अपमानस्पद वर्तणूक

Twitter चे नियम: आपण कोणाच्याही लक्ष्यित छळवणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा इतर लोकांना तसे करण्याबाबत चिथावणी देऊ शकत नाही. एखाद्याची छळवणूक करण्याचा, त्यास भयभीत करण्याचा किंवा एखाद्याचा आवाज दाबण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे अपमानस्पद वर्तणूक असे आम्ही समजतो.
 

कारणमीमांसा


Twitter वर आपणास आपले वैशिष्ट्यपूर्ण मत व्यक्त करण्यास सुरक्षित वाटले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त संवाद याविषयी आम्ही आस्था बाळगतो पण याचा थोडाफार अर्थ काही लोक मौन बाळगतात कारण त्यांना बोलण्याची भीती वाटते या तत्वज्ञानामध्ये दडलेला आहे. 

प्लॅटफॉर्मवर सहजपणे निकोप संवाद साधता यावा तसेच लोकांना त्यांची वेगवेगळी मते तसेच धार्मिक दृष्टिकोन व्यक्त करता यावे यासाठी, इतरांना त्रास देणाऱ्या/धमकावणाऱ्या किंवा इतरांसाठी लज्जास्पद वा त्यांची मानहानी करण्याच्या वर्तनास आम्ही प्रतिबंध करतो. लोकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याव्यतिरिक्त, अपमानास्पद वर्तणूक देखील बाधित व्यक्तींना शारीरिक आणि भावनिक त्रास देऊ शकते. 

धोरण विकास आणि आमच्या अंमलबजावणी संदर्भातील तत्त्वज्ञान संदर्भातील आमच्या दृष्टीकोनबद्दल अधिक जाणून घ्या.

हे कधी लागू होते 


वैयक्तिक स्तरावर पाहिल्यावर काही ट्विट्स अपमानास्पद वाटू शकतात, परंतु जेव्हा मोठ्या चर्चेमधील मागचा पुढचा संदर्भ घेऊन ती पाहिली जातात तेव्हा ती तशी वाटत नाहीत. जेव्हा आम्ही या प्रकारच्या मजकुराचे पुनरावलोकन करतो तेव्हा हा एखाद्या व्यक्तीचा छळ करण्याचा हेतू आहे किंवा तो एकमत झालेल्या चर्चेचा भाग आहे, हे स्पष्ट होऊ शकत नाही. आम्ही कोणाकडूनही उल्लंघनाचा रिपोर्ट स्वीकारत असलो तरीही कधीकधी आपल्याकडे योग्य संदर्भ असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला लक्ष्यित व्यक्तीकडून थेट ऐकण्याची आवश्यकता असू शकते.

आम्ही Twitter कडून ट्विट्स किंवा थेट संदेशामध्ये पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची वागणूक असलेल्या एखाद्या व्यक्तीस किंवा लोकांच्या गटाला लक्ष्य करीत असलेल्या खात्यांच्या रिपोर्ट्सचे पुनरावलोकन करून कारवाई करू. स्वतःच्या प्रोफाइलवर अपमानास्पद वर्तणूक देणाऱ्या खात्यांसाठी, कृपया आमच्या अपमानास्पद प्रोफाइल धोरणाचा संदर्भ घ्या. वंश, जात, राष्ट्रीयत्व, लैंगिक अभिमुखता, लिंग, लिंग ओळख, धार्मिक संलग्नता, वय, अपंगत्व किंवा गंभीर आजारानुसार लोकांना लक्ष्य करणाऱ्या वर्तनासाठी हे आमच्या द्वेषपूर्ण आचारण धोरणाचे उल्लंघन करणारे ठरू शकते.


एखाद्या व्यक्तीस किंवा लोकांच्या गटास गंभीर नुकसान पोहोचविण्याची इच्छा, आशा किंवा आवाहन करणे

एखादी व्यक्ती किंवा लोकांच्या गटाविरूद्ध, मृत्यू, गंभीर शारीरिक हानी किंवा गंभीर आजाराची इच्छा, आशा करणाऱ्या, प्रोत्साहन, उत्तेजन देणाऱ्या किंवा मृत्यूची इच्छा व्यक्त करणाऱ्या मजकुराला आम्ही थारा देत नाही. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाही: 

 • एखाद्या गंभीर रोगाचा परिणाम म्हणून एखाद्याचा मृत्यू होण्याची आशा बाळगणे उदा. "तुला कॅन्सर होऊन तू मरणार आहेस असं मला वाटतं."
 • एखाद्याने एखाद्या गंभीर अपघाताला बळी पडावे अशी इच्छा व्यक्त करणे उदा. “पुढच्या वेळी तुम्ही फालतू बडबड कराल तेव्हा तुमच्या अंगावरून गाडी जावी असं मला वाटतं."
 • एखाद्या लोकांच्या समूहाला गंभीर शारीरिक दुखापत व्हावी असे म्हणणे उदा. "विरोधकांच्या या गटाने आरडा-ओरडा बंद न केल्यास त्यांना गोळ्या घालून ठार मारणेच योग्य आहे."
   

