goglobalwithtwitterbanner

थेट संदेशांविषयी

मूलभूत कार्ये

Twitter for iOS वरून थेट संदेश पाठविणे

Twitter for Android वरून थेट संदेश पाठविणे

वेबवरून थेट संदेश पाठविणे

आपला थेट संदेशाचा इनबॉक्स शोधणे

थेट संदेश सूचनापत्रे म्यूट करणे

थेट संदेश किंवा चर्चा रिपोर्ट करण्यासाठी

थेट संदेशावरून ट्विट शेअर करणे

कोणाकडूनही थेट संदेश मिळविणे

थेट संदेश विनंत्यांचे पुनरावलोकन करणे

थेट संदेश वाचन पावत्या अक्षम करणे

थेट संदेशांविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे

 

मूलभूत कार्ये

 • आपण आपल्याला फॉलो करणाऱ्या कोणाही बरोबर खाजगी चर्चा सुरू करू शकता किंवा गट चर्चा तयार करू शकता.
 • पुढील परिस्थितींमध्ये आपण फॉलो करत नसलेले कोणीही आपणास थेट संदेश पाठवू शकते:
  • कोणाकडूनही थेट संदेश मिळवायचे आपण निवडले आहे किंवा;
  • आपण त्या व्यक्तीला पूर्वी थेट संदेश पाठविला होता.
 • चर्चेतील कोणीही, गटाला थेट संदेश पाठवू शकते. जरी सर्वजण परस्परांना फॉलो करत नसले तरी गटातील सर्वजण सर्व संदेश पाहू शकतात.
 • गट चर्चांमध्ये, चर्चेतील कोणीही इतर सहभागींना समाविष्ट करू शकते. नव्याने समाविष्ट केलेल्या सहभागींना चर्चेचा पूर्व इतिहास दिसणार नाही.
 • काही खात्यांनी, विशेषतः Twitter वरील व्यवसायांनी, कोणाकडूनही थेट संदेश मिळविण्यासाठी सेटिंग सक्षम केले आहे. ही खाती आपल्याला फॉलो करत नसली तरीही आपण त्यांना थेट संदेश पाठवू शकता.
 • गट आणि एकास-एक अशा दोन्ही चर्चांमध्ये, आपण अवरोधित केलेल्या खात्याबरोबर चर्चा करू शकत नाही.

Twitter for iOS वरून थेट संदेश पाठविणे

 1. एन्व्हलप प्रतीक टॅप करा. आपणास आपल्या संदेशांकडे निर्देशित केले जाईल.
 2. नवीन संदेश तयार करण्यासाठी संदेश प्रतीक   टॅप करा.
 3. आपल्याला ज्यांना संदेश पाठवायचा आहे त्यांचे(ची) नाव(वे) किंवा @उपभोक्तानाव(वे) पत्त्याच्या रकान्यामध्ये प्रविष्ट करा. गट संदेशामध्ये जास्तीत जास्त 50 लोक समाविष्ट असू शकतात.
 4. आपला संदेश प्रविष्ट करा.
 5. मजकूराबरोबरच आपण थेट संदेशाबरोबर छायाचित्र, व्हिडिओ किंवा GIF समाविष्ट करू शकता. संदेश लिहा बारवरून किंवा अधिक प्रतीकातून  आपण खालील पर्यायांचा वापर करू शकता:
  • छायाचित्र घेण्यासाठी किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी किंवा आपल्या उपकरणाच्या गॅलरीमधून एखादा संलग्न करण्यासाठी छायाचित्र प्रतीक टॅप करा. आपला संदेश पाठविण्यापूर्वी आपले छायाचित्र संपादित करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. संपादन स्क्रीन आणण्यासाठी छायाचित्रावर टॅप करा जिथे आपण विस्तारित करू शकता, क्रॉप करू शकता आणि फिल्टर्स समाविष्ट करू शकता. आपले संपादन पूर्ण झाले की, जतन करा टॅप करा.  प्रगत छायाचित्र पर्याय याविषयी अधिक जाणून घ्या.
  • GIF म्हणून iOS Live छायाचित्र समाविष्ट करण्यासाठी, आपले छायाचित्र समाविष्ट करा, नंतर iOS Live छायाचित्राच्या डावीकडील खालच्या भागात GIF बॅज टॅप करा.
  • आपल्या संदेशामध्ये अॅनिमेटेड GIF समाविष्ट करण्यासाठी, मीडिया लायब्ररीमधून फाईल शोधून निवडण्याकरिता GIF प्रतीक  टॅप करा.
 6. आपला संदेश पाठविण्यासाठी, कागदी विमान प्रतीक टॅप करा 

