TweetDeck वरील संघांचे वैशिष्ट्य वापरण्याच्या पद्धती

TweetDeck च्या संघांच्या वैशिष्ट्यामुळे एकाधिक लोकांना पासवर्ड शेअर न करता Twitter खाते शेअर करण्याची परवानगी मिळते.

जेव्हा एखादा कार्यसंघ सदस्य त्यांच्या स्वतःच्या Twitter खात्यावरून TweetDeck मध्ये लॉग इन करतो तेव्हा त्यांना डावीकडे नॅव्हिगेशन चिन्हांची सूची दिसेल. खाती कॉलम विस्तारित करण्यासाठी खाती प्रतीक क्लिक करून त्यांची शेअर केलेली खाती पहा. कार्यसंघाचे सदस्य त्यांच्या स्वत:च्या खात्यांवर  लॉगइन सत्यापन चालू करू शकतात, ज्यामुळे त्यांचे खाते (तसेच त्यांच्या TweetDeck मधील कोणतीही अतिरिक्त खाती) सुरक्षित राहतील.

संघाचे वैशिष्ट्य वापरून खाते मालक इतर लोकांबरोबर त्याचा पासवर्ड शेअर न करता व्यक्तीसापेक्ष खाते प्रवेश मंजूर करू शकतो:
 

मालक
 

 • पासवर्ड, फोन क्रमांक आणि लॉगइन सत्यापन सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकतो.
 • इतरांना प्रशासक किंवा सहयोगी म्हणून खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करू शकतो.
 • कार्यसंघाच्या खात्याच्या वतीने कृती करू शकतो (ट्विट, पुनर्ट्विट, थेट संदेश, पसंती, इत्यादी), ट्विट्स नियोजित करणे, याद्या तयार करणे आणि कलेक्शन तयार करणे.
   

प्रशासक
 

 • इतरांना प्रशासक किंवा सहयोगी म्हणून खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करू शकतो.
 • कार्यसंघाच्या खात्याच्या वतीने कृती करू शकतो (ट्विट, पुनर्ट्विट, थेट संदेश, पसंती, इत्यादी), ट्विट्स नियोजित करणे, याद्या तयार करणे आणि कलेक्शन तयार करणे.
   

सहयोगी
 

 • कार्यसंघाच्या खात्याच्या वतीने कृती करू शकतो (ट्विट, पुनर्ट्विट, थेट संदेश, पसंती, इत्यादी), ट्विट्स नियोजित करणे, याद्या तयार करणे आणि कलेक्शन तयार करणे.

खात्याच्या कृतींमध्ये क्लायंटनुसार थोडाफार बदल होऊ शकतो. TweetDeck वरून कशी सुरुवात करावी यावरील सूचनांसाठी, खालील लेख पहा:

नोट: अधिकृत प्रशासक आणि सहयोगींनी त्यांच्या खात्यांवर पोस्ट केलेल्या मजकुरासाठी खाते मालक जबाबदार असतात.

खात्यामधील प्रवेश शेअर करणे

आपल्या कार्यसंघाचा सेट अप करणे:

 1. आपणास ज्या खात्यावरील प्रवेश शेअर करायचा आहे त्या खात्यावरून TweetDeck वर लॉग इन करा.
 2. नॅव्हीगेशन बारमध्ये खाती क्लिक करा. कार्यसंघ व्यवस्थापित करा कॉलम दिसतो. 
 3.  कार्यसंघाचा सदस्य समाविष्ट करा रकान्यामध्ये, आपणास ज्या व्यक्तीला आमंत्रित करायचे आहे त्या व्यक्तीचे username टाइप करा.
 4. अधिकृत करा क्लिक करा. एकदा आपण एखाद्या व्यक्तीला अधिकृत केले की त्यांना ई-मेल, त्यांच्या TweetDeck खात्यांचे पॅनेलमध्ये आमंत्रण, आणि पुश सूचनापत्र मिळेल.
 5. शेअर केलेले खाते वापरण्यास सुरुवात करण्यासाठी नवीन कार्यसंघ सदस्याने आमंत्रण स्वीकारणे आवश्यक असेल.

