कॉपीराईट धोरण

कॉपीराईटविषयीच्या कोणत्या तक्रारींना Twitter कडून प्रतिसाद दिला जातो.

Twitter वरून Digital Millennium Copyright Act (“DMCA”) अंतर्गत सबमिट करण्यात आलेल्या तक्रारींना प्रतिसाद दिला जातो. DMCA च्या कलम 512 मध्ये कॉपीराईटच्या उल्लंघनाविषयीच्या औपचारिक रिपोर्टसाठी आवश्यक वैधानिक बाबींबाबत माहिती दिली आहे तसेच, तक्रारवजा प्रति-सूचना सबमिट करून प्रभावित झालेला पक्ष ते काढून टाकण्याचे अपील कसे करू शकतो याविषयी देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

कॉपीराईट असलेल्या प्रतिमेचा प्रोफाइल छायाचित्रे किंवा हेडर फोटो म्हणून अनधिकृतपणे वापर केल्याचा आरोप, आमच्या मीडिया होस्टिंग सेवेच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेल्या कॉपीराईट असलेल्या व्हिडिओ किंवा प्रतिमेचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप किंवा उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या सामग्रीची लिंक समाविष्ट असलेले ट्विट्स यासारख्या कॉपीराईट विषयक उल्लंघनाचा आरोप असलेल्या रिपोर्टला Twitter वरून प्रतिसाद दिला जाईल. लक्षात घ्या की कॉपीराईट असलेल्या सामग्रीच्या अनधिकृत वापराचे सर्वच प्रकार उल्लंघनीय ठरत नाहीत (अधिक माहितीसाठी आमचा निष्पक्ष वापर हा लेख पहा).

आपल्याला आपल्या ब्रँड किंवा मार्केटमधील नावाविषयी काळजी वाटत असल्यास, कृपया Twitter चे ट्रेडमार्क धोरण पहा. विडंबन, न्यूजफिड, समालोचन किंवा चाहत्यांच्या खात्याविषयी आपल्याला काळजी वाटत असल्यास कृपया त्या अनुषंगाने संबंधित धोरण इथे पहा. सर्वसामान्यपणे या कॉपीराईट विषयक समस्या नसतात.

मी कॉपीराईटधारक आहे काय? मला ते कसे माहित होईल?

विशिष्ट कार्याच्या अनुषंगाने आपल्याकडे तसे अधिकार आहेत किंवा नाहीत याविषयी आपल्याला खात्री नसल्यास, Twitter याविषयी कायदेशीर सल्ला देऊ शकत नसल्याने कृपया अटॉर्नी किंवा इतर एखाद्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा. कॉपीराईट कायद्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी http://copyright.govhttps://lumendatabase.org/ आणि http://www.eff.org/issues/bloggers/legal/liability/IP यासह अनेक स्रोत असून त्यापैकी ही काही मोजकी नावे आहेत.

कॉपीराईटविषयीची तक्रार सबमिट करण्यापूर्वी काय विचारात घ्यायला हवे

आम्हाला कॉपीराईटविषयीची तक्रार सबमिट करण्यापूर्वी कृपया होत असलेला वापर हा निष्पक्ष वापर म्हणून समजता येईल किंवा नाही हे विचारात घ्या. 

आपण निष्पक्ष वापर विचारात घेतला असल्यास आणि तरीही आपल्याला कॉपीराईटविषयक तक्रार करायची असल्यास आपण प्रथम संबंधित उपभोक्त्याकडे जाऊन ते प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण उपभोक्त्याच्या ट्विटला प्रत्युत्तर देऊन किंवा उपभोक्त्याला थेट संदेश पाठवून त्यास आपली कॉपीराईट असलेली सामग्री Twitter ला संपर्क न साधता काढून टाकण्याविषयी विचारू शकता. 

Twitter कडे औपचारिक तक्रार सबमिट करण्यापूर्वी कृपया आपल्याला 17 U.S.C. § 512(f) अंतर्गत असलेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे, जर आपण जाणूनबुजून साहित्य किंवा कृतीचे उल्लंघन केले असल्याचे विपर्यास करून सांगितल्यास, आमच्याकडून किंवा आमच्या उपभोक्त्याकडून खर्च झालेल्या किंमत आणि अटॉर्नीच्या शुल्कासह होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी आपण जबाबदार असू शकाल. आपण रिपोर्ट करत असलेल्या सामग्रीचे खरोखरच उल्लंघन झाले आहे किंवा नाही याबाबत आपल्याला खात्री नसल्यास आमच्याकडे सूचनापत्र फाईल करण्याच्या अगोदर आपण एखाद्या अटॉर्नीशी संपर्क साधावा.

