प्रगत शोध वापरण्याच्या पद्धती

आपणास जुन्या ट्विटचा शोध घ्यायचा आहे की एखादे ठरविक ट्विट शोधायचे आहे? शोध परिणामांमध्ये आपण जे शोधत आहात तेच मिळवा
 

आपण twitter.com मध्ये लॉगइन केलेले असताना प्रगत शोध उपलब्ध असतो. त्यामुळे आपल्याला विशिष्ट तारखांच्या श्रेणी, लोक आणि अधिक गोष्टींसाठी हवे तसे शोध परिणाम मिळू शकतात. यामुळे ठराविक ट्विट्स शोधणे सोपे जाते.
 

प्रगत शोध वापरण्याच्या पद्धती
 1. twitter.com वर शोध बारवर आपला शोध प्रविष्ट करा.
 2. आपल्या परिणामांच्या पृष्ठाच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या शोध फिल्टर्स मध्ये, प्रगत शोध क्लिक करा किंवा अधिक पर्याय क्लिक करा आणि नंतर प्रगत शोध क्लिक करा.
 3. आपले शोध परिणाम रिफाईन करण्यासाठी योग्य रकाने भरा (काही उपयोगी टिप्ससाठी खाली पहा).
 4. आपले परिणाम पाहण्यासाठी शोध क्लिक करा.


आपला प्रगत शोध रिफाईन करण्याच्या पद्धती


प्रगत शोधावरून आपण खालील रकान्यांपैकी कोणतेही संयोजन वापरून आपण आपले शोध परिणाम रिफाईन करू शकता:
 

शब्द

 • कोणत्याही स्थितीमध्ये सर्व शब्द असलेली ट्विट्स ("Twitter" आणि "शोध")  
 • अचूक वाक्यांश असलेली ट्विट्स ("Twitter शोध")
 • कोणतेही शब्द असलेली ट्विट्स ("Twitter" किंवा "शोध")
 • विशिष्ट शब्द वगळलेली ट्विट्स ("Twitter" आहे पण "शोध" नाही)
 • विशिष्ट हॅशटॅग असलेली ट्विट्स (#twitter)
 • विशिष्ट भाषेतील ट्विट्स (इंग्रजीत लिहिलेली)
   

लोक

 • ठराविक खात्याकडील ट्विट्स ("@TwitterComms" ने ट्विट केले)
 • एखाद्या विशिष्ट खात्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाठवलेली ट्विट्स ("@TwitterComms" यांना प्रत्युत्तर देताना)
 • ठराविक खात्याचा उल्लेख करणारी ट्विट्स (ट्विटमध्ये "@TwitterComms" समाविष्ट असते)
   

ठिकाणे

 • एखाद्या भौगोलिक ठिकाणावरून पाठवलेली ट्विट्स, उदा. विशिष्ट शहर, राज्य, देश
  • भौगोलिक ठिकाण निवडण्यासाठी ठिकाणाचा ड्रॉपडाउन वापरा
    

तारखा

 • विशिष्ट तारखेपूर्वी, विशिष्ट तारखेनंतर किंवा ठराविक कालावधीमध्ये पाठवलेली ट्विट्स
  • "आरंभ" तारीख, "अंतिम" तारीख किंवा दोन्ही निवडण्यासाठी कॅलेंडरचा ड्रॉपडाउन वापरा
 • पहिले सार्वजनीक ट्विट पासून कोणत्याही तारखेचे ट्विट्स शोधा
   

प्रगत शोधामध्ये रकाने एकत्रित करून, आपण आपल्या शोध परिणामांना अधिक कार्यक्षम पद्धतीने तयार करू शकता. उदाहरणार्थ, समजा नववर्षाच्या दिवशी आपण काय केले याविषयी पाठविलेले जुने ट्विट आपण शोधत असल्यास, आपण "नवीन वर्ष" असलेली ट्विट्स शोधू शकता, परंतु 30 डिसेंबर 2013 आणि 2 जानेवारी 2014 च्या दरम्यानची "रेझोल्युशन" वगळता. आपण हॅशटॅगवरून इंग्रजीमधील ट्विट्स शोधू शकता. उदाहरणार्थ, जुलै 2014 मध्ये ब्राझीलहून पाठविलेला "#WorldCup" आपल्याला त्यावर्षीच्या विश्वचषकाविषयीची ट्विट्स दाखवेल.

हा लेख शेअर करा