Twitter वर खात्यांना कसे म्यूट करावे

खात्यांना अनफॉलो किंवा अवरोधित न करता आपल्या टाइमलाइनवरून अशा खात्यांचे ट्विट काढून टाकण्याची म्यूट ही सुविधा आपल्याला परवानगी देते. म्यूट केलेल्या खात्यांना आपण त्यांना म्यूट केल्याचे माहित होणार नाही आणि आपण त्यांना कोणत्याही वेळी अनम्यूट करू शकता. आपण म्यूट केलेल्या खात्यांची यादी पाहण्यासाठी twitter.com वर आपल्या म्यूट केलेल्या खाते सेटिंग ला किंवा iOS अथवा Android करिता Twitter वर आपल्या अनुप्रयोग सेटिंगला भेट द्या.

म्यूट सूचनापत्रांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या Twitter वरील प्रगत म्यूट पर्याय विषयी वाचा.

म्यूट करा विषयी काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे:

 • म्यूट केलेली खाती आपल्याला फॉलो करू शकतात आणि आपण देखील म्यूट केलेल्या खात्यांना फॉलो करू शकता. खाते म्यूट केल्याने आपण त्यास अनफॉलो करण्यासाठी कारणीभूत ठरत नाहीत.
 • खाते म्यूट केल्याने आपण त्यास थेट संदेश पाठविण्याच्या क्षमतेवर काही परिणाम होत नाही.
 • म्यूट केलेल्या कोणत्याही खात्यावरून आपल्याला यापुढे पुश किंवा SMS सूचनापत्रे प्राप्त होणार नाहीत.

आपण फॉलो करत असलेल्या पण म्यूट केलेल्या खात्यांसाठी:

 • म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आणि उल्लेख आपल्या सूचनापत्र टॅबमध्ये दिसत राहतील.
 • खाते म्यूट करण्याच्या अगोदर म्यूट केलेल्या खात्यांकडील पोस्ट केलेले ट्विट-आपल्या होम टाइमलाइनवरून काढून टाकले जातील.
 • जेव्हा आपण चर्चेमध्ये क्लिक कराल किंवा टॅप कराल तेव्हा म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आपल्याला दिसतील.

आपण फॉलो करत नसलेल्या पण म्यूट केलेल्या खात्यांसाठी:

 • अशा खात्यांकडील प्रत्युत्तरे आणि उल्लेख आपल्या सूचनापत्र टॅबमध्ये दिसणार नाहीत.
 • आपण फॉलो करत नसलेल्या खात्याला म्यूट केल्यास आणि त्यांनी आपला उल्लेख करून चर्चेला प्रारंभ केल्यास आपण केवळ ज्यांना फॉलो करता त्यांचीच चर्चेतील प्रत्युत्तरे आणि आपला केलेला उल्लेख याविषयीची सूचनापत्रे आपल्याला प्राप्त होतील. आपला जेथे जेथे उल्लेख झालेला आहे ते सर्व आपल्याला पाहण्याची इच्छा असल्यास आपण आपले उपभोक्ता नाव शोधून पाहू शकता. 
 • जेव्हा आपण चर्चेमध्ये क्लिक कराल किंवा टॅप कराल तेव्हा म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आपल्याला दिसणार नाहीत.
 • आपण म्यूट न केलेल्या खात्याने म्यूट केलेल्या खात्यावरील ट्विट नमूद केले असल्यास, नमूद केलेले ट्विट हे ट्विट अनुपलब्ध आहे संदेशासह लपविले जाईल.
View instructions for:

खात्याला कसे म्यूट करावे

ट्विटवरून म्यूट करण्यासाठी:

 1. आपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या ट्विटवर अगदी वरच्या बाजूला असलेल्या  प्रतीकावर टॅप करा.
 2. म्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.

प्रोफाइलवरून म्यूट करण्यासाठी:

 1. आपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.
 2. गिअर प्रतीक  टॅप करा
 3. म्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.

खात्याला कसे म्यूट करावे

ट्विटवरून म्यूट करण्यासाठी:

 1. आपण जे ट्विट म्यूट करू इच्छिता त्या ट्विटच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या  प्रतीकावर टॅप करा.
 2. म्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.

प्रोफाइलवरून म्यूट करण्यासाठी:

 1. आपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.
 2. ओव्हरफ्लो प्रतीकावर  टॅप करा
 3. म्यूट करा टॅप करा, त्यानंतर खात्री करण्यासाठी होय, मी निश्चित केले आहे निवडा.

खात्याला कसे म्यूट करावे

ट्विटवरून म्यूट करण्यासाठी:

 1. ट्विटवरून  प्रतीकावर क्लिक करा
 2. म्यूट करा क्लिक करा.