नोट: सामान्यपणे, काढलेल्या छायाचित्राचा प्रत्यक्ष अधिकारधारक ही फोटोग्राफची विषयवस्तू (सब्जेक्ट) नसून खुद्द फोटोग्राफर असतो. एखाद्या कार्याच्या अनुषंगाने आपण त्याविषयीचा कॉपीराईट धारण करत आहात किंवा नाही किंवा आपण एखाद्याच्या कार्याचे उल्लंघन करत आहात किंवा नाही याबाबत आपल्याला काही खात्री नसल्यास, कृपया अटॉर्नीशी किंवा इतर एखाद्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

कॉपीराईट विषयक तक्रार प्रोसेस करण्यासाठी कोणती माहिती आपल्याला आवश्यक आहे?

कॉपीराईट उल्लंघनाविषयी दावा करणारी सूचना सबमिट करण्यासाठी आपल्याला आमच्याकडे खालील माहिती देणे आवश्यक आहे:

 1. एक प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कॉपीराईट धारकाची किंवा त्यांच्यावतीने कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीची (आपले पूर्ण नाव टाईप केलेले असणे पुरेसे आहे) सही;
 2. उल्लंघन करण्यात आलेल्या कॉपीराईट असलेल्या कामाची ओळख (जसे की, उल्लंघन होत असल्याचा आरोप केलेल्या सामग्रीबाबत आपल्या मूळ कामाविषयी असलेली लिंक किंवा सामग्रीचे स्पष्ट वर्णन);
 3. Twitter ला आपल्या वेबसाईट किंवा सेवांवर सामग्री शोधून काढण्यासाठी उल्लंघन करण्यात आलेल्या सामग्री आणि माहितीची माफक स्वरूपातील पुरेशी ओळख;
 4. आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्त्यासह आपली संपर्क विषयक माहिती;
 5. दावा करण्यात आलेल्या सामग्रीचा वापर हा कॉपीराईट धारक, त्यांचा एजंट किंवा कायद्याने अधिकृत केली नसल्याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे असे नमूद करणारे विधान; आणि
 6. तक्रारीमधील माहिती पूर्णपणे अचूक असून खोटी साक्ष दिल्यास त्याच्या शिक्षेसाठी आपल्याला कॉपीराईट धारकाच्या वतीने अधिकृत करण्यात आले आहे असे नमूद करणारे विधान.
   

आपण एखाद्या ट्विटचा मजकूर रिपोर्ट करत असल्यास कृपया त्या ट्विटची थेट लिंक आम्हाला द्या. किंवा कथित उल्लंघन हेडर, अवतार इत्यादी मध्ये असल्यास कृपया ते निर्दिष्ट करा. उल्लंघनाचा मजकूर ओळखण्यासाठी Twitter करिता केवळ प्रोफाइलची लिंक पुरेशी नाही.

कॉपीराईट विषयक तक्रार मी कशी फाईल करू?

Twitter च्या मदत केंद्राला भेट देऊन कॉपीराईट तक्रार नमूद करून आपल्याला आरोप करण्यात आलेल्या कॉपीराईट उल्लंघनाविषयी रिपोर्ट देता येईल. आपण twitter.com वर लॉग केल्यास आपल्या Twitter खात्यावर बाजूला असलेल्या "मदत" लिंकवर क्लिक करून थेट Twitter मदत केंद्राला भेट देता येईल.

DMCA तक्रार फाईल करणे म्हणजे पूर्व-निर्धारित कायदेशीर प्रक्रियेचा प्रारंभ होय. आपल्या तक्रारीची अचूकता, वैधता आणि परिपूर्णता यासाठी समीक्षा केली जाईल. आपली तक्रार या आवश्यकतांची पूर्तता करत असल्यास आम्ही आपल्या विनंतीवर कार्यवाही करू – ज्यामध्ये आपल्या तक्रारवजा सूचनेची एक पूर्ण कॉपी (आपल्या नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि ई-मेल पत्त्यासह) उल्लंघन केलेला मजकूर पोस्ट केल्याचा आरोप असणाऱ्या उपभोक्त्या(क्त्यां)कडे पाठवला जाईल.

फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या आपल्या संपर्क विषयक माहितीबाबत आपल्याला काही काळजी वाटत असल्यास आपली इच्छा असल्यास आपण आपल्यासाठी एजंटचा वापर करू शकता.

कृपया आपल्याला 17 U.S.C. § 512(f) अंतर्गत असलेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे, जर आपण जाणूनबुजून सामग्री किंवा कृतीचे उल्लंघन केले असल्याचे विपर्यास करून सांगितल्यास, आमच्याकडून किंवा आमच्या उपभोक्त्याकडून खर्च झालेल्या किंमत आणि अटॉर्नीच्या शुल्कासह होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी आपण जबाबदार असू शकाल. आपण रिपोर्ट करत असलेल्या सामग्रीचे खरोखरच उल्लंघन झाले आहे किंवा नाही याबाबत आपल्याला खात्री नसल्यास आमच्याकडे कॉपीराईट विषयक तक्रार फाईल करण्याच्या अगोदर आपण एखाद्या अटॉर्नीशी संपर्क साधावा.

क्लेम्सवर कशी प्रक्रिया केली जाते?

कॉपीराईट विषयक तक्रारी जशा प्राप्त होतात त्या क्रमाने आम्ही त्या प्रोसेस करतो. आपण आपले तिकीट सबमिट केल्यानंतर आम्ही आपल्या तिकीट पुष्टीकरणाविषयी आपल्याला ई-मेल पाठवू. तिकीट पुष्टीकरणाविषयी आपल्याला ई-मेल न मिळाल्यास त्याचा अर्थ आम्हाला आपली तक्रार मिळाली नाही आणि आपण आपली तक्रार पुन्हा सबमिट करायला हवी. तथापि, कृपया हे लक्षात घ्या की कॉपीराईट विषयक डुप्लिकेट तक्रार सबमिट केल्यास प्रोसेसिंगला उशीर लागू शकतो.

साहित्यामधील अॅक्सेस अक्षम करण्याचा किंवा ती काढून टाकण्याचे आम्ही ठरविल्यास आम्ही प्रभावित होणाऱ्या उपभोक्त्याला सूचित करून रिपोर्ट करण्यात आलेल्या तक्रारीची पूर्ण कॉपी (प्रदान करण्यात आलेल्या संपर्क माहितीसह) तक्रारवजा प्रती-सूचना कशी दाखल करावी याविषयीच्या सूचनांसह प्रदान करतो. तक्रारीची संपादित केलेली एक कॉपी आपली वैयक्तिक माहिती काढून आम्ही ल्यूमेनला सुद्धा पाठवूत.

रिपोर्ट केलेल्या उपभोक्ता(क्त्यां)ना कोणती माहिती फॉर'वर्ड केली जाते?

रिपोर्ट करण्यात आलेल्या कॉपीराईट विषयक तक्रारीमधील मजकूर आम्ही काढून टाकल्यास किंवा त्यामधील अॅक्सेस अक्षम केल्यास, रिपोर्ट केलेल्या उपभोक्त्यांना रिपोर्ट सादर करणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव, ई-मेल, पत्ता आणि तक्रारीमध्ये समाविष्ट असलेली इतर माहिती यासह तक्रारीची एक पूर्ण कॉपी पाठवतो. 

रिपोर्ट केलेल्या उपभोक्ता(क्त्यां)सोबत आपली संपर्क माहिती शेअर करणे आपल्याला गैरसोईचे वाटत असल्यास, आपली इच्छा असल्यास आपण आपल्या वतीने DMCA तक्रारवजा सूचना सबमिट करण्यासाठी एजंट नियुक्त करू शकता. यासाठी आपल्या एजंटला वैध संपर्क माहितीसह DMCA तक्रारवजा सूचना सबमिट करणे आवश्यक आहे आणि त्याने तो प्रतिनिधित्व करत असलेल्या सामग्रीचे आपण मालक आहात अशी त्याला खात्री असली पाहिजे. 

पुढे काय होते?

