ट्विट, यादी किंवा थेट संदेश रिपोर्ट करणे

Twitter चे नियम किंवा आमच्या सेवा अटी यांचे उल्लंघन करणाऱ्या ट्विट्स, याद्या आणि थेट संदेशांविरुद्ध देखील आपण रिपोर्ट करू शकता. आपण रिपोर्ट करू शकत असलेल्या उल्लंघनांची उदाहरणे म्हणजे ट्विट्स, याद्या आणि अपमानास्पद किंवा हानिकारक मजकूर, स्पॅम, तोतयागिरी, कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क उल्लंघनाचे थेट संदेश. 

ट्विट रिपोर्ट करणे
 1. आपणास जे ट्विट रिपोर्ट करायचे आहे त्यावर नॅव्हीगेट करा.
 2. ट्विटच्या अगदी वरच्या बाजूला असलेले  प्रतीक टॅप करा.
 3. ट्विट रिपोर्ट करा निवडा.
 4. ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त ट्विट्स निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.
 5. आपण रिपोर्ट केलेल्या ट्विट्सचा मजकूर आम्ही फॉलो-अप ई-मेल आणि आपल्यासाठीच्या सूचनापत्रांमध्ये समाविष्ट करू. ही माहिती मिळविणे रद्द करण्यासाठी, कृपया ही ट्विट्स या रिपोर्टविषयीचे अपडेट्स दाखवू शकतात याच्या पुढील चेकबॉक्स अक्षम करा.
 6. एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.

नोट: आपण अवरोधित केलेल्या खात्यावरील ट्विट्स देखील आपल्याला रिपोर्ट करता येतील. आपल्याला ज्या खात्याने अवरोधित केले आहे अशा खात्यावरील ज्या ट्विट्समध्ये आपला उल्लेख केला आहे असे ट्विट्स देखील आपल्याला रिपोर्ट करता येतील. खात्याविषयीचा रिपोर्ट कसा द्यावा याविषयीच्या सूचनांसाठी आमचा अपमानास्पद वर्तणूक रिपोर्ट करणे संदर्भातील लेख पहा.

यादी रिपोर्ट करणे
 1. यादीच्या तपशील पृष्ठावरून किंवा सूचनापत्रे टॅबवरून याद्यांविरुद्ध रिपोर्ट केला जाऊ शकतो.

 2. आपणास जी यादी रिपोर्ट करायची आहे त्यावर नॅव्हीगेट करा.

 3. यादीच्या सर्वात वरच्या बाजूला असलेले  प्रतीक टॅप करा.

 4. यादी रिपोर्ट करा निवडा.

 5. ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत किंवा यामध्ये संवेदनशील छायाचित्र किंवा व्हिडिओ प्रदर्शित होतो असे आपण निवडल्यास, आम्ही आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी अतिरिक्त माहिती देण्यास आपणास सांगू. 

 6. एकदा आपण रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आम्ही आपल्यास एक पुष्टीकरण ई-मेल पाठवू आणि आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांच्या शिफारसी आम्ही देऊ.

स्वतंत्र थेट संदेश रिपोर्ट करणे
IOS साठी:
1 पायरी

थेट संदेश चर्चा टॅप करून आपणास रिपोर्ट करायचा आहे असा संदेश टॅप करा.

2 पायरी

संदेश टॅप करून धरून ठेवा. पॉप-अप मेनूमधून संदेश रिपोर्ट करा निवडा.

3 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

4 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याशिवाय, गट चर्चेमधून संदेश रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

Android साठी:

डेस्कटॉपसाठी:
1 पायरी

थेट संदेश चर्चा यामध्ये क्लिक करा आणि आपणास ध्वजांकित करायचा आहे असा संदेश निवडा.

2 पायरी

माहिती प्रतीक  क्लिक करून नंतर report@username क्लिक करा.

3 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

4 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याशिवाय, गट चर्चेमधून संदेश रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

थेट संदेश चर्चेविरुद्ध रिपोर्ट करणे
IOS साठी:
1 पायरी

आपल्या इनबॉक्समधील थेट संदेशांच्या यादीमधून, आपणास ध्वजांकित करायचा आहे अशा संदेश चर्चेवर डावीकडे स्वाईप करा.

