आपला संपर्क वाढविण्याच्या पद्धती

आपण ट्विट केलेल्या कशाविषयी जेव्हा आपण उत्सुक असता आणि ते आपल्याला आणखी लोकांबरोबर शेअर करायचे असते तेव्हा, आपण संपर्क वाढविण्यासाठी आणि जास्त मोठा प्रेक्षकवर्ग मिळविण्यास मदत करण्यासाठी ते प्रमोट करू शकता. ट्विट प्रमोट करणे सोपे आहे आणि पुढे जाताना प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि निकाल पाहण्यास मदत करण्याकरिता आम्ही टूल्स पुरवितो.

अधिक लोकांपर्यंत संपर्क साधण्याच्या पद्धती

सुरुवात करण्यासाठी, आपल्याला जे ट्विट प्रमोट करायचे आहे ते शोधा (आपण केवळ आधी पोस्ट केलेले आपण ट्विट प्रमोट करू शकता):

 1. आपल्या प्रोफाइलवर जा.
  1. वेबद्वारा: आपले प्रोफाइल प्रतीक क्लिक करा.
  2. Twitter for iOS वर: सर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर प्रोफाइल टॅप करा.
  3. Twitter for Android वर: सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक  किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा आणि नंतर प्रोफाइल टॅप करा.
 2. आपणास जे ट्विट प्रमोट करायचे आहे ते शोधा.
 3. ट्विट क्रियाकलाप पहा प्रतीक  क्लिक किंवा टॅप करा
 4. आपले ट्विट प्रमोट करा क्लिक किंवा टॅप करा.
 5. पहिल्यांदा आपण आपले ट्विट प्रमोट कराल तेव्हा खालील माहिती प्रदान करा:
 6. आपला देश आणि वेळ क्षेत्र निवडा, आपली संपर्क माहिती प्रदान करा आणि Twitter जाहिरात अटी मान्य करा. नंतर पुढील टॅप करा.
 7. आपली क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती आणि आपला बिलिंगचा पत्ता एंटर करा. नंतर पुढील टॅप करा. 
  नोट: ही माहिती भविष्यातील प्रमोटेड ट्विट्ससाठी सुरक्षितपणे संग्रहित केली जाईल.
 8. लक्ष्यीकरण खाली, आपल्याला आपले ट्विट जिथे लक्ष्यित करायचे असेल ते स्थान निवडा. आपण जगभरात निवडू शकता किंवा आपल्या स्थानाजवळचा लक्ष्य भाग निवडू शकता.
 9. बजेट खाली, आपल्याला जितकी रक्कम खर्च करायची आहे ती निवडा. आपण $10 आणि $2,500 दरम्यान (किंवा स्थानिक समतुल्य) खर्च करू शकता आणि आम्ही प्रत्येक रकमेसाठी अंदाजे सहभागांची संख्या आपल्याला दाखवू.
 10. आपल्या प्रमोशनला वेग देण्यासाठी खर्चाची पुष्टी करा क्लिक किंवा टॅप करा.

नोट: एकदा प्रमोशन सायकल संपल्यानंतर, आपण पुन्हा त्याच ट्विटचे प्रमोशन करू शकता.


प्रगतीचा मागोवा घेणे आणि परिणाम पाहणे


आपण रिअलटाईममध्ये आपल्या परिणामांचा मागोवा घेऊ शकता आणि एकदा का प्रमोशन पूर्ण झाले की अंतीम निकाल पाहू शकता:

 1. आपण प्रमोट केलेले ट्विट पहा आणि ट्विटचे तपशील उघडण्यासाठी क्लिक किंवा टॅप करा.
 2. ट्विट क्रियाकलाप प्रतीक  क्लिक किंवा टॅप करा
 3. संघटनात्मक आणि प्रमोटेड सहभागांवरून खालील संयोजित परिणाम आपल्याला पाहता येतील:
  • क्लिक केलेल्या लिंक्स (जर आपल्या ट्विटमध्ये लिंक असेल);
  • इम्प्रेशन्स (आपले ट्विट पाहिलेल्या लोकांची संख्या); आणि
  • एकूण सहभाग (आपल्या ट्विटसह परस्परसंवादांची संख्या).
    

