धोरण विकास आणि अंमलबजावणी तत्त्वाविषयीचा आमचा दृष्टीकोन

जगात प्रत्यक्ष चालणाऱ्या चर्चांचे Twitter हे एक प्रतिबिंब आहे आणि त्यात काही वेळेला गुन्हेगारी स्वरूपाचा वादग्रस्त आणि/किंवा इतरांना धर्मांध वाटणारा दृष्टीकोन समाविष्ट असू शकतो. आमच्या सेवांवर स्वतःला व्यक्त करण्यासाठी आम्ही प्रत्येकाला आमंत्रित करत असलो तरी सतावणूक करणारी, धमक्या देणारी किंवा इतरांचा आवाज दाबण्यासाठी भीतीचा वापर करणारी वर्तवणूक आम्ही सहन करणार नाही.

आपल्या भावना व्यक्त करताना प्रत्येकाला सुरक्षित वाटावे यासाठी आमचे Twitter चे नियम आहेत आणि समानपणे त्याची अंमलबजावणी करता यावी यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न सुद्धा करत आहोत.  विविध अंमलबजावणी विषयक कारवाया याविषयी अधिक जाणून घ्या.

 

आमची धोरण विकास प्रक्रिया
 

नवीन धोरण तयार करणे किंवा धोरणामध्ये बदल करणे यासाठी ऑनलाईन कृतींचे जे प्रचलन होते त्याबाबत, कशाची परवानगी आहे याविषयीच्या अपेक्षा अधोरेखित करणारी विकसित अशी स्पष्ट भाषा आणि लाखो ट्विट्स ज्यावर पारखून घेता येतील अशा समीक्षकांसाठी अंमलबजावणी विषयक मार्गदर्शक सूचना यासाठी सखोल संशोधन आवश्यक असते.

धोरण विषयक भाषेचा मसुदा तयार करतांना आम्ही आमच्या वेगवेगळ्या अंतर्गत टीमकडून तसेच विश्वास आणि सुरक्षितता कौन्सिलकडून अभिप्राय मागवितो. आमचे नियम कसे लागू केले जाऊ शकतील आणि विविध सांस्कृतिक आणि सामजिक संदर्भांच्या बाबतीत त्यांचा कसा अर्थ लावला जाईल यासह बदलणाऱ्या ऑनलाईन संभाषणाचा विश्वव्यापी दृष्टीकोण विचारात घेणे निश्चित करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. शेवटी, आम्ही आमच्या जागतिक समीक्षा संघाला प्रशिक्षित करतो, Twitter चे नियम अपडेट करतो आणि नवीन धोरणांच्या अंमलबजावणीला सुरूवात करतो.

 

आमचे अंमलबजावणी तत्व
 

समस्येचे विविध पैलू समजून घेण्याच्या दृष्टीने आम्ही लोकांना सक्षम करतो आणि खुलेपणाने चर्चा करता येऊ शकेल अशा प्रचलित मतांपेक्षा वेगळे मत मांडायला तसेच मुद्दे मांडण्यासाठी प्रोत्साहन देतो. हा दृष्टीकोण आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या विधानांचे अस्तित्व तयार करतो आहे, विशेषतः प्रचलित मतांपेक्षा वेगळे मत मांडायला प्रोत्साहन मिळत आहे: असे मत जे चुकीची विधाने किंवा समज दुरूस्त करण्याच्या दृष्टीने वस्तुस्थिती सादर करेल, ढोंग किंवा परस्पर विरोध नमूद करेल, ऑफलाईन किंवा ऑनलाईन परिणामांबाबत इशारा देईल, सार्वजनिकरीत्या द्वेषपूर्ण किंवा धोकादायक विधानांना दोष देईल किंवा मन परिवर्तन करेल आणि मवाळ बनवेल.

म्हणून, संदर्भ महत्त्वाचा आहे. अंमलबजावणी विषयक कार्यवाही करायची आहे किंवा नाही हे निश्चित करतांना आम्ही अनेक घटक विचारात घेतो ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो (पण त्या तेवढ्यापुरत्या मर्यादित नाहीत):

  • वर्तवणूक ही वैयक्तिक, समूह किंवा संरक्षित श्रेणीतील लोकांना निर्देशित करत आहे काय;
  • अपमान करण्यात आलेल्या लक्ष्य समूहाकडून किंवा त्रयस्थांकडून रिपोर्ट फाईल करण्यात आलेला आहे;
  • उपभोक्त्याच्या नावे आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याचा इतिहास आहे;
  • नियमाच्या उल्लंघनाची गंभीरता;
  • सामग्री कायदेशीर सार्वजनिक हिताचा विषय असू शकते.


