Twitter वर व्हिडिओ शेअर करण्याच्या आणि पाहण्याच्या पद्धती

Twitter वर व्हिडिओ शेअर करणे

Twitter वर व्हिडिओ शेअर करण्यासाठी चार मार्ग आहे:

  1. रेकॉर्ड करणे: आपण Twitter अनुप्रयोगावरून (Twitter for iPhone किंवा Twitter for Android OS 4.1 आणि त्यानंतरचे) व्हिडिओ रेकॉर्ड, संपादित, आणि शेअर करू शकता.
  2. आयात करणे: आपण Twitter for iPhone किंवा iPad अनुप्रयोग वापरत असल्यास आपण आपल्या उपकरणावरून व्हिडिओ आयात करू शकता.
  3. अपलोड करणे: आपण twitter.com वर व्हिडिओ अपलोड करू शकता.
  4. लाइव्ह होणे: आपल्या Twitter अनुप्रयोगावरूनच लाइव्ह व्हिडिओ तयार करण्याच्या पद्धती जाणून घ्या.
View instructions for:

ट्विटसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करणे

  1. मुमेंटमध्ये व्हिडिओ त्वरित शेअर करणे यासाठी सर्वात वरच्या मेनूमधून कॅमेरा प्रतीक  टॅप करा किंवा टाइमलाइनमधून डावीकडे स्वाइप करा.
    व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅप्चर प्रतिकावर टॅप करून धरून ठेवा.

    आपल्याकडे ट्विटची प्रत आणि ठिकाण समाविष्ट करण्याचा पर्याय आहे.

    आपण पोस्ट करण्यासाठी तयार असता तेव्हा ट्विट टॅप करा किंवा आपल्या शेवटच्या ट्विटवर कनेक्ट करण्यासाठी थ्रेडमध्ये समाविष्ट करा टॅप करा आणि नंतर शेअर करण्यासाठी समाविष्ट करा दाबा.

  2. ट्विटमध्ये व्हिडिओ समाविष्ट करणे.
    आपण आपल्या मनासारखा एखादा व्हिडिओ घेण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी ट्विट प्रतीक  टॅप करू शकता.

    ट्विट कंपोझ बॉक्सच्या खाली, आपल्याला एक नवीन व्हिडिओ समाविष्ट करण्यासाठी त्वरित निवड पर्याय दिसतील. आपल्या गॅलरीमधील सर्वात अलीकडील व्हिडिओ सुलभ प्रवेशासाठी लघुप्रतिमा पूर्वावलोकनांच्या स्वरूपात प्रदर्शित होतील.

    व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा प्रतीक  टॅप करा.

    आपण तळाशी असलेल्या बारच्या दोन्ही बाजू ड्रॅग करून आपल्या व्हिडिओची लांबी कमी करू शकता. व्हिडिओची कमाल लांबी 2 मिनिटे आणि 20 सेकंद आहे.

    आपली संपादने समाप्त करण्यासाठी कमी करा टॅप करा. आपण ट्विट करण्यापूर्वी प्ले बटण टॅप करून आपल्या व्हिडिओचे पूर्वावलोकन करू शकता आणि शेअर करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओमध्ये अतिरिक्त संपादने करू शकता.

    पोस्ट करण्यासाठी ट्विट टॅप करा. 

Note: ट्विट करण्यापूर्वी व्हिडिओ काढून टाकण्यासाठी व्हिडिओच्या लघुप्रतिमेवरील X टॅप करा.

ट्विटसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करणे

  1. मुमेंटमध्ये व्हिडिओ त्वरित शेअर करणे यासाठी सर्वात वरच्या मेनूमधून कॅमेरा प्रतीक टॅप करा किंवा टाइमलाइनमधून डावीकडे स्वाइप करा.

    व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅप्चर प्रतिकावर टॅप करून धरून ठेवा.

    आपल्याकडे ट्विटची प्रत आणि ठिकाण समाविष्ट करण्याचा पर्याय आहे.

