आपल्या व्हॉइसवरून ट्विट करण्याच्या पद्धती
आम्ही सध्या iOS अनुप्रयोगासाठी Twitter वर ऑडिओ संदेश ट्विट करण्याच्या पर्यायाची चाचणी घेत आहोत. या वैशिष्ट्यामुळे आपली कामे करत असताना आपल्या व्हॉइसवरून ट्विट करणे अगदी सोपे होते. आम्ही वापरसुलभता सुधारण्यासाठी स्वयंचलित मथळे देखील समाविष्ट केले आहेत.
- ट्विट लिहा प्रतीक टॅप करा.
- व्हॉइस प्रतीक टॅप करा.
- आपला संदेश रेकॉर्ड करण्यास सुरुवात करण्यासाठी लाल रंगाचे रेकॉर्ड बटण टॅप करून ते (रेकॉर्डिंग) समाप्त झाल्यानंतर पूर्ण झाले टॅप करा.
- ट्विटमध्ये मजकूर समाविष्ट करण्याचा आणि/किंवा एकाधिक ट्विट्सवरून थ्रेड सुरू करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. आपण प्रत्येक स्वतंत्र व्हॉइस ट्विटसाठी 2 मिनिटे आणि 20 सेकंदांपर्यंत रेकॉर्ड करू शकता. आपला संदेश त्यापेक्षा मोठा असल्यास तो स्वयंचलितपणे जास्तीत जास्त 25 ट्विट्समध्ये थ्रेड केला जाईल.
- समाप्त करण्यासाठी ट्विट टॅप करा.
जेव्हा आपण फॉलो करत असलेले कोणी व्हॉइस ट्विट रेकॉर्ड करते तेव्हा खालील पायऱ्यांचे अनुसरण केल्यास त्याचा प्लेबॅक मोबाईल आणि twitter.com वर उपलब्ध होतो:
1. व्हॉइस ट्विटवर नॅव्हीगेट करा.
2. प्लेबॅक सुरू करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी व्हॉइस ट्विट लघुप्रतिमा टॅप/क्लिक करा.
आपणास खालीलप्रमाणे iOS 13 आणि त्यावरील सेटिंग्ज समायोजित करून मथळे सक्षम करू शकता:
नोट: हे आपल्या Twitter अनुप्रयोगावरील सेटिंग्ज पृष्ठ नाही.
1. होम स्क्रीनवरून आपल्या iOS उपकरणावरील सेटिंग्ज अनुप्रयोग उघडा.
2. प्रवेशयोग्यता येथे जाऊन नंतर उपशीर्षके आणि मथळ्यांवर जा
3. "बंद मथळे + SDH" पर्याय सक्षम किंवा अक्षम करा
एकदा आपण आपल्या iOS उपकरणावर मथळे सक्षम केले की खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
1. व्हॉइस ट्विटवर नॅव्हीगेट करा.
2. व्हॉइस ट्विट लघुप्रतिमेवर टॅप करा.
3. व्हॉईस ट्विटचे ट्रान्सक्रिप्ट व्हॉइस ट्विट
लघुप्रतिमेवर स्वयंचलितपणे ओव्हरले झालेले दिसते.
आपण खालीलप्रमाणे आपली Android सेटिंग्ज समायोजित करून मथळे सक्षम करू शकता:
नोट: हे आपल्या Twitter अनुप्रयोगावरील सेटिंग्ज पृष्ठ नाही.
1. होम स्क्रीनवरून
आपल्या Android उपकरणावर सेटिंग्ज अनुप्रयोग उघडा.
2. प्रवेशयोग्यतेवर जा आणि नंतर प्रवेशयोग्यता -> ऑडिओ आणि
ऑन-स्क्रीन मजकुरावर जा.
3. “बंद मथळे + SDH” पर्याय सक्षम किंवा अक्षम करा
एकदा आपण आपल्या Android उपकरणावर मथळे सक्षम केले की खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
1. व्हॉइस ट्विटवर नॅव्हीगेट करा.
2. व्हॉइस ट्विट लघुप्रतिमेवर टॅप करा.
3. व्हॉईस ट्विटचे ट्रान्सक्रिप्ट व्हॉइस ट्विट
लघुप्रतिमेवर स्वयंचलितपणे ओव्हरले झालेले दिसते.
1. व्हॉइस ट्विटवर नॅव्हीगेट करा. ट्विटमध्ये मथळे उपलब्ध असल्यास सर्वात वरच्या उजव्या कॉर्नरमध्ये CC प्रतीक
दिसते
2. व्हॉइस ट्विट प्लेअरवर CC क्लिक करा.
3. व्हॉईस ट्विटचे ट्रान्सक्रिप्ट व्हॉइस ट्विट
लघुप्रतिमेवर स्वयंचलितपणे ओव्हरले झालेले दिसते.
व्हॉइस ट्विट्सविषयी अधिक
- व्हॉईस ट्विट्स ही ऑडिओ संलग्नकांसहित ट्विट्स म्हणून प्रदर्शित होतील जी लोक प्ले करू शकतात. आपले सध्याचे प्रोफाइल छायाचित्र ऑडिओ संलग्नकांवर स्टॅटिक इमेज म्हणून समाविष्ट केले जाईल आणि आपण आपले प्रोफाइल छायाचित्र अपडेट केल्यास रिफ्रेश होणार नाही.
- एखाद्याच्या व्हॉइस ट्विटवर टॅप केल्याने ट्विट ऑडिओ संदेश प्ले होईल आणि iOS वर थ्रेडेड व्हॉइस ट्विटसाठी स्वयंचलितपणे पुढे जाईल.
- जेव्हा आपण IOS वर प्ले टॅप करता, तेव्हा तो (संदेश) आपल्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ऑडिओ डॉकमध्ये स्वयंचलितपणे संकोचित होईल, जेणेकरून आपण Twitter वर स्क्रोल करताना आणि आपण अनुप्रयोगामधून बाहेर पडता तेव्हा आपण ऐकणे पुढे चालू ठेवू शकता.