द्वि-घटक प्रमाणीकरण सहाय्यता

माझा फोन हरवला आहे
 

 • आपण द्वि-घटक प्रमाणीकरण (2FA) मध्ये नावनोंदणी केली असेल आणि आपण बॅकअप कोड जनरेट केला असेल तर, आपले खाते अॅक्सेस करण्यासाठी बॅकअप कोड प्रविष्ट करून आपली मोबाईल सेटिंग्ज अपडेट करा.
 • आपण आता आपल्या खात्यामध्ये लॉग इन केलेले नसल्यास आणि सक्रिय बॅकअप कोडमध्ये आपल्याला अॅक्सेस नसल्यास, कृपया सहाय्यासाठी आमच्या समर्थन कार्यसंघाशी संपर्क साधा.

नोट: आपण आपल्या खात्यामध्ये SMS मजकूर संदेश द्वि-घटक प्रमाणीकरण चालू असल्यास (आणि केवळ द्वि-घटक प्रमाणीकरण पर्याय चालू असेल) आणि आपण अजूनही लॉग इन केलेले असल्यास आपण twitter.com वर आपल्या मोबाईल सेटिंग्जमधून आपला फोन क्रमांक काढून टाकू शकता. माझा फोन क्रमांक हटवा क्लिक करा आणि आपल्या खात्याचे द्वि-घटक प्रमाणीकरण स्वयंचलितपणे बंद होईल.

मी नवीन फोन विकत घेतला आहे
 

 • आपण आपला जुना फोन क्रमांक बदलण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेण्याची आम्ही शिफारस करतो. यामुळे आपणास आपल्या नवीन उपकरणावर आपले अनुप्रयोग सत्र पुनर्संचयित करता येईल, ज्यामुळे आपण द्वि-घटक प्रमाणीकरण वापरणे पुढे चालू ठेवू शकाल. (नोट: आपण Twitter for iOS वर असाल तर, आपली अनुप्रयोग कळ जपून ठेवण्यासाठी आपण एनक्रिप्टेड बॅकअप घ्यावा अशी आम्ही शिफारस करतो. थोडक्यात, केवळ iCloud बॅकअप्स कळ जतन करत नाही आणि एनक्रिप्टेड बॅकअपशिवाय twitter.com वर तयार झालेला तात्पुरता पासवर्ड वापरुन आपल्या अनुप्रयोगामध्ये पुन्हा लॉग इन करावे लागेल)
 • आपण आपल्या जुन्या फोनवरील द्वि-घटक प्रमाणीकरणावरून किंवा आपल्याकडे विद्यमान चालू वेब सत्र असल्यास twitter.com वरून देखील नोंदणी रद्द करू शकता. आपल्याकडे चालू वेब सत्र, तसेच जुना फोन नसल्यास आपण आपला बॅकअप कोड वापरून twitter.com वर पुन्हा लॉग इन करू शकता.
 • आपले खाते सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतीच्या टिप्स विषयी जाणून घ्या.
   

मला SMS कोड मिळाला नव्हता
 

 • SMS संदेश वितरणाला वेळ लागू शकतो. कृपया पुन्हा साइन इन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी किमान दोन मिनिटे प्रतीक्षा करा.
 • आपण लॉग इन केले असल्यास, आपला फोन क्रमांक आपल्या मोबाईल सेटिंग्जमध्ये योग्यरित्या चालू आहे हे सत्यापित करा. 
 • आपण अलीकडे आपला फोन क्रमांक किंवा मोबाईल कॅरियर बदलल्यास आपली सेटिंग्ज अपडेट करणे आवश्यक आहे. आपण अजूनही लॉगइन केले असल्यास, आपण वेब, iOS किंवा Android अनुप्रयोगांवरून हे करू शकता. अन्यथा, लॉग इन करण्यासाठी आपण बॅकअप कोड वापरू शकता आणि आपली सेटिंग्ज बदलू शकता. बॅकअप कोडविषयी अधिक माहिती खाली आहे.
 • आपला मोबाईल ऑफलाइन किंवा फ्लाइट मोडवर असल्यास, कदाचित आपणास आपण SMS वरून द्वि-घटक प्रमाणीकरण कोड मिळण्यास अडचण येऊ शकते. वैकल्पिकरित्या, आपण आपल्या Twitter वरून Twitter for iOS किंवा Twitter for Android वरून किंवा twitter.com च्या माध्यमातून QR कोड (सूचना खाली सूचीबद्ध केल्या आहेत) तयार करू शकता.
   
