एकाधिक खाती व्यवस्थापित करण्याच्या पद्धती

आपल्याकडे एकाधिक Twitter खाती असल्यास, त्यांना आपल्याTwitter for iOS किंवा Android अनुप्रयोग आणि डेस्कटॉपवर, mobile.twitter.com, Twitter Lite आणि Twitter for Windows समाविष्ट करणे आणि ती ऍक्‍सेस करणे सोपे आहे.

अतिरिक्त खाती समाविष्ट करण्याच्या पद्धती
IOS साठी:
1 पायरी

नॅव्हिगेशन मेनू  प्रतीक टॅप करा.

2 पायरी

आणखी प्रतीकावर  टॅप करा

3 पायरी

येथून आपण नवीन खाते तयार करणे किंवा सध्याचे खाते समाविष्ट करणे ही कार्ये करू शकता.

4 पायरी

एकदा आपण आपले अतिरिक्त खाते(ती) समाविष्ट केल्यानंतर, आपल्याला वापरायचे आहे अशा खात्याच्या प्रोफाइल प्रतीकावर टॅप करून, नंतर  च्या पुढील अत्यंत लहान, अतिरिक्त प्रोफाइल प्रतीक(के) टॅप करून खाती अॅक्सेस करू शकता. मागे परत येण्यासाठी नॅव्हिगेशन मेनू पुन्हा टॅप करा.

नोट:   आपल्या iOS अनुप्रयोगावरून नवीन खात्यासाठी साइन-अप करण्यासाठी मदत मिळवा.  किंवा, आपला पासवर्ड रिसेट कसा करायचा हे जाणून घ्या.

Android साठी:
1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.

2 पायरी

हेडरमध्ये खाली बाण प्रतीक  टॅप करा.

3 पायरी

येथून आपण नवीन खाते तयार करणे किंवा सध्याचे खाते समाविष्ट करणे ही कार्ये करू शकता.

4 पायरी

एकदा आपण आपले अतिरिक्त खाते समाविष्ट केली की, आपण शीर्षकामध्ये खाली दिशेचा बाण टॅप करून खात्यांमध्ये टॉगल करू शकता.

नोट: आपल्या Android अनुप्रयोगावरून नवीन खात्यामध्ये साइन-अप करण्यासाठी मदत मिळवा. किंवा, आपला पासवर्ड रिसेट कसा करायचा हे जाणून घ्या.


डेस्कटॉपवरून एकाच वेळी एकाअधिक Twitter खात्यामध्ये लॉग इन कसे करता येईल?
 

 • बाजूच्या मेनूवर, आपले प्रोफाइल प्रतीक क्लिक करा.
 • आणखी प्रतीक  किंवा अधिक प्रतीक निवडा
 • येथून आपण सध्याचे खाते समाविष्ट करू शकता.
 • एकदा आपण आपले खाते(ती) समाविष्ट केले की, आपण प्रोफाइल प्रतीक क्लिक करून आणि नंतर आणखी प्रतीक  च्या पुढील अत्यंत लहान, अतिरिक्त प्रोफाइलप्रतीक(के) टॅप करून आपण त्यांच्यामध्ये टॉगल करू शकता.
   

mobile.twitter.com वरून मला एकावेळी एकापेक्षा अधिक Twitter खात्यांमध्ये लॉग इन कसे करता येईल?
 

 • सर्वात वरती डावीकडे, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 •  आणखी प्रतीक  टॅप करा
 • येथून आपण सध्याचे खाते समाविष्ट करू शकता.
 • एकदा आपण आपले खाते(ती) समाविष्ट केले की, आपण प्रोफाइल प्रतीकावर दीर्घकाळ दाबून आणि नंतर आणखी प्रतीक  च्या पुढील अत्यंत लहान अतिरिक्तप्रोफाइल प्रतीक(के) टॅप करून आपण त्यांच्यामध्ये टॉगल करू शकता.
   

Twitter Lite वरून मला एकावेळी एकाअधिक Twitter खात्यांमध्ये लॉग इन कसे करता येते?
 

 • सर्वात वरती डावीकडे, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.
 • आणखी प्रतीक  निवडा
 • येथून आपण सध्याचे खाते समाविष्ट करू शकता.
 • एकदा आपण आपले खाते(ती) समाविष्ट केले की, आपणप्रोफाइल प्रतीकावर दीर्घकाळ दाबून आणि नंतर आणखी प्रतीक  च्या पुढील अत्यंत लहान अतिरिक्त प्रोफाइल प्रतीक(के) टॅप करून आपण त्यांच्यामध्ये टॉगल करू शकता.
   

मी Twitter for Microsoft वरून मला एका वेळी एकापेक्षा अधिक Twitter खात्यात लॉग इन कसे करू?
 

 • सर्वात वरती डावीकडे, आपले प्रोफाइल प्रतीक क्लिक करा.
 •  आणखी प्रतीक  निवडा
 • येथून आपण सध्याचे खाते समाविष्ट करू शकता.
 • एकदा आपण आपले खाते(ती) समाविष्ट केले की, आपण प्रोफाइल प्रतीक क्लिक करून आणि नंतर आणखी प्रतीक  च्या पुढील अत्यंत लहान, अतिरिक्त प्रोफाइलप्रतीक(के) टॅप करून आपण त्यांच्यामध्ये टॉगल करू शकता.
   

मी दोन किंवा अधिक Twitter खाती एकामध्ये विलीन किंवा एकत्र करू शकतो/ते?
 

आम्ही सध्या एका खात्यातून एकाधिक खात्यांमध्ये विलीन करण्याचा किंवा डेटा (ट्विट्स, फॉलोइंग किंवा फॉलोअर्स) एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये स्थानांतरित करण्याचा मार्ग पुरवित नाही आहोत.

हा लेख शेअर करा