कॉपीराईट विषयक तक्रारीसाठी Twitter च्या प्रतिसादामध्ये उल्लंघनाचा आरोप असलेली सामग्री काढून टाकणे किंवा त्यावरील प्रवेशावर प्रतिबंध लादणे असू शकते. कॉपीराईट विषयक तक्रारीसाठी देण्यात आलेल्या प्रतिसादानुसार जर आम्ही ती सामग्री काढून टाकली किंवा त्यावरील प्रवेशाबाबत उपभोक्त्यावर प्रतिबंध लादले, तर Twitter चांगला हेतू ठेवून प्रभावित झालेल्या खाते धारकाशी तक्रारीच्या पूर्ण कॉपीसह तक्रारवजा प्रति-सूचना कशी फाईल करावी याविषयीच्या सूचनांसह काढून टाकल्या जाणाऱ्या माहिती किंवा त्यावर लावण्यात येणाऱ्या प्रतिबंधाच्या अनुषंगाने संपर्क साधेल.

आपल्या खात्यावरून काढून टाकण्यात आलेल्या सामग्रीच्या अनुषंगाने कॉपीराईट विषयक तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाली नसल्यास कृपया आम्ही आपल्याला पाठवलेल्या समर्थन तिकिटाला प्रतिसाद द्या.

शक्य तितका पारदर्शक कारभार ठेवण्याच्या प्रयत्नात उपभोक्त्याने पोस्ट केलेल्या सामग्रीला काढून टाकणे किंवा त्यावर प्रतिबंध लावण्याच्या अनुषंगाने जेव्हा सामग्री राखून ठेवलेली असते तेव्हा आम्ही दर्शकांना दर्शविण्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या ट्विट्स आणि मीडियावर स्पष्टपणे तसे सूचित करतो (खालील उदाहरणे पहा). आम्ही प्रत्येक कॉपीराईट विषयक तक्रारीची एक संपादित कॉपी आणि आम्ही ल्यूमेनकडे प्रोसेस केलेली तसेच सार्वजनिकरित्या वाद-विवाद करणाऱ्या वेबसाईटवर (आपली वैयक्तिक माहिती काढून) पोस्ट केलेली तक्रारवजा प्रतिसूचना देखील पाठवतो.

माझी सामग्री Twitter वरून काढून टाकण्यात आली होती

कॉपीराईट विषयक तक्रार मला का मिळाली आहे?

आपल्याला कॉपीराईट विषयक तक्रार प्राप्त झालेली असल्यास त्याचा अर्थ तक्रारीमध्ये वर्णन केलेल्या सामग्रीवर प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. आमचा आपल्याशी झालेला पत्रव्यवहार कृपया वेळ काढून वाचा, ज्यामध्ये आम्हाला मिळालेल्या तक्रारीविषयीची माहिती तसेच तक्रारवजा प्रति-सूचना कशी फाईल करावी याविषयीची माहिती समाविष्ट आहे. आपल्या Twitter खात्याशी संलग्न असलेला ई-मेल पत्ता आपण वापरत असल्याची कृपया खात्री करून घ्या.

टीप: कॉपीराईट विषयक तक्रारीमध्ये रिपोर्ट करण्यात आलेला मजकूर काढून टाकल्याने त्या तक्रारीचे समाधान करता येणार नाही.

मला वाद मिटवायचा असेल तर मी काय करावे?

आपला विश्वास असल्यास कॉपीराइट तक्रारींमध्ये नोंदवलेला मजकूर 
चुकीची समजण्यात आली आहे किंवा चुकीने काढून टाकण्यात आलेली आहे तर आपण आम्हाला तक्रारवजा प्रति-सूचना पाठवू शकता. तक्रारवजा प्रति-सूचना ही काढून टाकण्यात आलेली सामग्री पुन्हा स्थापित करण्यासाठी Twitter ला केलेली एक विनंती असते आणि तिचे कायदेशीर परिणाम देखील होतात. पर्यायी स्वरूपात, आपण रिपोर्ट सादर करणाऱ्या व्यक्तीकडून कॉपीराईट विषयक तक्रार मागे घेण्याच्या दृष्टीने सुद्धा मार्ग शोधू शकता.

तक्रार मागे घेण्याच्या दृष्टीने मी मार्ग कसा शोधू?

