लॉक किंवा मर्यादित केलेल्या खात्यांच्या संदर्भातील साहाय्यता

आम्ही खाते लॉक करू शकतो किंवा खाते तडजोड केलेले किंवा Twitter चे नियम किंवा सेवा अटी यांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आल्यास काही खाते वैशिष्ट्यांवर तात्पुरती मर्यादा घालू शकतो. आपण लॉग इन केल्यास किंवा आपला अनुप्रयोग उघडल्यानंतर आपले खाते लॉक झाले आहे किंवा आपल्या खात्यातील काही वैशिष्ट्ये मर्यादित केल्याचा संदेश दिसल्यास, ते पुनर्स्थापित करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा किंवा अधिक माहितीसाठी वाचन पुढे चालू ठेवा.


आपले खाते सुरक्षिततेच्या उद्देशाने लॉक केले आहे


आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन केले असल्यास आणि आपले खाते सुरक्षिततेच्या उद्देशाने लॉक केले आहे असा संदेश आपणास दिसणे म्हणजे आम्हाला संशयास्पद वर्तन आढळले आहे आणि आपल्या खात्याशी तडजोड करण्यात आल्याचे आम्हाला आढळले आहे. आपले खाते अनलॉक करण्यासाठी, कृपया आपला पासवर्ड बदलून ते त्वरित सुरक्षित ठेवा.

आपल्या खात्याशी संबंधित ई-मेल पत्ता असल्यास आम्ही त्या पत्त्यावर सूचना देखील पाठवल्या आहेत. आपणास आमच्याकडील ई-मेल दिसत नसल्यास, कृपया आपले स्पॅम, जंक आणि सोशल फोल्डर पहा.

आपले खाते सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतीवरील टिप्स वाचा.

खाते अनलॉक करण्यासाठी आपणास अधिक मदत हवी असल्यास आमच्या समर्थन कार्यसंघाशी संपर्क साधा.
 

आपले खाते लॉक केले आहे आणि आपण वैध मालक आहात याची आम्हाला पुष्टी करणे आवश्यक आहे.

आपल्या खात्यामध्ये Twitter चे नियम याचे उल्लंघन करणारे स्वयंचलित वर्तन दिसून येत असल्यास आम्ही ते लॉक करू शकतो आणि खात्याचे वैध मालक असल्याची खात्री करण्याची विनंती करू शकतो.

खाते अनलॉक करण्यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा:

  1. आपल्या खात्यामध्ये लॉग इन करा.
  2. आपले खाते लॉक झाले आहे असे आपणास कळवणारा संदेश शोधा.
  3. सुरुवात करा बटणावर क्लिक किंवा टॅप करा.
  4. आपला फोन क्रमांक प्रविष्ट करा. कृपया लक्षात ठेवा की आम्ही हा फोन क्रमांक आपल्या खात्याशी संबद्ध करू.
  5. आम्ही आपणास मजकूर संदेश पाठवू किंवा आपणास सत्यापन कोड कळविणारा फोन कॉल येईल. आपल्या फोनवर कोड वितरित होण्यासाठी काही मिनिटे लागू शकतात.
  6. एकदा आपण सत्यापन कोड प्रविष्ट केल्यानंतर, आपले खाते अनलॉक करण्यासाठी सबमिट करा क्लिक किंवा टॅप करा.

आपल्या खात्याशी संबंधित ई-मेल पत्ता असल्यास आम्ही त्या पत्त्यावर सूचना देखील पाठवल्या आहेत. आपणास आमच्याकडील ई-मेल दिसत नसल्यास, कृपया आपले स्पॅम, जंक आणि सोशल फोल्डर्स पहा.

खाते अनलॉक करण्यासाठी आपणास अधिक मदत हवी असल्यास आमच्या समर्थन कार्यसंघाशी संपर्क साधा.

