goglobalwithtwitterbanner

Twitter मुमेंट्स विषयी मार्गदर्शकतत्वे आणि नियम

मुमेंट्सच्या माध्यमातून दिवसभरातील लाखो ट्विट्सपैकी सर्वोत्तम ताज्या घडामोडी Twitter वर दाखविल्या जातात. मुमेंट्सच्या माध्यमातून लाखो लोक Twitter च्या कार्यक्षमतेचा आनंद घेऊ शकतात-एखाद्या निषेध-सभेच्या मध्यभागी उभे राहून, ऑस्कर सोहळ्याच्या पुढच्या रांगेत बसून, विश्व चषकाच्या मैदानावर किंवा अंतराळामधून. जे जगामध्ये घडत असते तेच आपण Twitter वर पाहता.

मुमेंट्स तयार करण्यासाठी आणि निवडण्यासाठी Twitter क्युरेशन संघ म्हणून आम्ही जी मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे आचरणात आणतो तिच मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे आचरणात आणली जातात.

मुमेंट्स क्युरेशन धोरण

लोकांना Twitter वर उत्तम माहिती शोधता यावी यासाठी मुमेंट्स डिझाइन केले आहे. आमचे स्वत:चे क्युरेटर, मूळ मजकुराचे पत्रकार किंवा निर्माते म्हणून काम करत नाहीत; त्याऐवजी ते वापरण्यास सोपे जाईल अशा मार्गाने Twitter वर आधीपासून अस्तित्वात असलेल्या आकर्षक मजकुराचे आयोजन आणि सादरीकरण करतात.

ही जागतिक मार्गदर्शक तत्त्वे मजकूर वाचणाऱ्या तसेच ज्यांचा मजकूर मुमेंट्समध्ये प्रदर्शित होणार आहे अशा ग्राहकांसाठी शक्य तितका सर्वोत्कृष्ट अनुभव व्यक्त करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

सर्वोत्तम मुमेंट्स तयार करणे

Twitter वरील उल्लेखनीय मजकूर अधिक लक्षवेधी करण्यासाठी मुमेंट्स डिझाइन केले आहे. त्या भव्य दर्शकसंचांला आकर्षित करणाऱ्या असल्या पाहिजेत आणि त्यामधील मजकूर Twitter कम्युनिटीच्या सर्व विभागांसाठी साजेसा असणे आवश्यक आहे.

काहीवेळा मुमेंट्स जागतिक स्तरावर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये संबंधित असलेल्या घटकांच्या बरोबरीने जाणाऱ्या असतील; तर काहीवेळा त्या Twitter वर वैशिष्ट्यपूर्ण मजकुराचा वापर करून तयार केल्या जातील. Twitter वरील ताज्या घडामोडींनुसार आम्ही मुमेंट्सची निवड करू, किंवा मीडिया आउटलेटवर प्रदर्शित झालेल्या Twitter मजकुरानुसार मुमेंट्स तयार करू. विवादास्पद विषयांवरील मुमेंट्स निवडताना, आम्ही मुख्यप्रवाहातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या मोठ्या बातम्या किंवा Twitter वरील मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक चर्चा निवडू.

आम्ही अशा मुमेंट्स तयार करण्याचे टाळतो ज्यामुळे गोपनीयतेला धक्का पोहोचू शकतो, बेकायदेशीर कृत्यांना उत्तेजन मिळू शकते, अज्ञान (18 वर्षांखालील) मुलांचे शोषण किंवा त्यांना नुकसान पोहोचवू शकते किंवा Twitter, Inc. ला बातमीचे लक्ष्य करू शकतात.

आम्ही एकल तृतीय-पक्ष वेबसाइटवर एम्बेड केलेल्या क्युरेटेड कलेक्शन्सचे किंवा ट्विट्सच्या संचांचे किंवा एकल Twitter खात्यावरून पुन्हा ट्विट केलेल्यांचे डुप्लीकेट करत नाही.

