ट्विट कसे करावे
ट्विट्समध्ये फोटो, GIFs, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतात.
यासाठी सूचना पहा:
ट्विट स्रोत लेबल्स
ट्विट स्रोत लेबल्स आपल्याला ट्विट कसे पोस्ट केले गेले होते हे समजावून घेण्यास मदत करतात. ही अतिरिक्त माहिती ट्विट आणि त्याच्या लेखकाबाबत संदर्भ देते. स्रोत आपल्या परिचयाचा नसल्यास, आपण सामग्रीवर किती विश्वास ठेवू शकता हे ठरविण्यासाठी आपल्याला कदाचित अधिक जाणून घ्यायचे असू शकते.
- ट्विट तपशील पृष्ठावर जाण्यासाठी ट्विटवर क्लिक करा.
- ट्विटच्या तळाशी, खात्याच्या ट्विटच्या स्रोताचे लेबल आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ, “iPhone साठी Twitter”, “Android साठी Twitter” किंवा “वेबसाठी Twitter” .
- काही प्रकरणांत आपल्याला तृतीय पक्ष ग्राहक नाव दिसेल, जे सूचित करते की ते ट्विट गैर-Twitter अनुप्रयोगावरून आले आहे. लेखक कधीकधी त्यांची ट्विट्स व्यवस्थापित करण्यासाठी, विपणन मोहिमा व्यवस्थापित करण्यासाठी, जाहिरातीची कामगिरी मोजण्यासाठी, ग्राहक समर्थन प्रदान करण्यासाठी आणि ठराविक लोकांच्या गटांना जाहिरात करण्यासाठी लक्ष्यित करण्याकरिता तृतीय पक्ष ग्राहक अनुप्रयोग वापरतात. माणसे थेट ट्विट आणि मोहिमा तयार करू शकतात किंवा काही परिस्थितींमध्ये, अनुप्रयोगाद्वारे आपसूक तयार होतात. सामान्य तृतीय-पक्ष स्रोतांच्या यादीसाठी आमच्या भागीदार पृष्ठाला भेट द्या.
ट्विट्स हटविणे
- ट्विट कसे हटवावे याबद्दल वाचा.
- लक्षात घ्या की आपण केवळ आपली स्वतःचीच ट्विट्स हटवू शकता.
- इतर खात्यांनी पोस्ट केलेली ट्विट्स आपण हटवू शकत नाही. त्याऐवजी, आपण ज्या खात्यांची ट्विट्स प्राप्त करू इच्छित नाही त्यांना आपण अनफॉलो, अवरोधित किंवा म्यूट करू शकता.
- पुन्हा ट्विट कसे हटवावे किंवा पूर्ववत करावे याबद्दल वाचा.
कीबोर्ड शॉर्टकट्स
twitter.com वर वापरण्याच्या कीबोर्ड शॉर्टकट्सची यादी खाली आहे.
कृती
- n = नवीन ट्विट
- l = पसंत करा
- r = प्रत्युत्तर
- t = पुन्हा ट्विट
- m = थेट संदेश
- u = खाते म्यूट करा
- b = खाते अवरोधित करा
- एंटर = ट्विट तपशील उघडा
- o = फोटो विस्तारित करा
- / = शोध
- cmd-enter | ctrl-enter = ट्विट पाठवा
नॅव्हिगेशन
- ? = पूर्ण कीबोर्ड मेनू
- j = पुढील ट्विट
- k = आधीचे ट्विट
- स्पेस = पेज डाऊन
- . = नवीन ट्विट्स लोड करा
टाइमलाइन
- g आणि h = होम टाइमलाइन
- g आणि o = मुमेंट्स
- g आणि n = सूचनापत्रे टॅब
- g आणि r = उल्लेख
- g आणि p = प्रोफाइल
- g आणि l = पसंती टॅब
- g आणि i = यादी टॅब
- g आणि m = थेट संदेश
- g आणि s = सेटिंग्ज आणि गोपनीयता
- g आणि u = एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर जा