थेट संदेश किंवा चर्चा हटविणे:

 • थेट संदेश हटविण्यासाठी, संदेश टॅप करून धरून ठेवा आणि पॉप अप होणाऱ्या मेनूमधून संदेश हटवा निवडा.
 • आपल्या इनबॉक्समधून संपूर्ण चर्चा हटविण्यासाठी, चर्चेवर डावीकडे स्वाईप करा आणि ट्रॅश कॅन प्रतीक टॅप करा आपण माहिती प्रतीक  टॅप करून आणि चर्चेची माहितीमधून चर्चा हटवा निवडून देखील संपूर्ण चर्चा हटवू शकता.
 • जेव्हा आपण थेट संदेश किंवा चर्चा (पाठविलेली किंवा मिळालेली) हटविता, तेव्हा ती केवळ आपल्या खात्यामधून हटविली जाते. आपण हटविलेले थेट संदेश किंवा चर्चा, चर्चेमधील इतरांना अजूनही पाहता येतील.

गट चर्चा व्यवस्थापित करणे:

 • चर्चेतील सहभागींची यादी त्वरित अॅक्सेस करता येण्यासाठी, आपल्या इनबॉक्समध्ये गट चर्चेचा प्रोफाइल छायाचित्र टॅप करा. 
 • गट चर्चेमध्ये सेटिंग्ज पृष्ठ आणण्यासाठी माहिती प्रतीक  टॅप करा.
 • सेटिंग्जचा तपशील:
  • गट चर्चेचे प्रोफाइल छायाचित्र आणि नाव अपडेट करण्यासाठी संपादित करा टॅप करा. छायाचित्र बदलण्याकरिता, लायब्ररीमधून निवडा किंवा नवीन छायाचित्र घ्या यासाठी छायाचित्रामधील कॅमेरा प्रतीक टॅप करा. अपडेट करण्यासाठी जतन करा टॅप करा. 
   नोट: एकदा का आपण छायाचित्र अपडेट केले की, आपल्याकडे वर्तमान छायाचित्र काढून टाका, वर्तमान छायाचित्र पहा, लायब्ररीमधून निवडा किंवा नवीन छायाचित्र घ्या असा पर्याय असतील.
  • चर्चेमध्ये लोकांना समाविष्ट करण्यासाठी सदस्य समाविष्ट करा टॅप करा.
  • सूचनापत्रे 1 तास, 8 तास, 1 आठवडा किंवा कायमस्वरूपी म्यूट करण्यासाठी सूचनापत्रे म्यूट करा याच्या पुढील स्लायडर ड्रॅग करा. 
  • गट चर्चेत आपला उल्लेख झाल्यावर आपल्याला सूचनापत्रे मिळतील का हे नियंत्रित करण्यासाठी उल्लेख म्यूट करा च्या पुढील स्लायडर ड्रॅग करा. कृपया लक्षात घ्या की, हे वैशिष्ट्य सक्षम असल्याशिवाय, अगदी जरी आपण चर्चा म्यूट करा वैशिष्ट्य सक्षम केले असले, तरी आपला चर्चेत थेट उल्लेख झाला की आपल्याला सूचनापत्रे मिळतील. याशिवाय, त्या चर्चेसाठी उल्लेख सूचनापत्रे मिळण्यासाठी गट चर्चेत आपण एक सहभागी होणे आवश्यक आहे.
  • गट चर्चा रिपोर्ट करण्यासाठी, चर्चा रिपोर्ट करा टॅप करा.
  • गट चर्चेतून आपल्याला स्वतःला काढून टाकण्यासाठी, चर्चेमधून बाहेर पडा टॅप करा. 