आपले खाते या स्थितीमध्ये असल्यास, आपल्या प्रोफाइलवर भेट देणाऱ्या लोकांना या खात्याने असामान्य कृती दाखवल्या आहेत आणि त्यांना ते अजून पहायचे आहे याची पुष्टी करण्यास सांगणारा संदेश दिसू शकतो.


कदाचित Twitter च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने आपले खाते मर्यादित केले आहे
 

 

आपल्या खात्याने Twitter चे नियम उल्लंघन केल्याने ते मर्यादित केले आहे. तरीही आपण Twitter ब्राउझ करू शकता, परंतु या स्थितीमध्ये असताना आपण केवळ आपल्या फॉलोअर्सना थेट संदेश पाठवू शकता. ट्विट करणे, पुन्हा ट्विट करणे किंवा पसंत करणे यासारख्या कृतींमध्ये आपण सहभागी होऊ शकणार नाही आणि केवळ आपले फॉलोअर्स आपल्या पूर्वीच्या ट्विट्स पाहू शकतात.

आपल्या मर्यादित स्थितीवर काउंटडाउन सुरू करण्यापूर्वी आम्ही आपणास काही क्रियाकलाप पूर्ण करण्यास सांगू शकतो. या क्रियाकलापांमध्ये आपला ई-मेल पत्ता सत्यापित करणे, आपल्या खात्यामध्ये फोन क्रमांक समाविष्ट करणे किंवा आमच्या नियमांचे उल्लंघन करणारे ट्विट्स हटवणे यांचा समावेश असू शकतो.

आपले खाते पुनर्स्थापित करण्यासाठी लॉग इन करून आम्ही आपल्या खात्यामधील काही वैशिष्ट्ये तात्पुरती मर्यादित केली आहेत हे कळवणारा संदेश शोधा. सुरुवात करा क्लिक किंवा टॅप करा आणि विनंती केलेल्या क्रिया पूर्ण करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा.

नोट: Twitter नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास कायमस्वरूपी (खाते) स्थगिती होऊ शकते.

आपले खाते चुकून मर्यादित झाले आहे असे आपणास वाटत असल्यास आपण आमच्या समर्थन कार्यसंघाशी संपर्क साधून अपील करू शकता.

आपले खाते तात्पुरते प्रतिबंधित असल्यास, जे लोक आपल्या प्रोफाइलवर भेट देतात त्यांना या खात्याने Twitter च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आणि त्यांना ते अजून पहायचे आहे याची पुष्टी करण्यास सांगणारा संदेश दिसू शकतो.
 

आपल्या खात्यामधील काही वैशिष्ट्ये संशयास्पद क्रियाकलापांमुळे मर्यादित आहेत


आपल्या खात्यामध्ये Twitter च्या नियमांचे उल्लंघन करणारे आक्रमक फॉलोइंग किंवा आक्रमक प्रतिबद्धता (जसे की पसंती, पुनर्ट्विट आणि ट्विट विषयी भाष्य) प्रदर्शित केल्याचे दिसत असल्यास, आपल्या खात्याची वैशिष्ट्ये एका विशिष्ट वेळेसाठी मर्यादित आहेत असा संदेश आपणास दिसेल.

आपल्याकडे निवडण्यासाठी खालील दोन पर्याय असतील:

  • सूचीबद्ध केलेल्या निर्दिष्ट वेळेसाठी Twitter चा वापर तात्पुरत्या, मर्यादित स्थितीत करा.
  • आपला फोन क्रमांक किंवा ई-मेल पत्ता सत्यापित करण्यासाठी आमच्या सूचना पूर्ण करा.
     

Twitter तात्पुरत्या, मर्यादित स्थितीमध्ये वापरण्यासाठी आपण केवळ Twitter वर पुढे चालू ठेवा क्लिक किंवा टॅप करू शकता. आपल्या मर्यादित स्थितीच्या काळामध्ये शोध परिणाम आणि सूचनांबरोबर आपले खाते आणि ट्विट्स, Twitter वरील काही ठिकाणांहून फिल्टर केले जाऊ शकतात. आपण Twitter वर पुढे चालू ठेवा निवडल्यास आपणास परत जाऊन सत्यापनाचे पर्याय निवडता येणार नाही.

