goglobalwithtwitterbanner

संवेदनशील मीडिया रिपोर्ट करणे

Twitter चे मीडिया धोरण यानुसार ट्विट्समधील मीडिया संवेदनशील समजावे असा आपला आग्रह असल्यास, कृपया खाली वर्णन केलेल्या प्रक्रियेचा वापर करून त्याविषयीचा रिपोर्ट द्या.

ट्विट्समधील मीडिया कसा रिपोर्ट करावा

 1. twitter.com वर किंवा iOS अथवा Android अनुप्रयोगांसाठी Twitter वरून आपण ज्या ट्विटविरुद्ध रिपोर्ट करायचा आहे त्या ट्विटवर नॅव्हीगेट करा.
 2.   प्रतीकावर क्लिक किंवा टॅप करा. 
 3. ट्विट रिपोर्ट करा निवडा.
 4. ते संवेदनशील प्रतिमा दर्शवित आहे निवडा.
 5. पुढे आपल्या Twitter वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.

आपण पाहत असलेली एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसल्यास आणि Twitter ने देखील त्याच्यासमोर इशारा देणारे लेबल लावलेले नसल्यास मीडियाबाबत इशारा देण्याच्या आमच्या ठरवून देण्यात आलेल्या मर्यादेसोबत ते जुळत नसल्याची शक्यता आहे, हे कृपया लक्षात ठेवा.

मी रिपोर्ट केलेल्या संवेदनशील मीडियाचे पुढे काय होते?

Twitter च्या मीडिया धोरणांचे पालन करण्यासाठी मीडियावर इशारा संदेश आवश्यक असल्यास उपभोक्त्यांकडून ध्वजांकित करण्यात आलेले रिपोर्ट्सचे Twitter कडून पुनरावलोकन केले जाते. मीडिया ध्वजांकित करून आपण त्यास Twitter संघाच्या निदर्शनास आणून देत आहात, हे कृपया लक्षात ठेवा. ध्वजांकित केलेल्या माहितीला स्वयंचलितरित्या इशारा देणारा संदेश प्राप्त होत नाही किंवा त्यास साईटवरून काढून टाकले जात नाही.

आपली माहिती संवेदनशील म्हणून रिपोर्ट केलेली असल्यास आपल्याला काय करता येईल या विषयीच्या अधिक माहितीसाठी Twitter चे मीडिया धोरण पहा.
 

यासाठी सूचना पहा:

ट्विट्समध्ये आपणास संवेदनशील मीडिया दिसल्यास त्यास कसे नियंत्रित करावे

twitter.com वर लॉग इन करून आपली ट्विट मीडिया सेटिंग्ज समायोजित करा. डेस्कटॉप कॉम्प्युटर प्रतीक निवडून twitter.com साठी दिलेल्या सूचना पहा. 

ट्विट्समध्ये आपणास संवेदनशील मीडिया दिसल्यास त्यास कसे नियंत्रित करावे

 1. अगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.
 2. गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.
 3. सुरक्षितता अंतर्गत, संवेदनशील सामग्री असू शकेल असा मीडिया प्रदर्शित करा च्या समोरील बॉक्सवर टिकमार्क लावा.

ट्विट्समध्ये आपणास संवेदनशील मीडिया दिसल्यास त्यास कसे नियंत्रित करावे

 1. twitter.com लॉग इन करा आणि आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्जवर जा.
 2.  ट्विट मीडिया विभाग पहा आणि संवेदनशील सामग्री असू शकेल असा मीडिया प्रदर्शित करा च्या समोरील बॉक्सवर टिकमार्क लावा.
 3. पानाच्या तळाशी आपली सेटिंग जतन करून ठेवा.

नोट: याशिवाय आपण आपला Twitter अनुभव बाधित करणाऱ्या खात्यांना अनफॉलो किंवा अवरोधित करू शकता.

बेकायदेशीर किंवा Twitter च्या नियमांचे उल्लंघन करणारी माहिती कशी रिपोर्ट करावी

इतर प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि त्याविषयीचा रिपोर्ट आम्हाला कसा द्यावा याविषयीच्या माहितीसाठी कृपया उल्लंघनांचा रिपोर्ट कसा द्यावा हा लेख पहावा.

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.