नवीन उपभोक्त्याकडून वारवांर विचारले जाणारे प्रश्न

ट्विट करणे

Twitter म्हणजे काय?

त्वरित, वारंवार संदेशांची देवाणघेवाण करून संवाद साधता यावा आणि कनेक्ट राहता यावे यासाठी Twitter ही मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसाठी एक सेवा आहे. लोक ट्विट्स पोस्ट करतात, ज्यांमध्ये छायाचित्रे, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतात. हे संदेश आपल्या प्रोफाइलवर पोस्ट केले जातात, आपल्या फॉलोअर्सना पाठवले जातात आणि Twitter शोधमध्ये शोधले जाऊ शकतात.  Twitter कसे वापरावे याबाबत अधिक जाणून घ्या.

ते वापरण्यासाठी माझ्याकडे काही खास असावे लागते का?

Twitter वापरण्यासाठी आपल्याला फक्त इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाईल फोनची आवश्यकता असते. आमच्यामध्ये येथे सहभागी व्हा! आपण येथे आलात की आपल्याला ज्यांच्या ट्विट्समध्ये स्वारस्य वाटते त्यांची खाती शोधण्यास आणि त्यांना फॉलो करण्यास सुरुवात करा. आपण साइन अप केले की आम्ही उत्तम खात्यांची शिफारस करू.

ट्विट म्हणजे काय?

ट्विट म्हणजे Twitter वर पोस्ट केलेला कोणताही संदेश, ज्यामध्ये छायाचित्र, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतात. आपल्या प्रोफाइलमध्ये नवीन अपडेट पोस्ट करण्यासाठी ट्विट बटण क्लिक किंवा टॅप करा. अधिक माहितीसाठी आमचा ट्विट पोस्ट करणे लेख वाचा.

मला Twitter ला अपडेट्स कसे पाठवता येतील?

आमचा ट्विट पोस्ट कसे करावे याविषयीचा लेख वाचा. आपण twitter.com, मोबाईल उपकरण किंवा एखाद्या अनुप्रयोगावरून ट्विट करू शकता. 

पुनर्ट्विट म्हणजे काय?

 पुनर्ट्विट म्हणजे आपण आपल्या फॉलोअर्सना फॉरवर्ड करता ते ट्विट होय.

मी Twitter वर चित्र पोस्ट कसे करावे?

Twitter वर प्रतिमा अपलोड आणि शेअर करणे सोपे आहे!  Twitter वर चित्र पोस्ट कसे करावे यासाठी क्रमवार सूचना आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा.

ट्विट पोस्ट केल्यानंतर मला ते संपादित करता येते का?

नाही ट्विट एकदा पोस्ट केल्यानंतर आपण ते संपादित करू शकत नाही, परंतु आपण आपले ट्विट हटवू शकता.

आपले दृश्य सानुकूल करण्याच्या पद्धती

twitter.com वरून आपल्याला हवा तो फॉन्ट आकार, मजकूर रंग आणि पार्श्वभूमी मोड व्यवस्थापित करण्यासाठी अधिक  क्लिक करून नंतर मेनूमधून प्रदर्शित करा निवडा. आपला प्राधान्यकृत फॉन्ट आकार, रंग निवडा. डिफॉल्ट पांढरी पार्श्वभूमी किंवा गडद मोड पर्याय डीम आणि लाईट्स आउटमधून निवडण्यासाठी रेडिओ बटणे वापरा.  Twitter for iOS आणि Twitter for Android वर देखील गडद मोड पर्याय उपलब्ध आहेत.

माझे अपडेट्स कोण वाचते?

आपले फॉलोअर्स आपली ट्विट्स वाचतात. आपल्या ट्विट्स सार्वजनिक असल्यास, आपल्या ट्विटमध्ये एखाद्या कीवर्डचा शोध घेणाऱ्या कोणालाही तो संदेश पाहता येऊ शकतो. आपल्या ट्विट्स डिफॉल्ट रूपात सार्वजनिक असतात; आपल्याला माहीत नसलेले लोक आपले अपडेट्स वाचतील याचा जर आपल्याला संकोच वाटत असेल तर, फॉलोअर्स मंजूर करण्यासाठी आणि आपले अपडेट्स शोधापासून दूर राखण्यासाठी आपल्या ट्विट्स सुरक्षित ठेवा.

मला माझ्या सर्व ट्विट्स का दिसत नाहीत? त्या हरवल्या आहेत का?

आम्ही आपल्या सर्व ट्विट्स संग्रहित करतो. आपल्या प्रोफाइल टाइमलाइनमध्ये आपल्या सर्वात अलीकडील जास्तीत जास्त 3,200 ट्विट्स पाहण्यासाठी आपल्या प्रोफाइलमध्ये नॅव्हिगेट करा. अधिक पाहण्यासाठी, आपण आपला Twitter संग्रह डाउनलोड करू शकता आणि आपल्या पहिल्या ट्विटपासून सुरुवात करून, आपल्या Twitter माहितीचा एक स्नॅपशॉट ब्राउझ करू शकता.

मला माझे Twitter अपडेट्स माझ्या ब्लॉगवर ठेवता येतात का?