Twitter for Android वरून थेट संदेश पाठविणे

 1. एन्व्हलप प्रतीक टॅप करा. आपणास आपल्या संदेशांकडे निर्देशित केले जाईल.
 2. नवीन संदेश तयार करण्यासाठी संदेश प्रतीक  टॅप करा.
 3. आपल्याला ज्यांना संदेश पाठवायचा आहे त्यांचे(ची) नाव(वे) किंवा @उपभोक्तानाव(वे) पत्त्याच्या रकान्यामध्ये प्रविष्ट करा. गट संदेशामध्ये जास्तीत जास्त 50 लोक समाविष्ट असू शकतात.
 4. आपला संदेश प्रविष्ट करा.
 5. मजकूराशिवाय, थेट संदेशाद्वारे आपण छायाचित्र, व्हिडिओ किंवा GIF समाविष्ट करू शकता.
  • छायाचित्र घेण्यासाठी किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी किंवा आपल्या डिव्हाइस गॅलरीतून एखादा संलग्न करण्यासाठी छायाचित्र प्रतीक  टॅप करा. आपला संदेश पाठविण्यापूर्वी Twitter for iOS किंवा Twitter for Android अनुप्रयोगावरून आपले छायाचित्र संपादित करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. संपादन स्क्रीन आणण्यासाठी छायाचित्रावर टॅप करा जिथे आपण विस्तारित करू शकता, क्रॉप करू शकता आणि फिल्टर्स समाविष्ट करू शकता. आपले संपादन पूर्ण झाल्यानंतर जतन करा टॅप करा.प्रगत छायाचित्र पर्याय याविषयी अधिक जाणून घ्या .
  • आपल्या संदेशामध्ये अॅनिमेटेड GIF समाविष्ट करण्यासाठी, मीडिया लायब्ररीमधून फाईल शोधून निवडण्याकरिता GIF प्रतीक  टॅप करा.
 6. पाठवा प्रतीक टॅप करा.

थेट संदेश किंवा चर्चा हटविणे:

 • थेट संदेश हटविण्यासाठी, संदेश टॅप करून धरून ठेवा आणि पॉप अप होणाऱ्या मेनूमधून संदेश हटवा निवडा.
 • आपल्या इनबॉक्समधून संपूर्ण चर्चा हटविण्यासाठी, चर्चा टॅप आणि होल्ड करा आणि चर्चा हटवा निवडा. माहिती प्रतीक टॅप करून  आणि चर्चा माहिती पृष्‍ठामधून चर्चा हटवा निवडून देखील आपण संपूर्ण चर्चा हटवू शकता.
 • जेव्हा आपण थेट संदेश किंवा चर्चा (पाठविलेली किंवा मिळालेली) हटविता, तेव्हा ती केवळ आपल्या खात्यामधून हटविली जाते. आपण हटविलेले थेट संदेश किंवा चर्चा, चर्चेमधील इतरांना अजूनही पाहता येतील.

