प्लॅटफॉर्म हाताळणी आणि स्पॅम धोरण

विहंगावलोकन


सप्टेंबर 2020

आपण Twitter च्या सेवांचा वापर माहितीचा कृत्रिमरित्या विस्तार करण्याच्या किंवा दडपून ठेवण्याच्या हेतूने करू शकत नाही किंवा Twitter वरील लोकांचा अनुभव प्रभावित करणारे किंवा व्यत्यय आणणारे वर्तन करू शकत नाही.

आम्हाला Twitter ला असे ठिकाण बनवायचे आहे जिथे लोकांना जिव्हाळ्याचे संबंध जोडता येतील, विश्वसनीय माहिती सापडेल आणि स्वतःला मुक्तपणे आणि सुरक्षितपणे व्यक्त करता येईल. हे शक्य करण्यासाठी आम्ही स्पॅम किंवा इतर प्रकारच्या प्लॅटफॉर्म हाताळणीला परवानगी देत नाही. इतरांची दिशाभूल करणाऱ्या आणि/किंवा त्यांच्या अनुभवात व्यत्यय आणणाऱ्या एकगठ्ठा, आक्रमक किंवा फसव्या कृतींमध्ये सहभागी होण्यासाठी Twitter चा वापर करण्यास आम्ही प्लॅटफॉर्म हाताळणी म्हणतो.

प्लॅटफॉर्म हाताळणी अनेक स्वरूपाची असू शकते आणि आमच्या नियमांचा उद्देश व्यापक निषिद्ध वर्तन संबोधित करणे असून यात पुढील बाबींचा समावेश होतो:

 • ज्याचा हेतू सामान्यत: Twitter वरील चर्चांवरून खाती, वेबसाइट्स, उत्पादने, सेवा किंवा उपक्रमांकडे लक्ष वेधणे किंवा वाहतुक वळविण्याचे असते असे व्यावसायिकरित्या प्रेरित स्पॅम;
 • अवैध सहभाग, जो खाती किंवा मजकूर आहे त्यापेक्षा अधिक लोकप्रिय किंवा सक्रिय दाखविण्याचा प्रयत्न करतो;
 • समन्वय साधलेली अशी कृती, जी एकाहून जास्त खाती, बनावट खाती, ऑटोमेशन आणि/किंवा स्क्रिप्टिंगच्या माध्यमातून चर्चांवर कृत्रिमरित्या प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करते; आणि
 • समन्वित हानिकारक क्रियाकलाप जे Twitter चे नियम उल्लंघन करणाऱ्या वर्तनास प्रोत्साहित करतात किंवा चालना देतात.
   

या धोरणाचे उल्लंघन करणे म्हणजे काय?


या धोरणांतर्गत आम्ही खालील क्षेत्रांमध्ये विविध वर्तनांना प्रतिबंध करतो:
 

खाते आणि ओळख


बनावट खाती चालवून तुम्ही Twitter वर इतरांची दिशाभूल करू शकत नाही.
यात स्पॅम, अपमानास्पद किंवा व्यत्यय आणणाऱ्या वर्तनात गुंतण्यासाठी दिशाभूल करणारी खाते माहिती वापरण्याचा समावेश होतो. आम्ही विचारात घेऊ शकणाऱ्या काही घटकांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

 • स्टॉक किंवा चोरलेल्या प्रोफाइल छायाचित्राचा वापर करणे, विशेषतः इतर कोणी असल्याचे भासवणारे;
 • चोरलेल्या किंवा कॉपी केलेल्या प्रोफाइल माझ्या बद्दलच्या माहितीचा वापर; आणि
 • प्रोफाइल स्थानासह हेतुपूर्वक दिशाभूल करण्यासाठी प्रोफाइल माहितीचा वापर करणे.
   

आपण एकाधिक खात्यांचा वापर करून किंवा Twitter च्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी इतरांशी समन्वय साधून कृत्रिमरित्या चर्चा वाढवू किंवा व्यत्यय आणू शकत नाही. यामध्ये हे समाविष्ट आहे:

 • ओव्हरलॅपिंग खाती - ओव्हरलॅपिंग युज केसेसवरून अनेक खाती ऑपरेट करणे, जसे एकसारखे किंवा तत्सम व्यक्तिमत्त्व किंवा मोठ्या प्रमाणामधील एकसारखा मजकूर;
 • म्यूचुअल परस्परसंवादी खाती - विशिष्ट ट्विट्स किंवा खात्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी परस्परांशी संवाद साधणारी खाती; आणि
 • समन्वय - डुप्लिकेट सामग्री पोस्ट करण्यासाठी अनेक खाती तयार करणे किंवा खोटा सहभाग तयार करणे, यासह:
  • आपण ऑपरेट केलेल्या अनेक खात्यांमधून एकसारखे किंवा खूपच सारखे ट्विट्स किंवा हॅशटॅग पोस्ट करणे; 
  • आपण ऑपरेट करत असलेल्या विविध खात्यांमधून सारख्या ट्विट्स किंवा खात्यांमध्ये वारंवार (पुनर्ट्विट्स, पसंती, उल्लेख, Twitter सर्वेक्षण मते) सहभागी होणे;
  • कृत्रिम सहभाग किंवा प्रवर्धनामध्ये सहभागी राहण्यासाठी इतरांशी समन्वय साधणे किंवा त्यांना भरपाई देणे, जरी त्यात सामिल होणारे लोक फक्त एक खाते वापरत असतील तरी; आणि
  • आमच्या अपमानास्पद वर्तणूक धोरणाचे उल्लंघनासहित Twitter नियमांच्या उल्लंघनांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी इतरांशी समन्वय साधणे
    

सहभाग आणि मेट्रिक्स


आपण कृत्रिमरित्या आपल्या स्वतःच्या किंवा इतरांच्या फॉलोअर्सचा आकडा किंवा गुंतणूक फुगवू शकत नाही.
यात समावेश होतो:

 • ट्विट किंवा खाते मेट्रिक फुगवटा विकणे/खरेदी करणे– फॉलोअर्स किंवा सहभाग विकणे किंवा खरेदी करणे (पुन्हा ट्विट्स, पसंत्या, उल्लेख, Twitter सर्वेक्षण मते);
 • अनुप्रयोग - फॉलोअर्स जोडण्याचा किंवा ट्विटमध्ये सहभाग जोडण्याचा दावा करणाऱ्या तृतीय-पक्षाच्या सेवा किंवा अनुप्रयोग वापरणे किंवा त्यांचा प्रचार करणे;
 • परस्पर फुगवटा - फॉलो करणे किंवा ट्विट गुंतवणूकीची देवाणघेवाण करण्यासाठी व्यापार करणे किंवा समन्वय साधणे ("फॉलो करा ट्रेन्स", "डेक" आणि "पुन्हा ट्विटसाठी पुन्हा ट्विट" वर्तनात सहभागी होण्यासह परंतु तेवढ्यासच मर्यादित नाही); आणि
 • खाते हस्तांतरण किंवा विक्री - Twitter खाती, उपभोक्ता नावे किंवा Twitter खात्यावर तात्पुरता प्रवेश यांची विक्री, खरेदी, व्यापार करणे किंवा त्यांची विक्री, खरेदी, व्यापार करण्याची ऑफर देणे.
   

Twitter च्या उत्पादन वैशिष्ट्यांचा दुरूपयोग


इतरांच्या वापरानुभवामध्ये व्यत्यय आणण्यासाठी आपण Twitter च्या उत्पादन वैशिष्ट्यांचा दुरूपयोग करू शकत नाही.
यात समावेश होतो:
 

ट्विट्स आणि थेट संदेश

 • घाऊक, आक्रमक, मोठ्या प्रमाणात अवांछित प्रत्युत्तरे, उल्लेख किंवा थेट संदेश पाठविणे;
 • एकच सामग्री वारंवार पोस्ट करणे आणि हटविणे;
 • वारंवार एकसारखे किंवा जवळपास एकसारखे ट्विट्स पोस्ट करणे किंवा वारंवार एकसारखे थेट संदेश पाठवणे; आणि
 • आपल्या ट्विट/थेट संदेश कृतीचा बराचसा भाग असेल असे ट्विट्स वारंवार पोस्ट करणे किंवा टिप्पणीशिवाय सामायिक केलेले दुवे असलेले थेट संदेश पाठविणे.
   

फॉलो करणे

 • “फॉलोइंग चर्न” - आपल्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नातून मोठ्या संख्येत खाती फॉलो करणे आणि नंतर अनफॉलो करणे;
 • अंदाधुंद फॉलोइंग - अल्पावधीतच विशेषतः स्वयंचलित साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर खात्यांना फॉलो करणे आणि/किंवा अनफॉलो करणे; आणि
 • विशेषतः स्वयंचलित साधनांचा वापर करून, दुसऱ्या खात्याचे फॉलोअर्स डुप्लिकेट करणे.
   

सहभाग

 • खाती, वेबसाइट्स, उत्पादने, सेवा किंवा उपक्रमांकडे लक्ष वेधणे किंवा वाहतुक वळविण्यासाठी आक्रमकपणे किंवा आपोआप ट्विट्समध्ये सहभागी होणे.
 • याद्या किंवा मुमेंट्समध्ये आक्रमकपणे उपभोक्ता जोडणे.
   