वर्तवणूक ही वैयक्तिक किंवा समूह श्रेणीतील लोकांना निर्देशित करत आहे काय?

प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्या जाणाऱ्या स्वीकारहार्य असलेल्या विविध मतांमधील संतुलन शोधण्यासाठी आणि आमच्या उपभोक्त्यांचे संरक्षण करण्यासाठी जेव्हा कोणी एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा समूहाला लक्ष्य करणाऱ्या अपमानास्पद वर्तणूकीचा रिपोर्ट आम्हाला देतो तेव्हा आम्ही धोरणांची अंमलबजावणी करतो. हे लक्ष्यीकरण अनेक मार्गाने (उदाहरणार्थ, @उल्लेख, छायाचित्र टॅग करणे, नावासह त्यांचा उल्लेख करणे आणि असे बरेच काही) होऊ शकते.


अपमान करण्याची शक्यता असलेल्या लक्ष्य समूहाकडून किंवा त्रयस्थांकडून रिपोर्ट फाईल करण्यात आलेला आहे?

वैयक्तिक स्तरावर पाहिल्यावर काही ट्विट्स अपमानास्पद वाटू शकतात, परंतु जेव्हा मोठ्या चर्चेमधील मागचा पुढचा संदर्भ घेऊन किंवा प्लॅटफॉर्मवर असलेल्या लोकांमधील संबंधाचा इतिहास पाहिल्यास ती तशी वाटत नाहीत. उदाहरणार्थ, मित्रा-मित्रांमधील हास्यविनोद त्रयस्थ व्यक्तीला गुन्हेगारी स्वरूपाचे वाटतील आणि एखाद्या संस्कृती किंवा देशामध्ये स्वीकारहार्य असणारे शेरे दुसऱ्या ठिकाणी स्वीकारहार्य असतीलच असे नाही. आमच्या कार्यसंघाला चुका करण्यापासून आणि विसंगत परस्परसंवाद काढण्यापासून प्रतिबंध करण्याच्या कामी मदत म्हणून काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणतीही अंमलबजावणी विषयक कार्यवाही करण्यापूर्वी प्रत्यक्ष लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांकडून (किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून) आम्हाला रिपोर्ट मिळणे आवश्यक असते.


उपभोक्त्याने यापूर्वी आमच्या धोरणांचे उल्लंघन केले आहे काय?

लोकांचा आमच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नव्हता हे गृहीत धरून आम्ही सुरूवात करतो. आम्हाला खाते त्वरित स्थगित करावे लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाले नसल्यास, आम्ही प्रथम आमच्या नियमांविषयी लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांची वर्तणूक सुधारण्यासाठी त्यांना एक संधी देखील देतो. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला आम्ही गुन्हेगारी स्वरूपाचे असणारे ट्विट दाखवितो, कोणत्या नियमाचे उल्लंघन झाले आहे हे स्पष्ट करून सांगतो आणि ते पुन्हा ट्विट केले जाण्यापूर्वी ती सामग्री काढून टाकण्याचे त्यांना सांगतो. एखादा सतत आमच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर आमची अंमलबजावणीची कार्यवाही आणखी कडक होईल. यामध्ये उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीने ट्विट(ट्स) काढून टाकणे आणि खात्याची मालकी सत्यापित करणे आणि/किंवा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित केलेल्या कालावधीसाठी त्यांची ट्विट करण्याची क्षमता मर्यादित करणे यांचा समावेश होतो. एखादा सतत मर्यादेच्या पलीकडे जाऊन नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याचे खाते कायमस्वरूपी स्थगित केले जाऊ शकते.


नियमाच्या उल्लंघनाची गंभीरता म्हणजे काय?

काही विशिष्ट प्रकारची वर्तवणूक ही गंभीर स्वरूपाच्या सुरक्षा आणि सुरक्षितता विषयक धोक्यांना दर्शवत असल्यासारखे दिसते आणि/किंवा त्याचा परिणाम म्हणून त्यात सामील असलेल्या लोकांवर शारीरिक, भावनिक आणि आर्थिक संकट ओढवते. हे Twitter च्या नियमांचे भयंकर स्वरूपातील उल्लंघन आहे - जसे की हिंसक धमकी पोस्ट करणे, महत्वाच्या विषयावरील गैर-समज पसरविणारा मीडिया किंवा लहान मुलांचे लैंगिकदृष्ट्या शोषण करणारी सामग्री - याचा परिणाम म्हणून त्वरित आणि कायमस्वरूपी ते खाते स्थगित होते. इतर प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास वेगळ्या प्रकारची कार्यवाही केली जाते, जसे की एखाद्याकडून त्याचे गुन्हेगारी स्वरूपाचे ट्विट काढून टाकण्यास सांगणे आणि/किंवा नवीन ट्विट पोस्ट करण्याची त्यांची क्षमता तात्पुरत्या स्वरूपात मर्यादित राखणे.