गट चर्चा व्यवस्थापित करणे:

 • चर्चेतील सहभागींची यादी त्वरित अॅक्सेस करता येण्यासाठी, आपल्या इनबॉक्समध्ये गट चर्चेचा प्रोफाइल छायाचित्र टॅप करा.
 • गट चर्चेमध्ये, सेटिंग्ज पृष्ठ वर आणण्यासाठी माहिती प्रतीक  टॅप करा.
 • सेटिंग्जचा तपशील:
  • गट चर्चेचे प्रोफाइल छायाचित्र आणि नाव अपडेट करण्यासाठी संपादित करा टॅप करा. खालील छायाचित्र पर्याय आणण्यासाठी कॅमेरा प्रतीक टॅप करा: छायाचित्र पाहा, कॅमेरा, छायाचित्र गॅलरी किंवा छायाचित्र काढून टाका. अपडेट करण्यासाठी जतन करा टॅप करा.
  • चर्चेमध्ये लोकांना समाविष्ट करण्यासाठी सदस्य समाविष्ट करा टॅप करा.  गट तयार करणारी व्यक्ती डिफॉल्ट प्रशासक आहे. गट तयार करणारी व्यक्ती यापुढे गटामध्ये नसल्यास, प्रशासकानंतर जो पहिला सदस्य गटामध्ये सहभागी झाला, तो प्रशासक होईल. गट प्रशासक म्हणून, आपण गटामधून सदस्यांना काढू शकता.
  • सूचनापत्रे 1 तास, 8 तास, 1 आठवडा किंवा कायमस्वरूपी म्यूट करण्यासाठी, चर्चा म्यूट करा टॅप करा. 
  • गट चर्चेत आपला उल्लेख झाल्यावर आपल्याला सूचनापत्रे मिळतील का हे नियंत्रित करण्यासाठी उल्लेख म्यूट करा याच्या पुढील चेकबॉक्स सक्षम करा. कृपया लक्षात की, अगदी जरी आपण चर्चा म्यूट करा वैशिष्ट्य सक्षम केले असले, तरी हे वैशिष्ट्य सक्षम असल्याशिवाय, आपला चर्चेत थेट उल्लेख झाला की आपल्याला सूचनापत्रे मिळतील. याशिवाय, त्या चर्चेसाठी उल्लेख सूचनापत्रे मिळविण्यासाठी गट चर्चेत आपण एक सहभागी असणे आवश्यक आहे.
  • गट चर्चा रिपोर्ट करण्यासाठी, चर्चा रिपोर्ट करा टॅप करा.
  • गट चर्चेतून आपल्याला स्वतःला काढून टाकण्यासाठी, चर्चेमधून बाहेर पडा टॅप करा.

वेबवरून थेट संदेश पाठविणे

 1. डाव्या नॅव्हिगेशन बारवरून संदेश क्लिक करा.
 2. आपणास आपला थेट संदेशाचा इतिहास दिसेल. वरच्या बाजूला असलेले नवीन संदेश प्रतीक क्लिक करा.
 3. आपल्याला ज्यांना संदेश पाठवायचा आहे त्यांचे(ची) नाव(वे) किंवा @उपभोक्तानाव(वे) पत्त्याच्या रकान्यामध्ये प्रविष्ट करा. गट संदेशामध्ये जास्तीत जास्त 50 लोक समाविष्ट असू शकतात.
 4. पुढे क्लिक करा
 5. मजकूर बॉक्समध्ये थेट संदेशावरून आपण छायाचित्र, व्हिडिओ, GIF किंवा इमोजी समाविष्ट करू शकता:
 • छायाचित्र किंवा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी छायाचित्र प्रतीक क्लिक करा.
 • आपल्या संदेशामध्ये अॅनिमेटेड GIF समाविष्ट करण्यासाठी, मीडिया लायब्ररीतून फाईल शोधून निवडण्यासाठी GIF प्रतीक टॅप करा.
 • पाठवा बटण क्लिक करा किंवा पाठविण्यासाठी एंटर की दाबा. 

नोट: संदेशामध्ये नवीन ओळ सुरू करण्यासाठी, शिफ्ट आणि एंटर की एकाच वेळी दाबा. केवळ एंटर की दाबल्यास आपला संदेश पाठविला जाईल.

