goglobalwithtwitterbanner

Twitter च्या व्यवसाय भागीदारांसोबत आपला डेटा शेअर करणे

जेव्हा Twitter ला आपल्याविषयीची माहिती मिळते, तेव्हा आम्ही त्या माहितीचा वापर आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी, आपला Twitter अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी आणि आमच्या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केलेल्या इतर हेतूंसाठी करतो. काही प्रकरणात यामध्ये सार्वजनिक-नसलेली माहिती आमच्या भागीदारांसोबत शेअर करणे समाविष्ट असते.

खाली यादीबद्ध केलेल्या भागीदारींसाठी, आम्ही उपभोक्त्यांना त्यांचा डेटा शेअर केला जाऊ शकतो किंवा नाही यावरील अतिरिक्त नियंत्रणे देतो. आपण आपल्या वैयक्तिकरण आणि डेटा सेटिंग्जमधील "Twitter च्या व्यवसाय भागीदारांसोबत आपला डेटा शेअर करणे" हे सेटिंग्ज वापरून हे नियंत्रण वापरू शकता. या सेटिंगमध्ये केलेला बदल प्रभावी होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. सेटिंग केवळ विशिष्ट प्रकारच्या भागीदारांना आणि खालील यादीमध्ये समाविष्ट असलेल्या भागीदारांना लागू होते: सेवा प्रदात्यांसारख्या इतर भागीदारांसोबत किंवा खालील यादीमध्ये असलेल्या भागीदारांव्यतिरिक्त त्याच भागीदारांसोबत भागीदारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून Twitter कशा प्रकारे डेटा शेअर करते यास ते प्रभावित करत नाही.


भागीदारांची यादी, अंतिम अपडेट 3 ऑगस्ट, 2019:

रिअल-टाईम बिडिंग (RTB): ही भागीदारी जाहिरातदारांना Twitter वर जाहिराती खरेदी करण्यासाठी आणि त्या दाखवण्यासाठी भागीदारांची सिस्टम वापरण्याची परवानगी देते. कोणत्या जाहिराती खरेदी कराव्यात आणि कोणत्या जाहिराती दाखवाव्यात याचा निर्णय घेण्यासाठी जाहिरातदारांना मदत करण्याकरता Twitter कडून उपकरण-स्तरीय डेटा शेअर केला जातो, ज्यामध्ये या भागीदारींच्या माध्यमातून लोकसंख्याशास्त्रीय डेटा देखील समाविष्ट केला जातो. उदाहरणार्थ, Twitter कडून जाहिरातदारांसोबत 25-34 वयोगटातील पुरूष उपभोक्त्याशी संबंधित मोबाइल उपकरण आयडेंटीफायर त्या प्रेक्षकांना लागू होऊ शकतील अशा अधिक चांगल्या जाहिराती दाखवण्याच्या हेतूने शेअर केला जाऊ शकतो. Twitter कडून आपले नाव, ई-मेल, फोन क्रमांक किंवा Twitter हँडल RTB भागीदारांसोबत शेअर केले जात नाही. हे भागीदार कदाचित आम्ही उपभोक्त्याचे नाव, ई-मेल, फोन क्रमांकावर शेअर करतो तो उपकरण-स्तरीय डेटा किंवा भागीदारांकडे असलेल्या इतर माहितीनुसार (उदाहरणार्थ जर उपभोक्त्याने त्या भागीदाराच्या सेवेसह खात्यावर साइन-अप केले असल्यास) इतर वैयक्तिक डेटाशी कनेक्ट करू शकतात. तसे करण्यापूर्वी या भागीदारांना आपली संमती आवश्यक असते. आपला Twitter डेटा या मध्यमातून आपण आपला लोकसंख्याशास्त्रीय डेटा पाहून तो संपादित करू शकता. 

RTB भागीदार:


रूपांतरण ट्रॅकिंग: ही भागीदारी Twitter ला जाहिरातदारांसाठी जे कोणी मापन आणि विश्लेषण विषयक साधने प्रदान करतात अशा भागीदारांसोबत माहिती शेअर करू देतात. या माहितीमध्ये कोणती जाहिरात विशिष्ट ब्राउझर किंवा उपकरणावर पाहिली गेली किंवा तिच्यासोबत कोणते आदान-प्रदान झाले अशा माहितीचा त्यात समावेश असू शकतो. ही साधने जाहिरातदारांना Twitter च्या माध्यमातून ते चालवीत असलेल्या मोबाइल जाहिरात मोहिमेच्या प्रभावाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करू देतात. उदाहरणार्थ, Twitter शेअर करू शकते की एका विशिष्ट मोबाइल अनुप्रयोगासाठी मोबाइल उपकरण आयडेंटीफायरने जाहिरात पाहिली आहे. त्यानंतर भागीदार ही माहिती जाहिरात दाखविणाऱ्या जाहिरातदारास प्रदान करतो ज्यामुळे उपकरणावर नंतर मोबाइल अनुप्रयोग स्थापित केल्यास, Twitter वरील जाहिरात प्रभावी होती हे जाहिरातदाराला माहित होईल. Twitter आपले नाव, ई-मेल, फोन क्रमांक किंवा Twitter हँडल या भागीदारांसोबत शेअर करत नाही. आमच्या भागीदारांकडील माहितीनुसार आपल्या वैयक्तिक जाहिरात सेटिंगचा वापर करून आपल्या इतर ऑनलाइन कृतीवर आधारित वैयक्तिक जाहिराती Twitter वर पाहायच्या आहेत किंवा नाही यावर आपण नियंत्रण ठेवू शकता.


रूपांतरण ट्रॅकिंग भागीदार:

 

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.