द्वेषपूर्ण वर्तनाविषयची धोरण

द्वेषपूर्ण वर्तन: वंश, वांशिकता, जात, राष्ट्रीयत्व, लैंगिक अभिमुखता, लिंग, लिंग ओळख, धार्मिक संलग्नता, वय, अपंगत्व किंवा गंभीर आजाराच्या आधारावर आपण इतरांविरुद्ध हिंसेला चालना देऊ नका किंवा थेट हल्ला करू नका किंवा इतर लोकांना धमकावू नका. या श्रेणींनुसार इतरांना हानी पोहोचविण्याचा प्राथमिक हेतू असलेल्या खात्यांना देखील आम्ही परवानगी देत नाही.

द्वेषपूर्ण चित्रे आणि नावे प्रदर्शित करणे: आपण आपल्या प्रोफाइल प्रतिमेमध्ये किंवा प्रोफाइल हेडरमध्ये द्वेषपूर्ण प्रतिमा किंवा चिन्हांचा वापर करू शकत नाही. आपण आपले उपभोक्ता नाव, प्रदर्शन नाव किंवा माझ्या प्रोफाइल बायोबद्दल यांचा वापर अपमानास्पद वर्तवणूक दर्शविणाऱ्या पद्धतीने जसे की, व्यक्ती, समूह किंवा संरक्षित समूहाकडे दिशानिर्देश करून छळवणूक किंवा द्वेष करून त्यांना लक्ष करू शकत नाही. 
 

कारणमीमांसा
 

मनात येणारे विचार आणि माहिती तयार करून ती शेअर करण्याची, तसेच कोणत्याही अडथळ्यांशिवाय त्यांची मते व्यक्त करण्याची क्षमता प्रत्येकाला देणे हा Twitter चा उद्देश आहे. मुक्त अभिव्यक्ती हा मानवी अधिकार आहे - आमचा विश्वास आहे की प्रत्येकाचे स्वतःचे विचार असून ते व्यक्त करण्याच्या अधिकार आहे असा आमचा विश्वास आहे. भिन्न दृष्टीकोनांचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे अशा सार्वजनिक चर्चा लोकांपर्यंत पोहोचविणे ही आमची भूमिका आहे. 

जर लोकांना Twitter वर गैरवर्तन झाल्याचे आढळले, तर ते व्यक्त करण्याची त्यांची क्षमता धोक्यात येऊ शकते याची आम्हाला जाणीव आहे. लोकांचे काही गट ऑनलाइन गैरवर्तनाचे व्यनुपाती रीतीने लक्ष्य केले जात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. यामध्ये महिला, युरोपियन नसलेले लोक, लेस्बिअन, समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, क्वीर, इंटरसेक्स, समलैंगिक व्यक्ती, उपेक्षित आणि ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांचा समावेश होतो. असे लोक जे एकाधिक अंतर्गत प्रतिनिधित्व करणाऱ्या गटांवरून ओळखले जातात, त्यांच्यासाठी गैरवर्तन अधिक सामान्य, अधिक गंभीर स्वरूपाचे आणि धिक हानिकारक असू शकते.

द्वेष, पूर्वग्रह किंवा असहिष्णुतेवरून प्रेरित गैरवापराचा प्रतिकार करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, विशेषत: असे अपमान जे ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित झालेल्या लोकांच्या आवाजाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कारणास्तव, संरक्षित श्रेणीनुसार गैरवर्तन असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या वर्तनाला आम्ही प्रतिबंधित करतो.  

आमच्या द्वेषपूर्ण वर्तनाच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे असे काहीतरी आपणास Twitter आढळल्यास कृपया आमच्याकडे ते रिपोर्ट करा.
 

हे कधी लागू होते 
 

ट्विट्स किंवा थेट संदेशांमध्ये पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची वागणूक असलेल्या एखाद्या व्यक्तीस किंवा लोकांच्या गटाला लक्ष्य करीत असलेल्या खात्यांच्या रिपोर्ट्सचे आम्ही पुनरावलोकन करून कारवाई करू. 
 

हिंसक धमक्या

ओळखल्या जाऊ शकणाऱ्या उद्देशाविरुद्ध हिंसक धमक्या देणारा मजकूर आम्ही प्रतिबंधित करतो. हिंसक धमक्या म्हणजे दुखापत करण्याच्या इराद्याची घोषणात्मक विधाने ज्याची परिणती गंभीर आणि कायमस्वरूपी शारीरिक हानीमध्ये होऊ शकेल, जिथे एखादी व्यक्ती निधन पावली किंवा तिला गंभीर इजा होऊ शकेल, उदा. "मी तुला ठार मारेन".

