माझ्या हॅक झालेल्या खात्यासंदर्भातील साहाय्यता

आपणास वाटत असेल की आपले खाते हॅक केले आहे आणि आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्डवरून लॉग इन करू शकत नसल्यास कृपया खालील दोन पायऱ्यांचे अनुसरण करा:

1. पासवर्ड रिसेटची विनंती करा


पासवर्ड रिसेट फॉर्म भरून ई-मेलची विनंती करून आपला पासवर्ड रिसेट करा. आपले उपभोक्ता नाव आणि ई-मेल पत्ता दोन्ही प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या Twitter खात्याशी संबंधित पत्त्यावर रिसेट ई-मेल निश्चितपणे पहा.

पासवर्ड रिसेट केल्यानंतर आपण लॉग इन करू शकत असल्यास, कृपया आपल्या खात्याशी तडजोड झाली आहे का हे पाहून आपले खाते पुन्हा सुरक्षित करा.

 

2. आपणास अजूनही मदत हवी असल्यास समर्थनाशी संपर्क साधा


आपण अजूनही लॉग इन करू शकत नसल्यास, समर्थन विनंती सबमिट करून आमच्याशी संपर्क साधा. हॅक झालेल्या आपल्या Twitter खात्याशी संबंधित ई-मेल पत्ता वापरल्याची खात्री करा; त्यानंतर आम्ही त्या ई-मेल पत्त्यावर अतिरिक्त माहिती आणि सूचना पाठवू. आपली समर्थन विनंती सबमिट करताना कृपया आपले उपभोक्ता नाव आणि आपल्या खात्यामध्ये आपण शेवटची लॉग इन केल्याची तारीख, दोन्ही घटक समाविष्ट करा.

आपण आपल्या Twitter खात्याशी संबंधित ई-मेल खात्यामधील लॉग इन गमावल्यास आपण काय करू शकता याविषयी अधिक जाणून घ्या.

हा लेख शेअर करा