Twitter शोध वापरण्याच्या पद्धती
विशिष्ट ट्विट, खाती किंवा सुरू असलेल्या चर्चा शोधा
Twitter वर शोध वापरण्याचे अनेक मार्ग आहेत. आपली स्वतःची, मित्रांची, स्थानिक व्यवसायांची आणि प्रख्यात मनोरंजनकर्त्यांपासून ते जागतिक राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांची ट्विट्स आपण शोधू शकता. विषयाचे कीवर्ड्स किंवा हॅशटॅग्ज शोधून, आपण ठळक बातम्या किंवा वैयक्तिक आवडींबाबत सुरू असलेल्या चर्चा फॉलो करू शकता.
आपल्या शोध परिणामांमध्ये आपण काय पाहता यावर आम्ही आपल्याला सुरक्षित शोध मोडवरून नियंत्रण देतो. संभाव्यतः संवेदनशील माहिती तसेच आपण म्यूट केलेली किंवा अवरोधित केलेली खाती आपल्या शोध परिणामांमधून हे फिल्टर्स वगळतात. कोणत्याही वेळी, ते बंद करण्याचा किंवा परत चालू करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे (सूचना खाली दिल्या आहेत).
जेव्हा वेबवर आपण आपल्या खात्यामध्ये साइन इन केलेले असते तेव्हा शोध वापरणे हे Twitter for iOS किंवा Android अनुप्रयोगांवरून वापरण्यापेक्षा काहीसे वेगळे असते. दोन्हीसाठी आपल्याला खालील सूचना मिळू शकतात.