    आपण पोस्ट करण्यासाठी तयार असता तेव्हा ट्विट टॅप करा किंवा आपल्या शेवटच्या ट्विटवर कनेक्ट करण्यासाठी थ्रेडमध्ये समाविष्ट करा टॅप करा आणि नंतर शेअर करण्यासाठी समाविष्ट करा दाबा.

  2. ट्विटमध्ये व्हिडिओ समाविष्ट करणे.
    आपण आपल्या मनासारखा एखादा व्हिडिओ घेण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी ट्विट प्रतीक टॅप करू शकता.

    ट्विट कंपोझ बॉक्सच्या खाली, आपल्याला एक नवीन व्हिडिओ समाविष्ट करण्यासाठी त्वरित निवड पर्याय दिसतील. आपल्या गॅलरीमधील सर्वात अलीकडील व्हिडिओ सुलभ प्रवेशासाठी लघुप्रतिमा पूर्वावलोकनांच्या स्वरूपात प्रदर्शित होतील.

    व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा प्रतीक टॅप करा.

    आपण तळाशी असलेल्या बारच्या दोन्ही बाजू ड्रॅग करून आपल्या व्हिडिओची लांबी कमी करू शकता. व्हिडिओची कमाल लांबी 2 मिनिटे आणि 20 सेकंद आहे.

    आपली संपादने समाप्त करण्यासाठी कमी करा टॅप करा. आपण ट्विट करण्यापूर्वी प्ले बटण टॅप करून आपल्या व्हिडिओचे पूर्वावलोकन करू शकता आणि शेअर करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओमध्ये अतिरिक्त संपादने करू शकता.

    समाप्त करण्यासाठी ट्विट टॅप करा. 

Note: ट्विट करण्यापूर्वी व्हिडिओ काढून टाकण्यासाठी व्हिडिओच्या लघुप्रतिमेवरील X टॅप करा.

Note: आपण आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयता याच्या प्रवेशयोग्यता विभागामधून आपली स्वयं-प्ले सेटिंग्ज देखील समायोजित करू शकता.

वेबवरून व्हिडिओ अपलोड करून ट्विट करणे

  1. ट्विट बटण क्लिक करा. 
  2. मीडिया समाविष्ट करा क्लिक करा.
  3. आपल्या कम्प्युटरवर संग्रहित केलेली एखादी व्हिडिओ फाईल निवडून उघडा क्लिक करा. व्हिडिओ समर्थित स्वरूपात नसल्यास आपल्याला सूचित केले जाईल. फाईलचा कमाल आकार 512MB आहे.
  4. संपादन विंडोमध्ये, आपण आपल्या निवडलेल्या व्हिडिओची लांबी 1 सेकंद ते 2 मिनिटे आणि 20 सेकंदांच्या दरम्यान कमी करू शकता. व्हिडिओची कमाल लांबी 2 मिनिटे आणि 20 सेकंद आहे.
  5. आपण संपादन समाप्त केल्यानंतर पूर्ण झाले क्लिक करा.
  6. आपला संदेश पूर्ण करा आणि आपले ट्विट आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी ट्विट क्लिक करा. 

Twitter वर व्हिडिओ पाहणे

टाइमलाइन, मुमेंट्स, एक्सप्लोर टॅब आणि Twitter वर, स्थानिक व्हिडिओ, GIF आणि Periscopes (iOS आणि Android मधील) यामध्ये स्वयं-प्ले होतील.

व्हिडिओ स्वयं-प्ले होणेमी कसे थांबवू?

आपण व्हिडियो स्वयं-प्ले सेटिंग बदलून आपली टाइमलाइन, मुमेंट्स आणि एक्सप्लोर टॅबमध्ये व्हिडिओ स्वयं-प्ले होणे होणे थांबवू शकता. twitter.com आणि आपल्या Twitter अनुप्रयोगावर व्हिडिओ स्वयं-प्लेची आपली सेटिंग्ज स्वतंत्रपणे समायोजित केली जाऊ शकतात (उदाहरणार्थ, आपण आपल्या iOS उपकरणावर स्वयं-प्ले करण्यासाठी व्हिडिओ सेट करू शकता परंतु वेबवर नाही).

