आपला Twitter वापरानुभाव नियंत्रित करण्याच्या पद्धती

आपल्या कल्पना आणि माहिती शेअर करणे, आपल्या समुदायाच्या संपर्कात राहणे आणि आपल्या आजूबाजूच्या जगात काय चालले आहे ते पाहण्याचे ठिकाण म्हणजे Twitter आहे. या वापरानुभवाचे सर्वोत्तमरित्या संरक्षण करण्यासाठी आपण काय पाहता आणि आपल्याविषयी इतर लोक काय पाहू शकतात हे नियंत्रित करण्यात मदत करण्याच्या हेतूने Twitter कडून टूल्स पुरविण्यात आली आहेत, जेणेकरून आपण स्वतःला Twitter वर आत्मविश्वासाने व्यक्त करू शकाल.

 

ट्विटवर आपल्याला सहज कार्यवाही करता यावी यासाठी आम्ही ते सोपे बनविले आहे. आपल्या होम टाइमलाइनवरून त्वरित अनफॉलो करा, म्यूट करा, अवरोधित करा, रिपोर्ट करा आणि इतर बऱ्याच पर्यायांवर प्रवेश करता यावा यासाठी कोणत्याही ट्विटच्या अगदी वरच्या भागात  प्रतीकावर टॅप करा. 
 

अनफॉलो करा

आपल्या होम टाइमलाइनवर एखाद्याकडील ट्विट्स न पाहण्यासाठी त्या व्यक्तीला अनफॉलो करणे ही एकदम सोपी अशी आपल्याला करता येण्यासारखी कार्यवाही आहे. आपला विचार बदलल्यास आपण केव्हाही त्या खात्याला पुन्हा फॉलो करू शकता. आपण ट्विटमधील  प्रतीकावरून पर्याय वापरू शकता.

लोकांना अनफॉलो कसे करावे याविषयी अधिक जाणून घ्या.

सूचनापत्रे फिल्टर करणे

आपली सूचनापत्रे टाइमलाइन आपला इतर Twitter खात्यांसोबतचा परस्परसंवाद जसे की, उल्लेख, पसंत्या, पुनर्ट्विट्स आणि आपल्याला नुकतेच कोणी फॉलो केले आहे याविषयीची माहिती प्रदर्शित करतात. आपण फॉलो करत नसलेल्या खात्यांकडून नको असलेली प्रत्युत्तरे किंवा उल्लेख मिळत असल्यास आपल्याला मिळत असलेल्या सूचनापत्रांच्या प्रकारांना फिल्टर करू शकता.

आपली सूचनापत्रे टाइमलाइन समायोजित करणे विषयीच्या सूचना वाचा.

कायम कमी प्रमाणामध्ये दाखवा 

जेव्हा आपण ट्विटला कायम कमी प्रमाणामध्ये दाखवा म्हणून चिन्हांकित करता तेव्हा आपल्या होम टाइमलाइनवर आपल्याला कमीत कमी वेळा बघायला आवडतील अशा ट्विटचे प्रकार Twitter ला समजण्यास मदत होते. या माहितीचा उपयोग आम्ही आपला भविष्यातील अनुभव अनुकूल आणि चांगला बनविण्याच्या दृष्टीने करू शकतो. आपण ट्विटमधील  प्रतीकावरून पर्याय वापरू शकता.
 

म्यूट करा

Twitter खाते म्यूट करणे म्हणजे आपल्या टाइमलाइनवर आपल्याला त्या खात्याची ट्विट्स दिसणार नाहीत. आपल्याला एखाद्या मित्राची सर्व ट्विट्स पाहायला आवडत नसली तरी देखील मित्रांसोबत कनेक्ट राहण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. म्यूट केलेल्या खात्यांना आपण त्यांना म्यूट केले असल्याचे सूचित केले जात नाही आणि जेव्हा ते आपला ट्विटमध्ये उल्लेख करतील आणि आपल्याला थेट संदेश पाठवतील तेव्हा आपल्याला सूचनापत्रे मिळतील. आपण फॉलो करत नसलेल्या खात्यांना देखील म्यूट करू शकता जेणेकरून आपल्या सूचनापत्रे टाइमलाइनवर त्यांची ट्विट्स दिसणार नाहीत.

