goglobalwithtwitterbanner

विडंबन, न्यूजफिड, समालोचन किंवा चाहत्याच्या खात्याविषयीचे धोरण (विशिष्ट "धोरण")

आमचे नियम

उपभोक्त्यांना त्यांच्या कल्पना आणि माहितीची विस्तृत व्याप्ती शेअर करण्यासाठी आणि मिळविण्यासाठी Twitter प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते, आणि आम्ही आमच्या उपभोक्त्यांच्या अभिव्यक्तीच्या अधिकाराला महत्त्व देतो आणि त्याचा आदर करतो. आमचे उपभोक्ते त्यांनी प्रदर्शित केलेल्या माहितीसाठी पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांच्यामधील विवादांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच सर्वोत्तम स्थितीमध्ये असतात. या नियमांमुळे, आम्ही उपभोक्त्याच्या मजकुरावर जातीने लक्ष देत नाही, आणि सेवा अटीच्या उल्लंघनाच्या प्रतिक्रियेदाखल किंवा वैध कायदेशीर प्रक्रियेशिवाय आम्ही उपभोक्त्याचा मजकूर संपादित करत नाही किंवा काढून टाकत नाही. 

खालील आवश्यकतांचे पालन केल्यास उपभोक्त्यांना Twitter वर विडंबन, न्यूजफिड, समालोचन किंवा चाहत्यांची खाती तयार करण्याची परवानगी आहे.

विडंबन, न्यूजफिड, समालोचन किंवा चाहत्यांची खाती तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यकता

आपले खाते तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यकता खालील प्रमाणे आहेत. धोरणाचे पालन करण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • बायो: बायोवरून हे स्पष्टपणे सूचित होणे आवश्यक आहे की उपभोक्ता या खात्याच्या विषयाशी संबंधित नाही. “विडंबन", "बनावट", “चाहता" किंवा "समालोचन" (पण यापुरतेच मर्यादित नसून) यासारख्या विशिष्ट शब्दांनी असंबद्धता दर्शविता येते. उद्देशित दर्शकांना समजू शकेल अशा तऱ्हेने असंबद्धता व्यक्त करणे आवश्यक आहे.
  • खात्याचे नाव: या खात्याच्या नावावरून (नोट: हे उपभोक्ता नाव, किंवा @हँडल पेक्षा वेगळे आहे) हे स्पष्टपणे सूचित होणे आवश्यक आहे की हा उपभोक्ता या खात्याच्या विषयाशी संबंधित नाही. “विडंबन", "बनावट", “चाहता" किंवा "समालोचन" (पण यापुरतेच मर्यादित नसून) यासारख्या विशिष्ट शब्दांनी असंबद्धता दर्शविता येते. उद्देशित दर्शकांना समजू शकेल अशा तऱ्हेने असंबद्धता व्यक्त करणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात घ्या की या आवश्यकतांची पूर्तता करण्यासोबतच आपल्या खात्याने Twitter चे नियम आणि सेवा अटी यांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे.

या धोरणांतर्गत Twitter खात्यांचे पुनरावलोकन कधी करते?

तोतयागिरी किंवा ट्रेडमार्क तक्रारीच्या प्रतिक्रियेदाखल आम्ही आमच्या धोरणांतर्गत एका खात्याचे पुनरावलोकन करू.

मी कॉपीराईट किंवा तोतयागिरीविरुद्ध रिपोर्ट कसा फाईल करू?

आपण ट्रेडमार्क धोरण याच्या उल्लंघनाविरुद्ध येथे, आणि तोतयागिरी करणाऱ्या खात्याविरुद्ध येथे रिपोर्ट सबमिट करू शकता. तोतयागिरीच्या विरुद्ध रिपोर्ट फाईल करण्याविषयीच्या अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

कृपया फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. आपण अपूर्ण माहितीचा रिपोर्ट सबमिट केल्यास ती माहिती विचारण्यासाठी आम्ही आपल्या संपर्कात राहू. कृपया लक्षात घ्या की परिणामी आपल्या रिपोर्टवर कार्यवाही करण्यास विलंब होईल.

फॉर्म भरत असताना आपल्याला समस्या आल्यास, आपला ब्राउझर अपडेट करण्याचा किंवा दुसऱ्या ब्राउझरवर स्विच करण्याचा प्रयत्न करा.

आपला रिपोर्ट Twitter वरील गैरवर्तनाविषयी असल्यास, त्याचा रिपोर्ट कसा करावा याविषयी हा लेख वाचा.

विडंबन, न्यूजफिड, समालोचन किंवा चाहत्यांच्या खात्यांशी संबंधित रिपोर्ट्सना Twitter कडून कसा प्रतिसाद दिला जातो?

जेव्हा आम्हाला आमच्या धोरणाचे पालन न करणाऱ्या एखाद्या खात्याविषयी तोतयागिरी किंवा ट्रेडमार्क संदर्भात वैध रिपोर्ट मिळतो तेव्हा आम्ही खाते मालकांना (धोरणाचे) अनुपालन करण्याची संधी देऊन तात्पुरते ते खाते स्थगित करू शकतो. वारंवार उल्लंघनाचा इतिहास असलेली खाती कायमस्वरूपि स्थगित केली जाऊ शकतात.

कृपया समजून घ्या की आमच्या धोरणाचा अवलंब करणाऱ्या खात्याकडे आमच्या ट्रेडमार्क किंवा तोतयागिरी धोरणांचे उल्लंघन न करणारे खाते या दृष्टीने पाहिले जाऊ शकते.

हा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा

हा लेख उपयुक्त होता का?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्याला मदत करता आल्याने आम्हाला खरोखरच आनंद होत आहे!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही या लेखामध्ये कशी सुधारणा करावी?

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या टिप्पण्या आम्हाला भविष्यात आमच्या लेखामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतील.