नियमाचे उल्लंघन रिपोर्ट करणे

या लेखामध्ये Twitter चे नियम आणि सेवा अटीचे उल्लंघन झाल्यास त्याविषयीचा रिपोर्ट कसा द्यावा याविषयी थोडक्यात सांगितले आहे.

थेट ट्विट किंवा प्रोफाइलवरून कसे रिपोर्ट करावे

विशिष्ट प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास आपण थेट स्वतंत्र ट्विट किंवा प्रोफाइलवरून रिपोर्ट करू शकता, ज्यामध्ये समाविष्ट आहे: स्पॅम, अपमानास्पद किंवा प्रक्षोभक सामग्री, अयोग्य जाहिराती, स्वतःला इजा करून घेणे आणि तोतयागिरी. इतर प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, त्याविषयी रिपोर्ट करण्यासाठीच्या अधिक माहितीसाठी खालील विशिष्ट प्रकारच्या नियमांच्या उल्लंघनाविषयी कसा रिपोर्ट करावा हा विभाग पहा.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वैयक्तिक ट्विट्ससाठी कसा रिपोर्ट करावा:

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वैयक्तिक ट्विट्स (किंवा थेट संदेशांबाबत) रिपोर्ट कसा द्यावा याविषयी अधिक जाणून घ्या.

नियमांचे उल्लंघन करणारा मीडिया कसा रिपोर्ट करावा:

मीडियासाठीचे ट्विट्स रिपोर्ट कसे करावेत आणि हे जाणून घ्या आणि Twitter मीडिया धोरण वाचा.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रोफाइल कशा रिपोर्ट कराव्यात:

 1. आपण रिपोर्ट करू इच्छित असलेली प्रोफाइल उघडा.
 2. ओव्हरफ्लो प्रतीक  (Android साठी twitter.com आणि Twitter च्या माध्यमातून) निवडा किंवा गियर प्रतीकावर  (iOS साठी Twitter वरून) टॅप करा.
 3. रिपोर्ट निवडा आणि त्यानंतर आपण रिपोर्ट करू इच्छित असलेला समस्येचा प्रकार निवडा.
 4. ते अपमानास्पद किंवा प्रक्षोभक होत आहेत, असे आपण निवडल्यास आपण रिपोर्ट करत असलेल्या समस्येविषयी आम्ही आपल्याला अतिरिक्त माहिती विचारू. आपल्या रिपोर्टचे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ योग्यरीत्या लक्षात येण्याकरिता आपण रिपोर्ट करत असलेल्या खात्यावरून अतिरिक्त ट्विट्स निवडण्याबाबत देखील आम्ही आपल्याला विचारू शकतो.
 5. आपण रिपोर्ट केलेल्या ट्विट्सचा मजकूर आम्ही फॉलो-अप ई-मेल आणि आपल्यासाठीच्या सूचनापत्रांमध्ये समाविष्ट करू. ही माहिती प्राप्त करणे रद्द करण्यासाठी कृपया या रिपोर्टविषयीचे अपडेट हे ट्विट्स दाखवू शकतात च्या पुढील बॉक्सवरील टिकमार्क काढून टाका.
 6. आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter विषयक अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा अतिरिक्त कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.

मुमेंटमधील विशिष्ट सामग्री कशी रिपोर्ट करावी

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मुमेंटमधील ट्विट कसे रिपोर्ट करावेत:

 1. मुमेंटमधील जे ट्विट आपण रिपोर्ट करू इच्छिता ते नॅव्हीगेट करा. 
 2.   प्रतीकावर क्लिक किंवा टॅप करा 
 3. ट्विट रिपोर्ट करा क्लिक किंवा टॅप करा.
 4. आपण आम्हाला रिपोर्ट करू इच्छित असलेल्या समस्येचा प्रकार निवडा.
 5. आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter विषयक अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मुमेंटसाठीच्या अनेक घटकांसाठी कसा रिपोर्ट करावा:

 1. मुमेंट्स रिपोर्ट फॉर्म ला भेट द्या. 
 2. आपण रिपोर्ट करू इच्छित असलेल्या मुमेंटची URL नोंदवा.
 3. आपण आम्हाला रिपोर्ट करू इच्छित असलेल्या समस्येचा प्रकार निवडा.
 4. मुमेंटमधील 5 ट्विट्स आम्हाला प्रदान करा जे नियमांचे उल्लंघन करू शकतात.
 5. आपण आपला रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्या Twitter विषयक अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा कार्यवाहीची आम्ही शिफारस करू.

विशिष्ट प्रकारच्या नियमांच्या उल्लंघनाविषयी कसा रिपोर्ट करावा

खालील माहिती ही आपण आम्हाला आमच्या मदत केंद्राच्या माध्यमातून रिपोर्ट करू शकता अशा नियमांच्या उल्लंघनाच्या विविध प्रकारांचे तसेच ते कसे रिपोर्ट करायचे याविषयीचे स्पष्टीकरण देते.

Note: मदत केंद्राच्या माध्यमातून Twitter चे नियम आणि सेवा अटी च्या उल्लंघनाविषयी रिपोर्ट करताना, आपल्या रिपोर्टचा काही भाग हा प्रभावित खात्यासारख्या तिसऱ्या पक्षासोबत शेअर करण्याची आम्हाला परवानगी द्यावी, असे आपल्याला विचारले जाऊ शकते.