हॅशटॅग 

 • एखादी चर्चा नष्ट करणे किंवा हाताळण्याच्या उद्देशाने त्यावरील लक्ष वेधण्यासाठी किंवा वाहतुक वळविण्यासाठी किंवा खाती, उत्पादने, वेबसाईट्स, उत्पादने, सेवा किंवा पुढाकार यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रचलन असलेला किंवा लोकप्रिय हॅशटॅग वापरणे; आणि
 • एकाच ट्विटमध्ये किंवा विविध ट्विट्समध्ये खूप जास्त, असंबंधित हॅशटॅग्जसह ट्विट करणे.
   

URLs

 • इतर व्यक्तीचा ब्राउझर (मालवेअर) किंवा कॉम्प्युटर यांना नुकसान पोहोचविण्याच्या हेतूने किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याच्या हेतूने अथवा व्यक्तीच्या गोपनीयतेबाबत तडजोड करणारी दुर्भावनायुक्त सामग्री (फिशिंग) प्रकाशित करणे किंवा त्यास लिंक करणे; आणि 
 • दिशाभूल करणाऱ्या किंवा फसव्या लिंक्स पोस्ट करणे; उदा., संबद्ध लिंक्स आणि क्लिकजॅकिंग लिंक्स.
   

या धोरणाचे उल्लंघन न करणे म्हणजे काय?


खालील गोष्टी या धोरणाचे उल्लंघन नाहीत:

 • अनुमानित नावाने किंवा विडंबन, समालोचन किंवा चाहता खातेम्हणून Twitter चा वापर करणे;
 • समालोचन न करता प्रासंगिक लिंक्स पोस्ट करणे;
 • एखाद्या कारणासाठी कल्पना, दृष्टिकोन, समर्थन किंवा विरोध व्यक्त करण्यासाठी इतरांशी समन्वय साधणे, अशा वर्तनामुळे Twitter च्या नियमांचे उल्लंघन होत नाही; आणि
 • वेगळी ओळख, उद्देश किंवा वापर प्रकरणांसह विविध खाती ऑपरेट करणे. ही खाती जर इतर नियमांचे उल्लंघन करत नसतील तर ती एकमेकांशी संवाद साधू शकतात. काही उदाहरणे:
  • संबंधित परंतु स्वतंत्र प्रकरण किंवा शाखा असलेल्या संस्था, जसे की विविध स्थानांवर असलेला व्यवसाय;
  • आपल्या छंद किंवा उपक्रमांशी आणि छंद / कलात्मक बॉट्सशी संबंधित असलेल्या खात्यांव्यतिरिक्त किंवा छद्म खात्यांव्यतिरिक्त वैयक्तिक
  • छंद/कलात्मक बॉट्स.
    

या धोरणाच्या उल्लंघनाचा कोण रिपोर्ट करू शकते?


आमच्या समर्पित रिपोर्टिंग फ्लोवरून कोणीही खाती किंवा ट्विट्सबाबत रिपोर्ट करू शकते. आमच्या अंमलबजावणी प्रणाली अधिक चांगल्या करण्यास मदत करण्यासाठी आणि वर्तनाची नवीन व उदयोन्मुख प्रचलने आणि रचना ओळखण्यासाठी, हे रिपोर्ट एकत्रितपणे वापरले जातात. 
 

या धोरणाच्या उल्लंघनाबाबत मी कसे रिपोर्ट करावे?


इन-अॅप

आपण खालीलप्रमाणे हा मजकूर इन-अॅप रिपोर्ट करू शकता:

 1. प्रतिकावरून ट्विट रिपोर्ट करा निवडा.
 2. हे संशयास्पद किंवा स्पॅम आहे असे निवडा. 
 3. ट्विट कसे संशयास्पद आहे किंवा स्पॅम पसरवत आहे ते सर्वोत्तमरित्या सांगणारा पर्याय निवडा.
 4. आपला रिपोर्ट सबमिट करा.
   

डेस्कटॉप

आपण खालील प्रमाणे हा मजकूर डेस्कटॉपवरून रिपोर्ट करू शकता:

 1. प्रतिकावरून ट्विट रिपोर्ट करा निवडा.
 2. हे संशयास्पद किंवा स्पॅम आहे असे निवडा.
 3. ट्विट कसे संशयास्पद आहे किंवा स्पॅम पसरवत आहे ते सर्वोत्तमरित्या सांगणारा पर्याय निवडा.
 4. आपला रिपोर्ट सबमिट करा.
   

रिपोर्ट फॉर्म

आमच्या स्पॅम रिपोर्टिंग फॉर्म मध्ये मला Twitter वर स्पॅम रिपोर्ट करायचे आहे निवडून आपण हा मजकूर पुनरावलोकनासाठी देखील रिपोर्ट करू शकता.
 

