Twitter चे नियम

सार्वजनिक चर्चांची माहिती पुरविणे हा Twitter चा उद्देश आहे. हिंसा, मानसिक छळ आणि इतर अशा प्रकारचे वर्तन लोकांना स्वतःचे विचार व्यक्त करण्यापासून परावृत्त करतात आणि शेवटी जागतिक सार्वजनिक चर्चेचे मूल्य कमी करतात. सर्व लोक सार्वजनिक चर्चांमध्ये मुक्तपणे आणि सुरक्षितपणे सहभागी होऊ शकतात याची खात्री देण्यासाठी आमचे नियम आहेत.
 

सुरक्षा


हिंसा:
आपण एखाद्या व्यक्ती किंवा लोकांच्या गटाविरुद्ध हिंसा करण्याची धमकी देऊ शकत नाही. आम्ही हिंसाचाराला प्रसिद्धी देण्यास देखील प्रतिबंधित करतो. हिंसक धमक्या आणि हिंसेला प्रसिद्धी देणे या धोरणांविषयी अधिक जाणून घ्या. 

दहशतवाद/हिंसक उग्रवाद: आपण दहशतवाद किंवा हिंसक उग्रवादाला धमकावू किंवा चालना देऊ शकत नाही. अधिक जाणून घ्या.

बाल लैंगिक शोषण: Twitter वर आम्ही बाल लैंगिक शोषणास कदापि थारा देत नाही. अधिक जाणून घ्या.

गैरवर्तन/छळवणूक: आपण कोणाच्याही लक्ष्यित छळवणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा इतर लोकांना तसे करण्याबाबत चिथावणी देऊ शकत नाही. यामध्ये एखाद्याला शारीरिक हानी पोहोचविण्याची इच्छा किंवा आशा असते. अधिक जाणून घ्या.

द्वेषपूर्ण वर्तन: वंश, जात, राष्ट्रीयत्व, जातीभेद, लैंगिक अभिमुखता, लिंग, लिंग ओळख, धार्मिक संलग्नता, वय, अपंगत्व किंवा गंभीर आजाराच्या आधारावर आपण इतरांविरुद्ध हिंसेला चालना देऊ शकत नाही किंवा थेट त्यांचा छळ करू शकत नाही. अधिक जाणून घ्या

आत्महत्त्या किंवा स्व-हानी: आपण आत्महत्या किंवा स्व-हानीला प्रोत्साहन किंवा चालना देऊ शकत नाही. अधिक जाणून घ्या.

ग्राफिक स्वरूपातील उल्लंघन आणि प्रौढांशी संबंधित मजकूर असलेला संवेदनशील मीडिया: आपण अत्याधिक प्रसिद्ध असेलला मीडिया पोस्ट करू शकत नाही किंवा लाइव्ह व्हिडिओ किंवा प्रोफाइल किंवा हेडर प्रतिमांमध्ये हिंसक किंवा प्रौढांशी संबंधित मजकूर शेअर करू शकत नाही. लैंगिक हिंसाचार आणि/किंवा गंभीर स्वरूपाची मारहाण दाखविणाऱ्या मीडियाला देखील परवानगी नाही. अधिक जाणून घ्या

अवैध किंवा विशिष्ट नियमन केलेल्या वस्तू किंवा सेवा: आपण आमच्या सेवेचा वापर कोणत्याही बेकायदेशीर हेतूसाठी किंवा नियमबाह्य कृतींसाठी करत नसाल. यामध्ये बेकायदेशीर वस्तू किंवा सेवांमध्ये तसेच विशिष्ट प्रकारच्या नियमन केलेल्या वस्तू किंवा सेवांमधील व्यवहारांची विक्री, खरेदी किंवा सुविधा समाविष्ट आहेत. अधिक जाणून घ्या.

गोपनीयता


खाजगी माहिती:
इतर लोकांची खाजगी माहिती (जसे की निवासी फोन क्रमांक आणि पत्ता) त्यांनी स्पष्टपणे अधिकृतता आणि परवानगी दिल्याशिवाय आपण प्रदर्शित किंवा पोस्ट करू शकत नाही. खाजगी माहिती उघड करण्याची धमकी देणे किंवा असे करण्यास इतरांना प्रोत्साहन देणे यालाही आम्ही प्रतिबंध करतो. अधिक जाणून घ्या.

