके: CEA 608/708 एम्बेडेड, .SRT साईडबार
कमाल फ्रेमरेट: 60 FPS

कालावधी

बहुतांशी लोकांसाठी तो 2:20 (140 सेकंद) पर्यंत मर्यादित आहे, तथापि काही भागीदारांना 10 मिनिटांच्या व्हिडिओ कालावधीसाठी व्हाईटलिस्ट केले जाते.

आपणास 2:20 पेक्षा कमी (जास्तीत जास्त 10 मिनिटे) मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी व्हाईटलिस्ट करायचे असल्यास, आपल्या Twitter खाते व्यवस्थापकाशी संपर्क साधा.

प्रतिमा

फाईलचा आकार आणि प्रकार

फाईलचा कमाल आकार: 20 MB
फाईलचा प्रकार: .JPG, .PNG

वियोजन

कमाल वियोजन: 8192x8192

GIF

फाईलचा आकार

फाईलचा कमाल आकार: 15 MB
फाईलचा प्रकार: .GIF

वियोजन

कमाल वियोजन: 2048x2048

संबंधित लेख

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.