2 पायरी

रिपोर्ट प्रतीक  टॅप करा

3 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

4 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याव्यतिरिक्त, गट संदेशामधून चर्चा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

Android साठी:
1 पायरी

आपल्या इनबॉक्समधील थेट संदेशांच्या यादीमधून, आपण ध्वजांकित करायचा आहे अशा संदेश चर्चेवर टॅप करून अधिक काळ ते दाबून धरा.

2 पायरी

चर्चा रिपोर्ट करा टॅप करा.

3 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

4 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याशिवाय, गट संदेशामधून संपूर्ण चर्चा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

डेस्कटॉपसाठी:
1 पायरी

आपण रिपोर्ट करायची आहे अशी थेट संदेश चर्चेमध्ये क्लिक करा.

2 पायरी

आणखी प्रतीक  क्लिक करा

3 पायरी

@उपभोक्तानाव रिपोर्ट करा निवडा.

4 पायरी

ते अपमानास्पद किंवा हानिकारक आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त संदेश निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.

5 पायरी

एकदा आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter वापरानुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त प्रक्रियांची आम्ही शिफारस करू.
नोट: याशिवाय, गट संदेशामधून संपूर्ण चर्चा रिपोर्ट करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.

नोट: आपण संदेश किंवा चर्चा रिपोर्ट केल्यानंतर त्यांना आपल्या संदेश इनबॉक्समधून काढून टाकले जाईल.

ट्विट, यादी किंवा थेट संदेश यांच्या विरुद्ध मी रिपोर्ट केल्यानंतर काय होते?

 • रिपोर्ट करण्यात आलेल्या ट्विटचा मूळ मजकूर हा आपण यास रिपोर्ट केले आहे अशी सूचना देणाऱ्या मजकुराने बदलला जातो. याशिवाय, आपण इच्छा करत असलेल्या ट्विटवर क्लिक करून त्यांना पाहू शकता. 
 • ट्विट किंवा यादी रिपोर्ट केल्यास खाते स्वयंचलितपणे स्थगित केले जात नाही.
 • रिपोर्ट करण्यात आलेले संदेश आणि चर्चा आपल्या इनबॉक्समधून दिसेनाशा होतील आणि त्या पुनर्प्राप्त करता येणार नाहीत.

थेट संदेशांमध्ये मला "संशयास्पद मजकूर" हा इशारा का दिसतो?

संशयास्पद किंवा संशयास्पद URLs असू शकणाऱ्या (जसे की, स्पॅमशी संबंधित) संदेशांना Twitter लपवून ठेवेल. संदेश ठीक आहे असल्याचा किंवा त्यात स्पॅम असल्याची माहिती आपण आम्हाला देऊ शकता.

 1. संदेश पाहण्यासाठी "संशयास्पद मजकूर" इशाऱ्यावर टॅप करा.
 2. संदेश स्पॅम वाटत असल्यास, त्यास रिपोर्ट करण्यासाठी हा स्पॅम आहे टॅप करा.
 3. संदेश संशयास्पद वाटत नसल्यास, त्यास आपल्या इनबॉक्समध्ये ठेवण्यासाठी संदेश ठीक आहे टॅप करा.

खाते रिपोर्ट करणे आणि ट्विट किवा यादी रिपोर्ट करणे यात काय फरक आहे?

ट्विट किंवा यादी रिपोर्ट केल्यामुळे आपल्या विचारांनुसार विशिष्ट ट्विट किंवा यादी हे Twitter चे नियम किंवा सेवा अटी यांचे उल्लंघन करत असल्याचे आपण दाखविता. ट्विट, यादी किंवा थेट संदेश पोस्ट न करता एखादे खाते Twitter च्या धोरणांचे उल्लंघन करत असल्यास (जसे की, अनेक खात्यांना फॉलो करणे) आपण स्पॅम म्हणून खाते रिपोर्ट करायला हवे.

हा लेख शेअर करा