लोकांसाठी प्रतिमा प्रवेशयोग्य कशा कराव्या

जेव्हा आपण iOS किंवा Android साठी Twitter अनुप्रयोग वापरून किंवा twitter.com वर फोटो ट्विट करता तेव्हा, दिव्यांग लोकांना सामग्री प्रवेशयोग्य असावी यासाठी प्रतिमांचे वर्णन लिहिण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

कॉम्पोझ प्रतिमा वर्णन सेटिंग कसे सक्षम करावे याबाबत माहिती आणि पुढील पर्याय वापरून प्रतिमा वर्णन कॉम्पोझ करण्याबाबत सूचना या लेखात समाविष्ट आहेत:

View instructions for:

प्रतिमा वर्णन कसे सेट करावे

iOS साठी Twitter वरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे 

 1. सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 2. सर्वसाधारण खाली, प्रवेशयोग्यता टॅप करा.
 3. प्रतिमा वर्णन लिहा शेजारी, सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी स्लायडर खेचा.

iOS साठी Twitter वरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे 

 1. ट्विट लिहा प्रतीक टॅप करून सुरुवात करा  आणि तुमचा(चे) फोटो संलग्न करा.
  नोट: आपल्या ट्विट्समध्ये फोटो समाविष्ट करण्याबाबत तपशीलवार सूचनांसाठी, हा लेख वाचा.
 2. प्रतिमेवर, वर्णनात्मक मजकूर समाविष्‍ट करण्यासाठी वर्णन जोडा टॅप करा.
 3. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा आणि लागू करा टॅप करा. ट्विट पोस्ट करण्यापूर्वी वर्णन संपादित करण्यासाठी ते पुन्हा टॅप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 4. ट्विटमध्ये आपण प्रत्येक प्रतिमेचे वर्णन समाविष्ट करू शकता.
  नोट: GIF किंवा व्हिडिओंमध्ये प्रतिमा वर्णन जोडता येत नाही.

प्रतिमा वर्णन कसे सेट करावे

Android साठी Twitter वरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. अगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला एकतर नॅव्हीगेशन मेनू प्रतीक{{ htc-icon: drawer_on }} किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. सर्वसाधारण खाली, प्रवेशयोग्यता टॅप करा.
 4. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी, प्रतिमा वर्णन लिहा शेजारील चौकटीत खूण करा.

Android साठी Twitter मधून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. ट्विट प्रतीक टॅप करून सुरुवात करा {{ htc-icon:compose_circle_fill }} आणि तुमचा(चे) फोटो संलग्न करा.
  नोट: आपल्या ट्विट्समध्ये फोटो समाविष्ट करण्याबाबत तपशीलवार सूचनांसाठी, हा लेख वाचा.
 2. प्रतिमेवर, वर्णनात्मक मजकूर समाविष्‍ट करण्यासाठी वर्णन जोडा टॅप करा.
 3. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा आणि लागू करा टॅप करा. ट्विट पोस्ट करण्यापूर्वी वर्णन संपादित करण्यासाठी ते पुन्हा टॅप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 4. ट्विटमध्ये आपण प्रत्येक प्रतिमेचे वर्णन समाविष्ट करू शकता.
  नोट: GIF किंवा व्हिडिओंमध्ये प्रतिमा वर्णन जोडता येत नाही.

