goglobalwithtwitterbanner

TweetDeck वापरण्याच्या पद्धती

TweetDeck आपल्याला एका सोयीस्कर इंटरफेसमध्ये एकाधिक टाइमलाइन्स दाखवून अधिक सोयीस्कर Twitter चा वापरानुभव देतो. यामध्ये Twitter चा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने अनेक प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत: एकाधिक Twitter खाती व्यवस्थापित करणे, पुढील काळात पोस्ट करण्यासाठी ट्विट्स नियोजित करणे, ट्विटचे कलेक्शन करणे इत्यादी.

TweetDeck सध्या tweetdeck.com किंवा Mac app store वर उपलब्ध आहे.

TweetDeck वापरण्यास सुरुवात करण्याच्या पद्धती

 1. http://tweetdeck.twitter.com येथे जा किंवा Mac साठी डेस्कटॉप अनुप्रयोग उघडा.
 2. आपल्या Twitter खात्यावरून लॉग इन करा. आपण इतर लोकांबरोबर शेअर न केलेले Twitter खाते वापरण्याची आम्ही शिफारस करतो.
 3. एकदा आपण लॉग इन केले की, आपण आपल्या TweetDeck खात्यावर एकाधिक Twitter खाती कनेक्ट करू शकता.

नोट: आपण Mac साठी (Mac: 3.5.0 पेक्षा जुनी) आमच्या डेस्कटॉप अनुप्रयोगाचे जुने संस्करण वापरत असल्यास, आपणास नवीनतम संस्करणावर उन्नत होईपर्यंत Twitter खात्यावरून साइन इन किंवा नवीन खाते तयार करता येणार नाही.

कॉर्पोरेट किंवा टिम एनव्हायरमेंटमध्ये आपण TweetDeck वापरत असल्यासटिमचे खाते सेट करण्याच्या पद्धती जाणून घ्या.

आपल्या TweetDeck मध्ये एकाधिक Twitter खाती कनेक्ट करण्याच्या पद्धती

 1. नॅव्हीगेशन बारवरील खाती  क्लिक करा.
 2. आपल्या मालकीच्या दुसऱ्या खात्याशी लिंक करा क्लिक करा.
 3. आपण समाविष्ट करत असलेल्या टिमशी संबंधित खाते तयार करणार आहात हे समजण्यासाठी संदेश वाचा, त्यानंतर पुढे चालू ठेवा क्लिक करा.
 4. नवीन विंडोमध्ये, खात्याचे उपभोक्ता नाव किंवा ई-मेल आणि पासवर्ड प्रविष्ट करून अधिकृत करा क्लिक करा.
 5. आपण TweetDeck वापरण्यास तयार आहात!

TweetDeck वरून खाते काढून टाकण्याच्या पद्धती

 1. नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.
 2. खाली बाण क्लिक करून आपणास हटवायचे असलेले खाते विस्तृत करा.
 3. टिममधून बाहेर पडा क्लिक करून बाहेर पडा क्लिक करून पुष्टी करा.

नोट: TweetDeck मध्ये आपण साइन-इन केलेले खाते TweetDeck वरून काढून टाकले जाऊ शकत नाही.

TweetDeck वर एकाधिक खाती व्यवस्थापित करणे

डिफॉल्ट खाते निवडा:

आपल्या खात्यांपैकी कोणते खाते आपल्याला डिफॉल्ट खाते म्हणून वापरायचे आहे ते आपण निवडू शकता. हे असे खाते आहे ज्यावरुन आपण या वैशिष्ट्यांचा वापर करून ट्विट तयार कराल, ट्विट पसंत कराल आणि या घटकांचा वापर करून ट्विट्सना प्रत्युत्तर द्याल.

 1. नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.
 2. खाली बाण क्लिक करुन आपण डिफॉल्ट म्हणून सेट करायचे आहे असे खाते विस्तृत करा.
 3. डिफॉल्ट खाते पर्यायावर टॉगल करा.

