goglobalwithtwitterbanner

Twitter for Android च्या संबधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

माझ्या Android च्या संस्करणासाठी अनुप्रयोग उपलब्ध आहे का?

 • Android OS संस्करणे 2.3+ चालू असलेल्या फोन्ससाठी Twitter for Android हा अनुप्रयोग उपलब्ध आहे
  नोट: आता आम्ही 2.3 ते 4.1 Android संस्करणांना Google Play Store वर समर्थन देत नाही. आपण ही संस्करणे वापरत राहिल्यास, कृपया लक्षात घ्या की ती अपडेट होणार नाहीत. सर्वात अद्ययावत Twitter for Android चा अनुभव घेण्यासाठी, स्टोअरमधून नवीन संस्करण डाउनलोड करा किंवा आपल्या ब्राउझरमध्ये twitter.com वर भेट द्या.
 • किंडल फायर
 • B&N नुक्स

माझ्याकडे अनेक खाती आहेत. मला त्या सर्वांमध्ये एकाच वेळी लॉग इन करता येईल का?

होय! Twitter for Android एकाधिक खात्यांना समर्थन देतो. आपण एकाहून जास्त खाती जोडली असल्यास, सर्वात वरच्या मेनूमध्ये, नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा. नंतर, आपल्या इतर खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी हेडरमध्ये खालच्या दिशेने असलेला बाण  टॅप करा. एकाधिक Twitter खाती व्यवस्थापित करणे याविषयी अधिक जाणून घ्या.

माझ्या ट्विट्स संरक्षित आहेत. मी माझ्या फॉलोअर विनंत्या कशा पाहाव्या?

आपल्याला फॉलोअर विनंत्या अनुप्रयोगात मंजूर/नामंजूर करता येतात:

 1. आपल्या प्रोफाइल पृष्ठावर जा.
 2. आपल्या विनंत्यांची यादी पाहण्यासाठी मेनूमध्ये फॉलोअर विनंत्या टॅप करा.
 3. बरोबरची खूण टॅप करून विनंती मंजूर करा किंवा X टॅप करून नामंजूर करा.

मी अनुप्रयोग कसा काढून टाकावा किंवा तो माझ्या SD कार्डावर तो कसा हलवावा?

 • जर आपल्या उपकरणामध्ये Twitter for Android बंडल स्वरूपामधील अनुप्रयोग म्हणून समाविष्ट असेल तर, तो विस्थापित करता येत नाही किंवा SD कार्डावर हलवता येत नाही.
 • SD कार्डावर हलवण्याच्या पर्यायावरून फक्त तो अनुप्रयोग हलवला जाईल (1.89mb), अनुप्रयोग वापरतानाचा डेटा हलवला जाणार नाही. जर SD वर असेल तर, अनुप्रयोग आपली लॉगइन माहिती गमावेल.

मी अनुप्रयोग उघडल्यावर माझी टाइमलाइन स्वयंचलितपणे का अपडेट होते?

 • जर अनुप्रयोग खुला असेल किंवा पार्श्वभूमीमध्ये चालू असेल तर आपली टाइमलाइन.
 • जर आपण अनुप्रयोग सोडून गेलात आणि पुन्हा उघडलात तर, टाइमलाइन रिफ्रेश करण्यासाठी फक्त खाली खेचा.
 • या वैशिष्ट्यामुळे आपण टाइमलाइन बंद करता आणि पुन्हा उघडता तेव्हा ती जतन करण्यास मदत होते

Twitter for Android मध्ये गडद मोड उपलब्ध आहे का?

होय, Twitter for Android गडद मोडला समर्थन देतो. हे वैशिष्ट्य सक्षम करणे:

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. प्रदर्शन आणि ध्वनी टॅब टॅप करा.
 4. गडद मोड वैशिष्ट्य चालू करण्यासाठी त्याच्या स्लायडरवर टॅप करा.
 5. गडद मोड स्वरूपामधील आपले प्राधान्य टॅप करून गडद निळा किंवा काळा निवडा.
 6. वैशिष्ट्य बंद करण्यासाठी, गडद मोड पर्याय पुन्हा टॅप करा.

Twitter for Android मध्ये मला फॉन्टचा आकार बदलता येईल का?

होय, आपल्या Android च्या उपकरण सेटिंग्जमधून आपण आपल्या Twitter for Android अनुप्रयोगामध्ये प्रदर्शित होणाऱ्या फॉन्टचा आकार कमी-जास्त करू शकता. आपल्या उपकरण सेटिंग्जद्वारे आपण फॉन्टचा आकार अपडेट केला आणि आपल्याला लगेच अपडेट दिसला नाही तर, आपला अनुप्रयोग पुन्हा सुरू करून पहा. कृपया नोंद घ्या: आपल्या Twitter for Android अनुप्रयोगावरून फॉन्टचा आकर थेट अपडेट करणे यापुढे शक्य होणार नाही.

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.