प्रतिमा वर्णन कसे सेट करावे

twitter.com वरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. अधिक प्रतीक  क्लिक करा आणि ड्रॉपडाउनमधून सेटिंग्ज व गोपनीयता निवडा (किंवा “g” की लगेच दाबून “s” की दाबा).
 2. सेटिंग्जच्या यादीतून प्रवेशयोग्यता क्लिक करा.
 3. प्रतिमा वर्णन लिहा चेकबॉक्स शोधा.
 4. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी चौकटीत खूण करा.

twitter.com वरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. ट्विट लिहा बटण क्लिक करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट वापरण्यासाठी, “n” की दाबा.
 2. आपला(ले) फोटो संलग्न करा.
  नोट: आपल्या ट्विट्समध्ये फोटो समाविष्ट करण्याबाबत तपशीलवार सूचनांसाठी, हा लेख वाचा.
 3. वर्णनात्मक मजकूर समाविष्‍ट करण्यासाठी वर्णन जोडा क्लिक करा.
 4. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा आणि पूर्ण झाले क्लिक करा. वर्णन संपादित करण्यासाठी, ट्विट पोस्ट करण्यापूर्वी वर्णन जोडा संवाद पुन्हा उघडा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 5. ट्विटमध्ये आपण प्रत्येक प्रतिमेचे वर्णन समाविष्ट करू शकता.
  नोट: GIF किंवा व्हिडिओंमध्ये प्रतिमा वर्णन जोडता येत नाही.
View instructions for:

iOS साठी Twitter वर VoiceOver:

VoiceOver वापरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. टच एक्सप्लोरेशन वापरून स्क्रीनच्या वर उजव्या बाजूला उपभोक्ता मेनू बटण शोधा.
 2. उपभोक्ता मेनू बटण दोनदा टॅप करा.
 3. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून स्क्रीनच्या मध्ये सेटिंग्ज आणि गोपनीयता बटण शोधा.
 4. सेटिंग्ज आणि गोपनीयता बटण दोनदा टॅप करा.
 5. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून प्रवेशयोग्यता घटक शोधा.
 6. प्रवेशयोग्यता दोनदा टॅप करा.
 7. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून प्रतिमा वर्णन लिहा स्विच बटण शोधा.
 8. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी बटण दोनदा टॅप करा.

VoiceOver वापरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. टच एक्सप्लोरेशन वापरून ट्विट लिहा बटण स्क्रीनच्या वरच्या बाजूस उजवीकडे शोधा.
 2. ट्विट लिहा बटण दोनदा टॅप करा.
 3. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून फोटो लायब्ररी बटण शोधा.
 4. प्रतिमा जोडण्यासाठी फोटो गॅलरी बटण दोनदा टॅप करा.
 5. समाविष्ट करण्याकरिता प्रतिमा शोधण्यासाठी, टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरा.
 6. प्रतिमा समाविष्ट करून आणि कॉम्पोझरमध्ये परत येण्यासाठी दोनदा टॅप करा.
 7. कॉम्पोझरमध्ये, टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून प्रतिमा शोधा.
 8. प्रतिमेवर लक्ष केंद्रित करून, "फोटोमध्ये वर्णन समाविष्ट करा" ऐकू येईपर्यंत वर किंवा खाली स्वाईप करत राहा आणि नंतर प्रतिमेसाठी वर्णन समाविष्ट करण्यासाठी दोनदा टॅप करा.
 9. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 10. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला लागू करा बटण शोधा.
 11. वर्णन जोडून कॉम्पोझरकडे परत येण्यासाठी लागू करा बटण दोनदा टॅप करा.

VoiceOver वापरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे संपादित करावे

 1. आपले प्रतिमा वर्णन ट्विटवर पोस्ट करण्यापूर्वी आपण ते संपादित करू शकता. कॉम्पोझरमध्ये, टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून प्रतिमा शोधा.
 2. प्रतिमेवर लक्ष केंद्रित करून, "फोटोचे वर्णन संपादित करा" ऐकू येईपर्यंत वर किंवा खाली स्वाईप करत राहा आणि नंतर प्रतिमेमध्ये वर्णन समाविष्ट करण्यासाठी दोनदा टॅप करा.
 3. प्रतिमेचे वर्णन बदला. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 4. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला लागू करा बटण शोधा.
 5. वर्णन जोडून कॉम्पोझरमध्ये परत येण्यासाठी लागू करा बटण दोनदा टॅप करा.

