Twitter याद्या कसे वापरावे
यादी म्हणजे Twitter खात्यांचा क्युरेट केलेला समूह असतो. आपण आपल्या स्वतःच्या याद्या तयार करू शकता किंवा इतरांनी तयार केलेल्या याद्यांची सदस्यता घेऊ शकता. यादी टाइमलाइन पाहण्यामुळे आपल्याला केवळ त्या यादीतील खात्यांची ट्विट स्ट्रीम दाखवली जाईल.
यासाठी सूचना पहा:
यासाठी सूचना पहा:
नोट: iOS साठी Twitter आणि twitter.com वर आपण कोणत्या याद्यांमध्ये आहात ते आपण पाहू शकता. आपण कोणत्या याद्यांमध्ये आहात हे पाहण्यासाठी आपल्या याद्या टॅबवर, चे सदस्य क्लिक करा. यादीतून स्वतःला काढण्यासाठी, आपल्याला त्या यादीच्या क्रिएटरला अवरोधित करावे लागेल.
शेअर कऱण्यासाठी एखाद्या यादीची URL शोधा
- आपल्याला जी यादी शेअर करायची इच्छा असेल त्यावर जा.
- आपल्या ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये दिसणारी URL कॉपी करा. हे काहीसे असे दिसेल: https://twitter.com/username/lists/list_name.
- यादीतील ज्यांच्यासह आपल्याला URL शेअर करायची आहे त्यांच्या संदेशात ती पेस्ट करा.
यादीतून ट्विट्स पाहण्यासाठी
- आपल्या प्रोफाइल पृष्ठावर जा.
- याद्या टॅब क्लिक किंवा टॅप करा.
- जी यादी आपल्याला पाहायची आहे त्यावर क्लिक किंवा टॅप करा.
- त्या यादीत समाविष्ट केलेल्या खात्यांच्या ट्विट्सची टाइमलाइन आपल्याला दिसेल.
याद्या संपादित करण्यासाठी किंवा हटविण्यासाठी
- आपल्या प्रोफाइल पृष्ठावर जा.
- याद्या टॅब क्लिक किंवा टॅप करा.
- आपण तयार केलेल्या याद्या आणि आपण फॉलो करत असलेल्या इतर लोकांच्या याद्या आपल्याला ची सदस्यता घेतली अंतर्गत दिसतील.
- आपण तयार केलेल्या याद्यांमधून जी यादी आपल्याला संपादित करायची आहे किंवा हटवायची आहे त्यावर क्लिक किंवा टॅप करा. आपले यादीचे तपशील अपडेट करण्यासाठी संपादित करा किंवा यादी काढून टाकण्यासाठी हटवाक्लिक किंवा टॅप करा.
- या पृष्ठावर आपण आपल्या यादीतील लोक जोडू किंवा काढू शकत नाही - आपल्या ज्या व्यक्तींना जोडायचे किंवा काढायचे आहे त्या प्रत्येकाच्या प्रोफाइल पृष्ठावरून आपण ते केले पाहिजे.
सदस्यता घेण्यासाठी/ इतर लोकांच्या यादी फॉलो करण्यासाठी
- दुसऱ्या कोणाचा प्रोफाइल पाहताना याद्या क्लिक किंवा टॅप करा.
- आपल्याला कोणत्या यादीची सदस्यता घ्यायची इच्छा आहे ती निवडा.
- यादी पृष्ठावरून, यादी फॉलो करण्यासाठी, सदस्यता घ्या क्लिक किंवा टॅप करा. यादीतली वैयक्तिक खाते फॉलो न करता आपण याद्या फॉलो करू शकता.