आपल्याला प्राप्त झालेल्या DMCA तक्रारीमध्ये रिपोर्ट सादर करणाऱ्या व्यक्तीची माहिती समाविष्ट असेल. आपली इच्छा असल्यास आपण त्यांच्यांशी संपर्क साधून तक्रार मागे घेण्याबाबत त्यांना विचारू शकता.  रिपोर्ट सादर करणारी व्यक्ती तक्रार मागे घेतल्याची माहिती copyright@twitter.com ला पाठवू शकते आणि पुढील गोष्टी समाविष्ट असणे आवश्यक आहे: (1) अक्षम करण्यात आलेल्या सामग्रीची ओळख आणि (2) रिपोर्ट सादर करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेनुसार DMCA तक्रार मागे घेत असल्याचे विधान. समाधान न करण्यात आलेल्या कॉपीराईट विषयक तक्रारी त्वरित आणि सक्षमपणे सोडविण्याचे हे जलद साधन आहे. तक्रार मागे घेणे हा मूळ रिपोर्ट सादर करणाऱ्या व्यक्तीचा स्वतः घेतलेला असा निर्णय असतो.

तक्रारवजा काउंटर-नोटीस मी कधी फाईल करायला हवी?

तक्रारवजा प्रति-सूचना ही काढून टाकण्यात आलेली सामग्री पुन्हा स्थापित करण्यासाठी Twitter ला केलेली एक विनंती असते आणि कायदेशीर परिणाम असलेल्या कायदेशीर प्रक्रियेची ती सुरूवात असते.  उदाहरणार्थ, तक्रारवजा प्रति-सूचना सबमिट करून आपण हे दर्शविता की आपण U.S. फेडरलच्या न्यायाधिकार क्षेत्राला सहमती दर्शविली असून आपली वैयक्तिक माहिती ज्यांना रिपोर्ट पाठविला आहे त्यांना आणि Lumen वेबसाईटला सांगण्याविषयी देखील सहमती दर्शविली आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या सामग्रीबाबत चुकीचा गैरसमज करून घेण्यात आला आहे असा आपल्याला विश्वास वाटत असल्यास किंवा सामग्री काढून टाकली जाऊ नये याविषयी आपला चांगला हेतू असल्यास आपण तक्रारवजा प्रति-सूचना फाईल करू शकता.  तक्रारवजा प्रति-सूचना फाईल करावी की करू नये याविषयी आपल्याला काही खात्री वाटत नसल्यास आपण अटॉर्नीचा सल्ला घेऊ शकता.

टीप: कॉपीराईट विषयक तक्रारीला देण्यात आलेला प्रतिसाद म्हणून काढून टाकण्यात सामग्री पुन्हा पोस्ट केल्यास खाते कायमस्वरूपी स्थगित होऊ शकते. सामग्री चुकून काढून टाकण्यात आली आहे असा आपल्याला विश्वास वाटत असल्यास सामग्री पुन्हा पोस्ट करण्याच्या ऐवजी कृपया तक्रारवजा प्रति-सूचना फाईल करा. 

तक्रारवजा प्रति-सूचना प्रोसेस करण्यासाठी कोणती माहिती आपल्याला आवश्यक आहे?

तक्रारवजा प्रति-सूचना सबमिट करण्यासाठी आपल्याला आमच्याकडे खालील माहिती देणे आवश्यक आहे:

 1. प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील (आपले पूर्ण नाव टाईप केलेले असणे पुरेसे आहे) सही;
 2. काढून टाकण्यात आलेल्या सामग्रीचे किंवा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे अशा सामग्रीची ओळख आणि सामग्री काढून टाकण्यापुर्वी किंवा त्यावर प्रतिबंध लावण्यापुर्वी (कॉपीराईट विषयक तक्रारीमधील वर्णन पुरेसे आहे) ती सामग्री जेथे होती तो स्रोत;
 3. खोटी साक्ष दिल्यास आपल्याला शिक्षा करण्याच्या कलमाअंतर्गत, काढून टाकण्यात आलेली सामग्री किंवा चुकून त्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध किंवा काढून टाकल्या जाणाऱ्या अथवा प्रतिबंध लावल्या जाणाऱ्या सामग्रीविषयी झालेला गैरसमज याविषयी आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असे कथन असलेले विधान; आणि
 4. आपले नाव, पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक आणि ज्या जिल्ह्याचा आपला पत्ता आहे त्या जिल्ह्याच्या फेडरल न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्राला आपण संमती दर्शवित असल्याचे किंवा आपला पत्ता अमेरिकेच्या बाहेर असल्यास Twitter ला ज्या कोणत्या जिल्ह्यात ते आढळून येईल आणि उपकलम (c)(1)(C) अंतर्गत ज्या व्यक्तीने किंवा अशा व्यक्तीच्या एजंटने आपल्याला सूचनापत्र प्रदान केले आहे अशा व्यक्तीकडील प्रोसेस सेवा आपण स्वीकार करत असल्याबाबतचे कथन करणारे विधान.
 