प्रोफाइलवरून म्यूट करण्यासाठी:

 1. आपण ज्या व्यक्तीला म्यूट करू इच्छिता त्या व्यक्तीच्या प्रोफाइलला जा.
 2. त्यांच्या प्रोफाइलवरील ओव्हरफ्लो प्रतीकावर  क्लिक करा. 
 3. पर्यायांच्या यादीमधून म्यूट करा निवडा.

वेबवर आपण एखादे खाते म्यूट केल्यानंतर आपल्याला खात्री केल्याचा एक बॅनर दिसेल. आपल्याकडून चूक झालेली असल्यास खाते म्यूट बंद करण्यासाठी आपण पूर्ववत करा क्लिक करू शकता.

खाते म्यूट बंद कसे करावे

 1. Twitter वर म्यूट केलेल्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.
 2. twitter.com वर म्यूट बंद करण्यासाठी म्यूट करा प्रतीकावर क्लिक करा. iOS किंवा Android करिता Twitter अनुप्रयोगावर आपण या खात्यावरील ट्विट म्यूट केली आहेत च्या नंतरील म्यूट बंद वर टॅप करा.

आपली म्यूट केलेल्या खात्यांची यादी पाहून व्यवस्थापित करण्यासाठी

आपण म्यूट केलेल्या खात्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी आपल्याला twitter.com वर आपल्या म्यूट केलेले खाते सेटिंगवर जाऊन किंवा iOS अथवा Android करिता Twitter वर आपल्या अनुप्रयोग सेटिंगला भेट देऊन पाहता येईल.

iOS करिता Twitter अनुप्रयोगामध्ये:

 1. आपल्या प्रोफाइल प्रतीकावर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 2. गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. सुरक्षा अंतर्गत, म्यूट केलेले टॅप करा. 
 4. म्यूट केलेली खाती टॅप करा.
 5. आपण म्यूट करा प्रतीकावर  टॅप करून देखील खाती म्यूट बंद करू शकता
 6. या यादीवरील फॉलो करा आणि अनफॉलो करा प्रतीकांवर टॅप करून देखील आपण कोणत्याही खात्याला फॉलो किंवा अनफॉलो करू शकता.
 7. खाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा. आपल्याला खात्याच्या प्रोफाइलवर नेले जाईल. येथून गिअर प्रतीक  टॅप करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट करा निवडा.

 

Android करिता Twitter अनुप्रयोगामध्ये:

 1. अगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 4. सुरक्षितता अंतर्गत, म्यूट केलेली खाती टॅप करा. 
 5. आपण म्यूट करा प्रतीकावर  टॅप करून देखील उपभोक्त्यांना म्यूट बंद करू शकता
 6. या यादीवरील फॉलो करा आणि अनफॉलो करा प्रतीकांवर टॅप करून देखील आपण कोणत्याही खात्याला फॉलो किंवा अनफॉलो करू शकता.
 7. खाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा. आपल्याला खात्याच्या प्रोफाइलवर नेले जाईल. इथून ओव्हरफ्लो प्रतीक  टॅप करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट निवडा.

 

twitter.com च्या माध्यमातून:

 1. आपल्या प्रोफाइल प्रतीकावरून सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.
 2. म्यूट केलेली खाती क्लिक करा.
 3. यादीच्या अगदी वरच्या भागातून आपण फॉलो करत असलेली पण म्यूट केलेली खाती किंवा आपण म्यूट केलेली सर्व खाती पाहण्याचे निवडू शकता. 
 4. आपण म्यूट करा बटणावर  क्लिक करून देखील खाती म्यूट बंद करू शकता
 5. खाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी ओव्हरफ्लो प्रतीकावर  क्लिक करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट निवडा.

Note: आपण फॉलो करत असलेली खाती सध्या आपण फॉलो करत असलेली आणि म्यूट केलेली अशा दोन्ही खात्यांची यादी दाखवेल. आपण फॉलो करत असलेल्या खात्यांसह आपण म्यूट केलेली सर्व खाती सर्व टॅबवरून प्रदर्शित केली जातील.

खात्यांना अनफॉलो करणे, अवरोधित करणे आणि रिपोर्ट करणे

खात्यांना म्यूट करण्याव्यतिरिक्त आपण नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किंवा स्पॅम म्हणून खात्यांना रिपोर्ट करण्यासाठी खात्यांना अनफॉलो करा, अवरोधित करा, रिपोर्ट करा हे देखील करू शकता. 

Bookmark or share this article