आपल्या उपकरणावर एकदा अचूक ठिकाण सक्षम झाले की आपण सामान्यपणे जसे ट्विट कराल तसे करा. आपण आपल्या ट्विटमध्ये यापूर्वी ठिकाण संलग्न केलेले नसल्यास आपल्याला विशिष्ट ठिकाण सक्षम करायला आवडेल का अशी विचारणा करणारा प्रॉम्प्ट दिसू शकतो.
आपण निवडलेली ठिकाणांची यादी उघडण्यासाठी ट्विट लिहा चौकटीत ठिकाणाचे प्रतीक टॅप करा.
आपल्या ट्विटमध्ये आपल्याला जे ठिकाण समाविष्ट करायचे आहे ते निवडा.
आपण आपल्या ट्विटमध्ये इन-अॅप कॅमेऱ्यावरून घेतलेले छायाचित्र समाविष्ट करत असल्यास आणि ठिकाण प्रतीकावर टॅप केले असल्यास आपले अचूक स्थान (अक्षांश आणि रेखांश) ट्विटशी संबंधित असेल आणि API वरून शोधता येईल.
Twitter for iOS च्या पूर्वीच्या संस्करणांमध्ये जेव्हा आपण ट्विट कराल तेव्हा आपल्या ट्विटमध्ये नेहमी आपले निवडलेल्या ठिकाणाचे नाव आणि आपल्या उपकरणाचे (जे API वरून सापडू शकते) अचूक ठिकाण असेल.
पुढीलवेळी त्याच उपकरणावरून आपण Twitter अनुप्रयोग वापरून ट्विट कराल तेव्हा, आपले सध्याचे ठिकाणाचा वापर करून आपले सर्वसाधारण ठिकाण स्वयंचलितपणे आपल्या ट्विटमध्ये दाखवले जाईल. 6.26 पूर्वीच्या Twitter for iOS संस्करणांसाठी आपले अचूक ठिकाण सामान्य ठिकाणावरून स्वयंचलितपणे ट्विटला (आणि API वरून शोधता येईल) संलग्न केले जाईल.