खाते सुरक्षा विषयी

आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही खालील सर्वोत्तम पद्धतींची शिफारस करतो:

 • आपण इतर वेबसाइट्सवर पुन्हा वापरणार नाही असा एखादा क्लिष्ट पासवर्ड वापरा.
 • द्वि-घटक प्रमाणीकरण वापरा.
 • पासवर्ड लिंक किंवा कोड रिसेट करण्याची विनंती करण्यासाठी ई-मेल आणि फोन क्रमांक आवश्यक आहे.
 • संशयास्पद लिंक्सपासून सावध रहा आणि आपली लॉगइन माहिती प्रविष्ट करण्यापूर्वी आपण twitter.com वर असल्याची खात्री करा.
 • आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड कधीही तृतीय पक्षांना देऊ नका, विशेषत: जे आपणास फॉलोअर्स मिळवून देण्याचे, पैसे कमवण्याचे किंवा आपल्या खात्याचे सत्यापन करण्याचे वचन देतात.
 • आपले संगणक सॉफ्टवेअर, आपल्या ब्राउझरसह, सर्वात अलीकडील अपग्रेड आणि अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरसहित अप-टू-डेट असल्याची खात्री करा.
 •  आपल्या खात्याची तडजोड झाली आहे किंवा नाही ते पहा.

पासवर्डची कार्यक्षमता

आपल्या Twitter खात्यासाठी एखादा क्लिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण पासवर्ड तयार करा. आपण आपल्या Twitter खात्याशी संबंधित ई-मेल पत्त्यासाठी तितकाच क्लिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण पासवर्ड देखील तयार करणे आवश्यक आहे.

हे करा:

 •  किमान 10 वर्णांचा पासवर्ड तयार करा. जास्त लांबीचा चांगला.
 •  अप्परकेस, लोअरकेस, संख्या आणि चिन्हे यांचे संयोजन वापरा.
 •  आपण भेट दिलेल्या प्रत्येक वेबसाइटसाठी वेगळा पासवर्ड वापरा.
 •  आपला पासवर्ड सुरक्षित ठिकाणी ठेवा. आपली सर्व लॉगइन माहिती सुरक्षितपणे संग्रहित करण्यासाठी पासवर्ड व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरण्याचा विचार करा.

हे करू नका:

 •  आपल्या पासवर्डमध्ये फोन क्रमांक, वाढदिवस इ. सारखी वैयक्तिक माहिती वापरू नका.
 •  “password”, “iloveyou”, इ. शब्दकोशामधील सामान्य शब्द वापरू नका.
 •  "abcd1234" किंवा "qwerty" सारखे कीबोर्डवरील अनुक्रम वापरू नका.
 •  वेबसाइट्सवर पासवर्ड पुन्हा वापरू नका. आपला Twitter खाते पासवर्ड Twitter साठी वैशिष्ट्यपूर्ण असावा.

याशिवाय, आपण आपल्या खाते सेटिंग्जमध्ये पासवर्ड रिसेट संरक्षण निवडू शकता. आपण हा बॉक्स सक्षम केल्यास, आपला ई-मेल पत्ता किंवा फोन क्रमांक दोन्ही आपल्या खात्याशी संबंधित असल्यास, आणि आपण तो विसरल्यास रिसेट पासवर्ड लिंक किंवा पुष्टीकरण कोड पाठविण्यासाठी आपणास आपला ई-मेल पत्ता किंवा फोन क्रमांक किंवा आपला ई-मेल पत्ता नंतर फोन क्रमांक प्रविष्ट करण्यास सूचित केले जाईल. 

आपली पासवर्ड रिसेट सेटिंग्ज शोधण्याच्या पद्धती
 1. मुख्य मेनूमध्ये नॅव्हिगेट करा
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. खाते टॅप करा.
 4. सुरक्षा टॅप करा.
 5. पासवर्ड रिसेट संरक्षणवर टॉगल करा
 1. आपल्या अनुप्रयोग सेटिंग्जमध्ये नॅव्हिगेट करा
 2. खाते टॅप करा.
 3. सुरक्षा टॅप करा.
 4. पासवर्ड रिसेट संरक्षण टॉगल करा
द्वि-घटक प्रमाणीकरण

वापरा

आपल्या खात्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण ही सुरक्षेची अतिरिक्त पातळी आहे. केवळ पासवर्डवर विसंबून राहण्याऐवजी, आपण आणि केवळ आपणच आपल्या Twitter खात्यामध्ये लॉगइन करू शकता याची खात्री करण्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरणामुळे दोन वेळा तपासणे शक्य होते. आपला पासवर्ड आणि आपला मोबाईल फोन (किंवा सुरक्षा कळ) दोन्हीचा वापर करू शकणारे लोकच आपल्या खात्यामध्ये लॉग इन करू शकतील.