नोट: आपणास आपले स्वतःचे Twitter खाते प्रशासक म्हणून समाविष्ट करायचे असू शकते, जेणेकरुन आपण आपल्या स्वत:च्या TweetDeck वरून कार्यसंघाचे व्यवस्थापन करू शकता. आपण जास्तीत जास्त 200 कार्यसंघाचे सदस्य समाविष्ट करू शकता.

कार्यसंघाचे व्यवस्थापन करणे

 

केवळ शेअर केलेल्या खात्याचा मालक पासवर्ड, फोन क्रमांक आणि लॉगइन सत्यापन सेटिंग्ज व्यवस्थापित करतो.

मालक आणि प्रशासक दोघेही कार्यसंघ व्यवस्थापित करू शकतात.
 

जबाबदारी बदलणे किंवा TweetDeck वरून कार्यसंघाच्या सदस्याला काढून टाकणे:
 

 1. TweetDeck वरून लॉग इन करताना नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.
 2. आपल्याला व्यवस्थापित करायचे आहे असे खाते निवडा.
 3. संघामधील सदस्यांची यादी उघडण्यासाठी कार्यसंघ व्यवस्थापित करा क्लिक करा.
 4. आपणास ज्या व्यक्तीची जबाबदारी बदलायची आहे ती शोधून भूमिका बदला क्लिक करा.
 5. सहयोगी, प्रशासक किंवा कार्यसंघमधून काढून टाका निवडा.
 6. आपल्या निवडीची पुष्टी करा.

नोट: सहयोगींना कार्यसंघाची खाती व्यवस्थापित करण्याची कार्यक्षमता नसते. केवळ प्रशासक कार्यसंघ व्यवस्थापित करू शकतात.

कार्यसंघामध्ये सहभागी होणे
जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यसंघामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा आपणास ई-मेल सूचनापत्र तसेच आपल्या TweetDeck खात्यामध्ये सूचनापत्र मिळेल.
1 पायरी

TweetDeck मधून नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.

2 पायरी

 कार्यसंघ आमंत्रणे टॅप निवडा. येथे आपणास सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या कार्यसंघाचे Twitter खाते दिसेल. 

3 पायरी

कार्यसंघामध्ये सहभागी होण्यासाठी स्वीकारा  , किंवा आमंत्रण डिसमिस करण्यासाठी नकार द्या निवडा.

4 पायरी

आपण आमंत्रणाचा स्वीकार केल्यास आता ते खाते खाती टॅबमध्ये आणि नवीन ट्विट पॅनेलमध्ये दिसेल. 

कार्यसंघाचे सदस्य म्हणून, आपण ट्विट्स, थेट संदेश, पसंती आणि पुनर्ट्विट पोस्ट करू शकता. आपण पासवर्ड बदलू शकत नाही किंवा खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकत नाही.

जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यसंघामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा आपणास ई-मेल सूचनापत्र तसेच आपल्या TweetDeck खात्यामध्ये सूचनापत्र मिळेल.
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.

2 पायरी

कार्यसंघाच्या विनंत्या टॅप करा.

3 पायरी

आमंत्रण स्वीकारण्यासाठी कार्यसंघाच्या विनंत्या अंतर्गत, तपासा प्रतीक  टॅप करा, किंवा ते नाकारण्यासाठी हटवा प्रतीक  टॅप करा.

कार्यसंघाचे सदस्य म्हणून, आपण ट्विट्स, थेट संदेश, पसंती आणि पुनर्ट्विट पोस्ट करू शकता. आपण पासवर्ड बदलू शकत नाही किंवा खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकत नाही.

जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यसंघामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा आपणास ई-मेल सूचनापत्र तसेच आपल्या TweetDeck खात्यामध्ये सूचनापत्र मिळेल.
1 पायरी

TweetDeck वरून: नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा. आपणास सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या कार्यसंघाचे Twitter खाते दिसेल.

2 पायरी

स्वीकारा किंवा नकार द्या क्लिक करा.

3 पायरी

आपण आमंत्रणाचा स्वीकार केल्यास आता ते खाते खाती टॅबमध्ये आणि नवीन ट्विट पॅनेलमध्ये दिसेल.

कार्यसंघाचे सदस्य म्हणून, आपण ट्विट्स, थेट संदेश, पसंती आणि पुनर्ट्विट पोस्ट करू शकता. आपण पासवर्ड बदलू शकत नाही किंवा खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकत नाही.


कार्यसंघामधून स्वतःचे नाव काढून टाकणे

 

आपणास कार्यसंघामध्ये यापुढे राहायचे नसल्यास आपण संघामधून स्वतःचे नाव काढून टाकू शकता.
 

TweetDeck वरून कार्यसंघामधून स्वतःचे नाव काढून टाकणे:

 1. नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.
 2. ज्या खात्यासाठी आपणास आपले नाव कार्यसंघामधून काढून टाकायचे आहे ते निवडा.
 3. कार्यसंघामधून बाहेर पडा क्लिक करा.
 4. बाहेर पडा क्लिक करून आपल्या निवडीची पुष्टी करा.

मला कार्यसंघांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करायला नको आहे. मी माझी सेटिंग्ज कशी बदलू?

twitter.com वरील आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्जच्या कार्यसंघांसाठी Twitter वरील कार्यसंघामध्ये आपणास कोणी आमंत्रित करावे हे समायोजित करण्यासाठी आपण आपली सेटिंग्ज बदलू शकता.

मी यापूर्वी खात्याचा पासवर्ड दिला आहे. आता कोणाला प्रवेश आहे हे मी कसे व्यवस्थापित करू?

ज्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या पासवर्ड दिला आहे तसेच सहयोगी किंवा प्रशासक म्हणून ज्यांना समाविष्ट केले आहे त्यांच्यासह आपल्या कार्यसंघाच्या सदस्यांच्या यादीमध्ये TweetDeck वरील सध्या या खात्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे नाव दाखविले जाते.

यादीमध्ये दाखविलेल्या एखाद्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा नसल्यास त्या व्यक्ती पुढील जबाबदारी बदला क्लिक करा आणि कार्यसंघामधून काढून टाका निवडा. यामुळे TweetDeck मधील त्या व्यक्तीचा प्रवेश मागे घेतला जाईल. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, आपला पासवर्ड बदला आणि twitter.com/सेटिंग्ज/अनुप्रयोगांवर आपल्या खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणते अनुप्रयोग अधिकृत आहेत ते पहा.

मी TweetDeck मध्ये वापर करत असलेली इतर खाती देखील माझ्या मालकीची आहेत. मी कार्यसंघाला कसे व्यवस्थापित करू?

आपल्याकडे उप-खाते देखील असल्यास आणि आपणास सदस्यांच्या सदस्यांची यादी पाहायची आणि व्यवस्थापित करायची असल्यास, आपणास सध्या लॉग इन केलेल्या खात्यामधून लॉग आउट करून नंतर इच्छित खात्यामध्ये पुन्हा लॉग इन करणे आवश्यक असेल.

मी माझ्या Twitter खात्यामधील TweetDeck प्रवेश रद्द केल्यास माझ्या कार्यसंघाच्या सदस्यांचे काय होईल?

आपण TweetDeck मधील कार्यसंघाच्या यादीमधून सदस्यांना जोवर काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्या संघाच्या सदस्यांना आपल्या Twitter खात्यामधील प्रवेश गमवावा लागणार नाही. TweetDeck वर अनुप्रयोगाचा प्रवेश रद्द करण्याने कार्यसंघाच्या सदस्यांच्या यादीवर परिणाम होणार नाही.

