ठिकाणासहित ट्विट करण्यासंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न

खाली आपल्या ठिकाणासहित ट्विट करण्यासंबंधी काही सामान्य प्रश्नांची उत्तरे आहेत. आपल्या ठिकाणासहित ट्विट करण्याच्या पद्धतींविषयी जाणून घ्या.

माझ्या ट्विट्समध्ये कोणती स्थान माहिती समाविष्ट केली आहे?
 

 • अचूक ठिकाण सक्षम केल्याने आपणास आपल्या ट्विट्समध्ये माहिती निवडकपणे समाविष्ट करता येते. हे वैशिष्ट्य डिफॉल्ट पद्धतीने बंद आहे आणि आपणास ते वापरण्यासाठी निवड करावी लागेल. Twitter च्या अधिकृत अनुप्रयोगामध्ये अचूक ठिकाण सक्षम केल्याने Twitter ला GPS माहितीप्रमाणे आपले अचूक ठिकाण संकलित, संग्रहित करून वापरता येते.
 • एकदा आपण अचूक ठिकाण सक्षम केल्यानंतर, आपण आपल्या ट्विटमध्ये आपल्या आवडीचे ठिकाण (जसे की शहर किंवा अतिपरिचित क्षेत्र) संलग्न करू शकाल. आपले ट्विट तयार करताना केवळ ठिकाणच्या मार्करवर टॅप करून आपणास टॅग करायचे आहे ते ठिकाण निवडा.
  नोट: एकदा आपण ठिकाणासहित ट्विट केले की, आपल्या पुढील ट्विटमध्ये स्वयंचलितपणे ठिकाणाचे सामान्य लेबल समाविष्ट होईल. कोणत्याही वेळी स्थान सेवा अक्षम करण्याच्या पद्धतींविषयी जाणून घ्या.
 • तृतीय-पक्ष अनुप्रयोग किंवा वेबसाइट्सवरून आपणास आपल्या ठिकाणासहित ट्विट करता येते. आम्ही या विकासकांना ठिकाणासहित ट्विट करण्यासाठी त्यांची उत्पादने वापरताना कोणती माहिती शेअर केली जात आहे हे स्पष्ट करण्यास सांगतो. 
   

जेव्हा आम्ही आमच्या ट्विट्समध्ये स्थान माहिती संलग्न करतो तेव्हा आमच्याकडे कोणती नियंत्रणे असतात?
 

आपण आपल्या ठिकाणासहित ट्विट करणे सक्षम केल्यानंतर देखील, कोणते ट्विट (आणि कोणत्या प्रकारची स्थान माहिती) शेअर केली जाते यावर आपले अतिरिक्त नियंत्रण असते. खालील घटक लक्षात ठेवा:

 • हे वैशिष्ट्य डिफॉल्ट पद्धतीने बंद आहे आणि आपणास ते वापरण्यासाठी निवड करावी लागेल.
 • आपण कधीही आपले ट्विटचे ठिकाण चालू किंवा बंद करू शकता. 
 • आपण एकाच ठिकाणावरून आपल्या ट्विट्समध्ये प्रदर्शित झालेला आपल्या पूर्वीच्या ठिकाणाचा डेटा हटवू शकता (क्रमवार सूचनांसाठी हा लेख पहा).
 • आपण ऑनलाइन शेअर करत असलेल्या माहितीविषयी जागरूक आणि सावध रहा. आपणास आपले ठिकाण ("आता परेड सुरू होत आहे" किंवा " ट्रकमधून स्वादिष्ट कँडी नुकतीच संपूर्ण रस्त्यावर सांडली!") शेअर करायचे आहे, अशी काही अपडेट्स असू शकतात, आणि काही अपडेट्स असतील जिथे आपणास आपले ठिकाण खाजगी ठेवायचे आहे. अगदी ज्याप्रमाणे आपणास आपल्या घराच्या पत्त्यासहित ट्विट करायचे नसेल, त्याचप्रमाणे इतरांनी पाहू नये असे वाटत असलेल्या ठिकाणांहून ट्विट करताना कृपया सावधगिरी बाळगा.
 • लक्षात ठेवा की जेव्हा आपण ठिकाणासहित ट्विट करायचे निवडले असेल, तेव्हा सुचवलेली ठिकाणे आपणास ऑफर केली जाऊ शकतात, परंतु तरीही आपण वैयक्तिक ट्विट्ससाठी आपले ठिकाण शेअर करण्यासाठी अजूनही नाही निवडू शकता (सूचनांसाठी हा लेख पहा).
 • कृपया आमच्या सामान्य स्थान सेटिंग्ज आणि आपण ट्विट करता असे कोणतेही अनुप्रयोग आणि उपकरणाच्या सेटिंग्जची सवय करून घ्या, जेणेकरून आपण शेअर करत असलेल्या माहितीबाबत आपण कायम जागृक असाल.
 • लक्षात ठेवा, एकदा आपण ऑनलाइन काहीतरी पोस्ट केले की, ते इतरांना दिसते.
   