आपल्या Twitter for iOS अनुप्रयोगामध्ये स्वयं-प्ले समायोजित करणे:

  1. आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयता यावर नॅव्हिगेट करा.
  2. सामान्य विभागाच्या अंतर्गत डेटा वापर टॅप करा.
  3. व्हिडिओच्या अंतर्गत, व्हिडिओ स्वयं-प्ले टॅप करा. 
  4. आपण खालील पर्यायांमधून निवडू शकता: मोबाईल डेटा आणि Wi-Fi, केवळ Wi-Fi आणि कोणतेच नाही.

आपल्या Twitter for Android अनुप्रयोगामध्ये स्वयं-प्ले समायोजित करणे:

  1. आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयता यावर नॅव्हिगेट करा. 
  2. सामान्य विभागाच्या अंतर्गत डेटा वापर टॅप करा.
  3. व्हिडिओ स्वयं-प्ले टॅप करा. 
  4. आपण खालील पर्यायांमधून निवडू शकता: मोबाईल डेटा आणि Wi-Fi, केवळ Wi-Fi आणि कोणतेच नाही.

twitter.com वर स्वयं-प्ले समायोजित करणे:

आपल्या प्रोफाइल प्रतिकावर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा. 
खाते विभागामधील व्हिडिओ ट्विट्सच्या पुढील, व्हिडिओ स्वयं-प्ले अक्षम करा. 

बंद असलेले मथळे आणि उपशीर्षके

प्रक्षेपणावर बंद असलेले मथळे आणि उपशीर्षके पाहण्याच्या पद्धती:
आपल्या उपकरणाच्या प्रवेशयोग्यता सेटिंग्जमध्ये मथळ्यांचा पर्याय चालू करा. iOS वर याला बंद मथळे असे लेबल दिले जाईल. Android वर याला मथळे असे लेबल दिले जाईल. 

उपशीर्षके पाहण्याच्या पद्धती:
आपल्या उपकरणावरचा ध्वनी बंद करा. वेबवरील उपशीर्षके पाहण्यासाठी, प्रक्षेपणावर "CC" स्लाइडर टॅप करा.

नोट: सर्व व्हिडिओंमध्ये मथळे किंवा उपशीर्षके उपलब्ध असणार नाहीत.

Twitter वर लाइव्ह व्हिडिओ पाहणे

आपण मुमेंट्स, एक्सप्लोर टॅबवरून लाइव्ह व्हिडिओ, प्रचलने किंवा खात्यावरील ट्विट्स ज्या लाइव्ह झाल्या आहेत पाहू शकता.

आपण Amazon Fire टीव्ही आणि Apple टीव्हीवरील Twitter आणि जागतिक Periscopes वरील लाइव्ह कार्यक्रम देखील पाहू शकता. याव्यतिरिक्त, आपण Periscope मधील लाइव्ह 360 व्हिडिओ पाहू शकता आणि Apple टीव्हीवरील Periscope जागतिक नकाशावरील मजकूर पाहू शकता. Xbox आणि Android टीव्हीचे उपभोक्ते त्यांचे वेब ब्राउझर लॉन्च करुन twitter.com वर जाऊन Twitter चा आनंद घेऊ शकतात.