इतर एखाद्याच्या नावाने रिपोर्ट कसा करावा

आपण इतर व्यक्तीच्या नावाने देखील नियमाच्या उल्लंघनाबाबत रिपोर्ट देऊ शकता. वर देण्यात आलेल्या श्रेणी आणि सूचनांचा संदर्भ पहावा किंवा आपला रिपोर्ट सबमिट करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आपण थेट ट्विट किंवा प्रोफाइलवरून देखील रिपोर्ट करू शकता (थेट ट्विट किंवा प्रोफाइलवरून कसे रिपोर्ट करावे हा वरील विभाग पहा).

Periscope उपभोक्ता नाव कसे शोधायचे

Periscope वरील स्पष्ट स्वरूपातील सामग्री रिपोर्ट करतांना आपल्याला Periscope उपभोक्ता नाव प्रदान करण्याविषयी विचारले जाऊ शकते. 

twitter.com च्या माध्यमातून:

 1. जेव्हा आपल्याला twitter.com वर ट्विटच्या माध्यमातून शेअर केले जाणारे Periscope प्रक्षेपण आढळते तेव्हा Periscope प्रक्षेपण वर क्लिक करा.
 2. Periscope प्रक्षेपण प्रत्यक्ष चालू असल्यास Periscope उपभोक्त्याचे प्रदर्शित नाव (जे खाली डाव्या बाजूस असते) शोधा. प्रोफाइल दृश्य प्रदर्शित करण्यासाठी त्यावर क्लिक करा. Periscope उपभोक्ता नाव कॉपी करा (ते @ चिन्हाने सुरू होते).
 3. Periscope प्रक्षेपण पुन्हा प्ले होत असल्यास आपल्याला Periscope उपभोक्ता नाव खाली उजव्या बाजूस असलेल्या उपभोक्त्याच्या प्रदर्शन नावामध्ये पाहता येईल. ते कॉपी करा (ते @ चिन्हाने सुरू होते).

iOS उपकरणावरून:

 1. प्रक्षेपण माहिती पॅनल पाहण्यासाठी Periscope प्रक्षेपणवरून वरच्या दिशेने स्वाईप करा किंवा स्क्रीनच्या खाली उजवीकडे असलेल्या आणखी प्रतीकावर  टॅप करा.
 2. Periscope उपभोक्ता प्रदर्शन नावाअंतर्गत असेल आणि ते @ चिन्हाने सुरू होते.

Android उपकरणावरून:

 1. प्रक्षेपण माहिती पॅनल पाहण्यासाठी Periscope प्रक्षेपणवरून स्क्रीनच्या खाली उजवीकडे असलेल्या आणखी प्रतीकावर  टॅप करा.
 2. Periscope उपभोक्ता प्रदर्शन नावाअंतर्गत असेल आणि ते @ चिन्हाने सुरू होते.
View instructions for:

Periscope प्रक्षेपणसाठी असलेली लिंक कशी शोधायची

Periscope वरील स्पष्ट स्वरूपातील सामग्री रिपोर्ट करतांना आपल्याला Periscope प्रक्षेपणसाठी असलेली लिंक प्रदान करण्याविषयी विचारले जाऊ शकते. कसे ते या ठिकाणी:

 1. प्रक्षेपण माहिती पॅनल पाहण्यासाठी Periscope प्रक्षेपणवरून वरच्या दिशेने स्वाईप करा किंवा स्क्रीनच्या खाली उजवीकडे असलेल्या आणखी प्रतीकावर  टॅप करा.
 2. प्रक्षेपण शेअर करा टॅप करा आणि लिंक शेअर करा निवडा.

Periscope प्रक्षेपणसाठी असलेली लिंक कशी शोधायची

Periscope वरील स्पष्ट स्वरूपातील सामग्री रिपोर्ट करतांना आपल्याला Periscope प्रक्षेपणसाठी असलेली लिंक प्रदान करण्याविषयी विचारले जाऊ शकते. कसे ते या ठिकाणी:

 1. प्रक्षेपण माहिती पॅनल पाहण्यासाठी Periscope प्रक्षेपणवरून स्क्रीनच्या खाली उजवीकडे असलेल्या आणखी प्रतीकावर   टॅप करा.
 2. प्रक्षेपण शेअर करा टॅप करा आणि URL कॉपी करा निवडा.

Periscope प्रक्षेपणसाठी असलेली लिंक कशी शोधायची

Periscope वरील स्पष्ट स्वरूपातील सामग्री रिपोर्ट करतांना आपल्याला Periscope प्रक्षेपणसाठी असलेली लिंक प्रदान करण्याविषयी विचारले जाऊ शकते. कसे ते या ठिकाणी:

 1. जेव्हा आपल्याला twitter.com वर ट्विटच्या माध्यमातून शेअर केले जाणारे Periscope प्रक्षेपण आढळते तेव्हा Periscope प्रक्षेपण वर क्लिक करा.
 2. आपल्या ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये प्रदर्शित होणारी URL कॉपी करा. ती याप्रमाणे दिसत असली पाहिजे: https://www.pscp.tv/w/…

टीमशी कसा संपर्क साधावा या बरोबरच अधिक माहितीसाठी Periscope मदत केंद्र ला भेट द्या.

Bookmark or share this article