आपल्या प्रमोटेड ट्विटच्या अधिक तपशीलवार विश्लेषण आणि प्रगत नियंत्रणांसाठी, आपण आपले Twitter उपभोक्ता नाव आणि पासवर्ड वापरून ads.twitter.com वर लॉग इन करू शकता. दरवेळी आपण एखादे ट्विट प्रमोट केले की, कॅम्पेन टॅबमध्ये ते स्वतःचे कॅम्पेन म्हणून लॉग इन होते.

आपल्या क्रेडीट कार्डची माहितीची देखभाल करणे


एकदा का आपण आपली क्रेडीट कार्डची माहिती प्रविष्ट केली की ती पुढील ट्विटच्या प्रमोशन्ससाठी वापरली जाते.

आपण ads.twitter.com ला भेट देऊन विद्यमान क्रेडिट/डेबिट कार्ड माहितीत बदल करू शकता किंवा अतिरिक्त कार्डे समाविष्ट करू शकता:

 1. आपले Twitter उपभोक्ता नाव आणि पासवर्ड वापरून ads.twitter.com वर लॉग इन करा.
 2. आपले खाते नाव (वरच्या शीर्षक पट्टीमध्ये) क्लिक करा आणि मेनूमधून पेमेंट पद्धती निवडा.
 3. येथून आपण वापरासाठी डिफॉल्ट कार्ड ओळखू शकता (जर आपल्या ट्विट प्रमोशन्स बरोबर एकाहून जास्त कार्डे संबंधित असतील); कार्ड हटवा; आणि नवीन पेमेंट पद्धती जोडा.

नोट: ट्विट प्रमोशन्स किंवा जाहिरात मोहिमांसह वापरण्यासाठी संग्रहित क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स ads.twitter.com वर संग्रहित केली जातात, Twitter वरून उत्पादने खरेदी करण्यासाठी आपण आपल्या खाते पेमेंट सेटिंग्जमध्ये पेमेंट पद्धतींपासून स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक आहे.
 

माझे प्रमोशन किती काळ टिकेल?

सहसा ट्विट प्रमोशन काही तास टिकून राहते, परंतु एकूण कालावधी बजेट, आपले फॉलोअर्स, फॉलोअर्सची संख्या इत्यादींसारख्या विविध गोष्टींनुसार बदलतो. प्रमोशन सायकल पूर्ण झाले की आपल्याला सूचनापत्र मिळेल.

 

माझे प्रमोटेड ट्विट कोण पाहील?

आपल्या मजकुराची सर्वात जास्त प्रशंसा करण्याची शक्यता असलेल्या लोकांना आम्ही आपली ट्विट पाठवतो. आपले फॉलोअर्स असे लोक आहेत ज्यांनी आपली ट्विट्स पाहण्याची निवड केली आहे असे गृहीत धरून आपल्या सध्याच्या फॉलोअर्सनुसार मॉडेल तयार करतो.

 

आपण कोणती क्रेडिट कार्डे स्वीकारता?

आम्ही सध्या Visa, MasterCard आणि American Express क्रेडिट व डेबिट कार्डे स्वीकारतो. देशांच्या अधिकृत चलनांमध्ये पेमेंट्स स्वीकारली जातात.  Twitter वरील जाहिरातींसाठी पात्रता विषयी अधिक जाणून घ्या.

 

प्रमोटेड ट्विटसाठी समर्थित भाषा कोणत्या आहेत?

प्रमोटेड ट्विट्सनी समर्थित Twitter भाषा वापरणे आवश्यक आहे. यांपैकी काही भाषांत समावेश होतो: बहासा, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, डच, जर्मन, पोर्तुगीज, जपानी, फिनिश, नॉर्वेजियन, स्वीडिश किंवा डॅनिश.  Twitter जाहिराती आणि समर्थित भाषांसाठी पात्रता याविषयी अधिक जाणून घ्या.

 

प्रमोटेड ट्विट्स कोठे प्रदर्शित केली जातात?

आपण प्रमोट करत असलेली ट्विट्स Twitter च्या मालकीच्या आणि चालन केल्या जात असलेल्या कोणत्याही मालमत्तांमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकतात, उदा. होम टाइमलाइन्स, प्रोफाइल्स इ.

 

हा लेख शेअर करा