अवरोधित करणे किंवा अनफॉलो करणे यापेक्षा म्यूट करणे खूप वेगळे आहे: आपण म्यूट केलेल्या खात्यांना (उपभोक्त्यांना) आपण त्यांना म्यूट केले आहे हे सांगण्यासाठी कोणताच मार्ग नाही. आपण ट्विटमधील  प्रतीकावरून पर्याय वापरू शकता.

खाती म्यूट करणे याविषयी अधिक वाचा.

आपण विशिष्ट शब्द, वाक्यप्रचार, उपभोक्ता नावे, इमोजी किंवा हॅशटॅग्ज समाविष्ट केलेल्या ट्विटला म्यूट देखील करू शकता. 
 

अवरोधित करा

जेव्हा आपण Twitter वर एखादे खाते अवरोधित करता तेव्हा आपण त्या खात्याची आपल्या खात्यासोबत परस्परसंवाद साधण्याची क्षमता प्रतिबंधित करता. आपण ज्या खात्यांसोबत राहू इच्छित नाही अशा खात्यांसोबतचा परस्परसंवाद हाताळण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो.

आपण अवरोधित केलेली खाती आपले ट्विट, फॉलोइंग किंवा फॉलोअर्सच्या याद्या, पसंत्या किंवा याद्या यांना Twitter वर लॉग इन केल्यावर पाहू शकणार नाहीत आणि अशा खात्यांकडून आपला थेट उल्लेख केल्याची सूचनापत्रे आपल्याला मिळणार नाहीत. आपल्या टाइमलाइनमध्ये देखील त्यांचे ट्विट दिसणार नाही.

अवरोधित केलेल्या खात्यांनी आपल्या प्रोफाइलला भेट देण्याचा किंवा आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केल्यास आपण त्यांना अवरोधित केल्याचे त्यांच्या लक्षात येऊ शकते, पण आपण त्यांना अवरोधित केल्याचे कोणतेही सूचनापत्र त्यांना मिळणार नाही. आपण या पर्यायावर  ट्विटमधील प्रतीकावरून प्रवेश करू शकता.

खाती अवरोधित करणे याविषयी अधिक वाचा.

रिपोर्ट करा

एखादे खाते किंवा ट्विट Twitter चे नियम किंवा आमच्या सेवा अटी चे उल्लंघन करत आहे असे आपल्याला वाटल्यास संबंधित खात्याविषयी किंवा ट्विटविषयी रिपोर्ट देऊन आम्हाला सांगा. आपल्याला रिपोर्ट करता येईल अशा उल्लंघनांमध्ये खालील घटक समाविष्ट आहेत: अपशब्द वापरणे, संवेदनशील मीडिया, तोतयागिरी आणि स्पॅम. रिपोर्ट सबमिट करण्यासाठी काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल, पण त्यामुळे Twitter प्रत्येकासाठी चांगले ठिकाण बनविण्याच्या दृष्टीने आम्हाला आपली मदत होते. आपण ट्विटमधील  प्रतीकावरून पर्याय वापरू शकता.

आपण Twitter वर काय रिपोर्ट करू शकता याविषयी अधिक वाचा.

ट्विट्समध्ये आपण पाहत असलेला मीडिया नियंत्रित करणे

जर ट्विटमधील मीडियामध्ये संवेदनशील माहिती असल्याचा इशारा पाहण्याचे आपण ठरविले असल्यास, आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्जमध्ये ट्विट मीडिया पर्याय समाविष्ट आहे. आपली डिफॉल्ट सेटिंग्ज इशारा देण्यासाठी असतात, पण आपण कधीही हे सेटिंग बदलू शकता.

ट्विटमध्ये आपण पाहत असलेला मीडिया नियंत्रित कसा करावा याविषयी अधिक वाचा.

इतरांना आपल्याविषयी काय पाहता येईल हे नियंत्रित करा

आपले ट्विट्सचे संरक्षण करा

आपल्या ट्विट्सचे संरक्षण करणे म्हणजे ती केवळ आपल्या फॉलोअरला पाहता येणे होय. आपल्या संरक्षित ट्विट्सच्या साहाय्याने आपले आपल्या Twitter विषयक अनुभवावर नियंत्रण असते: प्रत्येकवेळी कोणाला तरी आपले खाते फॉलो करायचे असते, त्यांची ही विनंती स्वीकार करायची किंवा नाही याची निवड आपल्या हातात असते.