एकाधिक खात्यांवरून ट्विट करणे:

TweetDeck वरून आपल्याला एकाधिक खात्यांवरून सहजपणे ट्विट करता येते. आपल्याला ज्यावरून ट्विट करायचे आहे ती खाती निवडणे:

 1. नॅव्हीगेशन बारच्या सर्वात वरती असलेल्या ट्विट बटणावर क्लिक करा; आपण अधिकृत केलेली खाती सर्वात वर (आपण खात्याचे उपभोक्ता नाव पाहण्यासाठी प्रतीकावर जाऊ शकता) सूचीबद्ध केली जातील.
 2. आपणास ज्या खात्यावरून ट्विट करायचे आहे ते निवडा (जर खाते निवडले असेल तर ते हिरव्या चेकमार्कने हायलाइट केले जाईल).
  टीप: आपल्या TweetDeck शी संबंधित कोणत्याही खात्यासाठी ट्विट्स (माध्यमाचा वापर करून/न करता) आगाऊ नियोजित करणे .

एकाधिक खात्यांवरून पसंत करणे:

TweetDeck वरून आपल्याला एकाधिक खात्यांवरून ट्विट पसंत करता येते.

 1. ट्विटवरील आणखी प्रतीकावर  क्लिक करा.
 2. पॉप-अप होणाऱ्या मेनूमधून …खात्यांवरून पसंत करा क्लिक करा
 3. आपल्याला ज्यामधून पसंत करायचे आहे त्या खात्या(त्यां)च्या पुढील पसंत करा क्लिक करा.

एकाधिक खात्यांवरून फॉलो करणे:

TweetDeck वरून एकाधिक खात्यांवरून एखाद्या व्यक्तीला आपल्याला फॉलो करता येते. आपण एखाद्याच्या प्रोफाइलवर फॉलो करून एखाद्याला फॉलो देखील करू शकता, परंतु केवळ आपले डिफॉल्ट खाते त्यांना फॉलो करेल.

 1. आपण जे खाते फॉलो करायचे आहे त्यावर क्लिक करा; प्रोफाइल दिसायला लागेल.
 2. आणखी प्रतीकावर क्लिक करून नंतर ...यावरील खात्यांवरून फॉलो करा निवडा.
 3. आपल्याला कोणत्या खात्यांवरून फॉलो करायला आवडेल ते निवडा.
  नोट: खाते अनफॉलो करताना त्याच सूचना लागू होतात.

वैयक्तिक Twitter उपभोक्ता नावावरून लॉग इन करणे अधिक सुरक्षित का आहे?

फक्त तुमच्याकडे पासवर्ड असलेले वैयक्तिक उपभोक्ता नाव वापरुन आपण लॉग इन केले असेल तरच आपण खात्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही जोखम न घेता आपल्या टिमच्या खात्यांमध्ये सुरक्षितपणे प्रवेश करू शकता. समाविष्टीत सुरक्षेसाठी आपण लॉगइन सत्यापन वापरण्याची आम्ही शिफारस करतो.

TweetDeck मध्ये ट्विट तयार करण्याच्या पद्धती

आपणास शब्द, प्रतिमा, GIFs, इमोजी, थ्रेड्स, सर्वेक्षणे इत्यादी असे काही शेअर करायचे असले तरीही TweetDeck मधील ट्विट कंपोझरमुळे चर्चांमध्ये सहभागी होणे सोपे होते.

 1. Twitter खात्यामध्ये लॉग इन केलेले असताना ट्विट क्लिक करा.
 2. आपण एकाधिक खात्यांमध्ये लॉग इन केले असल्यास, आपल्याला ज्या Twitter खात्यावरुन ट्विट करायचे आहे ते निवडल्याचे सुनिश्चित करा.
 3. मजकूर समाविष्ट करून ट्विट लिहा. वर क्लिक करून इमोजी समाविष्ट करा.   निवडून एक प्रतिमा किंवा व्हिडिओ समाविष्ट करा, टॅप करून GIF समाविष्ट करा,  वापरून सर्वेक्षण समाविष्ट करा.
 4. थ्रेड तयार करणे, आपल्या थ्रेडमध्ये पुढील ट्विट समाविष्ट करण्यासाठी  वर क्लिक करा.
 5. शेअर करण्यासाठी ट्विट क्लिक करा.

