Twitter वर खाते कसे अवरोधित करावे

अवरोधित करा ही एक सुविधा आहे जी आपल्याला Twitter वर इतर खात्यांसोबत परस्परसंवाद कसा नियंत्रित करावा यामध्ये मदत करते. ही सुविधा उपभोक्त्यांना त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांचे ट्विट पाहणे आणि त्यांना फॉलो करणे यापासून विशिष्ट खात्यांना प्रतिबंधित करण्यात मदत करते.

Note: या सुविधेच्या अधिक विस्तृत माहितीसाठी आमच्या प्रगत अवरोधित करा पर्याय विषयी अधिक जाणून घ्या.

अवरोधित करा विषयी काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे:

 • आपण अवरोधित केलेली खाती आपल्याला फॉलो करू शकणार नाहीत आणि आपल्याद्वारे अवरोधित केलेल्या खात्यांना आपण फॉलो करू शकणार नाही.
 • आपण सध्या फॉलो करत असलेल्या खात्याला अवरोधित केल्यास परिणामी आपण त्या खात्याला अनफॉलो कराल (आणि ते देखील आपल्याला अनफॉलो करतील). आपण त्या खात्यास अनब्लॉक करण्याचे ठरविल्यास आपल्याला ते खाते पुन्हा फॉलो करावे लागेल.
 • अवरोधित केलेल्या खात्यांना त्यांचे खाते अवरोधित केले असल्याबाबत अॅलर्ट करणारे सूचनापत्र प्राप्त होत नाही. तथापि, अवरोधित केलेल्या खात्याने त्यास ज्या खात्याने अवरोधित केले आहे त्यांच्या प्रोफाइलला भेट दिल्यास, त्यांना अवरोधित केल्याचे (म्यूट करा सदृश्य, जे म्यूट केलेल्या खात्यांसाठी अदृश्य असते) पाहायला मिळेल.
 • आपण एखादे खाते अवरोधित केल्यास आणि त्यांनी आपल्या खात्याचा रिपोर्ट देणे निवडल्यास त्यांचा थेट उल्लेख करण्यात आलेला आहे असे आपले कोणतेही ट्विट त्यांना पाहण्यासाठी आणि रिपोर्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यास संलग्न करण्यासाठी उपलब्ध होईल.
 • अवरोधित करण्यात आलेल्या खात्यांकडून किंवा आपण ज्या खात्याला अवरोधित केले आहे अशा खात्यांनी प्रारंभ केलेल्या चर्चेमध्ये आपण फॉलो करत नसलेल्या खात्यांनी आपला उल्लेख केल्यास आपल्याला सूचनापत्रे प्राप्त होणार नाहीत. तथापि, आपण ज्या खात्याला अवरोधित केले आहे अशा खात्यांनी प्रारंभ केलेल्या चर्चेमध्ये आपण फॉलो करत असलेल्या खात्यांनी आपला उल्लेख केल्यास आपल्याला सूचनापत्रे प्राप्त होतील. आपला जेथे जेथे उल्लेख झालेला आहे ते सर्व आपल्याला पाहण्याची इच्छा असल्यास आपण आपले उपभोक्ता नाव शोधून पाहू शकता.

 

Important: आपण अवरोधित केलेले खाते Twitter वर लॉग असल्यासच अवरोधित करणे शक्य होईल. उदाहरणार्थ, आपण अवरोधित केलेले खाते लॉग नसेल किंवा तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून Twitter वर प्रवेश मिळवत असल्यास त्यांना आपले सार्वजनिक ट्विट पाहता येणे कदाचित शक्य होईल. त्यामुळे जेव्हा आपण Twitter वर आपली सामग्री शेअर करणे निवडता तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा.

अवरोधित खात्यांना या गोष्टी करता येणार नाहीत:

 • आपल्याला फॉलो करणे
 • Twitter वर लॉग इन केल्यावर आपले ट्विट पाहणे (जोपर्यंत ते आपल्याविषयी रिपोर्ट देत नाहीत आणि जोपर्यंत आपल्या ट्विटमध्ये त्यांचा उल्लेख करणे चालू असते)
 • Twitter वर लॉग इन केल्यावर शोध मध्ये जाऊन आपले ट्विट शोधणे
 • आपल्याला थेट संदेश पाठविणे
 • Twitter वर लॉग इन केल्यावर आपले फॉलोइंग किंवा फॉलोअर्सच्या याद्या, पसंत्या किंवा याद्या पाहणे
 • Twitter वर लॉग इन केल्यावर आपण तयार केलेले मुमेंट पाहणे
 • त्यांच्या याद्यांमध्ये आपले Twitter खाते जोडणे
 • फोटोमध्ये आपल्याला टॅग करणे