वर्तवणूक वर्तमानपत्रात छापणे योग्य आणि लोकांच्या कायदेशीर हिताचा विषय आहे काय?

लोक कशाविषयी विचार करत आहेत त्यानुसार Twitter बदलत आहे आणि काय चालू आहे हे समजण्यासाठी लोक या सेवेचा वापर करतात. वेगळे मत शोधल्यामुळे लोकांना त्यापासून काही शिकायला मिळते, अधिक सहनशील होता येते आणि आपल्याला ज्या समाजात राहायचे आहे त्याविषयी निर्णय घेता येतो.

समस्येची प्रत्येक बाजू लोकांना पाहण्याची संधी आहे हे निश्चित करण्याच्या कामी मदत व्हावी म्हणून आम्ही एरव्ही आमच्या सेवांचा वापर करतांना आमच्या नियमांचे उल्लंघन ठरतील अशा वादग्रस्त सामग्रीला परवानगी देतो, कारण तशी सामग्री उपलब्ध होण्यात लोकांचे कायदेशीर हित दडलेले असते असा आमचा विश्वास असतो. प्रत्येक परिस्थितीचे प्रकरणनिहाय मूल्यमापन केले जाते आणि शेवटी क्रॉस-फंक्शनल टीमच्या माध्यमातून ठरविले जाते.

सामग्रीविषयी आमच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत माहिती देऊन मदत करणाऱ्या घटकांमध्ये सामग्रीचा सार्वजनिक प्रभाव, सामग्रीचा स्रोत आणि त्या प्रसंगाचे कव्हरेज करण्यासाठी उपलब्ध असलेला दुसरा पर्याय यांचा समावेश होतो.

सामग्रीचा सार्वजनिक प्रभाव: लोकांच्या उत्सुकतेच्या असलेल्या विषयापासून कायदेशीर सार्वजनिक हिताचा असलेला विषय हा पूर्णपणे वेगळा आहे. या सामग्रीविषयी नागरिकांना माहित नसल्यास त्याचा होणारा परिणाम आम्ही विचारात घेतो. जर ट्विटमध्ये अनेक लोकांचे जीवन प्रभावित करण्याची क्षमता असेल, देशाची प्रचलित व्यवस्था आणि/किंवा त्यातून महत्वाच्या सामाजिक समस्येबाबत चर्चा केली जात असल्यास आम्ही आमच्या सेवेवर अशी सामग्री ठेवण्याची परवानगी देतो. त्याचप्रमाणे, सार्वजनिक प्रभाव खूप कमी असेल तर आम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन झाले म्हणून अशी सामग्री काढून टाकतो.

सामग्रीचा स्रोत: काही लोक, समूह, संस्था आणि त्यांनी Twitter वर पोस्ट केलेली सामग्री ही त्यांच्या नेहमी सार्वजनिक हिताबाबत विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे कायदेशीर सार्वजनिक हिताचा विषय समजली जाऊ शकते. याचा अर्थ हा नाही की त्यांचे ट्विट्स नेहमीच सेवेवर राहू दिले जातील. त्याच्याऐवजी, आम्ही असा विचार करू की जर त्या विशिष्ट ट्विटमध्ये कायदेशीर सार्वजनिक हिताचा विचार केलेला असल्यास ते तसे राहू देण्यासाठी त्याविषयी मोकळेपणाने चर्चा करता येईल.

कव्हरेज करण्याची उपलब्धतता: जगात काय चालू आहे याविषयीच्या ताज्या घडामोडी प्रदान करणे, एखाद्या पैलूविषयी वेगळा मुद्दा मांडणे आणि काही प्रकरणात अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीकडून अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करणे यासारख्या कामांमध्ये दररोज लोक महत्वाची भूमिका बजावत आहेत. जसजसे परिस्थितीचे आकलन होत जाते तसतसे विशिष्ट माहितीवरील प्रतिबंध काढल्यामुळे अनवधनाने संदर्भ लपविला जाऊ शकतो आणि / किंवा समस्येची प्रत्येक बाजू शोधण्यापासून लोकांना प्रतिबंध केला जाऊ शकतो. म्हणून, नियमांचे उल्लंघन करू शकेल असे वाटणाऱ्या ट्विटबाबत काही कार्यवाही करण्यापूर्वी, आम्ही संपूर्ण संदर्भ दाखविण्यात त्यावरून बजावली जाणारी भूमिका आणि त्यात कोठे तो मजकूर आढळतो आहे किंवा नाही या गोष्टी आम्ही विचारात घेतो.

हा लेख शेअर करा