सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
खाते टॅप करा.
डेटा आणि परवानग्या अंतर्गत आपला Twitter डेटा टॅप करा.
आपला ई-मेल पत्ता आणि/किंवा फाईलवरील फोन क्रमांकावर कोड पाठवा टॅप करून आपली ओळख सत्यापित करा. आपल्याकडे फाईलवर ई-मेल पत्ता किंवा फोन क्रमांक नसल्यास, आपल्याला खाते माहिती पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
आपल्या ई-मेल पत्त्यावर आणि/किंवा फोन क्रमांकावर पाठवलेला कोड प्रविष्ट करा.
आपली ओळख सत्यापित झाल्यानंतर, आपला डेटा डाउनलोड करा अंतर्गत आणि Twitter शेजारील, डेटाची विनंती करा टॅप करा.
आपले डाउनलोड तयार झाल्यावर, आम्ही ई-मेल सूचनापत्र पाठवू किंवा आपल्याकडे प्रस्थापित अनुप्रयोग असल्यास पुश सूचनापत्र पाठवू. आपल्या सेटिंग्जमधून, आपण आपला डेटा डाउनलोड करा विभागाअंतर्गत संग्रहण डाउनलोड करा टॅप करू शकता.
आपल्या Twitter खात्याशी संबंधित पुष्टी केलेल्या ई-मेल पत्त्यावर आम्ही आपल्याला डाउनलोडची लिंक असलेला ई-मेल देखील पाठवू.
एकदा का आपल्याला ई-मेल मिळाला की आपल्या Twitter खात्यामध्ये लॉग इन करून डाउनलोड करा बटण क्लिक करून आपल्या Twitter संग्रहाणाची .zip फाईल डाउनलोड करा.