माझा फोन ऑफलाईन किंवा फ्लाईट मोडवर आहे

Twitter for iOS आणि Twitter for Android अनुप्रयोगांवर कोड तयार करण्याच्या पद्धती:

 1. आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयता येथे जा.
  • Twitter for iOS वर: सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.
  • Twitter for Android वर: सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.
 2. खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा.
 3. कोड जनरेटर लॉगइन टॅप करा. 
 4. आपल्या Twitter खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी दाखवलेला कोड वापरा.

 


मला माझ्या फोनवर लॉग इन करता येत नाही
 

 • आपली मोबाईल सेटिंग्ज समायोजित केल्यामुळे या समस्येचे निवारण करण्यास मदत होऊ शकते. डेस्कटॉप किंवा लॅपटॉप संगणकावरून twitter.com वर लॉग इन करा.
 • वैकल्पिकरित्या, आपण द्वि-घटक प्रमाणीकरणामध्ये नोंदणी करण्यासाठी वापरलेल्या उपकरणावरून आपल्या खात्यामधून साइन आउट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे ते बंद होईल आणि आपण नंतर आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड वापरून साइन इन करू शकता. साइन-आउट सूचनांसाठी या लेखांना भेट द्या: Twitter for iOS किंवा Twitter for Android.
   

मला पुश सूचनापत्र मिळाले नाही
 

 • आपली मोबाईल सूचनापत्रे चालू आहेत हे पहा. आपल्या उपकरणावर आपण मोबाईल सूचनापत्रे चालू केली नसल्यास आपणास लॉगइन पुश सूचनापत्रे मिळणार नाहीत.
 • मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व विनंत्यांची यादी पाहण्यासाठी आपल्या अनुप्रयोगातून आपण आपल्या अलीकडील लॉगइन विनंत्या नेहमीच पाहू शकता. अगदी अलीकडील विनंत्या पाहण्यासाठी पृष्ठ रिफ्रेश करण्याकरिता यादी खाली खेचा.
   

Twitter for iOS वापरत असल्यास:

 1. सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.
 2. खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा.
 3. सर्व विनंत्यांची यादी पाहण्यासाठी लॉगइन विनंत्या टॅप करा.
 4. आपल्या प्रक्रियेमध्ये अजूनही व्यत्यय येत असल्यास आपल्या फोनवर मजकूर संदेशावरून लॉगइन कोड पाठवण्याची आपण विनंती करू शकता. twitter.com वर जेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन कराल तेव्हा SMS वरून आपल्या फोनवर पाठविलेल्या कोडची विनंती करा लिंकवर क्लिक करा.
   

Twitter for Android वापरत असल्यास:

 1. सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.
 2. सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.
 3. खाते टॅप करा आणि सुरक्षा निवडा.
 4. लॉगइन विनंत्यासाठी पर्याय टॅप करा.
 5. आपल्या प्रक्रियेमध्ये अजूनही व्यत्यय येत असल्यास आपल्या फोनवर मजकूर संदेशावरून लॉगइन कोड पाठवण्याची आपण विनंती करू शकता. twitter.com वर जेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये लॉग इन कराल तेव्हा SMS वरून आपल्या फोनवर पाठविलेल्या कोडची विनंती करा लिंकवर क्लिक करा.
   