Android साठी Twitter वर TalkBack

TalkBack वापरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून स्क्रीनच्या उजव्या बाजूला वर नॅव्हिगेशन ड्रॉवर बटण शोधा.
 2. मेनू उघडण्यासाठी नॅव्हिगेशन ड्रॉवर बटण दोनदा टॅप करा.
 3. मेनूमध्ये, टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून सेटिंग्ज आणि गोपनीयता घटक शोधा.
 4. सेटिंग्ज आणि गोपनीयता घटक दोनदा टॅप करा.
 5. उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून प्रवेशयोग्यता घटक शोधा.
 6. प्रवेशयोग्यता दोनदा टॅप करा.
 7. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून प्रतिमा वर्णन लिहा चेकबॉक्स शोधा.
 8. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी चेकबॉक्स दोनदा टॅप करा.

TalkBack वापरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. टच एक्सप्लोरेशन वापरून स्क्रीनच्या तळाशी डावीकडे लिहा बटण शोधा.
 2. लिहा बटण दोनदा टॅप करा.
 3. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून फोटो बटण शोधा.
 4. फोटो जोडण्यासाठी फोटो बटण दोनदा टॅप करा.
 5. समाविष्ट करण्याकरिता फोटो शोधण्यासाठी, टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरा.
 6. फोटो समाविष्ट करून आणि कॉम्पोझरमध्ये परत येण्यासाठी दोनदा टॅप करा.
 7. कॉम्पोझरमध्ये, टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून वर्णन जोडा शोधा.
 8. वर्णन जोडा बटण दोनदा टॅप करा.
 9. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 10. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला लागू करा बटण शोधा.
 11. वर्णन जोडून कॉम्पोझरकडे परत येण्यासाठी लागू करा बटण दोनदा टॅप करा. (नोट: वर्णन समाविष्ट केल्यानंतर, वर्णन जोडा बटणाचे लेबल बदलून वर्णन जुळवा होईल.)

TalkBack वापरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे संपादित करावे

 1. आपले प्रतिमा वर्णन ट्विटवर पोस्ट करण्यापूर्वी आपण ते संपादित करू शकता. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून वर्तमान वर्णन असे लेबल असलेले बटण शोधा.
 2. बटण दोनदा टॅप करा.
 3. प्रतिमेचे वर्णन बदला. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 4. टच एक्सप्लोरेशन किंवा उजवे/डावे फ्लिक जेश्चर वापरून स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला लागू करा बटण शोधा.
 5. वर्णन जोडून कॉम्पोझरकडे परत येण्यासाठी लागू करा बटण दोनदा टॅप करा. (नोट: वर्णन समाविष्ट केल्यानंतर, वर्णन जोडा बटणाचे लेबल बदलून वर्णन जुळवा होईल.)

twitter.com सह Mac साठी VoiceOver वापरणे

twitter.com वरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. पटकन “g” की व नंतर “s” की दाबून सेटिंग्ज आणि गोपनीयता वर नॅव्हिगेट करा.
 2. वेब रोटर वर आणण्यासाठी “कंट्रोल + पर्याय + u” की एकदम दाबा.
 3. वेब रोटरमध्ये लिंक्स निवडण्यासाठी उजवा बाण की दाबा.
 4. घटक प्रवेशयोग्यता शोधण्यासाठी खाली बाण की वापरा आणि “एंटर” की दाबा.
 5. प्रवेशयोग्यता सेटिंग्जमध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी “एंटर” दाबा.
 6. वेब रोटर वर आणण्यासाठी “कंट्रोल + पर्याय + u” की एकदम दाबा.
 7. वेब रोटरमध्ये फॉर्म्स नियंत्रणे निवडण्यासाठी उजवा बाण की दाबा.
 8. प्रतिमा वर्णन लिहा शोधण्यासाठी खाली बाण की वापरा आणि “एंटर” की दाबा.
 9. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी स्पेसबार वापरा.
 10. वेब रोटर वर आणण्यासाठी “कंट्रोल + पर्याय + u” की दाबा.
 11. बदल सुरक्षित करा शोधण्यासाठी खाली बाण की वापरा आणि “एंटर” की दाबा.