थेट संदेश किंवा चर्चा हटविणे:

 • थेट संदेश हटविण्यासाठी, संदेशावर क्लिक करा आणि हटवा निवडा.
 • चर्चेमधून बाहेर पडण्यासाठी, चर्चा शोधा आणि ती उघडण्यासाठी क्लिक करा. माहिती  प्रतीक क्लिक करा आणि चर्चेमधून बाहेर पडा निवडा.
 • जेव्हा आपण थेट संदेश हटवता (पाठविलेला किंवा मिळालेला) किंवा चर्चेमधून बाहेर पडता, तेव्हा तो केवळ आपल्या खात्यामधून हटविला जातो. आपण हटविलेले थेट संदेश किंवा चर्चा, चर्चेमधील इतरांना अजूनही पाहता येतील.

गट चर्चा व्यवस्थापित करणे:

 • गट चर्चेमधून, चर्चेची सेटिंग्ज अॅक्सेस करण्यासाठी माहिती प्रतीक  क्लिक करा:
  • गट माहिती पृष्ठावरून ड्रॉप-डाउन मेनू अॅक्सेस करण्यासाठी आणखी प्रतीक  क्लिक करा. गटाचे नाव संपादित करा, नवीन छायाचित्र अपलोड करा, छायाचित्र पहा, किंवा छायाचित्र काढून टाका याची आपण निवड करू शकता.
   नोट: जर गट संदेश छायाचित्र अपलोड केले असेल तरच छायाचित्र पाहण्याचा व काढून टाकण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
 • सूचनापत्रे अंतर्गत, आपण पुढील गोष्टी निवडू शकता: 
  • सूचनापत्रे 1 तास, 8 तास, 1 आठवडा किंवा कायमस्वरूपी म्यूट करण्यासाठी, सूचनापत्रे म्यूट करा क्लिक करा. 
  • गट चर्चेत आपला उल्लेख झाल्यानंतर आपल्याला सूचनापत्रे मिळावीत किंवा नाही हे नियंत्रित करण्यासाठी उल्लेख म्यूट करा क्लिक करा. कृपया लक्षात की, अगदी जरी आपण चर्चा म्यूट करा वैशिष्ट्य सक्षम केले असले, तरी हे वैशिष्ट्य सक्षम असल्याशिवाय, आपला चर्चेत थेट उल्लेख झाला की आपल्याला सूचनापत्रे मिळतील. याशिवाय, त्या चर्चेसाठी उल्लेख सूचनापत्रे मिळविण्यासाठी गट चर्चेत आपण एक सहभागी असणे आवश्यक आहे.
 • गट चर्चा रिपोर्ट करण्यासाठी, चर्चा रिपोर्ट करा क्लिक करा.
 • गट चर्चेतून आपल्याला स्वतःला काढून टाकण्यासाठी, चर्चेमधून बाहेर पडा क्लिक करा.
 

थेट संदेशामध्ये इमोजी प्रतिक्रिया समाविष्ट करणे 

थेट संदेशामध्ये इमोजीची प्रतिक्रिया समाविष्ट करणे अगदी जलद आणि सोपे आहे - मजकूर आणि मीडिया संलग्नके दोन्ही. प्रतिक्रिया समाविष्ट करण्यासाठी, संदेशावर फिरवा आणि प्रतिक्रिया बटणावर (हार्ट आणि अधिक प्रतीक) क्लिक करा, किंवा संदेशावर डबल टॅप करून पॉप-अपमधून इमोजी निवडा. आपण कोणत्याही वेळी प्रतिक्रिया पूर्ववत करू शकता आणि सर्व सहभागींच्या संदेशामधून ती काढून टाकली जाईल. संदेशाला कोणी प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी चर्चेमधील प्रतिक्रियेवर क्लिक किंवा टॅप करा. 

