अपमानस्पद वर्तवणूक रिपोर्ट करणे

जेथे लोक मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकतात असे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी Twitter प्रयत्नांची पराकाष्ठा करते. अपमानस्पद वर्तवणूक आढळल्यास लोकांना त्याविषयी आमच्याकडे रिपोर्ट करणे आम्हाला सुलभ करायचे आहे. समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी तपासणीच्या दरम्यान आम्हाला अधिक चांगले संदर्भ मिळवून देण्यास मदत करणारी एकाधिक ट्विट्स त्याच रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.

 

नोट: आमच्या अपमानास्पद वर्तवणूक धोरणाविषयी स्पष्टीकरण मिळविण्यासाठी, कृपया Twitter चे नियम आणि सेवा अटी वाचा.

ट्विट किंवा खाते गैरवर्तन करणारे आहे त्याचा रिपोर्ट मी कसा फाइल करू?

ट्विट, प्रोफाइल किंवा थेट संदेशावरून कोणीही थेट अपमानास्पद वर्तनाची तक्रार करू शकतो.

ट्विट रिपोर्ट करणे:

 1. twitter.com वर किंवा Twitter for iOS किंवा Android अनुप्रयोगावरून आपल्याला जे ट्विट रिपोर्ट करायचे आहे त्यावर नॅव्हीगेट करा.
 2.   प्रतीक क्लिक किंवा टॅप करा.
 3. रिपोर्ट करा निवडा.
 4. ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहे निवडा.
 5. नंतर, आम्ही आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी अतिरिक्त माहिती देण्यास आपणास सांगू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त ट्विट्स निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.
 6. आपण रिपोर्ट केलेल्या ट्विट्सचा मजकूर आम्ही फॉलो-अप ई-मेल आणि आपल्यासाठीच्या सूचनापत्रांमध्ये समाविष्ट करू. ही माहिती मिळविणे रद्द करण्यासाठी, कृपया ही ट्विट्स या रिपोर्टविषयीचे अपडेट्स दाखवू शकतात याच्या पुढील चेकबॉक्स अक्षम करा.
 7. एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
   

खाते रिपोर्ट करणे:

 1. खात्याच्या प्रोफाइलवर जाऊन ओव्हरफ्लो प्रतीक  क्लिक किंवा टॅप करा.
 2. रिपोर्ट करा निवडा.
 3. ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहे निवडा.
 4. नंतर, आम्ही आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी अतिरिक्त माहिती देण्यास आपणास सांगू. आम्ही आपणास त्या खात्यातून ट्विट निवडण्यास सांगू शकतो जेणेकरून आपल्या रिपोर्टचे मूल्यांकन करण्यासाठी आमच्याकडे अधिक चांगला संदर्भ राहील.
 5. आपण रिपोर्ट केलेल्या ट्विट्सचा मजकूर आम्ही फॉलो-अप ई-मेल आणि आपल्यासाठीच्या सूचनापत्रांमध्ये समाविष्ट करू. ही माहिती मिळविणे रद्द करण्यासाठी, कृपया ही ट्विट्स या रिपोर्टविषयीचे अपडेट्स दाखवू शकतात याच्या पुढील चेकबॉक्स अक्षम करा.
 6. एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.

नोट: आपण अवरोधित केलेले खाते किंवा आपणास अवरोधित केले आहे असे खाते आपण रिपोर्ट करू शकता. त्या खात्याच्या प्रोफाइलवर जाऊन ओव्हरफ्लो प्रतीक टॅप करून नंतर रिपोर्ट करा निवडा.

 
स्वतंत्र संदेश किंवा चर्चा रिपोर्ट करण्याच्या पद्धती
1 पायरी

थेट संदेश चर्चा टॅप करून आपणास रिपोर्ट करायचा आहे असा संदेश टॅप करा.

2 पायरी

संदेश टॅप करून धरून ठेवा. पॉप-अप मेनूमधून संदेश रिपोर्ट करा निवडा. (संपूर्ण चर्चा रिपोर्ट करण्यासाठी माहिती प्रतीक  टॅप करून नंतर Report @username) निवडा.

3 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

4 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याव्यतिरिक्त, गट संदेशामधून चर्चा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

1 पायरी

थेट संदेश चर्चा टॅप करून आपणास रिपोर्ट करायचा आहे असा संदेश टॅप करा.

2 पायरी

संदेश टॅप करून धरून ठेवा. पॉप-अप मेनूमधून संदेश रिपोर्ट करा निवडा. (संपूर्ण चर्चा रिपोर्ट करण्यासाठी, अधिक प्रतीक  टॅप करून नंतर चर्चा रिपोर्ट करा निवडा.)

3 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

4 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याव्यतिरिक्त, गट संदेशामधून चर्चा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. 

1 पायरी

थेट संदेश चर्चेमध्ये क्लिक करा आणि आपणास रिपोर्ट करायचा आहे असा संदेश शोधा. (संपूर्ण चर्चा रिपोर्ट करण्यासाठी, आणखी प्रतीक  क्लिक करा)

2 पायरी

संदेशावर होवर करा आणि संदेश रिपोर्ट करा प्रतीक दिसल्यावर त्यावर क्लिक करा.

3 पायरी

आपण देखील माहिती प्रतीक  क्लिक करून Report @username निवडू शकता.

4 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

5 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याव्यतिरिक्त, गट संदेशामधून चर्चा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.


मला हिंसक धमकी मिळाल्यास मी काय करावे?
 