होय! Javascript किंवा HTML स्वीकारणाऱ्या आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर कुठेही एक Twitter विजेट ठेवा.

 

फॉलो करणे

एखाद्याला Twitter वर फॉलो करण्याचा काय अर्थ होतो?

एखाद्यालाफॉलो करणे म्हणजे आपण त्याच्या Twitter अपडेट्सची सदस्यता घेणे निवडले आहे. जेव्हा आपण एखाद्याला फॉलो करता तेव्हा, दरवेळी त्यांनी एखादा संदेश पोस्ट केला की, तो आपल्या Twitter होम टाइमलाइनवर दिसेल.

मी फॉलो करण्यासाठी लोकांना कसे शोधावे?

आपण खाते तयार करता तेव्हा, आपण नावाने किंवा उपभोक्ता नावाने लोकांना शोधू शकता, इतर नेटवर्कवरून मित्रांची नावे आयात करू शकता किंवा ई-मेलवरून मित्रांना आमंत्रितकरू शकता. 

मी कोणाला फॉलो करत आहे ते मला कसे समजेल?

एखाद्याच्या प्रोफाइलवर आपण फॉलो बटण क्लिक किंवा टॅप केल्यावर, आपण त्यांना फॉलो करत असता. आपल्या प्रोफाइल पृष्ठावरील किंवा आपल्या होम पृष्ठाच्या साईडबारवरील फॉलोईंग लिंक क्लिक करून आपण फॉलो करत असलेल्या लोकांची यादी पहा.

मला कोण फॉलो करत आहे ते मला कसे समजेल?

कोणी नवीन व्यक्ती आपल्याला फॉलो करते तेव्हा Twitter आपल्याला सूचनापत्र पाठवते. आपले नवीन फॉलोअर असतील तेव्हा आपल्याला सूचित करण्यासाठी आपली ई-मेल प्राधान्ये आणि मोबाईल पुश सूचनापत्रे सेट करा. आपल्याला कोण फॉलो करत आहे ते आपल्या प्रोफाइल पृष्ठावरील फॉलोअर्स लिंकवरून सुद्धा आपल्याला समजेल.

फॉलो मर्यादा काय आहेत?

Twitter ला स्थिरता आणि गैरवर्तन नियंत्रणासाठी मर्यादा फॉलो आणि अपडेट केल्या आहेत.  फॉलो मर्यादा याविषयी अधिक जाणून घ्या.

 

प्रत्युत्तरे

प्रत्युत्तरे म्हणजे काय?

 प्रत्युत्तर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या ट्विटला दिलेला प्रतिसाद. दुसऱ्या व्यक्तीच्या ट्विटला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यावरील प्रत्युत्तर प्रतीक क्लिक किंवा टॅप करा. कृपया नोंद घ्या की जर आपल्या ट्विट्स संरक्षित असतील तर, आपल्याला फॉलो करत नसलेल्या लोकांना आपली प्रत्युत्तरे किंवा उल्लेख दिसणार नाहीत. 

प्रत्युत्तर आणि थेट संदेशामध्ये काय फरक आहे?

 प्रत्युत्तर म्हणजे सार्वजनिक संदेश जो फॉलो न करताही दिला जातो. तो कोणालाही पाहता येतो (आपल्या ट्विट्स सार्वजनिक असल्यास).  थेट संदेश हा खाजगी संदेश असतो आणि फक्त प्रेषक आणि इच्छित प्राप्तकर्त्यांनाच दिसू शकतो.

 

थेट संदेश

थेट संदेश काय आहेत?

थेट संदेश हे एका Twitter खात्यावरून दुसऱ्या Twitter खात्या(त्यां)मध्ये पाठवलेले खाजगी संदेश असतात आणि इतर कोणालाही वाचण्यासाठी ते सार्वजनिकरीत्या दिसत नाहीत. आपल्याला फॉलो करणाऱ्या कोणाही बरोबर आपण चर्चा सुरू करू शकता.

 

Twitter धोरणे आणि रिपोर्ट करणे

खाती स्थगित का केली जातात?

खाती सेवा अटी उल्लंघनांसाठी किंवा स्पॅम तपासणीसाठी स्थगित केली जातात.  खाते स्थगिती याविषयी अधिक वाचा.

मी स्पॅमचा रिपोर्ट कसा करावा?

 Twitter वर स्पॅमचा रिपोर्ट कसा करावा याविषयीचा आमचा लेख वाचा. आपल्याला आढळणाऱ्या कोणत्याही स्पॅमर्सना आपण नेहमी अवरोधित करावे. 

Twitterच्या सेवा अटींबाबत मला आणखी माहिती कुठे मिळू शकेल?

अधिक माहितीसाठी Twitter च्या सेवा अटी आणि Twitter चे नियम वाचा. 

कॉपीराईट, तोतयागिरी, ट्रेडमार्क किंवा इतर सेवा अटी समस्यांबाबत मी तक्रार कशी सबमिट करावी?

उल्लंघन कशामुळे आहे आणि संबंधित समस्या दूर करण्यासाठी काय करावे याविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सेवा अटी विभागाचे पुनरावलोकन करा.