अवरोधित केलेल्या खात्यांवरील ट्विट आपल्या टाइमलाइनवर दिसणार नाहीत. तथापि, आपण खालील परिस्थितीमध्ये आपल्या टाइमलाइनवर ट्विट्स किंवा सूचनापत्रे कदाचित पाहू शकाल याची कृपया नोंद घ्या:

 1. आपण ज्यांना फॉलो करता त्यांच्या ट्विटमध्ये आपण अवरोधित केलेल्या खात्याचा उल्लेख असल्यास.
 2. आपण अवरोधित केलेल्या खात्यासह एखाद्या ट्विटमध्ये आपला उल्लेख केलेला असल्यास.
View instructions for:

Twitter खाते कसे अवरोधित करावे

ट्विटवरून अवरोधित करण्यासाठी

 1. आपण जे खाते अवरोधित करू इच्छिता त्या खात्याच्या ट्विटवर अगदी वरच्या बाजूला असलेल्या  प्रतीकावर टॅप करा.
 2. अवरोधित करा टॅप करा आणि त्यानंतर खात्री करण्यासाठी अवरोधित करा निवडा.

प्रोफाइलवरून अवरोधित करण्यासाठी

 1. आपण जे खाते अवरोधित करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.
 2. गिअर प्रतीक   टॅप करा
 3. अवरोधित करा टॅप करा आणि त्यानंतर खात्री करण्यासाठी अवरोधित करा निवडा.

Twitter खाते कसे अवरोधित करावे

ट्विटवरून अवरोधित करण्यासाठी

 1. आपण जे खाते अवरोधित करू इच्छिता त्या खात्याच्या ट्विटवर अगदी वरच्या बाजूला असलेल्या  प्रतीकावर टॅप करा.
 2. अवरोधित करा टॅप करा आणि त्यानंतर खात्री करण्यासाठी अवरोधित करा निवडा.

प्रोफाइलवरून अवरोधित करण्यासाठी

 1. आपण जे खाते अवरोधित करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.
 2. ओव्हरफ्लो प्रतीकावर  टॅप करा
 3. अवरोधित करा टॅप करा आणि त्यानंतर खात्री करण्यासाठी अवरोधित करा निवडा.

Twitter खाते कसे अवरोधित करावे

ट्विटवरून अवरोधित करण्यासाठी

 1. आपण जे खाते अवरोधित करू इच्छिता त्या खात्याच्या ट्विटवर अगदी वरच्या बाजूला असलेल्या  प्रतीकावर क्लिक करा.
 2. अवरोधित करा क्लिक करा आणि त्यानंतर खात्री करण्यासाठी अवरोधित करा निवडा.

प्रोफाइलवरून अवरोधित करण्यासाठी

 1. आपण जे खाते अवरोधित करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला जा.
 2. त्यांच्या प्रोफाइलच्या पानावरील अधिक  प्रतीकावर क्लिक करा.
 3. मेनूमधून अवरोधित करा निवडा.
 4. खात्री करण्यासाठी अवरोधित करा क्लिक करा.

मी एखाद्याला अवरोधित केल्यास ते मला कसे माहित होईल?

आपण अवरोधित केलेल्या खात्याच्या प्रोफाइलला जेव्हा भेट देता तेव्हा फॉलो करा बटणाऐवजी अवरोधित बटण असेल.

आपण अवरोधित केलेल्या खात्याच्या प्रोफाइलला जेव्हा भेट देता तेव्हा त्या खात्याचे ट्विट्स लपवलेले असतील. तथापि, होय, प्रोफाइल दाखवा बटण क्लिक करून त्या खात्यावरील ट्विट आपल्याला पाहता येतील.

Twitter खाते कसे अनब्लॉक करावे:

 1. Twitter वर अवरोधित केलेल्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.
 2. अवरोधित बटणावर क्लिक करा किंवा टॅप करा. 
 3. iOS करिता Twitter वर अनब्लॉक करा आणि Android करिता Twitter वर होय निवडून आपण खात्याला अनब्लॉक करू इच्छित असल्याची खात्री करा.

आणखी साधने

काही वेळेला आपल्याला असे आढळून येईल की इतर खात्यांना अवरोधित करणे हा योग्य मार्ग नाही-त्यामुळे फारसा काही लाभ होत नाही किंवा आपल्या Twitter विषयक अनुभवामध्ये त्यामुळे चांगला बदल दिसून येत नाही. आपल्या Twitter विषयक अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा इतर कार्यवाहींची संपूर्ण यादी पहा.

याशिवाय, सुरक्षित राहणे आणि आपला Twitter चा अनुभव नियंत्रित करणे विषयीचा आमचा लेख, तसेच जगभरातील उपभोक्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही ज्या भागीदारांसोबत काम करत आहोत त्यांच्या यादीविषयीचा विश्वसनीय साधने हा आमचा लेख देखील पहा.

Bookmark or share this article