Twitter वर स्पॅम रिपोर्ट करा
स्पॅम म्हणजे काय?
"स्पॅम" म्हणजे Twitter चे नियम चे उल्लंघन करणारे विविध प्रकारचे प्रतिबंधित वर्तन होय. सामान्यपणे स्पॅमचे अनपेक्षितपणे, लोकांवर नकारात्मक परिणाम करणारी वारंवार होणारी क्रिया असे वर्णन करता येईल. यामध्ये खात्यांमधील स्वयंचलितरित्या होणाऱ्या विविध प्रकारच्या परस्परसंवाद क्रिया आणि वर्तवणूक तसेच लोकांची दिशाभूल करणे किंवा त्यांना फसविणे यांचा समावेश होतो. Twitter वर "स्पॅमिंग" म्हणून जी वर्तवणूक समजली जाते त्या संकल्पनेचा सातत्याने विकास होत आहे.
Twitter चे नियम यामध्ये "स्पॅमिंग" मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो अशा उदाहरणांची यादी दिली आहे. याठिकाणी स्पॅम खात्यांकडून अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य डावपेचांविषयी माहिती दिली आहे:
- धोकादायक लिंक (फिशिंग किंवा मालवेअर साईट्सच्या लिंक देखील समाविष्ट आहेत) पोस्ट करणे
- आक्रमक फॉलोइंग वर्तवणूक (लक्ष वेधण्यासाठी सामूहिक फॉलोइंग आणि सामूहिक अनफॉलोइंग)
- खात्यांवर नको असलेले संदेश पोस्ट करण्यासाठी प्रत्युत्तर किंवा उल्लेख वैशिष्ट्यांचा गैरवापर करणे
- अनेक खाती तयार करणे (व्यक्तिचलित स्वरूपात किंवा स्वयंचलित टूल्स वापरून)
- लक्ष वेधण्यासाठी प्रचलित विषयांवर वारंवार पोस्ट करणे
- बनावट अपडेट्स एकसारखे पोस्ट करणे
- संबंध नसलेल्या ट्विट्सच्या लिंक पोस्ट करणे
एकटे ट्विट कसे रिपोर्ट करावे
Twitter चे नियम किंवा आमच्या सेवा अटी यांचे उल्लंघन करणाऱ्या एकेकट्या ट्विट्स विषयी देखील आपण रिपोर्ट देऊ शकता.
स्पॅमिंगसाठी ट्विट रिपोर्ट करणे:
- आपणास जे ट्विट रिपोर्ट करायचे आहे तिथपर्यंत नॅव्हीगेट करा.
- प्रतीकावर क्लिक किंवा टॅप करा.
- ट्विट रिपोर्ट करा निवडा.
- आपला रिपोर्ट सबमिट करण्यासाठी ते स्पॅम आहे निवडा.
- पुढे आपल्या Twitter वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.
आपणास Twitter वर इतर धोकादायक, त्रासदायक किंवा बेकायदेशीर माहिती आढळल्यास, इतर संभाव्य उल्लंघनांचा रिपोर्ट कसा द्यावा ते पहा.
Twitter वरील स्पॅमपासून माझे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मला काय करता येईल?
आपण आपल्या खात्याला या लेखातील खाते सुरक्षा टिप्स मध्ये चर्चा करण्यात आलेल्या सोप्या खबरदारी विषयक उपायांची अंमलबजावणी करून सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकता.
Twitter वर स्पॅमचा प्रसार होण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरते?
- धोकादायक लिंक्स (फिशिंग किंवा मालवेअर साईटच्या लिंक देखील समाविष्ट)
- द्वेषपूर्ण तृतीय पक्षाकडील अनुप्रयोग जे स्वयंचलितपणे धोकादायक लिंक्स पोस्ट करतात किंवा स्पॅम विषयक कृतींचे (फॉलो करणे, पसंत करणे, पुन्हा ट्विट करणे इत्यादी) व्यवस्थापन करतात
- स्पॅम स्वरूपाच्या क्रियाकलाप किंवा कृतींसाठी वापरले जाणारे समेट किंवा हॅक केलेली खाती
स्पॅम रोखण्यासाठी Twitter काय करत आहे?
Twitter स्पॅम विरोधातील लढाई गांभीर्याने लढत आहे आणि आमच्या उपभोक्त्यांनी स्पॅमचा विचार डोक्यात न आणता सेवांचा आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. आमचा स्पॅम विरोधी संघ सातत्याने विकसित होत असून Twitter वर स्पॅम-मुक्त वातावरण तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या नवीन स्पॅमला प्रतिसाद देत आहे.
आमच्याकडे Twitter वर स्पॅम शोधून काढण्यासाठीची सिस्टम आणि टूल्स असली तरीही स्पॅमविषयी रिपोर्ट करून मदत व्हावी यासाठी आम्ही आपल्यावर अवलंबून आहोत.