द्वि-घटक प्रमाणीकरण संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आमचा लेख वाचा.आपण twitter.com
वर आहात हे पहा

फिशिंग म्हणजे जेव्हा कोणी चलाखीने आपणास आपले Twitter उपभोक्ता नाव, ई-मेल पत्ता किंवा फोन क्रमांक आणि पासवर्ड देण्यासाठी बाध्य करते, जेणेकरून ते आपल्या खात्यामधून स्पॅम पाठवू शकतील. अनेकवेळा, ते बनावट लॉगइन पृष्ठावर जाणाऱ्या लिंकवरून आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा कधी आपणास आपला Twitter पासवर्ड प्रविष्ट करण्यास सूचित केले जाईल, तेव्हा आपण twitter.com वर असल्याची खात्री करण्यासाठी आपल्या ब्राउझरच्या पत्त्याच्या बारमधील URL पहा. याव्यतिरिक्त, आपणास विचित्र वाटणाऱ्या URL सह थेट संदेश (मित्राकडून देखील) मिळाल्यास आपण ती लिंक न उघडण्याची आम्ही शिफारस करतो.

फिशिंग वेबसाइट बहुतांशी वेळा Twitter च्या लॉगइन पृष्ठाप्रमाणे दिसतील, परंतु प्रत्यक्षात ती Twitter ची वेबसाइट नसेल. Twitter डोमेनमध्ये नेहमी https://twitter.com/ हे बेस डोमेन असेल. येथे Twitter लॉगइन पृष्ठांची काही उदाहरणे आहेत:


लॉगइन पृष्ठाबद्दल आपणास खात्री नसल्यास, थेट twitter.com वर जाऊन तेथे आपली क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा. आपणास फिश केले गेले आहे असे वाटत असल्यास, शक्य तितक्या लवकर आपला पासवर्ड बदलून अतिरिक्त सूचनांसाठी आमच्या तडजोड केलेले खाते हा लेख वाचा. 

ई-मेलवरून फिशिंगविषयीच्या अधिक माहितीसाठी बनावट Twitter ई-मेल्स विषयी वाचा.  आपला पासवर्ड विचारण्यासाठी आम्ही आपल्याशी संपर्क साधणार नाहीआपणास ई-मेल, थेट संदेश किंवा प्रत्युत्तरावरून आपला पासवर्ड देण्यास Twitter कधीही विचारणार नाही.

आम्ही आपणास कधीच काही डाउनलोड करण्यासाठी किंवा Twitter नसलेल्या वेबसाइटवर साइन-इन करण्यास सांगणार नाही. आमच्याकडून असल्याचा क्लेम करणाऱ्या ई-मेलवरून कधीही संलग्नक उघडू नका किंवा कोणतेही सॉफ्टवेअर प्रस्थापित करू नका; ते नाही.


आपले खाते फिश किंवा हॅक झाल्याची आम्हाला शंका असल्यास, हॅकरला आपल्या खात्याचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही आपला पासवर्ड रिसेट करू शकतो. या प्रकरणात, आम्ही आपल्याला twitter.com पासवर्ड रिसेट लिंक ई-मेल करू.


आपण आपला पासवर्ड विसरल्यास, आपण या लिंकवरून तो रिसेट करू शकता.

 

नवीन आणि संशयास्पद लॉगइन अलर्ट्स

आम्हाला संशयास्पद लॉग इन आढळल्यास किंवा आपण आपल्या Twitter खात्यामध्ये नवीन उपकरणावरून पहिल्यांदा लॉग इन केल्यास, आम्ही आपणास Twitter अनुप्रयोगामध्ये किंवा आपल्या खात्याच्या सुरक्षेची अतिरिक्त पातळी म्हणून ई-मेलवरून पुश सूचनापत्र पाठवू. iOS आणि Android, twitter.com आणि मोबाइल वेबसाठी Twitter वरून नवीन लॉगइन केल्यानंतर लॉगइन अलर्ट्स पाठविले जातात.

या अलर्ट्सवरून उपकरणावरून लॉग इन करणारे आपणच आहात हे सत्यापित करू शकता. आपण उपकरणावरून लॉग इन केले नसल्यास आपला Twitter पासवर्ड त्वरित बदलून आपले खाते सुरक्षित करण्यासाठी सूचनापत्रामधील पायऱ्यांचे अनुसरण करा. कृपया लक्षात घ्या की सूचनापत्रामध्ये सूचीबद्ध केलेले ठिकाण हे आपण Twitter मध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेल्या IP पत्त्यावरून घेतलेले अंदाजे ठिकाण आहे आणि ते आपल्या भौतिक ठिकाणापेक्षा वेगळे असू शकते.

नोट: आपण गुप्त ब्राउझर किंवा कुकीज अक्षम केलेल्या ब्राउझरवरून आपल्या Twitter खात्यामध्ये लॉग इन केल्यास, आपणास प्रत्येक वेळी अलर्ट मिळेल.

