कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे

Twitter खात्यांविषयी माहिती शोधणाऱ्या प्राधिकाऱ्यांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. Twitter वरील प्रतिरोधित मजकूर वरील विनंत्यांची माहिती आता उपलब्ध आहे. अधिक सामान्य स्वरूपाची माहिती आमच्या गोपनीयता धोरण, सेवा अटी आणि Twitter चे नियम यावर उपलब्ध आहे.   

 

समाविष्ट विषय:

 

Twitter म्हणजे काय?


Twitter हे रियल-टाईम विश्वव्यापी माहितीचे नेटवर्क आहे जे सार्वजनिक चर्चा वितरीत करण्यासाठी उपभोक्त्यांना त्वरित कल्पना आणि माहिती तयार करून शेअर करू देते. Twitter म्हणजे जागतिक घडामोडी आणि जगात लोक सध्या कशाविषयी बोलत आहेत. जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या Twitter वर दिसतात.

अधिक माहितीसाठी कृपया about.twitter.com येथे भेट द्या. Twitter च्या अगदी नवीन सुविधा आणि कार्यात्मकता याविषयी आमच्या मदत केंद्र येथे भेट द्या.
 

 

खाते माहितीसाठी विनंत्या

 

Twitter साठी कोणती खाते माहिती आवश्यक आहे?


Twitter खाते प्रोफाइलमध्ये नेहमी प्रोफाइल छायाचित्र, हेडर फोटो पार्श्वभूमी प्रतिमा आणि ट्विट्स म्हणून ओळखले जाणारे स्टेट्स अपडेट समाविष्ट असतात. याशिवाय, खातेधारकाला स्थान (जसे की, सॅनफ्रान्सिस्को), एक URL (जसे की, twitter.com) आणि त्यांच्या सार्वजनिक प्रोफाइलवर प्रदर्शित करण्यासाठी खात्याविषयीची संक्षिप्त "माझ्या बद्दल" माहिती भरण्याचा पर्याय देखील असतो. आम्ही प्रत्येकाला अत्यंत कार्यक्षम गोपनीयता नियंत्रणे पुरवितो. उपभोक्त्यांकडून संकलित केलेल्या डेटावरील अधिक माहितीसाठी गोपनीयता धोरण पहा.

 

उपभोक्त्यांनी तयार केलेल्या छायाचित्रे किंवा व्हिडिओवर Twitter ला अॅक्सेस आहे काय?


Twitter कडून काही प्रतिमा अपलोड करण्यासाठी (जसे की, pic.twitter.com images) तसेच Twitter खाते प्रोफाइल छायाचित्र आणि हेडर फोटोसाठी छायाचित्र होस्टिंग दिले जाते. तथापि, Twitter च्या प्लॅटफॉर्मवर दिसू शकणाऱ्या प्रतिमांसाठी Twitter हा एकमेव छायाचित्र प्रदाता नाही. Twitter वर छायाचित्र पोस्ट करणे विषयीच्या अधिक माहितीसाठी.

Twitter वर अपलोड केल्या जाणाऱ्या (जसे की, pic.twitter.com व्हिडिओ) तसेच Periscope वर पोस्ट केल्या जाणाऱ्या काही व्हिडिओसाठी Twitter कडून व्हिडिओ होस्टिंग दिले जाते. कृपया लक्षात घ्या की Twitter च्या प्लॅटफॉर्मवर दिसू शकणाऱ्या व्हिडिओसाठी Twitter हा एकमेव व्हिडिओ प्रदाता नाही.

थेट संदेशांसह Twitter वर शेअर केल्या जाणाऱ्या लिंक्स या स्वयंचलितरीत्या प्रोसेस करून http://t.co लिंकवर छोट्या केल्या जातील. जेव्हा आपण http://t.co लिंक पाहता तेव्हा तो व्हिडिओ किंवा प्रतिमा Twitter वरून होस्ट केल्याचे ते निदर्शक नसते.

 

Periscope म्हणजे काय?

Periscope ही एक स्टँडअलोन अशी मोबाईल सेवा आहे जी उपभोक्त्यांना रियल-टाईम व्हिडियो प्रक्षेपणे तयार करून शेअर करू देते. Periscope उपभोक्त्यांकडून आणि Periscope उपभोक्त्यांचा आम्ही गोळा करत असलेला डेटा याविषयीच्या अधिक माहितीसाठी कृपया Periscope गोपनीयता धोरण पहा आणि Periscope विषयीच्या अधिक माहितीसाठी Periscope मदत केंद्र ला भेट द्या. Twitter खात्याशिवाय देखील उपभोक्ते Periscope खात्यासाठी साइन-अप करू शकतात.