TweetDeck कॉलम्सचा वापर करणे

एकल टाइमलाइनच्या ऐवजी, TweetDeck वरून आपल्याला स्वारस्य असलेला विशिष्ट मजकूर प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांना बाजूला ठेवण्यासाठी कॉलम्स समाविष्ट करता येतात. आपले सर्व उल्लेख, शोध क्वेरीचे परिणाम, आवडींची यादी, हॅशटॅग किंवा प्रचलनाची अगदी नवीन ट्विट्स दाखविणारे कॉलम्स समाविष्ट करा.

कॉलम समाविष्ट करण्यासाठी:

 1. कॉलम समाविष्ट करा निवडण्यासाठी नॅव्हीगेशन बारवरून, अधिक प्रतीकावर   क्लिक करा.
 2. आपल्याला ज्या प्रकारचा कॉलम समाविष्ट करायचा आहे तो निवडा.
 3. आपली खाती च्या अंतर्गत आपल्याला जो कॉलम लाइव्ह दाखवायचा आहे तो निवडा.

नोट: इतर खात्यांमधील क्रियाकलापांवर आधारित माहिती वापरून आपण कॉलम देखील तयार करू शकता. खात्याच्या उपभोक्ता नावावर क्लिक करा आणि त्यांचे उल्लेख, यादी, संग्रह किंवा पसंती यासारख्या कृतींमधून निवडा.

कॉलम काढून टाकणे:

 1. कॉलम हेडरमध्ये, कॉलमच्या शीर्षकाच्या पुढील फिल्टर प्रतीकावर  क्लिक करा.
 2. कॉलम हटविण्यासाठी काढून टाका बटणावर क्लिक करा.

कॉलम फिल्टर्स:

आपण आपल्या प्रत्येक कॉलममध्ये प्रदर्शित ज्या प्रकारच्या ट्विट्स नियंत्रित करायच्या आहेत त्या सहजपणे नियंत्रित करू शकता. आपण मजकूर, स्थानउपभोक्ते, सहभाग किंवा अलर्ट्स; किंवा यांची संयोजने  निवडू शकता.

 1. मजकूर फिल्टर करण्याने आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या ट्विटवरून कॉलम फिल्टर करणे शक्य होते जसे की पुनर्ट्विट्स, विशिष्ट शब्द किंवा वाक्यांश असलेल्या ट्विट्स किंवा छायाचित्रे असलेली ट्विट्स. 
 2. स्थान फिल्टरमुळे आपल्याला विशिष्ट ठिकाणी जिओटॅग केलेल्या ट्विट्स फिल्टर करणे शक्य होते.
 3. उपभोक्ता फिल्टरमुळे आपल्याला एका विशिष्ट ट्विटकर्त्याने लिहिलेल्या विशिष्ट कॉलममधील ट्विट्स आणि त्यांनी उल्लेख केलेल्यांची ट्विट्स फिल्टर करणे शक्य होते. 
 4. एन्गेज्मेंट फिल्टरमुळे आपल्याला कमी संख्या असलेली पुनर्ट्विट्स, पसंत्या, किंवा प्रत्युत्तरांवरून ट्विट्स फिल्टर करणे शक्य होते.
 5. अॅलर्ट फिल्टरमुळे आपल्याला एका विशिष्ट कॉलमसाठी पॉप-अप किंवा ध्वनी सक्षम करणे शक्य होते.
 6. नोट: आपण शोध कॉलम तयार केल्यास, आपण स्थान, तारीख आणि प्रतिबद्धतेवरून परिणाम देखील फिल्टर करू शकता. स्थान फिल्टरमुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रातील संबंधित मजकूर शोधण्यासाठी आपले शोध परिणामांवर सहजपणे लक्ष केंद्रित करणे शक्य होते. जेव्हा स्थान फिल्टर लागू केला जातो तेव्हा स्थानासह जिओटॅग केलेल्या केवळ असुरक्षित ट्विट्स शोध परिणामांमध्ये दिसून येतील.