असंमती दर्शविलेली नग्नता: व्यक्तिगतपणे तयार केलेली आणि वितरित केलेली छायाचित्रे किंवा व्हिडिओ त्यांची परवानगी न घेता आपणास पोस्ट किंवा शेअर करता येणार नाहीत. अधिक जाणून घ्या.
 

प्रमाणीकरण


प्लॅटफॉर्मचा वापर आणि स्पॅम:
आपण Twitter च्या सेवांचा वापर माहितीचा कृत्रिमरित्या विस्तार करण्याच्या किंवा दडपून ठेवण्याच्या हेतूने करू शकत नाही किंवा Twitter वरील लोकांचा अनुभव प्रभावित करणारे किंवा व्यत्यय आणणारे वर्तन करू शकत नाही. अधिक जाणून घ्या.

निवडणुकीमधील प्रामाणिकपणा:: आपण Twitter च्या सेवांचा वापर निवडणुका किंवा नागरी प्रक्रिया हाताळण्यासाठी किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी करू शकत नाही. यामध्ये पोस्टिंग किंवा शेअरिंग मजकूर असतो ज्यामुळे नागरी प्रक्रियेमध्ये कधी, कोठे, किंवा कसे याविषयी सहभागी होण्यावर लोकांवर दबाव आणला जाऊ शकतो किंवा त्यांची दिशाभूल करू शकतो. अधिक जाणून घ्या.

तोतयागिरी: लोकांची दिशाभूल करण्यासाठी, संदिग्धतता निर्माण करण्यासाठी किंवा धोका देण्यासाठी किंवा त्या हेतूने आपण व्यक्ती, समूह किंवा संस्थांची तोतयागिरी करू शकत नाही. अधिक जाणून घ्या.

कृत्रिम किंवा फेरफार केलेला मीडिया: आपण कदाचित हानी पोहोचवण्याची शक्यता असलेल्या कृत्रिम किंवा फेरफार केलेला मीडिया शेअर करू शकत नाही. या व्यतिरिक्त, आम्ही लोकांना त्यांची अधिकृतता समजून घेण्यात मदत करण्यासाठी आणि अतिरिक्त संदर्भ देण्यासाठी कृत्रिम किंवा फेरफार केलेला मीडिया असलेली ट्विट्स आम्ही लेबल करू शकतो. अधिक जाणून घ्या.

कॉपीराईट आणि ट्रेडमार्क: कॉपीराईट आणि ट्रेडमार्कसह आपण इतर लोकांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. आमच्या ट्रेडमार्क धोरण आणि कॉपीराईट धोरण याविषयी अधिक जाणून घ्या.
 

अंमलबजावणी आणि अपील्स


या नियमांचे उल्लंघन करणे किंवा अंमलबजावणीस प्रतिबंध करणे तसेच अपील करण्या याविषयीच्या संभाव्य परिणामांसह आमचा अंमलबजावणीचा दृष्टीकोन याविषयी अधिक जाणून घ्या.
 

व्हिडिओ सामग्रीमधील तृतीय पक्षाची जाहिरात


आमच्या सेवांवर किंवा सेवांच्या माध्यमातून आपण असा कोणताही व्हिडिओ सबमिट, पोस्ट किंवा प्रदर्शित करणे यासारखी कृती आमच्या पूर्व-परवानगी शिवाय करू शकत नाहीत ज्यामध्ये तृतीय पक्षाची जाहिरात जसे की, प्री-रोल व्हिडिओ जाहिराती किंवा प्रायोजकत्व असलेले ग्राफिक्स समाविष्ट आहेत.

नोट: निकोप सार्वजनिक संभाषणास उत्तेजन देण्याच्या आमच्या ध्येयाचे समर्थन करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी हे नियम बदलण्याची आवश्यकता भासू शकते. अगदी अलीकडील संस्करण येथे कायमस्वरूपी उपलब्ध आहे: https://twitter.com/rules.

हा लेख शेअर करा