Periscope उपभोक्ता नाव कसे शोधायचे याविषयीच्या आमच्या सूचना वाचा.

 

डेटा राखून ठेवण्याविषयी माहिती


Twitter

Twitter वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळ्या कालावधीसाठी स्वतःकडे आमच्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरण प्रमाणे ठेवते. Twitter वरून देण्यात येणाऱ्या रियल-टाईम स्वरूपामुळे काही माहिती (जसे की, IP लॉग) अल्पावधीसाठी संग्रहित करून ठेवली जाते.

आम्ही संग्रहित करत असलेली काही माहिती स्वयंचलितरीत्या गोळा केली जाते तर काही इतर माहिती उपभोक्त्याच्या निर्णयानुसार आम्हाला प्रदान केली जाते. जरी आम्ही ही माहिती संग्रहित करत असलो तरी आम्ही त्याच्या अचूकतेची कोणतीही हमी देत नाही. उदाहरणार्थ, उपभोक्त्याने बनावट किंवा अनोळखी प्रोफाइल तयार केलेली असू शकते. Twitter ला प्रत्यक्ष वापरले जाणारे नाव, ई-मेल सत्यापन किंवा ओळख प्रमाणीकरण यांची आवश्यकता नाही. Twitter च्या माहिती राखून ठेवण्याच्या धोरणाविषयी अधिक माहिती आमच्या गोपनीयता धोरण वर मिळू शकते.

नोट: खाते निष्क्रिय केल्यानंतर ट्विट्ससह खाते माहितीवर प्रवेश करण्यासाठी फारच कमी वेळ आमच्याकडे उपलब्ध असतो. निष्क्रिय केलेली खाती याविषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे. खाते धारकाने काढून टाकलेला मजकूर (जसे की, ट्विट्स) सामान्यपणे उपलब्ध नसतो.
 

Periscope

Periscope वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळ्या कालावधीसाठी स्वतःकडे ठेवते. प्रक्षेपणे आणि प्रक्षेपण विषयक माहिती अल्पावधीसाठी संग्रहित करून ठेवली जाते. प्रक्षेपणाच्या उपलब्धतेविषयीची माहिती Periscope मदत केंद्र येथे मिळू शकते. आमच्या माहिती राखून ठेवण्याच्या धोरणाविषयी अधिक माहिती Periscope गोपनीयता धोरण येथे मिळू शकते.

 

डेटा नियंत्रक


युनायटेड स्टेट्स किंवा युरोपियन युनियन किंवा युरोपियन इकॉनॉमिक क्षेत्राच्या बाहेर असलेल्या इतर कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांच्या वैयक्तिक डेटासाठी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया स्थित Twittr, Inc. ही जबाबदार डेटा नियंत्रक आहे. युरोपियन युनियन किंवा युरोपियन इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी Twitter International Unlimited कंपनी ही डेटा नियंत्रक आहे, आहे जी आयर्लंडच्या डब्लिनमध्ये स्थित आहे.

 

जतन करून ठेवण्याविषयीच्या विनंत्या


कायद्याने योग्य आहे अशा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित पुरावा असल्याची शक्यता असणारे रेकॉर्ड जतन करून ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विनंत्या आम्ही स्वीकार करतो. कायदेशीर प्रक्रियेच्या 90 दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सेवेसाठी आम्ही संबंधित खात्याचे रेकॉर्ड्स तात्पुरते जतन करून ठेवतो पण ते उघड करून दाखवत नाही. 

जतन करून ठेवण्याच्या विनंत्या कायद्यानुसार अशा असाव्यात:

 • विनंती करणाऱ्या अधिकाऱ्याची त्यावर सही असावी;
 • परतीचा वैध अधिकृत ई-मेल पत्ता असावा;
 • कायद्याच्या अंमलबजावणीच्या लेटरहेडवर संपादन न करण्यायोग्य स्वरूपात पाठवलेला असावा;
 • त्यात @उपभोक्ता नाव आणि Twitter प्रोफाइलची URL (जसे की, https://twitter.com/twittersafety (@twittersafety) आणि/किंवा Twitter खात्याचा एकमेव, सार्वजनिक उपभोक्ता ओळख क्रमांक किंवा UID किंवा Periscope उपभोक्ता नाव आणि URL (जसे की, @twittersafety आणि https://periscope.tv/twittersafety) समाविष्ट करा. Twitter UID शोधण्यासाठी येथे किंवा Periscope उपभोक्ता नाव शोधण्यासाठी येथे पहा.
   