twitter.com वरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. कीबोर्ड शॉर्टकट वापरून ट्विट कम्पोझर उघडा (“n” की दाबा).
 2. फोटो किंवा व्हिडिओ जोडा बटणावर नॅव्हिगेट करण्यासाठी “टॅब” की वापरा आणि “एंटर” दाबा.
 3. समाविष्ट करण्यासाठी प्रतिमा निवडण्याकरिता फाईल सिस्टिम संवाद वापरा.
 4. कम्पोझरमध्ये, “टॅब” की वापरून आपण जोडलेली प्रतिमा शोधा. प्रतिमा ज्या क्रमाने समाविष्ट केली गेली त्यानुसार प्रतिमेला लेबल लावले जाईल (उदा. "प्रतिमा 1")
 5. वर्णनात्मक मजकूर समाविष्‍ट करण्यासाठी, प्रतिमेवर लक्ष केंद्रित करून “एंटर” की दाबून लघुप्रतिमा पूर्वावलोकन संवाद उघडा.
 6. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 7. “टॅब” की आणि “एंटर” दाबून किंवा फक्त “आज्ञा” की दाबून धरून “एंटर” दाबून लागू करा बटण शोधा दाबा.
 8. वर्णन संपादित करण्यासाठी, ट्विट पोस्ट करण्यापूर्वी लघुप्रतिमा पूर्वावलोकन संवाद पुन्हा उघडा.

Twitter.com सह Windows स्क्रीन रीडरसाठी JAWS वापरणे

twitter.com वरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. JAWS च्या आभासी नॅव्हिगेशनला तात्पुरते वगळण्‍यासाठी “समाविष्‍ट करा” आणि “3” की एकदम दाबा.
 2. पुढे जाण्यासाठी की एंटर करा ऐकल्यावर, कीबोर्ड वापरून सेटिंग्जवर नॅव्हिगेट करा. शॉर्टकट (“g” की पटकन दाबून नंतर “s” की दाबा).
 3. पृष्ठासाठीच्या लिंक्सची यादी वर आणण्यासाठी “समाविष्‍ट करा” आणि “F7” की दाबा.
 4. घटक प्रवेशयोग्यता शोधण्यासाठी खाली बाण की वापरा आणि “एंटर” की दाबा.
 5. प्रतिमा वर्णन लिहा घटक शोधण्यासाठी “f” की दाबा.
 6. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी स्पेसबार वापरा.
 7. बदल सुरक्षित करा बटण शोधण्यासाठी “f” की दाबा आणि “एंटर” की दाबा.

twitter.com वरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. JAWS च्या आभासी नॅव्हिगेशनला तात्पुरते वगळण्यासाठी “समाविष्‍ट करा” आणि “3” की एकदम दाबा.
 2. कीबोर्ड शॉर्टकट वापरून ट्विट कम्पोझर उघडा (“n” की दाबा).
 3. फोटो किंवा व्हिडिओ जोडा बटणावर नॅव्हिगेट करण्यासाठी “टॅब” की वापरा आणि “एंटर” दाबा.
 4. समाविष्ट करण्यासाठी प्रतिमा निवडण्याकरिता फाईल सिस्टिम संवाद वापरा.
 5. कम्पोझरमध्ये, “टॅब” की वापरून आपण जोडलेली प्रतिमा शोधा. प्रतिमा ज्या क्रमाने समाविष्ट केली गेली त्यानुसार प्रतिमेला लेबल लावले जाईल (उदा. "प्रतिमा 1").
 6. वर्णनात्मक मजकूर समाविष्‍ट करण्यासाठी, प्रतिमेवर लक्ष केंद्रित करून “एंटर” की दाबून लघुप्रतिमा पूर्वावलोकन संवाद उघडा.
 7. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 8. “टॅब” की आणि “एंटर” दाबून किंवा फक्त “कंट्रोल” की दाबून धरून “एंटर” दाबून लागू करा बटण शोधा.
 9. वर्णन संपादित करण्यासाठी, ट्विट पोस्ट करण्यापूर्वी लघुप्रतिमा पूर्वावलोकन संवाद पुन्हा उघडा.