फिल्टर तयार करणे:

 1. कॉलम हेडरमध्ये, कॉलमच्या शीर्षकाच्या पुढील फिल्टर प्रतीकावर  क्लिक करा.
 2. आपल्याला कॉलममध्ये (मजकूर, उपभोक्ते, किंवा अलर्ट्स) कोणत्या प्रकारचा फिल्टर(र्स) लागू करायचा आहे ते निवडा.
 3. कॉलम सेटिंग्ज संकोचित करण्यासाठी फिल्टर प्रतीकावर   क्लिक करा.
  नोट: सानुकूल फिल्टरिंग केलेले कॉलम्स, आपण सक्षम केलेल्या फिल्टरच्या प्रतीकासह यावरून फिल्टर करा प्रदर्शित करतील.

कॉलमची पुनर्क्रमित करणे:

TweetDeck मध्ये केवळ काही त्वरित क्लिक करून सहजतेने कॉलम क्रमवारी पुन्हा व्यवस्थित करा.

 1. कॉलम हेडरमध्ये, कॉलमच्या शीर्षकाच्या पुढील फिल्टर प्रतीकावर  क्लिक करा.
 2. आपल्याला कोणत्या दिशेने कॉलम हलवायचा आहे त्यानुसार डावा किंवा उजवा बाण हालवा.
  नोट: आपले कॉलम्स पुनर्क्रमित करण्यासाठी आपण नॅव्हीगेशन बारमधून ते त्यांच्या संबंधित प्रतीकावरून ड्रॅग आणि ड्रॉप देखील करू शकता.

TweetDeck कॉलम्सचे प्रकार आणि ते काय प्रदर्शित करतात

 • होम: कोणत्याही ठराविक खात्यासाठी होम टाइमलाइन.
 • उपभोक्ता: ठराविक खात्याकडील ट्विट्स.
 • सूचनापत्रे: जेव्हा एखाद्या खात्याची ट्विट्स पुन्हा ट्विट केली जातात, पसंत केली जातात, किंवा त्यांचा उल्लेख केला जातो आणि जेव्हा कोणी खाते फॉलो करण्याबरोबरच ठराविक खात्यासाठी सूचनापत्रे.
 • शोध: ठराविक शोध संज्ञा.
 • याद्या: यादी तयार करा किंवा आपण आधीच फॉलो करत असलेल्या यादीशी कनेक्ट करा.
 • कलेक्शन: इतरांबरोबर शेअर करण्यासाठी आपण निवडलेल्या क्युरेटेड ट्विटची टाइमलाइन.
 • कृती: आपण फॉलो करत असलेल्या खात्यांच्या बाबतीत काय घडते आहे.
 • पसंती: पसंती असे चिन्हांकित केलेल्या ठराविक खात्याकडील ट्विट्स.
 • संदेश (एक खाते): ठराविक खात्यासाठी थेट संदेश.
 • उल्लेख (एक खाते): जेव्हा एखादी व्यक्ती ठराविक खात्याचा उल्लेख करते.
 • फॉलोअर्स: ठराविक खात्यासाठी फॉलो करणे.
 • नियोजित: आपली नियोजित ट्विट्स.
 • संदेश (सर्व खाती): आपल्या अधिकृत खात्यांमधील एकूण थेट संदेश.
 • उल्लेख (सर्व खाती): सर्व खात्यांकडील उल्लेख.
 • प्रचलनामधील: जगभरातील विशिष्ट प्रचलने.

 

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.