Twitter for Mac वापरण्याच्या पद्धती

अनुप्रयोग कोठून मिळवावा
 

आपण App store वरून Twitter for Mac डाउनलोड करू शकता.
 

अनुप्रयोगावरून साइन अप किंवा लॉग इन करण्याच्या पद्धती
 

नवीन खाते तयार करणे:

 1. आपल्या उपकरणावरून Twitter अनुप्रयोग लाँच करा.

 2. Twitter खाते तयार करण्यासाठी साइन-अप बटण क्लिक करा.

 3. आपले उपभोक्ता नाव, ई-मेल आणि पासवर्ड निवडून प्रविष्ट करा.
   

सध्याच्या Twitter खात्यामध्ये लॉग इन करणे:

 1. अनुप्रयोग लाँच करून लॉग इन टॅप करा.

 2. आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
   

ट्विट्स आणि थेट संदेश पोस्ट करण्याच्या आणि हटविण्याच्या पद्धती
 

ट्विट पोस्ट करणे:

 1.    क्लिक करा

 2. ट्विट लिहा बॉक्समध्ये आपला संदेश टाइप करा.

 3. आपले ट्विट पोस्ट करण्यासाठी ट्विट क्लिक करा.
   

ट्विटमध्ये छायाचित्र, GIF, किंवा सर्वेक्षण संलग्न करणे:

 1. निवडा 

 2. छायाचित्र, GIF किंवा सर्वेक्षण समाविष्ट करण्यासाठी , टॅप करा, किंवा  टॅप करा. आपण आपल्या ट्विट्समध्ये जास्तीत जास्त चार प्रतिमा समाविष्ट करू शकता.

 3. ट्विट लिहा बॉक्समध्ये आपला संदेश टाइप करा.

 4. आपले ट्विट पोस्ट करण्यासाठी ट्विट क्लिक करा.
   

ट्विट हटविणे:

 1. आपणास जे ट्विट हटवायचे आहे ते निवडा.

 2.   प्रतिकावरून ट्विट रिपोर्ट करा निवडा.

 3. ट्विट हटवा टॅप करा.
   

थेट संदेश पाठविणे:

 1. मेनूमधून निवडा.

 2. क्लिक करा

 3. आपणास ज्या व्यक्तीला संदेश पाठवायचा आहे त्याचे उपभोक्ता नाव टाइप करा, त्यानंतर निवडण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा. आपण गट संदेश तयार करण्यासाठी अधिक सहभागी समाविष्ट करू शकता.

 4. पुढील टॅप करा.

 5. लिहिण्याच्या बॉक्समध्ये आपला संदेश टाइप करा.

  • छायाचित्र समाविष्ट करण्यासाठी क्लिक करा (पर्यायी).

  • GIF समाविष्ट करण्यासाठी क्लिक करा.

 6. संदेश पाठविण्यासाठी पाठवा क्लिक करा.
   

ट्विट्स बुकमार्क करण्याच्या पद्धती
 

 • ट्विटवरून  टॅप करा आणि बुकमार्क्समध्ये ट्विट समाविष्ट करा

 • आपण जतन केलेली ट्विट्स पाहण्यासाठी आपल्या प्रोफाइल प्रतीक मेनूमधून बुकमार्क्स क्लिक करा. 

 • जतन केलेला बुकमार्क काढून टाकण्यासाठी, आपल्या बुकमार्क टाइमलाइनमधील ट्विटमधून  टॅप करा आणि बुकमार्क्समधून ट्विट काढून टाका निवडा. 
   

एक्सप्लोर टॅब अॅक्सेस करण्याच्या पद्धती
 

 1. एक्स्प्लोर टॅबवर नॅव्हिगेट करण्यासाठी मेनूमधून  टॅप करा.

 2. प्रचलनामधील विषय, मुमेंट्स, सूचित मजकूर, लोकप्रिय लेख इत्यादी पाहण्यासाठी स्क्रोल करा.
   

आपली प्रोफाइल माहिती बदलण्याच्या पद्धती
 

 1. आपल्या प्रोफाइल पृष्ठावर नॅव्हिगेट करण्यासाठी आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. प्रोफाइल संपादित करा बटण टॅप करा.
 3. आपल्याला हवे ते बदल करून जतन करा टॅप करा.
   

पसंत करणे, पुन्हा ट्विट करणे, टिप्पणी देऊन पुन्हा ट्विट करणे
 

ट्विट पसंत करणे:

 1.   क्लिक किंवा टॅप करा, असे केल्याने आपल्याला ते ट्विट आवडले आहे याची पुष्टी करत ते लाल रंगामध्ये परिवर्तीत होईल.

 2. आपण प्रोफाइल पृष्ठ आणि ट्विटच्या परमालिंक पृष्ठावरील ट्विट पसंत देखील करू शकता.
   

पसंती पूर्ववत करणे किंवा काढून टाकणे:

 1. आपणास आवडणारे ट्विट शोधा (हार्टचे प्रतीक लाल असेल).

 2. पसंती पूर्ववत करण्यासाठी  क्लिक किंवा टॅप करा.
   

ट्विट पुन्हा ट्विट करणे:

 1. पुन्हा ट्विट करा प्रतीक क्लिक किंवा टॅप करा

 2. पुन्हा ट्विट करा टॅप करा.

 3. आपण ट्विट पुन्हा ट्विट केले आहे याची पुष्टी करत प्रतीक हिरव्या रंगामध्ये परिवर्तीत होईल.

 4. आपण प्रोफाइल पृष्ठ आणि ट्विटच्या परमालिंक पृष्ठावरील ट्विट पुन्हा ट्विट देखील करू शकता.
   

पुनर्ट्विट पूर्ववत करणे किंवा काढून टाकणे:

 1. आपण पुन्हा ट्विट केलेले ट्विट शोधा (प्रतीक हिरव्या रंगामध्ये असेल).

 2. पुनर्ट्विट पूर्ववत करण्यासाठी पुन्हा ट्विट करा प्रतीक क्लिक किंवा टॅप करा.
   

ट्विट विषयी भाष्य करणे:

 1. पुन्हा ट्विट करा प्रतीक क्लिक किंवा टॅप करा

 2. ट्विट विषयी भाष्य करा टॅप करा.

 3. आपल्या कमेंट्स प्रविष्ट करून पुन्हा ट्विट करा दाबा.

 4. आपण ट्विट पुन्हा ट्विट केले आहे याची पुष्टी करत प्रतीक हिरव्या रंगामध्ये परिवर्तीत होईल.

 5. आपण प्रोफाइल पृष्ठ आणि ट्विटच्या परमालिंक पृष्ठावरील ट्विट पुन्हा ट्विट देखील करू शकता.
   

साइन आउट करण्याच्या पद्धती

 1. आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.

 2. लॉग आउट टॅप करा. 

हा लेख शेअर करा