डिफॉल्टनुसार, जेव्हा आपल्या संदेशावर कोणी प्रतिक्रिया दिली तर आपल्याला केवळ एखादे सूचनापत्र मिळेल. आपल्या Twitter for iOS किंवा Android अनुप्रयोगासाठी हे सेटिंग कधीही अपडेट करू शकता:

 1. आपल्या प्रोफाइल मेनूमधून सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 2. सूचनापत्रे टॅप करून, नंतर पुश सूचनापत्रे टॅप करा.
 3. संदेश प्रतिक्रिया टॅप करा आणि आपले स्वतःचे संदेश आणि प्रत्येकाचे संदेश यामधून निवडा.

नोट: संदेश प्रतिक्रियांना समर्थन देत नसलेले Twitter for iOS किंवा Android अनुप्रयोगाचे जुने संस्करण वापरत असलेल्या लोकांना प्रतिक्रिया मजकूर-आधारित संदेशांच्या स्वरूपात दिसतील.

नोट: आपण फॉलो करत नसलेल्या कोणासह पूर्वीची चर्चा आधीच प्रस्थापित झाली असेल तर, कोणाकडूनही संदेश मिळवा सेटिंग अक्षम केल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला थेट संदेश मिळत राहण्यास प्रतिबंध होणार नाही. त्या व्यक्तीकडून थेट संदेश मिळविणे थांबविण्यासाठी आपल्याला ती चर्चा एकतर रिपोर्ट करावी लागेल किंवा ते खाते अवरोधित करावे लागेल.

थेट संदेश विनंत्यांचे पुनरावलोकन करणे

आपण कोणाकडूनही संदेश मिळवा सेटिंग सक्षम केले असल्यास, आपण ज्यांना फॉलो करीत नाही अशा लोकांकडून आपणास समाविष्ट केलेल्या गट चर्चांसह, आपण फॉलो करत नाही अशा लोकांकडून येणारे संदेश, आपल्या संदेश इनबॉक्समध्ये विनंत्यांच्या स्वरूपात दिसून येतील. आपणास आपल्या इनबॉक्सच्या सर्वात वरती संदेश विनंत्या दिसतील - ज्यावर आपण या विनंत्यांचा इनबॉक्स पाहण्यासाठी टॅप करु शकता. आपणास संदेश हटवा किंवा स्वीकारा यापैकी एक विचारण्यात येईल. संदेश स्वीकारल्यामुळे आपल्याला त्या व्यक्ती बरोबर सहभागी होता येईल आणि तो संदेश आपल्या मुख्य इनबॉक्समध्ये हलविला जाईल. कृपया लक्षात घ्या की, आपण त्यांची विनंती स्वीकारल्याशिवाय आपण संदेश पाहिल्याचे त्यांना कळणार नाही.

संभाव्य संवेदनशील मजकुर असलेल्या कोणत्याही संदेश विनंत्या संदेश विनंत्या इनबॉक्समधील अतिरिक्त विभागात प्रवेशयोग्य असतील. हे संदेश पाहण्यासाठी, दाखवा टॅप करा. 

संदेश हटविल्यामुळे तो आपल्या इनबॉक्समधून काढून टाकला जाईल. नोट: संदेश हटविल्यामुळे भविष्यात त्या खात्याला आपल्याला संदेश पाठविण्यापासून प्रतिबंध केले जाणार नाही. ते खाते अवरोधित करण्याचा किंवा चर्चेचा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे नेहमीच असेल. अवरोधित खात्यांना आपण अनब्लॉक करेपर्यंत ती आपल्याला संदेश पाठवू शकत नाहीत.

संदेश स्वीकारल्यामुळे आपल्याला त्या व्यक्ती बरोबर सहभागी होता येईल. संदेश स्वीकारण्यापूर्वी सर्व मीडिया लपविला जाईल. आपल्याला लपविलेला मीडिया पाहायचा असेल तर, मीडिया पहा क्लिक किंवा टॅप करा.