आपला फोन क्रमांक किंवा ई-मेल पत्ता सत्यापित करून आपले खाते पुनर्स्थापित करण्यासाठी, सत्यापित करा क्लिक किंवा टॅप करा आणि आम्ही दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. आपला फोन क्रमांक आणि ई-मेल पत्ता सत्यापित करण्यामुळे Twitter वर संभाव्य स्वयंचलित किंवा स्क्रिप्ट केलेले क्रियाकलाप कमी करण्यास मदत होते.

नोट: आपले खाते Twitter च्या नियमांचे वारंवार उल्लंघन करत असल्याचे किंवा इतर खात्यांशी आक्रमकपणे सहभागी झाल्याचे दिसत असल्यास, आपणास फोनवरून सत्यापन करण्याचा पर्याय दिला जाणार नाही. या प्रकरणामध्ये आपण सूचीबद्ध केलेल्या निर्दिष्ट वेळेसाठी मर्यादित स्थितीमध्ये केवळ Twitter वापरू शकाल.

आपली लॉक केलेली खाती निष्क्रिय करण्याच्या पद्धती

आपले लॉक केलेले खाते निष्क्रिय करण्यासाठी, कृपया आमचे समस्यानिवारणावरील लेख वाचाकिंवायेथे विनंती सबमिट करा. विनंत्या आमच्या गोपनीयता धोरणाच्या "आमच्याशी कसा संपर्क साधावा" विभागात सूचीबद्ध केलेल्या संपर्कांना देखील पाठवल्या जाऊ शकतात.
 

आपल्या वैयक्तिक माहितीच्या प्रतीसाठी विनंती कशी करावी

लॉक केलेली खाती त्यांची माहिती पाहण्यासाठी येथे विनंती सबमिट करू शकतात. आमच्या गोपनीयता धोरणच्या विभागामधील "आमच्याशी संपर्क साधण्याच्या पद्धती" यामध्ये सूचीबद्ध केलेल्या विनंत्या, संपर्कांना देखील संबोधित केल्या जाऊ शकतात.

आपले खाते चुकून लॉक झाले आहे असे आपणास वाटत असल्यास आपण आमच्या समर्थन कार्यसंघाशी संपर्क साधून अपील करू शकता.
 

आपल्या खात्यामधील काही वैशिष्ट्ये तात्पुरती मर्यादित आहेत.


चर्चा म्हणजे Twitter चा आत्मा, परंतु जर आम्हाला असे वर्तन आढळले जे कदाचित Twitter चे नियमचे उल्लंघन करत आहे किंवा इतर लोकांच्या स्वतःला मुक्तपणे व्यक्त होण्याच्या क्षमतेस प्रतिबंधित करत आहे, तर आम्ही खाते वैशिष्ट्यांवर तात्पुरती मर्यादा घालू शकतो. उदाहरणार्थ, याचा अर्थ असा होऊ शकतो की केवळ आपले फॉलोअर्स ट्विट्स, पसंत्या, पुन्हा ट्विट करणे इत्यादींसह आपले Twitter वरील कृती पाहू शकतात. संभाव्य अपमानास्पद मजकुर पाहण्याची व्याप्ती मर्यादित केल्याने एक सुरक्षित वातावरण आणि अधिक कार्यक्षम Twitter समुदाय तयार होतो.

जेव्हा आपण लॉग इन करता आणि हा संदेश पाहता, तेव्हा आपले खाते वैशिष्ट्ये पुनर्स्थापित करण्यासाठी काउंटडाउन सुरू करण्यासाठी Twitter वर पुढे चालू ठेवा क्लिक किंवा टॅप करा. आपण Twitter चे अपमानास्पद वर्तनाविषयीचे धोरण विषयी अधिक वाचू शकता आणि आमच्या द्वेषपूर्ण वर्तन धोरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे पाहू शकता.

हा लेख शेअर करा