goglobalwithtwitterbanner

Twitter वरील खाजगी माहितीविषयी

Twitter चे नियम: इतर लोकांची खाजगी माहिती त्यांनी अधिकृतता आणि परवानगी दिल्याशिवाय आपण प्रदर्शित किंवा पोस्ट करू शकत नाही. स्थानिक कायद्यांनुसार खाजगी माहितीची व्याख्या बदलू शकते.

तर्क

इतरांची खाजगी माहिती ऑनलाईन पोस्ट केल्याने ज्याची माहिती शेअर करण्यात आली आहे त्या व्यक्तीच्या सुरक्षितता आणि सुरक्षा विषयक जोखमीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. म्हणूनच हे Twitter चे नियम यांचे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन म्हणून समजले जाते.

हे केव्हा लागू होते

खाजगी माहितीच्या उदाहरणांमध्ये खाजगी संपर्क किंवा आर्थिक माहिती (यापुरतेच मर्यादित नसलेल्या गोष्टींमध्ये) खालील बाबींचा देखील समावेश होतो:

 • क्रेडीट कार्डची माहिती
 • सामाजिक सुरक्षा किंवा राष्ट्रीय ओळख दर्शविणारे इतर क्रमांक
 • खाजगी निवासस्थाने, वैयक्तिक निवासी पत्ते किंवा खाजगी म्हणून समजली जाणारी इतर ठिकाणे
 • खाजगी स्वरूपाचे, वैयक्तिक फोन क्रमांक
 • खाजगी स्वरूपाचे, वैयक्तिक ई-मेल पत्ते 

खाजगी म्हणून समजल्या जाणार नाही अशा माहितीच्या उदाहरणामध्ये समाविष्ट आहे:

 • नाव
 • जन्मदिनांक किंवा वय
 • व्यावसायिक पत्ते 
 • शिक्षण किंवा रोजगाराची ठिकाणे
 • संबंधित व्यक्तीचे वर्णन

कृपया हे लक्षात घ्या की जरी आपण काही विशिष्ट स्वरूपाची माहिती ही खाजगी म्हणून समजत असलात तरीही अशा प्रकारची सर्व माहिती पोस्ट करणे हे या धोरणाचे उल्लंघन ठरू शकणार नाही. आम्ही पोस्ट करण्यात आलेल्या माहितीचे स्वरूप आणि सार्वजनिक पातळीवर त्याबाबत उपलब्ध असलेली माहिती, स्थानिक गोपनीयता कायदे आणि इतर प्रकरणनिहाय वस्तुस्थिती विचारात घेतो. उदाहरणार्थ, जर माहिती Twitter वर प्रदर्शित करण्यापूर्वी इंटरनेटवर कोठेतरी पोस्ट केली गेली असेल किंवा प्रदर्शित केली गेली असेल (जसे की, एखाद्याने त्याचे वैयक्तिक फोन क्रमांक त्याच्या सार्वजनिक ब्लॉगवर सूचीबद्ध केले असतील)तर त्यामुळे कदाचित या धोरणाचे उल्लंघन होणार नाही. तथापि, सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीचा सताविण्यासाठी किंवा सताविण्याच्या कृतीला उत्तेजित करण्यासाठी केला जात असल्यास आम्ही आमच्या गैरवर्तवणूक धोरणा अंतर्गत कार्यवाही करू शकतो.

आम्ही याची देखील नोंद घेतली आहे की लोकांना काही वेळेला त्यांची वैयक्तिक संपर्काची माहिती सार्वजनिकरित्या शेअर करावयाची असते. उदाहरणार्थ:

 • व्यावसायिक नेटवर्किंगसाठी वैयक्तिक फोन क्रमांक किंवा ई-मेल पोस्ट करणे
 • सामाजिक कार्यक्रमांचा समन्वय साधण्यासाठी वैयक्तिक पत्ते पोस्ट करणे
 • नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीसाठी वैयक्तिक पत्ते सार्वजनिकरित्या पोस्ट करणे

माहितीचे खाजगी स्वरूप सत्यापित करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आणि खरोखरच ती शेअर करणे आवश्यक आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी आम्हाला ज्या व्यक्तीची माहिती पोस्ट करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीकडून किंवा त्या व्यक्तीच्या प्रतिनिधीकडून तसे समजणे आवश्यक असते. आम्ही अशा रिपोर्ट्सना ई-मेलवरून प्रत्युत्तर देतो आणि उपभोक्त्यांना त्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी कागदपत्र देण्याची विनंती करतो. कृपया हे लक्षात घ्या की प्रकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी Twitter ला आवश्यकता नसेल तेव्हा ही कागदपत्रे नष्ट केली जातील आणि कोणत्याही तृतीय पक्षासोबत शेअर केली जाणार नाही. या माहितीचा रिपोर्ट कोणी दिला याविषयीची माहिती उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीसोबत आम्ही शेअर करणार नाही.

परिणाम

आमच्या खाजगी माहितीच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचे परिणाम हे नियमाच्या उल्लंघनाचे गांभीर्य आणि त्या व्यक्तीकडून झालेल्या उल्लंघनांचे आधीचे रेकॉर्ड यानुसार बदलतात.

एखाद्याने पहिल्यांदाच आमच्या या धोरणाचे उल्लंघन केल्यास या धोरणाच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करणारे ट्विट काढून टाकणे आवश्यक असेल आणि/किंवा संबंधितांनी पुन्हा ट्विट करण्याच्या अगोदर तात्पुरत्या स्वरूपात त्यांचे खाते लॉक केले जाईल. या धोरणाचे एकापेक्षा अधिक वेळा उल्लंघन करणाऱ्या लोकांना आणि/किंवा केवळ खाजगी माहिती पोस्ट करण्यासाठी समर्पित असणाऱ्या खात्यांना स्थगित केले जाऊ शकते.

आमचे  Twitter वर पोस्ट केलेल्या खाजगी माहितीचा रिपोर्ट देणे याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न हा विभाग वाचा.

आपली खाजगी माहिती Twitter वर आणि इतर वेबसाईट्सवर सुरक्षित ठेवणे याविषयी अधिक जाणून घ्या.

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.