तक्रारवजा प्रति-सूचना सबमिट करण्यासाठी कृपया सामग्री काढून टाकण्याच्या आमच्या मूळ ई-मेल सूचनापत्राला प्रतिसाद देऊन आपल्या प्रत्युत्तराच्या बॉडीमध्ये आवश्यक ती माहिती समाविष्ट करा, कारण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही संलग्नके काढून टाकतो.

तक्रारवजा प्रति-सूचना सबमिट केल्यानंतर काय होते?

वैध तक्रारवजा प्रति-सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्वरित ज्यांनी मूळ तक्रार फाईल केली आहे अशा व्यक्तीला त्याची एक कॉपी पाठवितो. याचा अर्थ आपण सबमिट केलेल्या तक्रारवजा प्रति-सूचनेमध्ये असलेली संपर्क विषयक माहिती ज्यांनी मूळ तक्रार फाईल केली आहे अशा व्यक्तीसोबत शेअर केली जाईल. 

जर कॉपीराईटधारकाने चुकून सामग्री काढून टाकल्याचे किंवा त्याविषयी गैरसमज झाल्याचे अमान्य केले तर ते आपल्या विरोधात कायदेशीर करू शकतात.  ज्या सामग्रीविषयी समस्या उपस्थित झाली आहे अशा सामग्रीचे आणखी उल्लंघन होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी मूळ रिपोर्ट सादर करणाऱ्या व्यक्तीमार्फत दिला जाणारा न्यायालयीन आदेश आम्हाला 10 व्यावसायिक दिवसांच्या आत न मिळाल्यास आम्ही काढून टाकण्यात आलेली सामग्री पुन्हा पोस्ट करू किंवा त्यावर लावण्यात आलेला प्रतिबंध रद्द करू.

आम्ही कोणताही कायदेशीर सल्ला देत नाही. तरीही आपले काही प्रश्न असल्यास कृपया अॅटॉर्नीचा सल्ला घ्यावा.

कॉपीराईट विषयक तक्रार किंवा तक्रारवजा प्रति-सूचना फाईल करणे ही एक गंभीर बाब आहे!

दावा किंवा तक्रारवजा प्रति-सूचना सबमिट करण्यापूर्वी, विशेषतः आपण खरोखरच अधिकारधारक व्यक्ती आहात किंवा नाही याविषयी किंवा अधिकारधारकाच्या वतीने कृती करण्यासाठी आपण अधिकृत व्यक्ती आहात किंवा नाही याविषयी आपल्याला काहीच खात्री नसल्यास, कृपया दोनदा विचार करा. फसव्या आणि / किंवा वाईट हेतू ठेवून करण्यात आलेल्या सबमिशनचे कायदेशीर आणि आर्थिक परिणाम होतात. कृपया आपण खरोखरच अधिकारधारक व्यक्ती आहात किंवा सामग्री चुकून काढण्यात आली आहे आणि चुकीचा दावा सबमिट केल्याचे दुष्परिणाम आपल्याला समजले असल्याची खात्री करून घ्या.

माझ्या खात्यावर कॉपीराईट विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्यास काय होते?

कॉपीराईट विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्यास Twitter वरून खाते लॉक केले जाऊ शकते किंवा वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना ताकीद देण्यासाठी इतर प्रकारची कार्यवाही केली जाते. देण्यात येणारी ही ताकीद Twitter च्या सर्व सेवांवर वेगवेगळी असते.  योग्य परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या उल्लंघन पुनरावृत्ती धोरणाअंतर्गत उपभोक्ता खाते स्थगित करू शकतो. तथापि, आमचे उल्लंघन पुनरावृत्ती धोरण लागू करण्यापुर्वी आम्ही तक्रार मागे घेण्याची विनंती आणि तक्रारवजा प्रति-सूचना विचारात घेऊ शकतो. 

हा लेख शेअर करा