जतन करून ठेवण्याचा कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या विनंत्यांचा आम्ही योग्य तो आदर करतोच, पण कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या एजेंसीना योग्य मार्गाने आणि नमूद केलेल्या वेळेत शोधण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो, कारण विनंती करण्यात आलेली माहिती उपलब्ध असलेच याची आम्ही हमी देऊ शकत नाही.

आपण जतन करून ठेवण्याचा कालावधी वाढवण्याची विनंती सबमिट करणार असाल तर ती जतन करून ठेवण्याचा कालावधी संपण्याच्या किमान एक आठवडा (7 दिवस) अगोदर सबमिट करण्याची आम्ही शिफारस करतो, जेणेकरून प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळेल.

कायदेशीर अंमलबजावणी आणि जतन करून ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शासकीय विनंत्या आमच्या कायदेशीर विनंती सबमिशन साईटच्या (t.co/lr किंवा http://legalrequests.twitter.com) माध्यमातून सबमिट केल्या जाऊ शकतात. कृपया स्वतंत्र विनंती म्हणून जतन विस्तारणे सबमिट करा. आपल्याला आणखी सूचना खाली आढळतील.

 

Twitter खाते माहिती विषयीच्या विनंत्या


कायदेशीर अंमलबजावणीकडून उपभोक्ता खाते माहितीविषयक करण्यात आलेल्या विनंत्या कॅलिफोर्नियाच्या सॅनफ्रान्सिस्को मधील Twitter, Inc. ला किंवा आयर्लंडमधील डब्लिन येथे असलेल्या Twitter International Unlimited कंपनीकडे पाठवाव्यात. लागू होणाऱ्या कायद्याचे पालन करून वैध कायदेशीर प्रक्रियेला Twitter वरून प्रतिसाद दिला जातो.

 

न्यायालयात हजर राहण्यासाठी किंवा न्यायालयीन आदेशासाठी आवश्यक खाजगी माहिती

Twitter उपभोक्त्यांची सार्वजनिक नसलेली माहिती कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने न्यायालयात हजर राहण्यासाठी असलेला आदेश, न्यायालयीन आदेश, इतर वैध कायदेशीर प्रक्रिया यांच्याशिवाय कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या एजंसीला दिली जाणार नाही - किंवा खाली वर्णन करण्यात आलेल्या वैध आणीबाणी विनंतीला प्रतिसाद म्हणून ती दिली जाईल.

 

संवादाच्या तपशीलासाठी शोध हमी आवश्यक आहे

संवादाच्या तपशिलासाठीच्या (जसे की, ट्विट्स, थेट संदेश, छायाचित्रे) विनंत्यां योग्य न्यायधिकारक्षेत्र असलेल्या एजेंसीकडून वैध शोध वारंट किंवा त्या समकक्ष Twitter ला आवश्यक आहे.

 

खात्याविषयीच्या माहितीसाठी उपभोक्त्यांच्या विनंत्यांना Twitter कडून सूचित केले जाते?

होय. पारदर्शकता आणि योग्य प्रक्रियेच्या हेतूंसाठी, उपभोक्त्यांना त्यांच्या Twitter किंवा Periscope खात्याच्या माहितीसाठी विनंतीविषयी सूचित (उदा., खात्याची माहिती उघड करण्यापूर्वी) करणे हे Twitter चे धोरण आहे, ज्यामध्ये विनंतीची प्रत समाविष्ट आहे, जोपर्यंत आम्हाला असे करण्यास मनाई नाही (उदा., 18 U.S.C. § 2705(b)अंतर्गत ऑर्डर.) निर्दिष्ट कालावधीसह (जसे की, 90 दिवस) प्रकटीकरण न करण्याविषयीच्या तरतुदीबाबत आम्हाला विचारले जाऊ शकते ज्यामुळे Twitter ला त्या कालावधीसाठी उपभोक्त्याला सूचित करण्यापासून प्रतिबंध केलेला असतो. आमच्या उपभोक्ता सूचना धोरणाच्या अपवादांमध्ये अत्यंत आवश्यक किंवा उद्दिष्ट प्राप्तीमध्ये अडथळा ठरणारी परिस्थिती जसे की, जीवाला स्पष्ट धोका दर्शविणारी आणीबाणी, मुलांचे लैंगिक शोषण किंवा दहशतवाद यांचा समावेश होतो.