नोट: आमच्याकडे हिंसक धमक्यांविरूद्ध शून्य सहिष्णुता धोरण आहे. हिंसक धमक्या शेअर केलेल्या लोकांना त्यांचे खाते त्वरित आणि कायमचे स्थगित करण्यात येईल. 
 

एखाद्या व्यक्तीस किंवा लोकांच्या गटास गंभीर नुकसान पोहोचविण्याची इच्छा, आशा किंवा आवाहन करणे

आम्ही असा मजकूर प्रतिबंधित करतो ज्यामधून संपूर्ण संरक्षित श्रेणी आणि/किंवा त्या श्रेणीचे सदस्य असू शकतात अशा व्यक्तींविरूद्ध त्यांना शुभेच्छा देणे, आशा दाखविणे, उचलून धरणे, उत्तेजन देणे किंवा एखाद्याच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणे, गंभीर आजाराची भावना व्यक्त होते. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाही: 

 • संपूर्ण संरक्षित श्रेणी आणि/किंवा त्या श्रेणीतील सदस्यांचा गंभीर आजाराने मृत्यू व्हावा अशी आशा बाळगणे उदा. "माझी अशी इच्छा आहे की सर्व [राष्ट्रीयत्व] COVID होऊन नष्ट व्हावेत."
 • एखाद्याने एखाद्या गंभीर अपघाताला बळी पडावे अशी इच्छा व्यक्त करणे उदा. “पुढच्या वेळी तुम्ही फालतू बडबड कराल तेव्हा तुमच्या अंगावरून गाडी जावी असं मला वाटतं."
 • एखाद्या लोकांच्या समूहाला गंभीर शारीरिक दुखापत व्हावी असे म्हणणे उदा. "[कलंकित] गटाने आरडा-ओरडा बंद न केल्यास त्यांना गोळ्या घालून ठार मारणेच योग्य आहे."
 • संरक्षित श्रेणीमध्ये घेतलेल्या सदस्यतेनुसार एखादी व्यक्ती किंवा गटाविरुद्ध हिंसाचार करण्यास प्रोत्साहित करणे, उदा. "मी [वांशिक शिवीगाळ] पंच मारण्याच्या मूडमध्ये आहे, मला कोण साथ देणार आहे?"
   

सामूहिक हत्याकांड, हिंसक घटना किंवा विशिष्ट प्रकारची हिंसाचाराच्या घटनांचे संदर्भ जेथे संरक्षित गट हे प्राथमिक लक्ष्य किंवा बळी ठरले आहेत

संरक्षित श्रेणीमधील सदस्य प्राथमिक लक्ष्य किंवा बळी ठरत होते, ज्यामध्ये छळ करण्याचा हेतू होता अशा हिंसा किंवा हिंसक घटनांचा संदर्भ असलेल्या मजकुरासहित व्यक्ती किंवा गटांना लक्ष्य करण्यास प्रतिबंधित करतो. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहे, परंतु संदर्भित किंवा प्रदर्शित झालेल्या मीडिया किंवा मजकूरापुरते मर्यादित नाही:

 • नरसंहार (उदा., होलोकॉस्ट);
 • जुलूम जबरदस्तीने फासावर देणे.
   

संरक्षित श्रेण्यांविरूद्ध भडकवणे
 

आम्ही संरक्षित श्रेणीतील व्यक्ती किंवा लोकांच्या गटांना लक्ष्य बनवणाऱ्या भडकवण्याच्या वर्तनला प्रतिबंधित करतो. खालील हेतू असलेल्या मजकुराचा यामध्ये समावेश आहे:

 • संरक्षित श्रेणीचे सदस्य धोकादायक किंवा बेकायदेशीर कार्यांमध्ये भाग घेण्याची अधिक शक्यता असल्याचे सांगून संरक्षित श्रेणीविषयी भीती निर्माण करणे किंवा भितीदाय रुढींचा प्रसार करणे उदा. "सर्व [धार्मिक गट] दहशतवादी आहेत."
 • ऑन-ऑफ प्लॅटफॉर्मवर संरक्षित श्रेणीच्या सदस्यांना त्रास देण्यासाठी इतरांना भडकविणे, उदा. "[धार्मिक समूह] आमच्यापेक्षा चांगला आहे या विचाराने मी अगदी त्रासलो/ले आहे, जर तुमच्यापैकी कोणी [धार्मिक समुहाचे धार्मिक चिन्ह] धारण केलेले पाहिले तर ते काढून घ्या आणि तशी चित्रे पोस्ट करा!"
 • एखाद्या संरक्षित श्रेणीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या आर्थिक उद्योगांना पाठिंबा दर्शविण्यास नकार देण्याच्या स्वरूपात भेदभाव करण्यास उद्युक्त करणे, उदा. "आपण एखाद्या [धार्मिक समूह] स्टोअरमध्ये गेल्यास आपण त्या [अपमान] चे समर्थन करत असाल तर या [धार्मिक अपमान] ला आमचे पैसे देणे थांबवा." यामध्ये राजकीय भाष्य किंवा बहिष्कार किंवा निषेधाशी संबंधित मजकुरासारख्या राजकीय स्वरूपाच्या मजकुराचा समावेश होऊ शकत नाही.

