Twitter सर्वेक्षणांविषयी
Twitter वरील इतर लोकांनी मांडलेले प्रश्न आपल्याला Twitter सर्वेक्षणांत तोलता येतात. आपण आपले स्वतःचे सर्वेक्षणही सहजपणे तयार करू शकता आणि त्वरित परिणाम पाहू शकता.
Twitter सर्वेक्षणात मत द्या
सर्वेक्षणात मत देण्यासाठी:
जेव्हा आपल्याला एखाद्या ट्विटमध्ये सर्वेक्षण दिसते तेव्हा, फक्त आपले प्राधान्य असलेल्या पर्यायावर क्लिक किंवा टॅप करा. आपण मत दिल्यावर परिणाम त्वरित दाखवले जातात. आपले मत पर्यायाच्या शेजारील बरोबरच्या खुणेने दर्शवले जाते.
सर्वेक्षणात आपण एकदा मत देऊ शकता. वर्तमान एकूण मत संख्या आणि सर्वेक्षणात उरलेला वेळ सर्वेक्षण निवडींतर्गत दाखवले जाते.
अंतीम परिणाम पाहण्यासाठी:
Twitter सर्वेक्षण पोस्ट केल्यानंतर 5 मिनिटे आणि 7 दिवसांमध्ये समाप्त होते, ज्या व्यक्तीने ते ट्विट केले त्याने ठरविलेल्या कालावधीवर हे अवलंबून असते. जिंकलेला पर्याय ठळक अक्षरांत दाखवला जातो. आपण एखाद्या सर्वेक्षणात मत दिले तर, अंतीम परिणामांबाबत आपल्याला चेतावणी देणारे पुश सूचनापत्र आपल्याला मिळू शकते.
खाजगीपणे मत द्या:
जेव्हा आपण एखाद्या सर्वेक्षणात मत देता तेव्हा, आपला सहभाग इतरांना दाखवला जात नाही: कोणी मत दिले आहे किंवा कसे मत दिले आहे ते सर्वेक्षण निर्माता किंवा इतर सहभागींना दिसत नाही.
नोट: Twitter सर्वेक्षणात फोटो समाविष्ट करता येत नाहीत.