नोट: आपण फॉलो करत नसलेल्या कोणा नवीन व्यक्तीकडून संदेश स्वीकारा किंवा हटवा आणि मीडिया पहा हा पर्याय केवळ Twitter for iOS आणि Android अनुप्रयोगांसाठी Twitter आणि twitter.com वरच उपलब्ध आहे.

याशिवाय, Twitter for iOS आणि Android अनुप्रयोगांसाठी आपल्या इनबॉक्समधील संदेश विनंत्या विभागातील कमी-गुणवत्तेच्या विनंत्या आम्ही डिफॉल्टनुसार फिल्टर करतो. सक्षम केलेले असताना, संदेशाच्या गुणवत्ता फिल्टरवरून आम्हाला कमी गुणवत्तेच्या वाटणाऱ्या चर्चेच्या विनंत्या लपविल्या जातात. फिल्टर केलेल्या विनंत्या आपल्या इनबॉक्सच्या संदेश विनंत्या विभागात दिसणार नाहीत आणि त्या विनंत्यांविषयी आपल्याला सूचनापत्र मिळणार नाही. आपण गुणवत्ता फिल्टर अक्षम करण्याचे निवडल्यास, संदेश विनंत्या विभागात नवीन, येणाऱ्या विनंत्यांबरोबरच पूर्वी लपविलेल्या जुन्या चर्चांच्या विनंत्या उपलब्ध असतील.

संदेश विनंत्यांसाठी गुणवत्ता फिल्टर अक्षम किंवा सक्षम करणे:

 • आपल्या संदेश विनंत्या च्या सर्वात वरती, प्रतीक टॅप करा. 
 •  गोपनीयता अंतर्गत, गुणवत्ता फिल्टरच्या पुढील स्लायडर टॉगल करा.

नोट: आपल्या गोपनीयता सेटिंग्जमधून गुणवत्ता फिल्टर चालू किंवा बंद करण्यासाठी कोणाकडूनही संदेश मिळवा सेटिंग सक्षम करणे आवश्यक आहे.

नोट:  विनंत्या अंतर्गत दिसणाऱ्या चर्चांसाठी, प्रेषका(कां)ची चर्चा आपण स्वीकारल्याशिवाय, आपण त्यांचे थेट संदेश वाचले आहे किंवा नाही हे त्यांना पाहता येणार नाही.

थेट संदेशांविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे

 • जेव्हा आपण थेट संदेश किंवा चर्चा (पाठविलेली किंवा मिळालेली) हटविता, तेव्हा ती केवळ आपल्या खात्यामधून हटविली जाते. आपण हटविलेले थेट संदेश किंवा चर्चा, चर्चेमधील इतरांना अजूनही पाहता येतील. जेव्हा आपण गट चर्चा हटवता तेव्हा, आपण त्या गटामधून बाहेर पडाल आणि यापुढे त्यामध्ये आपल्याला सहभागी होता येणार नाही.
 • जेव्हा आपण थेट संदेशामध्ये लिंक शेअर करता तेव्हा, त्यावर स्वयंचलितपणे प्रक्रिया होते आणि ती t.co लिंक अशी संक्षिप्त केली जाते. लिंक संक्षिप्त करणे याविषयी अधिक जाणून घ्या. कृपया लक्षात घ्या की, संक्षिप्त केलेली t.co लिंक असलेल्या कोणालाही गंतव्य URL नॅव्हिगेट करता येईल.
 • जेव्हा आपण थेट संदेशामध्ये मीडिया शेअर करता तेव्हा, चर्चेतील सर्वांना तो दिसू शकेल. कृपया लक्षात घ्या की, आपण थेट संदेशांमध्ये शेअर केलेल्या मीडियाच्या लिंक्स प्राप्तकर्ते डाउनलोड किंवा पुन्हा शेअर करू शकतात. थेट संदेशांमध्ये शेअर केलेली मीडियाची लिंक असणारे कोणीही मजकूर पाहू शकतात.

अजून माहिती हवी आहे?

थेट संदेशांविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न पहा.

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.