Twitter वरील हानीच्या अपवादांच्या इच्छेविषयी 

कठोर हिंसाचाराच्या आरोपानुसार काही विशिष्ट व्यक्तींविषयी संभाषणांमुळे आक्रोश आणि संबंधित हानीची इच्छा निर्माण होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे. अशा ठराविक प्रकरणांमध्ये खाते दंड, संप किंवा स्थगितीची कोणतीही जोखीम न बाळगता आम्ही उपभोक्त्यास ट्विट हटविण्यासाठी विनंती करू. उदाहरणे खालीलप्रमाणे, पण त्या पुरते मर्यादित नाही:

 •  "सर्व बलात्कारी लोकांनी मरावे असं मला वाटतं." 
 • "बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी."
   

अवांछित लैंगिक जवळीक साधणे

Twitter वर काहीप्रमाणातील नग्नता आणि प्रौढ सामग्रीस मान्यता आहे, एखाद्या व्यक्तिची परवानगी नसताना साधलेली अनावश्यक लैंगिक जवळीक आणि एखाद्या व्यक्तीवर लैंगिक आक्षेप घेणाऱ्या मजकुराला आम्ही प्रतिबंधित करतो. यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:

 • प्रतिमा, व्हिडिओ आणि GIFs बरोबरच कोणालाही अवांछित आणि/किंवा अवांछित प्रौढांसाठी असलेला मीडिया पाठविणे; 
 • एखाद्याच्या शारीरिकतेविषयी अवांछित लैंगिक चर्चा करणे; 
 • लैंगिक कृत्यांविषयी याचना; आणि 
 • एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय अन्य कोणताही मजकूर ज्यावरून अन्यथा एखाद्या व्यक्तीवर लैंगिक संबंध ठेवते. 
   

इतरांना त्रास देण्यासाठी किंवा धमकावण्याच्या उद्देशाने आक्रमक पद्धतीने अपमान वापरणे

स्लर्स किंवा तत्सम भाषा असलेल्या मजकुरावरून एखाद्यास लक्ष्यित करणाऱ्या अत्यधिक आक्रमक अपमानाविरूद्ध आम्ही कारवाई करतो. कृपया हे देखील लक्षात घ्या की काही व्यक्तींना काही विशिष्ट शब्द आक्षेपार्ह वाटू शकतात, परंतु ज्या ठिकाणी अपमानास्पद शब्द वापरले जातात त्या प्रत्येक केसविरूद्ध आम्ही कारवाई करणार नाही. 


एखाद्याला किंवा लोकांच्या गटास त्रास देण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करणे किंवा कॉल करणे

जे इतरांना अपमानास्पद वर्तणूक देणारी विशिष्ट व्यक्ती किंवा गटांना त्रास देण्यासाठी किंवा लक्ष्यित करण्यास प्रोत्साहित करते आम्ही अशा वर्तनला प्रतिबंधित करतो. यात समाविष्ट आहे, परंतु ते मर्यादित नाही; ऑनलाइन गैरवर्तन किंवा छळ असलेल्या लोकांना लक्ष्य करण्याचे कॉल आणि शारीरिक छळ यासारख्या ऑफलाइन क्रियेसाठी उद्युक्त करणारे वर्तन. 

 

मोठ्या प्रमाणावर घडलेल्या दुर्घटनांना नकार देणे

जिथे आम्ही घटना घडल्याचे सत्यापित केलेले असते आणि मजकूर अपमानास्पद हेतूने शेअर केला जातो अशावेळी आम्ही सामुहिक खून किंवा इतर मोठ्या प्रमाणावर घडलेल्या दुर्घटनांना नकार देणारा मजकूर आम्ही प्रतिबंधित करतो. यात "फसवणूक" यासारख्या घटनांच्या संदर्भांचा समावेश असू शकतो किंवा पीडित किंवा उत्तरजीवी हे बनावट किंवा "अभिनेते" आहोत असा क्लेम करू शकतात. यामध्ये होलोकॉस्ट, शाळेमधील गोळीबार, दहशतवादी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या घटना समविष्ट आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:

 

पुनरावलोकन होणार आहे अशा मजकुराने Twitter च्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या संदर्भात मला लक्ष्य केले जाणार आहे का?

नाही, आम्ही अशा मजकुराच्या संदर्भात पहिली व्यक्ती आणि साक्षीदार अशा दोघांच्या रिपोर्ट्सचे पुनरावलोकन करतो.


परिणाम

या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड निश्चित करताना, आम्ही उल्लंघनाच्या तीव्रतेसह आणि नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मागील रेकॉर्डसहित अनेक घटकांचा विचार करतो परंतु इतकेच मर्यादित नाही. 

उदाहरणार्थ, आम्ही एखाद्यास पुन्हा ट्विट करण्यापूर्वी उल्लंघन करणारा मजकूर काढून टाकण्यासाठी आणि रीड-ओन्ली मोडमध्ये काही कालावधीसाठी सांगू शकतो. त्यानंतरच्या उल्लंघनांमुळे रीड-ओन्लीचा कालावधी वाढेल आणि अखेरीस कायमची (खाते) स्थगिती होऊ शकते. एखाद्या खात्याकडून प्रामुख्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्यास आम्ही सुरुवातीच्या पुनरावलोकनानंतर ते खाते कायमचे स्थगित करू शकतो. 

आमच्या अंमलबजावणीच्या पर्यायांच्या व्याप्ती विषयी अधिक जाणून घ्या.

हा लेख शेअर करा