आपले संपर्क कसे अपलोड आणि व्यवस्थापित करावे

जेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये आपले संपर्क अपलोड करता तेव्हा, आपल्या परिचयाचे लोक Twitter वर शोधण्यास आम्ही आपली मदत करू शकतो. नंतर आपल्याला असे संपर्क शोधता आणि फॉलो करता येतील ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता किंवा फोन नंबर वापरून त्यांना शोधण्याची इतरांना अनुमती दिली आहे. सामग्री वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही आपले आयात केलेले पत्ता पुस्तक संपर्कही वापरू शकतो, जसे की सूचना करणे किंवा उपभोक्ता खाती आणि आपल्यासाठी व इतर लोकांसाठीची ट्विट्स दाखवणे. खाते सूचना करण्यासाठी आणि Twitter वर फॉलो करण्यासाठी लोक शोधण्याचे इतर मार्ग याविषयी आम्ही आपले अपलोड केलेले संपर्क कसे वापरतो त्याबाबत अधिक जाणून घ्या.

आपले खाते इतरांना सुचविण्यासाठी Twitter आपले पत्ता पुस्तक वापरेल का हे आपण आपल्या ई-मेल पत्ता किंवा फोन नंबरने इतरांना आपल्याला शोधू देणारे गोपनीयता सेटिंग समायोजित करून नियंत्रित करू शकता. 

 

View instructions for:

Twitter वर संपर्क अपलोड करण्यासाठी

 1. सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 2. गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा. 
 3. शोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.
 4. खाते पुस्तक संपर्क सिंक करा टॅप करा. जेव्हा आपण आपले संपर्क सिंक करता तेव्हा, आपल्या डिव्हाइसच्या पत्ता पुस्तकातील संपर्क सातत्याने Twitter वर अपलोड होत राहतील.
 5. आधीच Twitter वर असलेली आपल्या पत्ता पुस्तकातील संपर्कांची खाती दाखवली जातील.

 

 

Twitter वर संपर्क अपलोड करण्यासाठी

 1. अगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला एकतर नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.
 2. गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. शोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.
 4. खाते पुस्तक संपर्क सिंक करा टॅप करा. जेव्हा आपण आपले संपर्क सिंक करता तेव्हा, आपल्या डिव्हाइसच्या पत्ता पुस्तकातील संपर्क सातत्याने Twitter वर अपलोड होत राहतील.
 5. आधीच Twitter वर असलेली आपल्या पत्ता पुस्तकातील संपर्कांची खाती दाखवली जातील.

iOS किंवा Android अनुप्रयोगासाठी Twitter वर पत्ता पुस्तक संपर्क सिंक करणे थांबविण्यासाठी:

पत्ता पुस्तक संपर्क सेटिंग सिंक करा समायोजित करून आपण आपले संपर्क सातत्याने Twitter वर अपलोड करणे थांबवू शकता.

iOS साठी Twitter वापरताना:

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा, नंतर गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. शोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.
 4. पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा शेजारी, बंद करण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.

 

Android साठी Twitter वापरताना:

 1. अगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला एकतर नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा, नंतर गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. शोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.
 4. पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा शेजारी, बंद करण्यासाठी चौकटीतील खूण काढा.

Note: जेव्हा एखाद्या ठराविक डिव्हाइसवर आपण पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा सेटिंग बंद करता तेव्हा, केवळ त्याच डिव्हाइसवरून Twitter वर संपर्क सिंक होणे बंद होईल. इतर डिव्हाइसवरील आपले संपर्क सिंक करणे आपल्याला थांबवायचे असल्यास, त्या डिव्हाइसवर आपल्याला आपली सेटिंग्ज समायोजित करावी लागू शकतात किंवा Twitter वरून सर्व संपर्क काढावे लागतात. आपण सर्व संपर्क काढेपर्यंत आपण आधी अपलोड केलेले संपर्क Twitter संग्रहित करत राहील आणि वापरेल.

iOS किंवा Android अनुप्रयोगासाठी Twitter वर संपर्क काढण्यासाठी

 1. अगदी वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक (iOS) किंवा नॅव्हीगेशन मेनू प्रतीक {{ htc-icon: drawer_on }}किंवा आपले प्रोफाइल प्रतीक (Android) टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा, नंतर गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. शोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.
 4. सर्व संपर्क काढा टॅप करा. प्रॉम्प्ट टॅप करून सर्व संपर्क काढले गेल्याची आपल्याला पुष्टी करावी लागेल.

Note: आपण आधी अपलोड केलेले कोणतेही संपर्क यामुळे काढले जातील आणि आपण ज्या कोणत्या डिव्हाइसेसवरून आधी संपर्क सिंक करण्याची निवड केली असेल त्यावर आपल्या खात्याचे पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा सेटिंग बंद केले जाईल. कृपया लक्षात ठेवा की याला थोडा वेळ लागतो आणि मधल्या काळात आपल्याला Twitter वर तरीही काही सूचना (आपल्या संपर्कांनुसार) दिसत राहतील.

twitter.com द्वारा संपर्क कसे पाहावे आणि काढावे

संपर्क पाहण्यासाठी किंवा काढण्यासाठी:

Twitter वरून आधी आयात केलेले संपर्क आपण कधीही पाहू किंवा काढू शकता. कृपया नोंद घ्या की ही माहिती काढल्यानंतर आपल्या खाते शिफारसी तितक्याशा सुसंबद्ध नसतील.

 1. मेनूमधील अधिक  प्रतीक क्लिक करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयतावर जा.
 3. गोपनीयता आणि सुरक्षा क्लिक करा.
 4. शोधक्षमता आणि संपर्क क्लिक करा.
 5. संपर्क व्यवस्थापित करा क्लिक करा.
 6. आपल्याला आपला पासवर्ड एंटर करण्याबाबत प्रॉम्प्ट केले जाऊ शकते. आपले सर्व अपलोड केलेले संपर्क प्रदर्शित होतील.
 7. आपल्याला आपले संपर्क काढायचे असल्यास, सर्व संपर्क काढा क्लिक करा. एकदा का काढा क्लिक करून आपण या विनंतीची पुष्टी केली की आपण आधी अपलोड केलेले कोणतेही संपर्क Twitter वरून काढले जातील आणि आपण ज्या कोणत्या डिव्हाइसेसवरून आधी संपर्क सिंक करण्याची निवड केली असेल त्यावर आपल्या खात्याचे पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा सेटिंग बंद केले जाईल. कृपया लक्षात ठेवा की याला थोडा वेळ लागतो आणि मधल्या काळात आपल्याला Twitter वर तरीही काही सूचना (आपल्या संपर्कांनुसार) दिसत राहतील.

mobile.twitter.com द्वारा संपर्क काढण्यासाठी:

 1. आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा, नंतर गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. शोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.
 4. संपर्क काढा टॅप करा. प्रॉम्प्ट टॅप करून सर्व संपर्क काढले गेल्याची आपल्याला पुष्टी करावी लागेल.

Bookmark or share this article