लाइव्ह व्हिडिओ पहात असताना किंवा रिप्ले पाहताना, आपण प्रक्षेपण ट्विट, थेट संदेशावरून किंवा लिंक कॉपी करून शेअर करू शकता. आपल्याकडे शेअर करण्यासाठी संपूर्ण प्रक्षेपण किंवा आपल्या आवडीच्या एखाद्या विशिष्ट भागापासून सुरू होणारे प्रक्षेपण निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

लाइव्ह प्रक्षेपण शेअर किंवा रिप्ले करण्याच्या पद्धती:

  1. लाइव्ह व्हिडिओ किंवा रिप्ले पूर्ण स्क्रीन मोडमधून शेअर करा प्रतीक {{ htc-प्रतीक:आउटगोइंग }} क्लिक किंवा टॅप करा.
    1. ट्विट, थेट संदेशाद्वारे शेअर करण्यासाठी किंवा पूर्ण लाइव्ह व्हिडिओची लिंक कॉपी करण्यासाठी लाइव्ह शेअर करा (लाइव्ह असताना)किंवा सुरुवातीपासून शेअर करा (रिप्ले मोडमध्ये असेल तेव्हा) क्लिक किंवा टॅप करा किंवा सुरुवातीपासून रिप्ले करा.
    2. ट्विट, थेट संदेशाद्वारे शेअर करण्यासाठी किंवा पूर्ण लाइव्ह व्हिडिओची लिंक कॉपी करण्यासाठी …वरून शेअर करा क्लिक किंवा टॅप करा किंवा निवड बारवरून निवडलेल्या भागाच्या सुरुवातीपासून रिप्ले करा.

लाइव्ह व्हिडिओ पाहताना आपल्याला समस्या येऊ शकतात. सर्वसाधारणपणे, अधिक कार्यक्षम नेटवर्क कनेक्शनवरून पाहण्याचा आणि/किंवा वेगळे नेटवर्क किंवा ब्राउझर वापरण्याची शिफारस केली जाते. याव्यतिरिक्त, अनुप्रयोग किंवा ब्राउझर बंद करून पुन्हा उघडणे मदतीचे ठरू शकते. उत्तम परिणामांसाठी, अप-टू-डेट अनुप्रयोग किंवा ब्राउझरचे संस्करण वापरा. जर आपणास लाइव्ह व्हिडिओच्या बाबतीत काही समस्या येत राहिल्या तर कृपया आम्हाला कळवा.

Twitter वर लाइव्ह Periscope प्रक्षेपणे पाहणे
गेस्ट्सकडे असलेल्या प्रक्षेपणांसह Periscope वर तयार केलेली लाइव्ह प्रक्षेपणे Twitter वर शेअर केली जाऊ शकतात.

पुढे जा किंवा मागे जा यावर बदला

व्हिडिओ पाहात असताना त्वरित मागे-पुढे जाण्यासाठी आपण आपल्या स्क्रीनवर डबल टॅप करू शकता.

व्हिडिओमध्ये वगळण्याच्या पद्धती:

  1. 5 सेकंद पुढे जाण्यासाठी, व्हिडिओ स्क्रीनच्या बाहेरील उजव्या बाजूला डबल टॅप करा. 
  2. 5 सेकंद पुढे जाण्यासाठी, व्हिडिओ स्क्रीनच्या बाहेरील उजव्या बाजूला डबल टॅप करा.

एकदा आपण वगळण्यासाठी डबल टॅप केले की आपण एकदाच टॅप करून त्या दिशेने पुढे जाऊ शकता.

केवळ पूर्ण स्क्रीनमध्ये व्हिडिओ पहाताना पुढे आणि मागे जाणे शक्य आहे.

Note: प्रीमियम लाइव्ह मजकूर प्रवाहीकरण आणि एम्बेडेड लाइव्ह व्हिडिओ विजेट twimg.com नावाच्या दुसऱ्या twitter.com डोमेनवरून पुढील दोन गोष्टी करण्यासाठी कुकीजवर अवलंबून आहे: लाइव्ह व्हिडिओचा वापरानुभव सुलभ करणे आणि जाहिराती वितरीत करणे. आपल्या ब्राउझरमध्ये तृतीय पक्ष कुकीज अक्षम असल्यास, लाइव्ह व्हिडिओ अनुभव कार्यरत होणार नाही किंवा आम्ही अनुभवास समर्थन देण्यासाठी जाहिराती देऊ शकणार नाही. Safari उपभोक्त्यांना सूचित केल्यावर "परवानगी द्या" बटणावर क्लिक करुन त्यांच्या ब्राउझर सेटिंग्ज बदलून प्रीमियम लाइव्ह मजकूर प्रवाहीकरण किंवा एम्बेडेड लाइव्ह व्हिडिओ विजेटचा अनुभव घेता येऊ शकतो. यामुळे आम्हाला twimg.com साठी कुकी सेट करण्याची परवानगी मिळेल ज्यावरून आम्हाला थेट व्हिडिओ अनुभव सुलभ करण्यास आणि जाहिराती वितरीत करण्यात मदत होईल. आपण दुसरा ब्राउझर वापरत असल्यास, कृपया तृतीय पक्षाच्या कुकीजना परवानगी देण्यासाठी आपल्या ब्राउझरच्या मदत विभागाकडून सल्ला घ्या.

