Twitter वरील स्व-हानी आणि आत्महत्त्या समस्यांविषयी काय करावे

आपण किंवा आपल्या ओळखीचे कोणी स्व-हानी किंवा आत्मघाती वर्तन करण्याचा विचार करत असल्यास संकट निवारण आणि आत्महत्त्या प्रतिबंधक तज्ञ असलेल्या सेवांशी संपर्क साधून आपण शक्य तितक्या लवकर मदत घ्या. Twitter वर अशा प्रकारचा मजकूर आढळल्यास स्व-हानी किंवा आत्महत्तेच्या वर्तनाशी संबंधित खात्यांचे रिपोर्ट्स हाताळण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या Twitter कार्यसंघाला देखील आपण सतर्क करू शकता.
 

स्व-हानी आणि आत्मह्त्तेच्या धमक्यांशी संबंधित मजकुरावरील Twitter चा दृष्टिकोन
 

स्व-हानी किंवा आत्महत्तेचा विचार करत असलेल्या एखाद्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर, Twitter प्रभावित व्यक्तीशी संपर्क साधेल जेणेकरून त्यांना कळेल की त्यांची काळजी असणाऱ्या कोणीतरी त्यांना हानीचा धोका असू शकतो हे ओळखले आहे. आम्ही त्यांना सहाय्य मिळविण्यासाठी प्रोत्साहित करू, आणि मदत करू शकतात अशा समर्पित ऑनलाईन आणि हॉटलाईन साहाय्यकांविषयी माहिती देऊ.
 

लक्षणे ओळखणे
 

केवळ ऑनलाईन पोस्टनुसार वर्तवणूकीबाबत निष्कर्ष काढणे हे आव्हानात्मक काम आहे, परंतु अशा काही संभाव्य चेतावण्यांची चिन्हे किंवा संकेतक आहेत, ज्यावरून कोणीतरी  स्व-हानी किंवा आत्महत्येबद्दल विचार करत आहेत हे समजू शकते. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्तेचे विचार येत असल्यास त्याला मदत करण्यासाठी खाली असे प्रश्न आहेत जे आपण स्वतःला विचारू शकता:

  • ही व्यक्ती नैराश्य किंवा आशा सोडून दिल्याची भावना दर्शविणारी माहिती वारंवार पोस्ट करत आहे?

  • ही व्यक्ती मृत्यूविषयी किंवा मृत्यू हाच एकमेव पर्याय असल्याची भावना दर्शविणारी प्रतिक्रिया पोस्ट करत आहे?

  • त्यांनी भूतकाळात आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया पोस्ट केली आहे?

  • ते स्व-हानीचे वर्णन किंवा छायाचित्रे पोस्ट करत आहे अथवा स्वतःला आत्महत्तेच्या विचारात असल्याचे दाखवत आहेत?

  • त्यांचा मूड आणि पोस्टमधील मजकूर अलीकडे बदलला आहे?
     

आपल्याला काळजी वाटत असल्यास आणि संबंधित व्यक्तीला ओळखत असल्यास, त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकते  आणि त्यांना मदत करण्यास समर्थ असलेल्या समर्पित सेवांकडून सल्ला घेण्यासाठी आपण प्रोत्साहित करू शकता. दुसरीकडे, जर आपण संबंधित व्यक्तीला ओळखत नसाल, तरीही आपण काळजी व्यक्त करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा समर्पित संस्था, सुसाइड हॉटलाईन किंवा त्यांना वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या कोणालातरी संदर्भित करणे निवडू शकता. जर आपल्याला स्वतःहून त्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सोयीचे वाटत नसेल किंवा त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे याची खात्री नसेल, तर आमच्या समर्पित रिपोर्टिंग फ्लोवरून आपल्याला Twitter ला अलर्ट देखील करता येते.
 

स्व-हानी किंवा आत्महत्तेच्या विचारांचे अनुभव व्यवस्थापित करणे
 

आपण स्व-हानी किंवा आत्महत्त्या करण्याचा विचार करत असल्यास, किंवा उदासीनता किंवा चिंता अनुभवत असल्यास आपला विश्वास असलेल्या लोकांशी बोललात किंवा ज्या या अनुभवांचे व्यवस्थापन करण्यात मदत आणि सहाय्य करू शकतात अशा समर्पित संस्थांशी संपर्क साधला तर मदत होऊ शकते. नैराश्य, एकटेपणा, मादक द्रव्याचे सेवन, आजारपण, नातेसंबंधातील समस्या आणि आर्थिक समस्यांसह विविध विषयांवरील सल्ल्यासाठी आपण या सहाय्यकांचा सल्ला घेऊ शकता.

नैराश्याची व्यापक विविध प्रकारची लक्षणे असून दरवर्षी लाखो लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. सर्वसामान्य लक्षणांमध्ये दुःखी वाटणे, काही करावेसे न वाटणे, जेवण आणि झोपेच्या स्वरूपात बदल होणे, अंगात शक्ति नसणे, विचारांमध्ये सुसूत्रता नसणे आणि मनात आत्मह्त्तेचे विचार येणे यांचा समावेश होतो. आपण कदाचितच अशी लक्षणे ठळकपणे दाखवू शकता किंवा त्यातील बदल हा फार सूक्ष्म स्वरूपाचा असतो. थोडक्यात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

हा लेख शेअर करा