twitter.com सह Windows साठी NVDA स्क्रीन रीडर वापरणे

twitter.com वरून प्रतिमा वर्णनाचे कॉम्पोझिशन कसे सक्षम करावे

 1. फॉर्म्स मोड एंटर करण्यासाठी “इन्सर्ट” आणि “स्पेस” की एकदम दाबा.
 2. पटकन “g” की व नंतर “s” की दाबून सेटिंग्ज आणि गोपनीयता वर नॅव्हिगेट करा.
 3. फॉर्म्स मोडमधून बाहेर पडण्यासाठी “इनसर्ट” आणि “स्पेस” की एकदम दाबा.
 4. पृष्ठासाठीच्या लिंक्सची यादी वर आणण्यासाठी “इनसर्ट” आणि “F7” की एकदम दाबा.
 5. घटक प्रवेशयोग्यता शोधण्यासाठी खाली बाण की वापरा आणि “एंटर” की दाबा.
 6. प्रतिमा वर्णन लिहा घटक शोधण्यासाठी “f” की दाबा.
 7. सेटिंग चालू किंवा बंद करण्यासाठी "स्पेसबार" वापरा.
 8. बदल सुरक्षित करा बटण शोधण्यासाठी “f” की दाबा आणि “एंटर” की दाबा.

twitter.com वरून ट्विट्समध्ये प्रतिमा वर्णन कसे जोडावे

 1. फॉर्म्स मोड एंटर करण्यासाठी “इनसर्ट” आणि “स्पेस” की एकदम दाबा.
 2. कीबोर्ड शॉर्टकट वापरून ट्विट कम्पोझर उघडा (n की दाबा).
 3. फोटो किंवा व्हिडिओ जोडा बटणावर नॅव्हिगेट करण्यासाठी “टॅब” की वापरा आणि “एंटर” दाबा.
 4. समाविष्ट करण्यासाठी प्रतिमा निवडण्याकरिता फाईल सिस्टिम संवाद वापरा.
 5. कम्पोझरमध्ये, “टॅब” की वापरून आपण जोडलेली प्रतिमा शोधा. प्रतिमा ज्या क्रमाने समाविष्ट केली गेली त्यानुसार प्रतिमेला लेबल लावले जाईल (उदा. "प्रतिमा 1").
 6. वर्णनात्मक मजकूर समाविष्‍ट करण्यासाठी, प्रतिमेवर लक्ष केंद्रित करून “एंटर” की दाबून लघुप्रतिमा पूर्वावलोकन संवाद उघडा.
 7. प्रतिमेचे आपले वर्णन टाईप करा. (420 वर्णांची मर्यादा आहे.)
 8. “टॅब” की आणि “एंटर” दाबून किंवा फक्त “कंट्रोल” की दाबून धरून “एंटर” दाबून लागू करा बटण शोधा.
 9. वर्णन संपादित करण्यासाठी, ट्विट पोस्ट करण्यापूर्वी लघुप्रतिमा पूर्वावलोकन संवाद पुन्हा उघडा.

Note: एकदा पोस्ट केल्यावर, प्रतिमेला लागू केलेले वर्णन दिसणार नाही परंतु दिव्यांग लोकांना त्यांच्या सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे (उदा. स्क्रीन रीडर्स आणि ब्रेल डिस्प्ले) वर्णनात प्रवेश असेल.

Bookmark or share this article