View instructions for:

लाइव्ह व्हिडिओसाठी पुश सूचनापत्रे

एखाद्या खात्याकडील लाइव्ह व्हिडिओ आपणास गमवायचा नसल्यास, आपण जेव्हा ते (खाते) लाइव्ह होईल तेव्हा पुश सूचनापत्रे मिळविण्याची निवड करू शकता. थेट खात्याच्या प्रोफाइल पृष्ठावरून सूचनापत्रे सेट करणे सोपे आहे.

  1. खात्याच्या प्रोफाइलवरून, सूचनापत्र प्रतीक  टॅप करा
  2. पॉप-अप संदेशामधून, केवळ लाइव्ह व्हिडिओ असणाऱ्या ट्विट्स निवडा.
  3. लाइव्ह व्हिडिओ पुश सूचनापत्रे रद्द करण्यासाठी, खात्याच्या प्रोफाइलमधून हायलाइट केलेले सूचनापत्र प्रतीक  टॅप करा आणि कोणतेही नाही निवडा.

लाइव्ह व्हिडिओसाठी पुश सूचनापत्रे

एखाद्या खात्याकडील लाइव्ह व्हिडिओ आपणास गमवायचा नसल्यास, आपण जेव्हा ते (खाते) लाइव्ह होईल तेव्हा पुश सूचनापत्रे मिळविण्याची निवड करू शकता. थेट खात्याच्या प्रोफाइल पृष्ठावरून सूचनापत्रे सेट करणे सोपे आहे.

  1. खात्याच्या प्रोफाइलवरून, सूचनापत्र प्रतीक  टॅप करा
  2. खाते सूचनापत्रे याच्या पुढील बॉक्स तपासा. 
  3. पॉप-अप संदेशामधून, केवळ लाइव्ह व्हिडिओ निवडा.
  4. लाइव्ह व्हिडिओ पुश सूचनापत्रे रद्द करण्यासाठी, खात्याच्या प्रोफाइलमधून हायलाइट केलेले सूचनापत्र प्रतीक  टॅप करा आणि कोणतेही नाही निवडा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

माझ्या ट्विट्स संरक्षित आहेत. माझे व्हिडिओ देखील संरक्षित आहेत का?

आपली ट्विट्स संरक्षित असल्यास, केवळ आपले फॉलोअर्स आपल्या ट्विट्समधील आपले व्हिडिओ पाहू शकतात. कृपया लक्षात घ्या की आपले फॉलोअर्स आपण संरक्षित ट्विट्समध्ये शेअर केलेल्या व्हिडिओच्या लिंक्स डाउनलोड किंवा पुन्हा शेअर करू शकतात. Twitter वर शेअर केलेल्या व्हिडिओच्या लिंक्स संरक्षित नसतात. लिंक असणारे कोणीही मजकूर पाहू शकेल. आपणास कोणालाही Twitter वरील आपले व्हिडिओ पाहू द्यायचे नसल्यास आम्ही आपणास त्या व्हिडिओंचा समावेश असलेली ट्विट्स हटवण्याचे सुचवितो.

व्हिडिओज ट्विटमधील वर्णाक्षरांच्या मर्यादेत मोजले जातात का?