आपण या धोरणाचे उल्लंघन केल्यास काय घडते?


या धोरणाचे उल्लंघन केल्याचे परिणाम हे उल्लंघनाचे गांभीर्य तसेच उल्लंघनांचा आधीचा इतिहास यानुसार बदलतात. आम्ही ओळखलेल्या स्पॅमच्या कृतींच्या प्रकारावरूनही आमच्या कारवाईस माहिती दिली जाते. आम्ही करत असलेल्या कारवाईमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
 

स्पॅम विरोधी आव्हाने

जेव्हा आम्हाला क्रियाकलापांचे संशयास्पद स्तर आढळतात, तेव्हा खाती लॉक केली जाऊ शकतात आणि अतिरिक्त माहिती देण्यास (उदा., फोन क्रमांक) किंवा reCAPTCHA सोडविण्यास सांगितले जाऊ शकते. 
 

URLs ची सूचीबद्धता काढून टाकणे

आम्हाला ज्या URLs असुरक्षित वाटतात त्यांची सूचीबद्धता आम्ही काढून टाकतो किंवा चेतावणी देतो. आपली URL असुरक्षित असल्याचे आम्ही चुकून ओळखले असल्यास त्यावरून, असुरक्षित लिंक्स विषयी अधिक वाचा.
 

ट्विट हटवणे आणि खाते तात्पुरते लॉक करणे

 • जर प्लॅटफॉर्म हाताळणे किंवा स्पॅमचा गुन्हा ही वेगळी घटना असेल किंवा पहिलाच गुन्हा असेल, तर आम्ही एक किंवा जास्त ट्विट्स हटवावे लागण्यापासून ते/ती खाते(ती) तात्पुरती लॉक करण्यापर्यंत कारवाई करू शकतो. त्यानंतरच्या कोणत्याही प्रकारे प्लॅटफॉर्म हाताळल्याची गुन्हा घडल्यास कायमचे निलंबन होईल.
 • विविध खात्यांचा वापर करण्याशी संबंधित उल्लंघन झाल्यास, आपल्याला एक खाते निवडण्यास सांगितले जाऊ शकते. उर्वरित खाती कायमस्वरूपी स्थगित केली जातील.
 • आपण आमच्या बनावट खात्यांच्या धोरणाचे उल्लंघन करीत आहात असे आम्हाला वाटल्यास, आपले खाते पुन्हा स्थापित करण्यासाठी आम्ही आपल्याला शासनाने जारी केलेली ओळख (जसे की वाहन चालक परवाना किंवा पासपोर्ट) प्रदान करण्यास सांगू शकतो.
   

कायमस्वरूपी स्थगिती

गंभीर उल्लंघनांमध्ये, सर्वप्रथम समजताच खाती कायमस्वरूपी स्थगित केली जातील. गंभीर उल्लंघनांच्या उदाहरणांत खालील घटकांचा समावेश होतो:

 • वर वर्णन केल्याप्रमाणे धोरणांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करणारे वर्तन दर्शविणारी खाती चालविणे;
 • निवडणुकांच्या अखंडतेला सुरूंग लावण्यासाठी या पृष्ठावर वर्णन केलेल्या कोणत्याही युक्तीचा वापर करणे;
 • खाती खरेदी करणे/विकणे;
 • स्थगित खाते बदलण्यासाठी किंवा त्याची नक्कल करण्यासाठी खाती तयार करणे; आणि
 • Twitter चे नियम उल्लंघन होत आहे हे माहीत असलेल्या खात्यांवर पूर्ण विश्वासाने दोषारोप करण्यास Twitter सक्षम असलेली खाती ऑपरेट करणे.

जर आपल्याला वाटत असेल की आपले खाते चुकून लॉक किंवा स्थगित झाले आहे तर, आपण अपील सबमिट करू शकता.

अतिरिक्त संसाधने


विकसकांसाठी आमचे ऑटोमेशन नियम, आमचे निवडणुकीमधील प्रामाणिकपणाचे प्रयत्न, आमचे वित्तीय स्कॅम धोरण, आमचे हॅक्ड मटेरियल धोरण, समन्वित हानिकारक क्रियाकलापांविषयी आमचा दृष्टीकोन आणि आमची जाहिराती आणि स्पर्धांसाठीच्या मार्गदर्शक सूचना यांविषयी अधिक जाणून घ्या.

आमच्या अंमलबजावणी पर्यायांची व्याप्ती आणि धोरण विकास आणि अंमलबजावणी याविषयीचा आमचा दृष्टीकोन याबाबत अधिक जाणून घ्या.

हा लेख शेअर करा