मी माझ्या Twitter खात्याचा पासवर्ड बदलल्यास माझ्या कार्यसंघाच्या सदस्यांचे काय होईल?

आपण पासवर्ड बदलल्यास आपल्या कार्यसंघाच्या सदस्यांचा खात्यामधील प्रवेश गमावला जाणार नाही. आम्ही आपल्याला पासवर्ड अपडेट करण्यास प्रोत्साहित करतो जेणेकरून केवळ आपणास (खाते मालक किंवा खाते व्यवस्थापित करणारी व्यक्ती म्हणून) हे माहित होते.

मी TweetDeck च्या बाहेर कार्यसंघांचा वापर करू शकतो/ते?

केवळ TweetDeck मधेच कार्यसंघाची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

TweetDeck न वापरता मी कार्यसंघ व्यवस्थापित करू शकतो/ते?

केवळ TweetDeck मधेच कार्यसंघ व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. नवीन सदस्य समाविष्ट करण्यासाठी किंवा विद्यमान सदस्यांना दिलेली जबाबदारी बदलण्यासाठी आपण TweetDeck वर लॉग इन करणे आवश्यक आहे.

माझ्या कार्यसंघाचे सदस्य त्यांचे खाते सुरक्षित ठेवत आहेत याची मला खात्री कशी करता येते?

संघाचे वैशिष्ट्य वापरणे म्हणजे आपल्या कार्यसंघाचे सदस्य त्यांच्या Twitter खात्यावरून TweetDeck मध्ये लॉग इन करतात. ते सर्व शेअर केलेली खाती सुरक्षित ठेवण्यासाठी TweetDeck वर लॉग इन करण्यासाठी वापरल्या गेलेल्या खात्यासाठी लॉगइन सत्यापन सक्षम करू शकतात.

मी कार्यसंघाच्या खात्यांमध्ये ई-मेल सूचनापत्रांवरून सदस्यता कशी रद्द करू शकतो/ते?

जेव्हा आपणास एखाद्या कार्यसंघाच्या खात्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि आपल्या खात्यांपैकी एखाद्या खात्यासाठी संघामध्ये सहभागी होण्यासाठी एखाद्याला आमंत्रित केले जाते तेव्हा Twitter कडून ई-मेल सूचनापत्र पाठविले जाते. ही आपल्या कार्यसंघाविषयीची एक महत्त्वाची सूचना असून त्यामुळे त्यांच्यासाठी सदस्यत्व रद्द करण्याचा कोणताही पर्याय नाही असे आम्हाला वाटते. आपणास "आपल्याला आमंत्रित केले आहे" ई-मेल सूचनापत्र मिळविणे थांबवायचे असल्यास, twitter.com वरील आपल्या आपले खाते सेटिंग्जवर जाऊन कार्यसंघामध्ये आपणास कोणी आमंत्रित करावे हे समायोजित करण्यासाठी आपण आपली सेटिंग्ज बदलू शकता.

मी माझ्या कार्यसंघामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव समाविष्ट करू शकत नाही. मी काय करावे?

त्या व्यक्तीने कदाचित गोपनीयता सेटिंग्ज सक्षम केली असावी ज्यामुळे तिला कार्यसंघामध्ये समाविष्ट होण्यास प्रतिबंधित केले जात आहे. हे असे घडते आहे का हे पाहण्यासाठी कार्यसंघामधील सदस्याशी बोला. नवीन आमंत्रण स्वीकारण्यासाठी twitter.com वरील त्यांच्या  आपले खाते  सेटिंग्ज पृष्ठावरील कार्यसंघांसाठी Twitter विभागामध्ये तात्पुरते सेटिंग अक्षम करु शकतात.

हा लेख शेअर करा