नाही, व्हिडिओ ट्विटमधील वर्णाक्षरांच्या मर्यादेमध्ये मोजले जात नाहीत.

Twitter वर व्हिडिओ स्वयंचलितपणे लूप होतात का?

Twitter वर पोस्ट केलेले 60 सेकंद किंवा त्यापेक्षा लहान आकाराचे सर्व व्हिडिओ स्वयंचलितपणे लूप होतील.

आपण Twitter वर व्हिडिओ डॉक करू शकता?

आपण आधी रेकॉर्ड केलेला किंवा Twitter for iOS आणि Twitter for Android अनुप्रयोगावरून प्रक्षेपित केलेला व्हिडिओ डॉक करू शकता. व्हिडिओ डॉकिंगवरून Twitter चा वापर पुढे चालू ठेवताना पाहणे सोपे आहे - जसे की आपल्या टाइमलाइनवरून स्क्रोलिंग करणे किंवा थेट संदेश पाठविणे. 

व्हिडिओ (iOS आणि Android) डॉक किंवा अनलॉक करण्याच्या पद्धती:

  • व्हिडिओ डॉक करण्यासाठी, पूर्ण-स्क्रीन मोडमध्ये व्हिडिओच्या सर्वात वरती उजवीकडे डॉकिंग प्रतीक {{htc-icon: media_dock}} टॅप करा. 
  • डॉक केलेल्या व्हिडिओवरून पूर्ण-स्क्रीन दृश्यावर परत येण्यासाठी व्हिडिओवर टॅप करा.
  • डॉक केलेला व्हिडिओ डिसमिस करण्यासाठी, डॉक केलेला व्हिडिओ दिसेनासा होईपर्यंत आपल्या स्क्रीनच्या बाजूकडे आपल्या बोटाच्या साहाय्याने स्लाइड करत न्या. वैकल्पिकरित्या, आपण वेगळ्या व्हिडिओवर टॅप केल्यास, सध्या-डॉक केलेला व्हिडिओ स्वयंचलितपणे दिसेनासा होईल. 

 

आपण कोणत्या व्हिडिओ फॉरमॅट्सना समर्थन देता?

आम्ही सध्या मोबाईल अनुप्रयोगावर MP4 आणि MOV व्हिडिओ फॉरमॅट्सना समर्थन देतो.

वेबवर, आम्ही AAC ऑडिओ असलेला H264 फॉरमॅटच्या MP4 व्हिडिओ फॉरमॅटला समर्थन देतो. आपण जास्तीत जास्त 512MB चे व्हिडिओ अपलोड करू शकता, तथापि आपल्याला 2 मिनिटे आणि 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीचे व्हिडिओ संपादित करण्यास सूचित केले जाईल.

वेबवर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओचे वियोजन आणि आयाम गुणोत्तरांवर काय मर्यादा आहेत?

  • किमान वियोजन: 32 x 32
  • कमाल वियोजन: 1920 x 1200 (आणि 1200 x 1900)
  • आयाम गुणोत्तरे: 1:2.39 - 2.39:1 व्याप्ती (समाविष्टीत)
  • कमाल फ्रेम दर: 40 fps
  • कमाल बीटरेट: 25 Mbps

मी लोकांना व्हिडिओमध्ये टॅग करू शकतो/ते का?

आपण लोकांना व्हिडिओमध्ये टॅग करू शकत नाही परंतु छायाचित्रांमध्ये टॅग करता येते. छायाचित्र टॅगिंग याविषयी अधिक जाणून घ्या.

मी व्हिडिओ (ट्विट केल्यानंतर) कसा हटवू?

आपण स्वतःचे ट्विट हटवून ज्या प्रमाणे छायाचित्र हटविता त्याच प्रमाणे आपण व्हिडिओ हटवू शकता. 

मी थेट संदेशावरून व्हिडिओ पाठवू शकतो/ते?

होय, आपण थेट संदेश यावरून व्हिडिओ आणि GIF पाठवू शकता. 

Bookmark or share this article