ठिकाणाची कोणती माहिती प्रदर्शित केली जाते?
 

 • आपल्या ब्राउझर किंवा उपकरणावरून पाठविलेली, ठिकाण (अक्षांश आणि रेखांश) च्या रूपात सुरु होणारी भौगोलिक ठिकाणाची सर्व माहिती. जोपर्यंत आपण वैशिष्ट्यामध्ये निवड करत नाही आणि आपल्या उपकरणाला किंवा ब्राउझरला आपले निर्देशांक आमच्यापर्यंत पाठवण्याची परवानगी देत नाही, तोपर्यंत Twitter कोणतीही स्थान माहिती दाखवणार नाही.
 • आपण आपल्या ट्विट्समध्ये स्थान माहिती संलग्न करणे निवडले असल्यास, आपले निवडलेल्या ठिकाणाचे लेबल ट्विटच्या मजकुराच्या खाली प्रदर्शित केले जाईल.
 • twitter.com वर, आपण एखाद्या परिसराचे किंवा शहराचे नाव यासारख्या ठिकाणाचे लेबल निवडू शकता.
 • जेव्हा आपण आपल्या ट्विटमध्ये छायाचित्र किंवा व्हिडिओ संलग्न करण्यासाठी Twitter for iOS आणि Android वर इन-अॅप कॅमेरा वापरून आपले अचूक ठिकाण टॅग करण्यासाठी पर्यायावर टॉगल करता तेव्हा त्या ट्विटमध्ये आपल्या पसंतीचे ठिकाणाचे लेबल आणि API वरून शोधले जाऊ शकते असे आपल्या उपकरणाचे अचूक स्थान (अक्षांश आणि रेखांश) समाविष्ट होईल. आपले अचूक ठिकाण आपण निवडलेल्या ठिकाणाच्या लेबलपेक्षा अधिक नेमके असू शकते. चालू घडामोडी शेअर करताना हे उपयुक्त आहे.
  नोट: अनुप्रयोगामधील कॅमेऱ्यातून आपले अचूक ठिकाण शेअर करण्याचा पर्याय सध्या फक्त Twitter for iOS च्या नवीन संस्करणांवर (6.26 किंवा त्यानंतरचे) आणि Twitter for Android च्या नवीन संस्करणांवर (5.55 किंवा त्यानंतरचे) उपलब्ध आहे. 
 • आपल्या ट्विटमध्ये आपले अचूक निर्देशांक समाविष्ट केले जावेत कि केवळ ठिकाणाचा समावेश करावा याविषयी अनुप्रयोगाच्या विकसकांना ठाम आणि स्वाभाविक माहिती असणे आवश्यक आहे. आपण तृतीय-पक्ष अनुप्रयोग किंवा मोबाईलवरून ट्विट करता तेव्हा आपल्या ट्विटमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा समाविष्ट केला जावा याबाबतीत स्पष्ट राहणे आवश्यक आहे.

नोट: काही क्षेत्रांमध्ये, आपल्या ट्विटला विशिष्ट व्यवसाय, महत्त्वाची खूण किंवा स्वारस्य असलेल्या गोष्टींसहित लेबल देण्याचा पर्याय आहे. ही ठिकाणे Foursquare वरून घेतली जातात. आपणास एखाद्या ठिकाणाविषयी समस्या दिसल्यास, कृपया Foursquare यांचे मदत केंद्र माध्यमातून रिपोर्ट करा. जर एखादे विशिष्ट ट्विट अपमानास्पद आहे असे आपल्याला वाटत असल्यास, कृपया Twitter ला रिपोर्ट करा.

हा लेख शेअर करा