लक्षात घ्या की एखाद्या संरक्षित श्रेणीविरूद्ध हिंसा करण्यास उद्युक्त करण्याच्या उद्देशाने इच्छा करणे, आशा करणे किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा लोकांच्या गटास गंभीर नुकसान पोहचविणे या उद्देशाने प्रतिबंधित आहे.

संरक्षित श्रेणीमधील सदस्य धोकादायक किंवा बेकायदेशीर कार्यामध्ये भाग घेण्याची अधिक शक्यता दर्शवितात, उदा. "सर्व [धार्मिक गट] दहशतवादी आहेत." असा समावेश असलेल्या संरक्षित श्रेणीमध्ये भीती भडकवण्यासाठी किंवा भयभीत रूढीविरूद्ध प्रसारित करण्याच्या उद्देशाचा मजकूर असलेल्या व्यक्ती आणि गटांना लक्ष्य करणे आम्ही प्रतिबंधित करतो 
 

पुनरावृत्ती आणि/किंवा गैरसमज पसरविणारी निंदा, विशेषणे, वंशद्वेष आणि लैंगिक शब्दांचा वापर किंवा इतर मजकूर ज्यामुळे एखाद्याचे खच्चीकरण होईल.

एखाद्या संरक्षित श्रेणीबद्दल नकारात्मक किंवा हानिकारक रूढीवादी लोकांचे अपमान, अधोगती किंवा बळकटी आणण्याचा हेतू असलेले एकसारखे अपमान, रूपके किंवा इतर मजकुर असलेल्या लक्ष्यित व्यक्तींना आम्ही प्रतिबंधित करतो. यात ट्रान्सजेंडर व्यक्तींचे लक्ष्यित गैरसमज किंवा डेडनेमिंग समाविष्ट आहे. 

आम्ही लोकांच्या समुहावर त्यांच्या धर्म, जाती, वय, अपंगत्व, गंभीर रोग, राष्ट्रीय मूळ, वंश किंवा जातीनुसार अवमानवीकरण करण्यास देखील प्रतिबंधित करतो.
 

द्वेषपूर्ण प्रतिमा

आम्ही घृणास्पद प्रतिमा लोगो, चिन्हे किंवा प्रतिमा विचारात घेतो ज्यांचा हेतू इतरांच्या वंश, धर्म, अपंगत्व, लैंगिक आवड, लिंग ओळख किंवा जाती/राष्ट्रीय मूळ यानुसार वैमनस्य आणि द्वेषाचा प्रचार करणे आहे. द्वेषपूर्ण प्रतिमांच्या काही उदाहरणांमध्ये खालील घटक समाविष्ट आहे, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:

 • ऐतिहासिकदृष्ट्या द्वेषपूर्ण गटांशी संबंधित चिन्हे, उदा., नाझी स्वस्तिक;
 • माणसापेक्षा इतरांना कमी दाखविणाऱ्या प्रतिमा किंवा तिरस्करणीय चिन्हे समाविष्ट करण्यासाठी त्यामध्ये बदल करणे उदा. प्राणी सदृश वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तींच्या प्रतिमांमध्ये बदल करणे; किंवा
 • द्वेषयुक्त चिन्हे समाविष्ट करण्यासाठी बदललेल्या प्रतिमांचा किंवा सामूहिक हत्येचा संदर्भ ज्यामध्ये संरक्षित श्रेणीला लक्ष्य केले गेले आहे, उदा. होलोकॉस्टच्या संदर्भात यलो स्टार ऑफ डेव्हिड बॅजेस समाविष्ट करण्यासाठी व्यक्तींच्या प्रतिमा हाताळणे.