 

खाते विषयक माहितीच्या विनंत्यांमध्ये कोणता तपशील समाविष्ट करणे आवश्यक आहे?

लागू होणाऱ्या कायद्यानुसार उपभोक्ता खाते माहितीसाठीच्या विनंत्यांना खालील माहिती समाविष्ट करणे आवश्यक आहे:

 • त्यात Twitter @उपभोक्ता नाव आणि संबंधित Twitter खात्याची URL (जसे की, https://twitter.com/twittersafety (@twittersafety) किंवा खात्याचा वैशिष्ट्यपूर्ण, सार्वजनिक उपभोक्ता ओळख क्रमांक किंवा UID समाविष्ट करावा.
 • आणि/किंवा वैध Periscope उपभोक्ता नाव आणि URL (जसे की, @twittersafety आणि https://periscope.tv/twittersafety) समाविष्ट करा.  Periscope उपभोक्ता नाव शोधण्यासाठीच्या सूचना येथे पहा;
 • कोणत्या विशिष्ट माहितीची विनंती करण्यात आलेली आहे त्याविषयीचा तपशील (जसे की, प्राथमिक सदस्यता माहिती) आणि आपल्या चौकशीसोबत त्याचा असलेला संबंध नमूद करावा.
  • नोट: आपण शोधत असलेली माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसल्याची (जसे की, संरक्षित नसलेले ट्विट्स) कृपया खात्री कारून घ्या. आम्ही जास्त व्यापक किंवा अस्पष्ट विनंत्यांवर प्रक्रिया करण्यास असमर्थ आहोत.
 •  वैध कार्यालयीन ई-मेल पत्ता (जसे की, name@agency.gov) समाविष्ट करावा ज्यामुळे आपल्या कायदेशीर प्रक्रियेची पावती मिळाल्यावर आम्हाला आपल्याशी पुन्हा संपर्क साधता येईल;
 • कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयाच्या लेटरहेडवर पाठवले जावे.
   

कायदेशीर अंमलबजावणी आणि शासकीय विनंत्या आमच्या कायदेशीर विनंत्या सबमिशन साईटच्या (https://t.co/lr or https://legalrequests.twitter.com) माध्यमातून सबमिट केल्या जाऊ शकतात. आपल्याला आणखी सूचना खाली आढळतील.

 

रेकॉर्ड्सचे उत्पादन

जर करार केलेला नसल्यास, आम्ही मागितलेले रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (जसे की, Word किंवा TextEdit यासारख्या वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा वापर करून उघडता येऊ शकतील अशा टेक्स्ट फाईलमध्ये) देतो.

 

रेकॉर्ड्सचे प्रमाणीकरण

आम्ही तयार केलेल्या रेकॉर्ड्सवर ती तयार करताना त्यामधील सत्यता निश्चित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी केली जाते. आपल्याला घोषणापत्र हवे असल्यास कृपया तसे आपल्या सबमिशनमध्ये दाखवा.

 

किंमतीची प्रतिपूर्ती

कायदेशीर प्रक्रियेचा पाठपुरावा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीसह त्यासाठी असलेली प्रतिपूर्तीची किंमत Twitter वरून कायद्याने परवानगी दिल्याप्रमाणे (जसे की, 18 U.S.C. §2706 अंतर्गत) मागितली जाऊ शकते.

 

आणीबाणी प्रकटीकरण विनंत्या


आमच्या गोपनीयता धोरण प्रमाणे वैध आणीबाणी प्रकटीकरण विनंत्यांना देण्यात आलेल्या प्रतिसादामध्ये कायदेशीर अंमलबजावणी कार्यालयाला खाते माहिती उघड करून सांगू शकतो.

Twitter आणीबाणी प्रकटीकरण विनंत्यांचे प्रकरणनिहाय संबंधित कायद्याचे अनुपालन करून मूल्यमापन केले जाते. आम्हाला चांगल्या हेतूने देण्यात आलेली माहिती मिळाल्यास मृत्यूचा धोका असलेल्या किंवा एखाद्या व्यक्तीला गंभीर शारीरिक इजा होण्याचा धोका असलेल्या अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तो धोका टाळण्यासाठी आम्ही उपलब्ध असलेली आवश्यक कोणतीही माहिती, आमच्याकडे ती उपलब्ध असल्यास देऊ शकतो.

 

आणीबाणी प्रकटीकरण विनंती कशी करावी

मृत्यूचा धोका असलेल्या किंवा एखाद्या व्यक्तीला गंभीर शारीरिक इजा होण्याचा धोका असलेल्या अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तो धोका टाळण्यासाठी आवश्यक ती माहिती Twitter कडे उपलब्ध असल्यास कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालायचे अधिकारी आणीबाणी प्रकटीकरण विनंती आमच्या कायदेशीर विनंती सबमिशन साईट (त्वरित आणि सर्वात कार्यक्षम पद्धत) च्या माध्यमातून सबमिट करू शकतात.
 

कृपया खालील सर्व माहिती समाविष्ट करा:

 • आपल्या प्रथम दर्शनी पत्रावर, जे कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयाच्या लेटरहेडवर असणे आवश्यक आहे, आपण आणीबाणी प्रकटीकरण विनंती सबमिट करत असल्याचे दर्शवावे;
 • मृत्यूचा किंवा गंभीर शारीरिक दुखापतीचा धोका असलेल्या व्यक्तीची ओळख;
 • आणीबाणीचे स्वरूप (जसे की, आत्महत्येचा रिपोर्ट, अतिरेकी हल्ला, बॉम्बस्फोटाची धमकी);
 • आणीबाणी टाळण्यासाठी ज्या संबंधित खात्याची माहिती आवश्यक आहे त्याचे Twitter @उपभोक्ता नाव आणि URL (जसे की, https://twitter.com/TwitterSafety (@twittersafety);
 • आम्ही पुनरावलोकन करावे असे आपल्याला वाटणारे कोणतेही विशिष्ट ट्विट्स;
 • विनंती करण्यात आलेली विशिष्ट माहिती आणि आणीबाणी टाळण्यासाठी ती माहिती का आवश्यक आहे;
 • कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याची सही; आणि
 • त्या विशिष्ट परिस्थितीशी संबंधित उपलब्ध असलेला इतर सर्व तपशील आणि संदर्भ.
 

म्यूचुअल् कायदेशीर साहाय्य करार


योग्य प्रक्रिया करून परस्पर कायदेशीर मदत करार (“MLAT”) वरून पाठवण्यात आलेल्या योग्य विनंत्या किंवा बाहेरच्या देशातील न्यायालयाने केलेली औपचारिक विनंती यांना ताबडतोब प्रतिसाद देण्याचे Twitter चे धोरण आहे. MLAT च्या माध्यमातून विनंत्या सबमिट करतांना MLAT च्या माध्यमातून विनंती केली जात असून त्यात मूळ देशाचे नाव समाविष्ट असल्याची कृपया खात्री करून घ्या.

 

मजकूर काढून टाकण्याच्या विनंत्या


सेवा अटी समीक्षेची विनंती कशी करावी

आपण कायदेशीर अंमलबजावणी करणारे एजंट किंवा शासकीय अधिकारी असल्यास आणि स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करणारा बेकायदेशीर मजकूर असल्याची शक्यता असणारा मजकूर Twitter वरून काढून टाकावा असे आपल्याला वाटत असल्यास, कृपया प्रथम Twitter चे नियम ची पुनरावलोकन करावे आणि लागू होत असल्यास आमच्या सेवा अटी चे उल्लंघन होत असल्यास मजकुराचे पुनरावलोकन केले जावे असे नमूद केलेली विनंती सबमिट करावी. Twitter चे नियम आणि सेवा अटीचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचा रिपोर्ट कसा द्यावा याविषयीचा ओव्हरव्यू येथे उपलब्ध आहे. आमच्या सेवा अटीचे उल्लंघन होण्याची शक्यता असलेल्या आपल्या रिपोर्टच्या माध्यमातून आपली विनंती योग्य कार्यसंघाकडे पाठवून त्वरित प्रोसेस केले जाईल याची खात्री केली जाते. आम्ही हा डेटा दर सहा महिन्यांनी Twitter पारदर्शकता अहवालात उघड करतो.
 