उत्तम ट्विट्स निवडणे

मुमेंट्स म्हणजे लोकांनी तयार केलेला मजकूर Twitter वर प्रदर्शित करणे. जेव्हा आम्ही अशा मजकुराला मुमेंट्समध्ये समाविष्ट करू तेव्हा आम्ही त्या व्यक्तीच्या वक्तव्यावर विश्वासू ठेऊ आणि असा मजकूर ट्विट्समध्ये समाविष्ट करणार नाही ज्यामध्ये दिशाभूल होणे, ट्विटच्या मूळ संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणे किंवा संरक्षित खात्यांमधील मजकूर समाविष्ट होणे अशा गोष्टींचा समावेश होतो. आम्ही Twitter कर्मचाऱ्यांनी तयार केलेला मजकूर प्रदर्शित करण्याचे टाळू.

पक्षपातीपणा, अचूकता, मूल्ये

आवश्यक, मूळ आणि विविध प्रकारची माहिती/मजकूर प्रदर्शित करणे हा मुमेंट्सचा उद्देश आहे. मुमेंटमध्ये दिसण्यासाठी मजकूर निवडताना आम्ही ट्विटचा मजकूर, कोणताही मीडिया, आणि पोस्ट करणाऱ्याचा अवतार आणि उपभोक्तानाव यांचा विचार करतो.

  • पक्षपातीपणा: विवादास्पद विषयांविषयी ट्विट्स निवडताना आम्ही डेटा-आधारित निर्णयांचा वापर करू आणि Twitter वर आधीपासूनच सर्वात जास्त प्रमाणात पाहिली जाणारी ट्विट्स हायलाइट करू. सार्वजनिक स्तरावरील वादविवाद दर्शविणाऱ्या विषयांवर आम्ही अशा ट्विट्सची निवड करू जेथे शक्य असेल तेथे तर्कवितर्क किंवा बातमीच्या अनेक बाजू मांडता येतील. Twitter क्युरेटर्सनी त्यांचे स्वतःचे मत मांडणे आवश्यक नसून जशा ट्विट्स आमच्या प्लॅटफॉर्मवर दिसतील तशा त्यावरील चर्चा दाखविणे आवश्यक आहे.
  • अचूकता: बातम्या किंवा लक्षवेधी मजकुरावर काम करत असताना, आम्हाला अचूक माहिती दर्शविणाऱ्या दर्जेदार ट्विट्स हायलाइट करायच्या आहेत. जर आम्हाला याची जाणीव झाली की आम्ही चुकीचा मजकूर हायलाइट केला आहे तर आम्ही लक्षात येण्याजोगी दुरुस्ती करून मुमेंट अपडेट करून अपडेट केलेले ट्विट प्रदर्शित करू. अगदी क्वचित प्रसंगी आम्ही मुमेंट्स हटवू शकतो आणि मागे घेण्याविषयी विचारणा करू शकतो.
  • मूल्ये: वृत्तपत्रामध्ये आवश्यक बातमी म्हणून प्रदर्शित होण्याखेरीज अर्वाच्यता, हिंसा, नग्नता आणि इतर प्रकारचा संभाव्य संवेदनशील मजकूर टाळणे आवश्यक आहे. आम्ही अवैध माहितीचा प्रचार किंवा बेकायदेशीर आचरण करणारा मजकुर समाविष्ट करणार नाही. मुमेंटमध्ये संभाव्य संवेदनशील माहिती असू शकते अशी स्पष्ट सूचना आम्ही लोकांना देऊ.

शैली विषयी मार्गदर्शक तत्वे 

मुमेंट म्हणजे ट्विट्सचे कलेक्शन आहे, जसे की विविध लोकांची मते, प्रसारमाध्यमांच्या विस्तृत व्याप्तीचा वापर करून स्वतःचीच ट्विट्स तयार करणे, जो एक निर्मितीक्षम बातम्या सांगण्याचा एक सहज-सोपा मार्ग असून ज्यामुळे एक परिपूर्ण आणि आकर्षक बातमी प्रदर्शित होते. सर्वोत्तम मुमेंट्समध्ये थेट घटनास्थळ किंवा मूळ संदर्भांकडून येणाऱ्या ट्विट्स समाविष्ट असून Twitter ने परवानगी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मजकुरावर लक्ष वेधण्यासाठी त्यामधील दृष्टीकोन, समयसूचकता किंवा मत प्रदर्शित केले जाते.

