Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहितीचा रिपोर्ट द्या

इतर व्यक्तीची खाजगी आणि गोपनीय माहिती पोस्ट करणे हे Twitter च्या नियमांचे उल्लंघन आहे. आमच्या Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहितीच्या धोरणाविषयी वाचा. 

रिपोर्ट करण्यासाठी माझ्याकडे Twitter खाते असणे आवश्यक आहे?

नाही, Twitter वर आपली जी खाजगी आणि गोपनीय माहिती पोस्ट करण्यात आलेली आहे त्याविषयीचा रिपोर्ट फाईल करण्यासाठी आपल्याकडे Twitter खाते असणे आवश्यक नाही.

कॉपीराईट असलेल्या मजकुराविषयी अनधिकृतपणे करण्यात आलेल्या पोस्टबाबत मला रिपोर्ट देता येईल काय?

आपली परवानगी न घेता आपला कॉपीराईट असलेला मजकूर ट्विट करण्यात आलेला असल्यास, कृपया आमचे कॉपीराईट आणि DMCA धोरण पहा.  

माझी माहिती इतर वेबसाइट्सवर पोस्ट केलेली असल्यास मला काय करता येईल?

Twitter व्यतिरिक्त इतर वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेली कोणतीही माहिती आम्हाला काढून टाकता येणार नाही. आपली माहिती इतर वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेली असल्यास कृपया जेथे आपली माहिती पोस्ट करण्यात आली आहे त्या वेबसाईटच्या मदत केंद्राशी किंवा समर्थन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.

Twitter वर पोस्ट करण्यात आलेल्या माझ्या खाजगी माहितीविषयी मला कसा रिपोर्ट देता येईल?

Twitter वर पोस्ट करण्यात आलेल्या आपल्या खाजगी माहितीविषयी थेट त्या आक्षेपार्ह ट्विटवरून आपल्याला रिपोर्ट करता येईल. वैयक्तिक ट्विट्स कशी रिपोर्ट करावी याविषयी अधिक जाणून घ्या.

कोणीतरी आपली वैयक्तिक माहिती पोस्ट केलेली असल्यास त्याविषयीचा रिपोर्ट फाईल करा. 

जेव्हा Twitter ला वैध रिपोर्ट प्राप्त होतो तेव्हा काय होते?

Twitter वर खाजगी माहिती पोस्ट करण्यात आली असल्याचा वैध आणि पूर्ण रिपोर्ट जेव्हा आम्हाला प्राप्त होतो, तेव्हा आम्ही रिपोर्ट करण्यात आलेल्या खात्याची आणि ट्विट्सची चौकशी करतो. संबंधित खाते किंवा ट्विट्सवर कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित माहिती इतरत्र कोठेही सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आली आहे किंवा नाही याविषयी आम्ही खात्री करून घेतो.  जर माहिती Twitter वर प्रदर्शित करण्यापूर्वी इंटरनेटवर कोठेतरी पोस्ट केली गेली असेल तर त्यामुळे आमच्या धोरणाचे उल्लंघन होणार नाही आणि आम्ही त्याबाबत कार्यवाही करणार नाही.

आपली खाजगी माहिती Twitter वर आणि इतर वेबसाईट्सवर सुरक्षित ठेवणे याविषयी अधिक जाणून घ्या.

आमच्या Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहिती विषयीचे धोरण याविषयी वाचा.

Bookmark or share this article