मजकूर राखून ठेवण्याची कायदेशीर विनंती कशी सबमिट करावी

जर आपण यापूर्वीच आमच्या सेवा अटीचे उल्लंघन होण्याची शक्यता असलेल्या मजकुराचे पुनरावलोकन करण्याविषयीची विनंती सबमिट केलेली असल्यास आणि रिपोर्ट करण्यात आलेला मजकूर सध्या तरी आमच्या सेवा अटीचे उल्लंघन करत नसल्याचा प्रतिसाद आपल्याला Twitter कडून मिळाला असल्यास, आपण राखून ठेवल्या जाणाऱ्या मजकुरासाठी वैध आणि पुन्हा व्यवस्थित तो पहावा असे सांगणारी कायदेशीर विनंती आमच्या कायदेशीर विनंती सबमिशन साईटच्या माध्यमातून करू शकता. स्थानिक कायद्या(द्यां)नुसार राखून ठेवण्याची विनंती सबमिट करण्याची ही सर्वात योग्य आणि जलद अशी पद्धत आहे. कृपया आमच्या सेवा अटीच्या संभाव्य उल्लंघनांच्या पुनरावलोकनासाठी आपण प्रथम तक्रार केली नसल्यास मजकूर रोखण्याची विनंती सबमिट करू नका.

ज्या ट्विट किंवा खात्याविषयी समस्या आहे त्यास ओळखण्याबरोबरच कृपया रिपोर्ट करण्यात आलेल्या मजकुरावरून स्थानिक कायद्यांचे देखील उल्लंघन झाले आहे किंवा नाही हे तपासून पहा. आपल्याकडे न्यायालयाचा आदेश किंवा इतर संबंधित कायदेशीर दस्तऐवजीकरण असल्यास कृपया आपली विनंती सबमिट करतांना त्याची एक कॉपी जोडा ("फाईल संलग्नके" विभाग पहा). कायदेशीर दस्तऐवजीकरणाचे कोणतेही भाषांतर, ते इंग्रजीमध्ये नसल्यास मदत करू शकेल असा इतर एखादा संदर्भ कृपया नमूद करा ज्यामुळे आपल्या विनंतीचे पुनरावलोकन अधिक वेगाने करता येईल. आम्हाला कार्यालयीन शासकीय किंवा कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्यांचा ई-मेल पत्ता आवश्यक असतो (जसे की, name@agency.gov) ज्यामुळे योग्य त्या कार्यसंघाला आवश्यक असल्यास आपल्याशी पुन्हा संपर्क साधता येतो. आम्ही आपल्या विनंतीवर शक्य तितक्या लवकर प्रक्रिया करू पण कृपया लक्षात घ्या की डुप्लिकेट पाठवल्याने आमच्या विनंतीची (प्रक्रिया) कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्याच्या आमच्या कार्यक्षमतेला विलंब होऊ शकतो.

मजकूर राखून ठेवण्याच्या कायदेशीर विनंतीविषयी Twitter तत्काळ प्रभावित होणाऱ्या उपभोक्त्याला, जर तसे करण्यापासून आम्हाला कायद्याने प्रतिबंध घातलेला नसल्यास, सूचित करेल. उपभोक्त्याला असे सूचित करण्यापासून Twitter ला प्रतिबंधित केले जावे असे आपल्याला वाटत असल्यास, कृपया त्याविषयीचे कारण विनंतीमध्ये नमूद करून त्यासोबत संबंधित कायद्याचा (लागू आहे तेथे) संदर्भ द्यावा, आणि/किंवा उपलब्ध असल्यास या प्रतिबंधाचे समर्थन करणारी कोणतीही कागदपत्रे "फाईल संलग्नके" विभागात अपलोड करावीत.

शासन आणि कायदेशीर अंमलबजावणीशी संबंधित रिपोर्टर त्यांच्या न्यायाधिकार क्षेत्रात बेकायदेशीर म्हणून निश्चित केल्या जाणाऱ्या मजकुराला रोखून धरण्याविषयीची आपली विनंतीची हार्ड कॉपी खालील संपर्क माहितीवर पोस्टाने देखील पाठवू शकतात. आपण युरोपियन युनियन किंवा युरोपियन इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये रहात असल्यास, कृपया आपली विनंती आयर्लंडमधील Twitter International Unlimited कंपनीकडे पाठवा (खाली "संपर्क माहिती" विभाग पहा). मेलवरून सबमिट केलेल्या विनंत्यांना प्रतिसाद मिळण्यास जास्त वेळ लागणे अपेक्षित आहे. 