ई-मेल पत्त्याच्या अपडेट विषयी अलर्ट्स

आपल्या Twitter खात्याशी संबंधित ई-मेल पत्ता कधीही बदलला की आम्ही आपल्या खात्यावरील पूर्वी वापरलेल्या ई-मेल पत्त्यावर ई-मेल सूचनापत्र पाठवू. आपल्या खात्याशी तडजोड झाल्यास, या अलर्ट्समुळे आपणास आपल्या खात्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्यात मदत होईल.
 

Twitter वरील लिंक्सचे मूल्यांकन करणे

ट्विटमध्ये शेअर करण्यास अशा वैशिष्ट्यपूर्ण लहान लिंक्स तयार करण्यासाठी असंख्य Twitter उपभोक्ते bit.ly किंवा TinyURL सारखे URL शॉर्टनर्स वापरून लिंक पोस्ट करतात. तथापि, URL शॉर्टनरमुळे अंतिम डोमेन नीटसे समजत नाही आणि पर्यायी लिंक कुठे जाते हे सांगणे कठीण होते.

Chrome आणि Firefox सारख्या काही ब्राउझरमध्ये विनामूल्य प्लग-इन्स आहेत ज्यावरून आपणास विस्तारित URL वर क्लिक न करता खालील घटक दिसतील:

सर्वसाधारणपणे, कृपया लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगा. आपण एखाद्या लिंकवर क्लिक केल्यास आणि अनपेक्षितपणे Twitter लॉगइन पृष्ठासारखे दिसणाऱ्या पृष्ठावर गेला आहात असे आपणास आढळल्यास, आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करू नका. त्याऐवजी, twitter.com वर जा आणि Twitter च्या मुख्यपृष्ठावरून थेट लॉग इन करा.
 

आपला कंप्युटर आणि ब्राउझर अपडेट आणि व्हायरसमुक्त ठेवा

आपला ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टीम नवीनतम संस्करण आणि पॅचेस वापरून अपडेट ठेवा - विशिष्ट सुरक्षा धोक्यांना संबोधित करण्यासाठी पॅचेस सहसा समाविष्ट केले जातात. व्हायरस, स्पायवेअर आणि अॅडवेअरसाठी आपला कंप्युटर नियमितपणे स्कॅन केल्याची खात्री करा.

आपण सार्वजनिक कंप्युटर वापरत असल्यास, आपण काम पूर्ण झाल्यावर Twitter मधून साइन आउट केल्याची खात्री करा.

तृतीय-पक्ष अनुप्रयोग काळजीपूर्णक निवडा

Twitter प्लॅटफॉर्मवर बाह्य विकसकांनी तयार केलेले अनेक तृतीय-पक्ष अनुप्रयोग आहेत जे आपण आपल्या Twitter खात्या(त्यां)वरून वापरू शकता. तथापि, तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना आपल्या खात्यामध्ये प्रवेश देण्यापूर्वी आपण सावध असले पाहिजे.

आपणास एखाद्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगाचा आपल्या खात्यामधील अॅक्सेस मंजूर करायचा असल्यास, केवळ Twitter ची OAuth पद्धत वापरूनच आपण तो अॅक्सेस मंजूर करण्याची आम्ही शिफारस करतो. OAuth ही एक सुरक्षित कनेक्शन पद्धत असून त्यासाठी आपण आपले Twitter उपभोक्ता नाव आणि पासवर्ड तृतीय पक्षास देण्याची आवश्यकता नसते. आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड एखाद्या अनुप्रयोग किंवा वेबसाइटसाठी देण्यास सांगितले जाते तेव्हा आपण विशेषतः सावध असले पाहिजे, कारण तृतीय-पक्ष अनुप्रयोगांना Oauth वरून आपल्या खात्यामध्ये अॅक्सेस देण्यासाठी आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्डची आवश्यकता नसते. आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड दुसऱ्या कोणाला देता तेव्हा, त्यांचे आपल्या खात्यावर पूर्ण नियंत्रण असते आणि ते आपणास लॉक करू शकतात किंवा आपले खाते स्थगित करण्यास कारणीभूत ठरणारे कृत्य करू शकतात. तृतीय-पक्ष अनुप्रयोग कनेक्ट करणे किंवा रद्द करणे याविषयी जाणून घ्या.

आपण वेळोवेळी आपले खाते अॅक्सेस करणाऱ्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगांचे पुनरावलोकन करा. आपल्या खाते सेटिंग्जमधील अनुप्रयोग टॅबला भेट देऊन आपण ओळखत नसलेल्या किंवा आपल्या वतीने ट्विट करत असलेल्या अनुप्रयोगांचा अॅक्सेस आपण रद्द करू शकता.

हा लेख शेअर करा