मुमेंट्स तयार करण्यासाठी येथे काही अटी आहेत:

  • प्रत्येक मुमेंटमध्ये Twitter वर वैशिष्ट्यपूर्ण माहिती किंवा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक मुमेंट दर्शकांना शेअर करण्यासाठी प्रेरित करणारी पाहिजे.
  • प्रत्येक मुमेंट योग्य वेळी पोस्ट करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक मुमेंटमध्ये बातमीशी संबंधित लोक, त्यांची मते आणि त्यांच्या दृष्टीकोनाला महत्त्व देणे आवश्यक आहे.

Twitter क्युरेशन संघाने तयार केलेल्या काही मुमेंट्समध्ये शीर्षक किंवा ट्विट्सच्या खाली अतिरिक्त मजकूर समाविष्ट असू शकतो. हा मजकूर मुमेंटमध्ये जास्तीचा संदर्भ समाविष्ट करण्यासाठी आणि कदाचित मुमेंटमध्ये ट्विट्सचे भाषांतर करण्यासाठी किंवा या ट्विटमधील माहिती पुन्हा सांगण्यासाठी आहे. मुमेंटमध्ये हा अतिरिक्त मजकूर ट्विटवरुन घेतला गेला नसल्यास, ते सहजपणे पडताळणी करण्यायोग्य असावा किंवा त्याच्या मूळ माहिती स्त्रोताप्रमाणे आहे असे समजावे.

स्वारस्याच्या संदर्भातील विरोध टाळणे

आमचा मुमेंट्स क्युरेशन संघ रेव्हेन्यू मिळविण्यासाठी, उपभोक्त्यांची संख्या वाढविण्यासाठी किंवा Twitter च्या भागीदार संबंधांचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार नाही. आम्ही मुमेंट्समध्ये ट्विट्स प्रदर्शित करू आणि जाहिरातदार, भागीदार किंवा Twitter च्या व्यवसायातील स्वारस्यांचा विचार न करता आमच्या दर्शकांना उत्तम काय देता येईल त्यानुसार मुमेंट निवडू. क्युरेशन संघ सामान्यत: आमच्या स्वतःच्या उद्योगास, आमच्या कंपनीला किंवा आमच्या प्रतिस्पर्ध्यांना कव्हर करणाऱ्या मुमेंट्स तयार करणे टाळेल. तथापि, जर Twitter किंवा तिचे प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्मवरील चर्चेचा एक महत्त्वपूर्ण भाग असतील (उदाहरणार्थ. जर एखादी समस्या हा प्रचलित विषयअसेल) तर आमचा क्युरेशन संघ उपलब्धतेनुसार कंपनीकडील प्रतिसादासह चर्चेचा एक तथ्यपूर्ण सारांश क्युरेट करू शकेल.

व्यक्ती आणि Twitter चे भागीदार मुमेंट्स तयार करतात.

आम्ही व्यक्ती आणि भागीदारांना मुमेंट्सवर नियंत्रण करण्याची परवानगी देतो आणि मुमेंट्सच्या टॅबमध्ये (twitter.com) आणि एक्सप्लोर टॅबमध्ये (Twitter for iOS आणि Android) त्या मुमेंट्सचा समावेश करू शकतो. प्रदर्शित करण्यापूर्वी आम्ही प्रत्येक मुमेंटचे पुनरावलोकन करतो आणि मुमेंट आणि एक्सप्लोर टॅब्ज किंवा मुमेंट्सच्या खात्यामधून प्रदर्शित केलेली कोणतीही मुमेंट या धोरणात उल्लेखित संपूर्ण क्युरेटोरियल मूल्ये पूर्ण करते हे सुनिश्चित करेल. मुमेंट कोणी क्युरेट केली आहे हे देखील आम्ही स्पष्टपणे दाखवू.

Twitter भागीदारांनी तयार केलेली काही मुमेंट्स तृतीय पक्षाकडून प्रायोजित केल्या जाऊ शकतात. मुमेंट्स आणि एक्सप्लोर टॅब्जमध्ये समाविष्ट करण्यासाठी भागीदारांकडील मुमेंट्स निवडताना आम्ही हे प्रायोजकत्व विचारात घेत नाही. प्रायोजित भागीदारांकडील सर्व मुमेंट्स बरोबरच आमच्या एकूणच क्युरेटोरियल मूल्यांचे परिपूर्णपणे आचरण करणे आवश्यक आहे.

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.