आपली ट्विट्स संरक्षित केली जाण्यापूर्वी आपल्या फॉलो करणारे कोणतेही खाते पूर्वीप्रमाणेच आपल्याला फॉलो करणे चालू ठेवेल (याचा अर्थ आपल्याला त्यांना पुन्हा अनुमोदित करणे आवश्यक नाही), पण त्यांना अवरोधित करून आपण त्यांना स्वतःला फॉलो करण्यापासून थांबवू शकता.

सार्वजनिक आणि संरक्षित ट्विटविषयी अधिक वाचा.
 

छायाचित्र टॅगिंग

छायाचित्रामध्ये मित्रांना टॅग करणे हा कनेक्ट राहण्याचा एक चांगला मार्ग आहे, पण आपल्याला हवे असल्यास आपण आपला Twitter अनुभव अधिक खाजगी ठेवण्याचे निवडू शकता. आपल्याला छायाचित्रामध्ये टॅग करण्यासाठी आपण कोणालाही, केवळ मित्रांना किंवा कोणीही नाही यापैकी काहीही निवडू शकता.

आपले छायाचित्र टॅग करण्याची सेटिंग्ज बदलणे या विषयी वाचा.

शोधक्षमता

आपल्याला ज्या लोकांविषयी आणि मित्रांविषयी काळजी वाटते त्यांना Twitter वर शोधणे एक छान अनुभव आहे आणि आपल्या ई-मेल पत्त्याचा किंवा फोन क्रमांकाचा वापर करून आम्ही आपल्याला सहजपणे त्यांच्याशी कनेक्ट राहण्यात मदत करू शकतो.

तथापि, आमच्या मदतीशिवाय मित्र आणि संपर्क यांना शोधण्यास आपण प्राधान्य देऊ शकता आणि सेटिंग समायोजित करून अशा प्रकारे सहजपणे आपण आपले खाते शोधण्यायोग्य ठेवू शकता. शोधक्षमता सेटिंग आणि आपली शोधक्षमता कशी बदलावी याविषयी अधिक वाचा.

ट्विटमध्ये आपले स्थान शेअर करणे

प्रत्येक वैयक्तिक ट्विटमध्ये आपले स्थान समाविष्ट करायचे आहे किंवा नाही याची Twitter आपल्याला निवड करू देते. आपले स्थान शेअर केल्याने आपल्या फॉलोअरला त्यावर प्रतिक्रिया देऊन काय करावे किंवा त्या ठिकाणी आणखी काय पाहता येईल अशा शिफारशी करता येतील, तसेच आपले स्थान सार्वजनिकरीत्या शेअर करण्यात काही धोके सुद्धा समाविष्ट आहेत. आपण आपल्या सर्वच फॉलोअर्सना ओळखता असे नाही, त्यामुळे आपण काय शेअर करण्याचे निवडत आहात याबाबत सतर्क राहणे कधीही चांगले.

आपले स्थान ट्विट करणे याविषयी अधिक जाणून घ्या. मोबाईल उपकरणांवर स्थान सुविधा कशी वापरावी याविषयी देखील आपण अधिक जाणून घेऊ शकता.

मीडिया सेटिंग्ज

आपल्या स्वतःच्या ट्विटमध्ये संवेदनशील मीडिया असल्यास आपण आपल्या ट्विटला ध्वजांकित करू शकता ज्यामुळे इतर लोकांना मीडिया प्रदर्शित होण्याच्या अगोदर इशारा पाहता येईल.

आपल्या ट्विटमधील मीडियामध्ये संवेदनशील मीडिया असल्यास त्यास कसे चिन्हित करावे याविषयी अधिक वाचा.

तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना आपण कोणती माहिती देत आहात हे माहित करून घ्या

आपला Twitter अनुभव अधिक विस्तृत करण्यासाठी इतर कंपन्यांनी अनुप्रयोग विकसित केले आहेत. तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना कनेक्ट करण्यापूर्वी त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन स्वतः त्यांच्या सेवा अटी माहित करून घेतल्याची खात्री करा. तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना अधिकृत करून कनेक्ट करणे याविषयी अधिक जाणून घ्या.

 

हा लेख शेअर करा