द्वेषपूर्ण प्रतिमा दाखविणाऱ्या मीडियाला लाइव्ह व्हिडिओ, खाते बायो, प्रोफाइल किंवा शीर्षलेख प्रतिमांमध्ये परवानगी नाही. इतर सर्व घटनांना संवेदनशील मीडिया म्हणून चिन्हांकित केले जाणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, वैयक्तिक अवांछित द्वेषपूर्ण प्रतिमा पाठविणे हे आमच्या अपमानास्पद वर्तनाचे धोरणचे उल्लंघन आहे. 
 

Twitter च्या नियमांचे उल्लंघन व्हावे म्हणून मी या मजकूराचे लक्ष्य असणे आवश्यक आहे काय?
 

वैयक्तिक स्तरावर पाहिल्यावर काही ट्विट्स द्वेषपूर्ण वाटू शकतात, परंतु जेव्हा मोठ्या चर्चेमधील मागचा पुढचा संदर्भ घेऊन ती पाहिली जातात तेव्हा ती तशी वाटत नाहीत. उदाहरणार्थ, विशेषत: अपमानास्पद म्हणून समजल्या जाणाऱ्या संज्ञांवरून संरक्षित श्रेणीचे सदस्य एकमेकांचा संदर्भ देऊ शकतात. जेव्हा अशा संज्ञा सहमतीजन्य स्वरूपात वापरल्या जातात तेव्हा त्यामागील हेतू हा निंदनीय नसून लोकांना कमी लेखण्यासाठी ऐतिहासिकदृष्ट्या वापरल्या जाणाऱ्या संज्ञा पुन्हा वापरण्याचा एक मार्ग आहे.  

जेव्हा आम्ही या प्रकारच्या मजकुराचे पुनरावलोकन करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या संरक्षित स्थितीनुसार गैरवर्तन करण्याचा हेतू आहे किंवा तो सहमतीपूर्वक झालेल्या चर्चांचा एक भाग आहे हे स्पष्ट होऊ शकत नाही. आमच्या कार्यसंघाला संदर्भ समजण्यास मदत होण्याच्या दृष्टीने काही वेळा अंमलबजावणीची कारवाई करण्यापूर्वी आम्हाला आवश्यक माहिती आमच्याकडे असल्याची खात्री करण्यासाठी थेट लक्ष्यित व्यक्तीकडून जाणून घेणे आवश्यक असते.

नोट: आम्हाला कारवाई करण्यासाठी एखाद्या विशिष्ट संरक्षित श्रेणीचा सदस्य असण्याची आवश्यकता नाही. आम्ही कधीही लोकांना कोणत्याही संरक्षित श्रेणीमध्ये सदस्यता सिद्ध किंवा नाकारण्यास सांगणार नाही आणि आम्ही या माहितीची तपासणी करणार नाही. 
 

परिणाम
 

या धोरणाच्या अंतर्गत, आम्ही उपरोक्त वर्णन केल्यानुसार घृणास्पद आचरण असलेल्या व्यक्ती किंवा संपूर्ण संरक्षित श्रेणीला लक्ष्य बनवणाऱ्या वर्तनाविरूद्ध कारवाई करतो. लक्ष्यीकरण बऱ्याच मार्गांनी घडू शकते, उदाहरणार्थ, एखाद्याच्या छायाचित्रावरून त्याचा संपूर्ण नावाने उल्लेख करणे इत्यादींचा उल्लेख करणे.

या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड निश्चित करताना, आम्ही उल्लंघनाच्या तीव्रतेसह आणि नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मागील रेकॉर्डसहित अनेक घटकांचा विचार करतो परंतु इतकेच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, आम्ही एखाद्यास पुन्हा ट्विट करण्यापूर्वी उल्लंघन करणारा मजकूर काढून टाकण्यासाठी आणि रीड-ओन्ली मोडमध्ये काही कालावधीसाठी सांगू शकतो. त्यानंतरच्या उल्लंघनांमुळे रीड-ओन्ली कालावधी वाढेल आणि सरतेशेवटी खाते कायमस्वरूपी स्थगित केले जाईल. जर एखाद्या खाते (उपभोक्त्याकडून) प्रामुख्याने अपमानास्पद वागणूक मिळत असेल किंवा हिंसक धोका असल्याचे समजत असेल तर आम्ही सुरुवातीच्या पुनरावलोकनेनंतर ते खाते कायमस्वरूपी स्थगित करू. 

आमच्या अंमलबजावणीच्या पर्यायांच्या व्याप्ती विषयी अधिक जाणून घ्या. 

जर एखाद्याला वाटत असेल की त्यांचे खाते चुकून स्थगित झाले आहे तर, ते अपील सबमिट करू शकतात.

हा लेख शेअर करा