आपली ट्विट्स संरक्षित आणि असंरक्षित करण्याच्या पद्धती

आपण Twitter साठी साइन-अप केल्यानंतर आपली ट्विट्स सार्वजनिक ठेवणे किंवा ती संरक्षित करणे निवडू शकता. सार्वजनिक आणि संरक्षित ट्विट्सविषयी अधिक वाचा.

आपली ट्विट्स संरक्षित करण्याच्या पद्धती
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल छायाचित्र टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

2 पायरी

गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.

3 पायरी

दर्शक आणि टॅगिंगच्या अंतर्गत, आणि आपली ट्विट्स संरक्षित करा याच्या पुढील, चालू करण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.

1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.

2 पायरी

गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.

3 पायरी

दर्शक आणि टॅगिंगच्या अंतर्गत, आणि आपली ट्विट्स संरक्षित करा याच्या पुढील, चेकबॉक्स सक्षम करा.

1 पायरी

 अधिक  प्रतीक क्लिक किंवा टॅप करा.

2 पायरी

आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयता येथे जा.

3 पायरी

दर्शक आणि टॅगिंग वर जाऊन आपली ट्विट्स संरक्षित करा याच्या पुढील चेकबॉक्स सक्षम करा.


आपली ट्विट्स असंरक्षित करण्याच्या पद्धती
 

  • आपली ट्विट्सवरील संरक्षण काढून टाकण्यासाठी वरील सूचनांचे अनुसरण करा: वेबसाठी, माझी ट्विट्स संरक्षित करा याच्या पुढील चेकबॉक्स सक्षम करा. Twitter for iOS आणि Twitter for Android अनुप्रयोगांसाठी स्लाइडर ड्रॅग करा किंवा माझी ट्विट्स संरक्षित करा याच्या पुढील चेकबॉक्स अक्षम करा.
  • आपली ट्विट्स सार्वजनिक करण्यापूर्वी आपल्या फॉलोअरच्या प्रलंबित विनंत्यांचे निश्चितपणे पुनरावलोकन करा. प्रलंबित राहिलेल्या कोणत्याही विनंत्या स्वयंचलितपणे स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रलंबित राहिल्यास त्या खात्यांना आपणास पुन्हा फॉलो करावे लागेल.
  • कृपया लक्षात घ्या की आपल्या ट्विट्सचे संरक्षण काढून टाकल्याने परिणामी पूर्वी संरक्षित केलेली कोणतीही ट्विट्स सार्वजनिक होतील.

हा लेख शेअर करा