माझे बॅकअप कोड्स वापरायचा प्रयत्न केला की त्रुटी उद्भवत आहे

 • आपण निष्क्रिय बॅकअप कोड वापरून लॉगइन करण्याचा प्रयत्न केला किंवा निष्क्रिय बॅकअप कोड वापरण्याचा प्रयत्न केला असल्यास आपल्याला त्रुटी संदेश दिसेल. लॉग इन करण्यासाठी आपल्याला नवीन बॅकअप कोड तयार करावा लागेल.
 • जेव्हा आपण twitter.com, mobile.twitter.com, Twitter for iOS किंवा Android, किंवा अन्य Twitter क्लायंटवरून लॉग इन कराल केवळ तेव्हाच आपले बॅकअप कोड कार्यरत होतील. आपण आपल्या Twitter खात्याशी निगडीत तृतीय पक्ष अनुप्रयोग अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपणास आपल्या बॅकअप कोडच्या ऐवजी तात्पुरता पासवर्ड वापरावा लागेल.
   

बॅकअप कोड्स वापरणे
 

आपण आपल्या iOS किंवा Android Twitter अनुप्रयोगावरून द्वि-घटक प्रमाणीकरण चालू करता तेव्हा आपल्यासाठी बॅकअप कोड स्वयंचलितपणे जनरेट होतो. आपण twitter.com वर बॅकअप कोड तयार देखील करू शकता. हा बॅकअप कोड लिहून ठेवा, प्रिंट करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपला मोबाईल हरवल्यास किंवा आपला फोन क्रमांक बदलल्यास आपल्या खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपण हा बॅकअप कोड वापरू शकता. बॅकअप कोड्स हे तात्पुरत्या पासवर्ड्ससारखे नसतात.
 

आपल्या Twitter अनुप्रयोगावरून नवीन बॅकअप कोड तयार करण्यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा:

 1. आपल्या सेटिंग्ज आणि गोपनीयता येथे जा (iOS उपकरणावर, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा; Android उपकरणावर, नॅव्हिगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा).
 2. खाते टॅप करा, नंतर सुरक्षा टॅप करा.
 3. बॅकअप कोड टॅप करा.
 4. आपला बॅकअप कोड वापरण्यासाठी, आपले नेहमीचे उपभोक्ता नाव आणि पासवर्डवरून Twitter मध्ये लॉग इन करा.  द्वि-घटक प्रमाणीकरण विनंती पाठविली आहे असे आपणास दिसले की आपला बॅकअप कोड प्रविष्ट करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. साईटला लॉग इन करण्यासाठी आपण निर्माण केलेला बॅकअप कोड एंटर करा.

नोट: कोणत्याही वेळी आपण जातीत जास्त पाच सक्रिय बॅकअप कोड्स तयार करू शकता. आपण ज्या क्रमाने कोड्स जनरेट केले आहेत त्याच क्रमाने ते वापरणार असल्याची खात्री करा; निष्क्रिय कोड वापरल्यामुळे पूर्वी तयार केलेले सर्व कोड्स अवैध होतील.


मी एक Verizon ग्राहक आहे आणि मला माझ्या खात्यामध्ये लॉग इन करता येत नाही.

आपण नवीन किंवा विद्यमान Verizon ग्राहक असल्यास, आपणास संदेशावरून आपण द्वि-घटक प्रमाणीकरण PIN मिळत नसल्याने आपल्या खात्यामध्ये लॉग इन करू शकणार नाही. आपल्या Twitter खात्यातून लॉग आऊट करून परत लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. नंतर आपल्याला SMS वरून सत्यापन PIN मिळेल. यामुळे आपली समस्या दूर न झाल्यास आपल्या उपकरणावरून पुढे जा असा संदेश Twitter शॉर्ट कोड 40404 वर पाठवा. यामुळे आपण Twitter वरून SMS मिळण्याची निवड कराल, जे आपल्या सूचनापत्र सेटिंग्जशी सातत्यपूर्ण आहे.

हा लेख शेअर करा