आपण थेट आम्हाला ट्विट्स, प्रोफाइल किंवा थेट संदेश आम्हाला रिपोर्ट करू शकता (वरती पहा). धमकी देणारे ट्विट, थेट संदेश आणि/किंवा जबाबदार खात्यावर Twitter कारवाई करू शकते.

तथापि, एखाद्याने ट्विट किंवा हिंसक धमकीचा संदेश पाठविला आहे जो आपल्याला विश्वासार्ह आहे किंवा आपणास आपल्या स्वतःच्या किंवा कोणाच्यातरी शारीरिक सुरक्षिततेविषयी धोका दाखविणारा आहे असे वाटल्यास, आपण आपल्या स्थानिक कायदा अंमलबजावणी एजन्सीशी संपर्क साधू शकता. ती (एजन्सी) धमकीच्या वैधतेचे अचूक मूल्यांकन करू शकते, धमकीच्या स्त्रोताची तपासणी करू शकते आणि शारीरिक सुरक्षिततेविषयीच्या समस्यांना प्रतिसाद देऊ शकते. कायद्याच्या अंमलबजावणीवरून थेट संपर्क साधल्यास आम्ही त्यांच्याबरोबर काम करून ते करत असलेल्या धमकीच्या तपासणीमध्ये आवश्यक माहिती देऊ. केवळ ट्विटच्या रिपोर्ट्ससाठी:  आम्हाला आपला रिपोर्ट मिळाला आहे स्क्रीनवरील ई-मेल रिपोर्ट वर क्लिक करून कायद्याच्या अंमलबजावणी बरोबर शेअर करण्यासाठी हिंसक धमकीच्या आपल्या रिपोर्टची आपली प्रत मिळू शकेल.

 

मी रिपोर्ट सबमिट केल्यावर काय घडते?

आपण रिपोर्ट सबमिट केल्यानंतर, आम्हाला आपला रिपोर्ट मिळाल्याचे आपणास सतर्क करणारा आमच्याकडील पुष्टीकरण संदेश दिसेल (आपल्याला संदेश पाहायला 24 तास लागू शकतात). आम्ही रिपोर्ट केलेले खाते आणि/किंवा ट्विट(स) आणि/किंवा थेट संदेश(शां)चे पुनरावलोकन करू. खाते आणि/किंवा ट्विट(स) आणि/किंवा थेट संदेश आमच्या धोरणांचे उल्लंघन करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही कारवाई (इशाऱ्यापासून ते खाते कायमचे स्थगित करण्यापर्यंत) करू. आम्हाला आपल्याकडून अधिक माहितीची आवश्यकता असल्यास, किंवा आम्ही रिपोर्ट केलेल्या खात्यावर ट्विट(स) आणि/किंवा थेट संदेश आवश्यक असल्यास आम्ही आपला फॉलो-अप घेऊ.

याव्यतिरिक्त, रिपोर्ट करण्यात आलेल्या ट्विटचा मूळ मजकूर हा आपण तो रिपोर्ट केले आहे अशी सूचना देणाऱ्या मजकुराने प्रतिस्थापित केला जाईल. हवे असल्यास आपण क्लिक करून ते ट्विट पाहू शकता. 

नोट:याव्यतिरिक्त, आपण अलीकडेच रिपोर्ट केलेल्या खात्यावर कारवाई केल्यास आपणास इन-प्रॉडक्ट सूचनापत्र मिळेल. ही कारवाई आपल्या रिपोर्टशी संबंधित असू शकते किंवा असू शकत नाही.

नवीन खाती तयार करण्यापासून Twitter खाते अवरोधित का करू शकत नाही?
 

IP अवरोधित करणे साधारणपणे गैरवर्तन थांबविण्याच्या दृष्टीने फारसे परिणामकारी ठरत नाही, तसेच कायदेशीर खात्यांना आमच्या सेवेचा वापर करण्यापासून खोटेपणाने प्रतिबंधित करू शकते.

IP पत्ते सामान्यत: अनेक खात्यांवरून विविध ठिकाणी शेअर केले जातात, म्हणजे एकल IP अवरोधित करण्याने Twitter वर मोठ्या संख्येने जोडलेली खात्यांना लॉग इन करण्यापासून प्रतिबंधि केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, IP पत्ते सहजपणे बदलता येतात आणि वेगळ्या ठिकाणी, तृतीय-पक्षाची सेवा किंवा अनेक विनामूल्य वेबसाइट्स किंवा अनुप्रयोगांमधून लॉग इन करून अवरोधन करणे सुसंघटीत केले जाऊ शकते.

Twitter मला दुसऱ्या खात्याची माहिती देऊ शकेल?

आमच्या गोपनीयता धोरणनुसार, विविध कायदेशीर प्रक्रियेकडील आवश्यकता वगळल्यास, Twitter खाते माहिती उघड करीत नाही. जर आपण पोलिस किंवा आपल्या वकीलाबरोबर काम करत असाल तर, अशी माहिती मिळविण्यासाठी ते योग्य आणि अचूक कायदेशीर प्रक्रियेमध्ये आपली मदत करू शकतील. थेट कायद्याच्या अंमलबजावणीवरून Twitter शी संपर्क साधल्यास आम्ही त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्या तपासणीमध्ये साहाय्य करू. आपण आमची कायदेशीर अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्त्वे कायदेशीर अंमलबजावणी अधिकाऱ्यांना दाखवू शकता.

हा लेख शेअर करा