आमच्या मजकूर राखून ठेवण्याचे देशनिहाय धोरणाविषयीची अधिक माहिती येथे पहा.

 

Twitter उपभोक्त्याला मदत करणे


नोंदणीकृत Twitter उपभोक्ते त्यांच्या स्वतःच्या खात्याची माहिती डाउनलोड करू शकतात, ज्यात त्यांच्या Twitter खात्यावर पोस्ट केलेल्या ट्वीट्सचा समावेश आहे. उपभोक्ता त्याविषयी कशी विनंती करू शकतो याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आमच्या मदत केंद्र वर उपलब्ध आहेत.

उपभोक्ते थेट त्याच्या किंवा तिच्या Twitter खात्यावरून IP लॉग आणि इतर डेटा आमच्या मदत केंद्रमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे मिळू शकतात. Twitter उपभोक्त्याने त्यांनी हवा असलेला डेटा स्वतः-डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला, तर कृपया उपभोक्त्याला आमचा गोपनीयता फॉर्मवरून Twitter ला विनंती पाठवण्याचे निर्देश द्या.
 

इतर समस्या

बऱ्याचशा समस्या थेट आम्हाला आमच्या मदत केंद्राच्या माध्यमातून Twitter खातेधारकाने सबमिट केलेल्या चौकशीवरून सोडवल्या जाऊ शकतात. उल्लंघन कसे रिपोर्ट करावे याविषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.
 

सामान्य चौकशी

कायदेशीर अंमलबजावणी किंवा शासनाकडील (उपभोक्ता डेटा किंवा मजकूर काढून टाकण्याची विनंती करत नाही) इतर सामान्य स्वरूपाची चौकशी आमच्या वेब फॉर्मच्या माध्यमातून सबमिट केली जाऊ शकते.

 

विनंत्या कोठे सबमिट कराव्यात


जतन करून ठेवणे, खाते माहिती (नियमित आणि आणीबाणी स्वरूपाच्या) विषयक विनंत्या आणि मजकूर काढून टाकण्याबाबतच्या विनंत्यांसह सर्व कायदेशीर विनंत्या Twitter च्या पुढील उपलब्ध असलेल्या कायदेशीर विनंती सबमिशन साईटच्या माध्यमातून सबमिट करता येतील: t.co/lr किंवा legalrequests.twitter.com.

आपल्याला जर आमच्या कायदेशीर विनंती सबमिशन साईटच्या माध्यमातून काही समस्यांचा अनुभव येत असल्यास विनंतीच्या प्रकारासाठी "इतर चौकशी" निवडून आपण आम्हाला आमच्या वेब फॉर्म च्या माध्यमातून विचारू शकता.  

केवळ सोईस्कर असल्याने या माध्यमातून पत्रव्यवहाराची पावती दिली जाते आणि त्यावरून अपुरे न्यायाधिकार क्षेत्र किंवा योग्य सेवा यासह कोणताही आक्षेप यास माफी दिली जात नाही.

कायदेशीर अंमलबजावणीशी संबंधित नसलेल्या विनंत्या आमच्या मदत केंद्रच्या माध्यमातून सबमिट केल्या जाव्यात.

 

संपर्क माहिती


आमच्या पत्त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे:

Twitter, Inc.
के/ऑ विश्वास आणि सुरक्षा - कायदेशीर धोरण
1355 मार्केट स्ट्रीट, सूट 900
सॅन फ्रान्सिस्को, CA 94103

Twitter International Unlimited कंपनी
के/ऑ विश्वास आणि सुरक्षा - कायदेशीर धोरण
एक कंबरलँड ठिकाण
फेनियन स्ट्रीट
डब्लिन 2
D02 AX07
आयर्लंड

यापैकी कोणत्याही माध्यमातून पत्रव्यवहाराची पावती केवळ सोयीसाठी दिली जाते आणि त्यावरून अपुरे न्यायाधिकार क्षेत्र किंवा योग्य सेवा यासह कोणताही आक्षेप यास माफी दिली जात नाही. शासकीय संस्था ज्या कायदेशीर विनंती सबमिशन साइटवरून कायदेशीर विनंत्या सादर करत नाहीत त्यांनी प्रतिसाद मिळण्यासाठी जास्त वेळेची अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे.

हा लेख शेअर करा